Avoid food in pregnancy in Marathi:एकदा गर्भधारणा झाली की, गर्भवती स्त्रियांना विशेष लक्ष द्यावे लागते ते म्हणजे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या खाण्यापिण्यावर कारण गर्भवती स्त्रीचे जर आणि चांगले असेल ती जेवणामध्ये योग्य पोषण देणारे घटक सामील करत असेल तर होणारे बाळ सुद्धा तितकेच आरोग्यदायी आणि रोगापासून दुर राहील. गर्भवती स्त्रियांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुमचा आहार पूर्ण पोषण देणारा असेल तर तुमचे बाळ तितकेच आरोग्यदायी आणि तुमचे प्रेग्नेंसी सुद्धा आरोग्यदायी जाईल. तर प्रेग्नेंसी राहिल्यानंतर आपण कोणते अन्न पदार्थ टाळावे आणि कोणते खावे हे आता आपण सविस्तरपणे पाहूयात.
हे अन्नपदार्थ तुमच्या आहारामध्ये सामील करा.
१) मोड आलेली कडधान्य-
मोड आलेली कडधान्य यामध्ये भरपूर सारे प्रोटीन समाविष्ट असते. तसेच ती कडधान्य बाळाच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे मोड आलेली कडधान्य नक्की आपल्या आहारात समाविष्ट करा. जर तुम्ही कच्ची कडधान्य खात असाल तर ती खाण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आणि ती थोडी वाफवून घ्या .कच्ची कडधान्ये खाऊ नका कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे शक्यता असते.
food avoid in pregnancy in Marathi
२) विटामिन सी फ्रुट्स- ( स्ट्रॉबेरी, ऑरेंज)
विटामिन सी प्रेग्नेंसी मध्ये खूप महत्त्वाचे असते. स्ट्रॉबेरी ,ऑरेंज, किवी या पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये विटामिन सी मिळते. या पदार्थामुळे बाळाच्या त्वचेचा रंग उजळण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे दररोज एक विटामिन सी चे फ्रुट्स खाण्यासाठी विसरू नका. जर ही फळे दररोज खाण्याची शक्य नसेल तर एक टोमॅटो सलाड म्हणून दररोजच्या जेवणामध्ये अवश्य सामील करू शकता.
हे सुद्धा वाचा –लहान मुलांच्या आजारांवर घरगुती उपाय
३्) नारळ पाणी-
गर्भावस्थेमध्ये पिशवी मधील पाणी कमी होण्याचे प्रमाण सुद्धा आढळून येते. त्यामुळे बाळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दररोज एक नारळ पाणी पिल्यामुळे बाळाच्या भोवती पिशवीमध्ये जे पाणी असते ते वाढण्यास मदत होते. तसेच बाळाचा रंग उजळण्यास सुद्धा मदत होतो.( Avoid food in pregnancy in Marathi)
४)हिरव्या पालेभाज्या-
खूप साऱ्या पालेभाज्या मधून बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक आपल्याला आरामात भेटून जातात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्व प्रकारचे घटक असतात जसे की विटामिन सी, विटामिन के, विटामिन बी ९ हे सारे घटक बाळाच्या वाढीसाठी खूप आवश्यक्य असतात दररोज एक तरी हिरवी पालेभाजी नक्की आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा शक्यतो जास्तीत जास्त पालक ,मेथी, लालमाठ हिरव्या पालेभाज्या यांचा वापर करा यामुळे लहान बाळांचे हाडे घट्ट होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे त्यांचे इम्युनिटी सिस्टीम होण्यास मदत होईल.
