Animation information in Marathi/ ॲनिमेशन कोर्स विषयी संपूर्ण माहिती

Animation information in Marathi -ॲनिमेशन क्षेत्रात करिअर कसे घडवावे येथे पहा संपूर्ण माहि
ॲनिमेशन हे क्षेत्र आजच्या घडीला सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. या ॲनिमेशन उद्योगाच्या वाढणाऱ्या वेगामुळे व अफाट क्षमतेमुळे या क्षेत्रातील कुशल लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि 12 वी नंतर जर ॲनिमेशन कोर्स चा अभ्यास करण्याचा विचार करत असाल , ॲनिमेशन या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखामध्ये आपण ॲनिमेशन उद्योग या विषयाच्या सर्व शंका दूर करणार आहोत. या लेखात आपण प्रवेश प्रक्रिया, या क्षेत्रातील नोकरीचे पर्याय, या क्षेत्रात मिळणारे वेतन अशा अनेक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.Animation information in Marathi

animation information in Marathi

आपण लहानपणापासूनच अनेक वेगवेगळी कार्टून पाहत आलो आहोत. अनेक वर्षापासून कार्टूनचे लहान वयोगटा तील मुलांच्या मनावर राज्य आहे. आताही मुलांमध्ये कार्टूनचे क्रेझ कमी झालेले नाही. मिकी माऊस, ऑगी अँड द कॉकरोजेस, छोटा भीम, डोरेमॉन असे अनेक कार्टून्स वर्षानुवर्षे चालत आलेली आहेत. याचसोबत आता ट्रेंडी मध्ये असलेले ॲनिमेशन मूव्हीज फार प्रचलित झालेली आहेत.

हे सुद्धा वाचा -ग्राफिक डिझाईन कोर्स विषयी संपूर्ण माहिती

मागील काही वर्षात ॲनिमेशनच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती झालेली आहे. यामुळेच या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक नोकरीचे संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आकर्षक करिअरचे पर्याय उपलब्ध करून ॲनिमेशन क्षेत्र अजून प्रगती करत आहे. ॲनिमेशनचा उपयोग चित्रपट, व्हिडिओ गेम्स, टेलिव्हिजन शो, जाहिराती यामध्ये केला जातो. ॲनिमेटेड व्हिडिओज, मोशन ग्राफिक्स, स्पेशल इफेक्ट्स, चित्रपटांमध्ये वापरले जाणारे व्हिज्युअल इफेक्ट्स यांमुळे या क्षेत्रात पात्र आणि कुशल ॲनिमेटर साठी चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.Animation information in Marathi

animation information in Marathi

ॲनिमेशन हे क्षेत्र पुढील काही वर्षात अजून मोठे होणार आहे. यामुळे या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. ज्यांना चित्र काढण्यात रस आहे, कलेची आवड आहे, डिझायनिंगच्या आवड आहे, तसेच जे विद्यार्थी कार्टूनच्या जगात रमतात ज्या विद्यार्थ्यांना वाटते की ॲनिमेशन ही त्यांची आवड आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ॲनिमेटर म्हणून करिअर करण्याची संधी हा पर्याय योग्य असू शकतो.

अशा विद्यार्थ्यांसाठी ॲनिमेशन मधील अभ्यासक्रम हा एक योग्य पर्याय आहे. ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप संयम असायला हवा ॲनिमेशन हे काम थोडेसे कंटाळवाणे काम आहे. ॲनिमेशन शिकण्यासाठी व ॲनिमेशनमध्ये करिअर करण्यासाठी 3d स्पेस चे अनेक विविध प्रकार समजून घेण्याची क्षमता तसेच कलात्मक कौशल्य आत्मसात करण्याची जिद्द असावी लागते. पुढील लेखात आपण ॲनिमेशन म्हणजे काय याची माहिती घेऊ.


ॲनिमेशन म्हणजे काय?
ॲनिमेशन म्हणजे एखादी रेखाचित्र किंवा छायाचित्र तसेच व्हिज्युअल आणि खऱ्या भासणाऱ्या गोष्टी यांचे एकत्रित करून तयार केलेला भ्रम. भ्रम निर्माण करण्याची ही एक पद्धत आहे याच पद्धतीला ॲनिमेशन म्हटले जाते. एखाद्या स्थिर चित्राचे किंवा तयार केलेल्या प्रतिमेचे जलद गती मध्ये तयार केला जाणारा भ्रम म्हणजे ॲनिमेशन होय .जी प्रतिमा द्रुत गतीने स्थिर प्रतिमा सादर करून केली जाऊ शकते व दर्शवली जाऊ शकते अशा प्रतिमेला ॲनिमेशन संबोधले जाते.(Animation information in Marathi)

या प्रतिमेसाठी चा हा प्रभाव प्रतिसेकंद जवळजवळ 25 ते 30 फ्रेम्स इतक्या अत्यंत वेगाने प्रक्षेपित करून मिळवला जातो. हे कार्य सामान्य फिल्म पेक्षा जास्त वेगाने केले जाते. या प्रक्रियेला ॲनिमेशन असे म्हटले जाते.
ॲनिमेशनच्या प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीची प्रतिमा किंवा एखाद्या कार्टून ची प्रतिमा अनेक वेगवेगळ्या मोशन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ठेवली जाते किंवा ती प्रतिमा मोशन मध्ये आल्याचा भास निर्माण केला जातो.

सुरुवातीला जेव्हा संगणक लॅपटॉप इत्यादी उपकरणे टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेस व्यंगचित्रे हे सुद्धा एक ॲनिमेशन चे उदाहरण आहे. (Animation information in Marathi)त्याकाळी व्यंगचित्रांच्या द्वारे ॲनिमेशन निर्माण केले जात होते. पण कालांतराने आता आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे हे कार्य सहज व सोप्या पद्धतीने होते.


तयार करते त्या व्यक्तीला ॲनिमेटर म्हटले जाते. लहानपणीची कार्टून्स आपण पाहत होतो आता जे एनिमी मुव्हीज आपण पाहतो त्याचा निर्माता हा ॲनिमेटर असतो. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत किंवा फक्त आपण कल्पनेतच त्या गोष्टी पाहू शकतो अशा गोष्टी ॲनिमेशन द्वारे ॲनिमेटर सहज बनवतो. उदाहरणार्थ पाण्याखालील जीवन, ब्रह्मांड, अनेक धोकादायक व भीतीदायक दृश्य ही ॲनिमेशन द्वारे बनवली जातात. पुढील लेखात आपण पुढील लेखात आपण ॲनिमेशन कोर्स च्या प्रकारांची माहिती घेऊ.Animation information in Marathi

Animation information in Marathi


ॲनिमेशन कोर्स चे प्रकार / Animation Courses in Marathi.
Animation Degree Courses –
ॲनिमेशन या कोर्सची संपूर्ण माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला अनेक अभ्यासक्रमांमध्ये डिग्री संपादन होऊ शकते. हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी कोर्सची पात्रता म्हणजे 10 वी व 12 वी हे 50% गुणांनी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. हा कोर्स तीन ते चार वर्षाचा असतो. या कोर्समध्ये तुम्ही खालील विषयांचे संपूर्ण ज्ञान मिळवू शकता.

  • बीए इन ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया
  • बीए इन अनिमेशन अंड सीजी आर्ट
  • बीएससी इन ॲनिमेशन
  • बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्टस
  • बीएससी इन ॲनिमेशन अँड गेमिंग
  • बीए इन डिग्री फिल्म मेकिंग अँड ॲनिमेशन
  • बीएससी इन ॲनिमेशन अँड वी एफ एक्स
  • बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन ॲनिमेशन ग्राफिक्स अँड वेब
  • डिझाईनिंग इन डिजिटल फिल्म मेकिंग अँड ॲनिमेशन

  • ( animation information in Marathi)

Animation Diploma Courses
जर तुम्हाला या क्षेत्रात तीन ते चार वर्षे घालवायचे नसतील. पण ॲनिमेशन चे ज्ञान घ्यायचे असेल व ॲनिमेशन शिकायचे असेल तर तुम्ही ॲनिमेशनमध्ये डिप्लोमा करू शकता. हा ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार वर्षे घालवावे लागत नाहीत. हा ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स हा फक्त एक वर्षाचा आहे. व या कोर्ससाठी ची पात्रता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये 50 टक्के गुण असणे महत्त्वाचे आहे. या ॲनिमेशन डिप्लोमा कोर्समध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स करत असताना तुम्ही खालील पर्याय निवडू शकता.

  • डिप्लोमा इन टु डी ॲनिमेशन
  • डिप्लोमा इन 3d अनिमेशन
  • डिप्लोमा इन सीजी ॲनिमेशन
  • डिप्लोमा इन ॲनिमेशन व्हिडिओ एडिटिंग अँड पोस्ट प्रोडक्शन वर्क
  • डिप्लोमा इन डिजिटल ॲनिमेशन
  • डिप्लोमा इन ॲनिमेशन अँड फिल्म मेकिंग.
    या ॲनिमेशन डिप्लोमा कोर्समध्ये विद्यार्थी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन डिप्लोमा कोर्स पूर्ण करू शकतो.
  • Animation Certification Courses
    या ॲनिमेशन सर्टिफिकेट कोर्स मध्ये अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रम आहेत. यातून आपण आपल्या आवडीचा ॲनिमेशन सर्टिफिकेशन कोर्स घेऊ शकतो. ॲनिमेशन सर्टिफिकेशन कोर्स करण्यासाठी विद्यार्थी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सर्टिफिकेशन कोर्समधील अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
  • सर्टिफिकेशन इन 2d अनिमेशन
  • सर्टिफिकेशन इन वी एफ एक्स
  • सर्टिफिकेशन इन 3d अनिमेशन
  • सर्टिफिकेशन इन सीजी आर्ट
  • सर्टिफिकेट इन एडिटिंग, मिक्सिंग अंड पोस्ट प्रोडक्शन वर्क

  • (animation information in Marathi)
  • हे ॲनिमेशन मध्ये करिअर करण्यासाठी व एक उत्तम ॲनिमेटर बनण्याचे रात करिअर करण्याचे काही पर्याय आहेत. जर तुम्हाला ॲनिमेशन या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही यापैकी कोणत्याही पर्यायातून या क्षेत्रात करिअर घडवू शकता. या क्षेत्रातून शिक्षण घेताना तुम्हाला ॲनिमेशन साठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर यांची चांगल्या प्रकारे माहिती करून दिली जाते तसेच डिझाईन बनवणे, ड्रॉइंग्स चे व्यवस्थित आउटलेट काढणे, योग्य प्रकारे रंगांचा वापर करणे, ॲनिमेशनच्या सॉफ्टवेअर ची संपूर्ण माहिती या सर्व गोष्टींचे ज्ञान दिले जाते.
    या लेखांमधून ॲनिमेशन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तसेच या ॲनिमेशन कोर्सेस चे संपूर्ण ज्ञान व संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.

( animation information in Marathi)

animation course / vfx course admission , job https://youtu.be/OWN08275c8E?si=8pa9pIe375vqwJxH