५) दही-
दह्याच्या वापरामुळे भरपूर साऱ्या प्रमाणात विटामिन सी बाळाला भेटते. दही, ताक , लोणी हे अन्नपदार्थ बाळाच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे तसेच एक गर्भवती स्त्रीला हे अन्नपदार्थ अमृत समान मानले जातात. त्यामुळे दररोज एक वाटी दही किंवा ताक यांचा वापर करायला अजिबात विसरू नका.( Avoid food in pregnancy in Marathi)
६) सफरचंद-
तसे बघायला गेले तर सगळेच फळे गर्भावस्था मध्ये खाणे आवश्यक आहे. पण जर सगळी फळे खाणे शक्य नसेल तर दररोज एक सफरचंद मात्र नक्की आहारामध्ये समावेश करा. सफरचंद बाळाच्या आरोग्यासाठी म्हणजे लहान मुलांच्या संपूर्ण पोषक वाढीसाठी आणि गर्भवती स्त्रीच्या आरोग्यासाठी पण भरपूर आवश्यक आहे.
७) अंडी –
गर्भावस्थेत दररोज एक उकडलेले अंडे खाण्यासाठी डॉक्टर सुद्धा सल्ला देतात. अंड्यामुळे गर्भाचे वजन वाढण्यास मदत होते जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग होऊ शकता. अंड्यामध्ये विटामिन b12 , vitamin D , vitamin A , vitamin B2 ,folate , choline , healthy fats आणि भरपूर साऱ्या प्रमाणात महत्त्वाचे असे मिनरल्स असतात. त्याचप्रमाणे यामध्ये भरपूर सारा प्रमाणात प्रोटीन सुद्धा आपल्याला भेटते त्यामुळे अंडी हे एक परिपूर्ण असा आहार मानला जातो.
avoid food in pregnancy in Marathi
) पाणी –
गर्भावस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचे व्यवस्थित पातळी शरीरामध्ये संतुलित राखणे. पाणी जर शरीरामध्ये कमी झाले तर गर्भाची नीट वाढवण्यास त्रास होऊ शकतो. आणि जर पाणी कमी झाले तर डॉक्टर परत तुम्हाला वैद्यकीय मेडिसिन चालू करतात त्यामुळे भरपूर सारे पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. बाळाच्या पिशवी भोवती जे पाणी असते ते सुद्धा आपल्या पाणी पिण्यावर अवलंबून असते.
९) चीज –
चीज या दुग्ध पदार्थांमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये झिंक असते. यामुळे गर्भा च्या वाढीसाठी त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंट साठी तसेच डोळे आणि हाडांच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे गर्भावस्थेमध्ये नक्कीच खा. पण चीज खात असताना ते एक्सपायर झाले नाही ना याची पडताळणी आवश्यक करा.
गर्भावस्थेत कोणते अन्नपदार्थ टाळावे?
avoid food in pregnancy in Marathi)
१) शेवग्याची शेंग-
शेवग्याची शेंगे उष्ण असते त्यामुळे गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये शेवग्याची शेंग खाणे टाळावे. गर्भावस्थेचे पहिले तीन महिने कोणतेही उष्ण पदार्थ जास्त घेऊ नये त्यामुळे गर्भाला त्रास होऊ शकतो.
२) High mercury fish –
गर्भावस्था मध्ये ज्या माश्यांमध्ये हाय मर्क्युरी आढळते असे मासे टाळावे. तसेच खेकडे सुद्धा गर्भावस्थेमध्ये खाऊ नयेत . हाय मर्क्युरी माश्यांमुळे लहान मुलांच्या नर्वस सिस्टीम वर परिणाम होतो.
३) डेरी प्रॉडक्ट-
डेरी प्रॉडक्ट मध्ये जे पदार्थ पाश्चराईज केलेले नाहीयेत. असे दूध पनीर चीज अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू नका यामुळे गर्भावस्था मध्ये इन्फेक्शन तर होतेच तसेच लहान मुलांच्या नर्वस सिस्टीम वर परिणाम होतो.
४) कॉफी चहा-
गर्भावस्थेमध्ये चहा आणि कॉफी यांचे अजिबात जेवण करू नका. कारण आपल्या शरीरामध्ये पर डे 200 एमजी पेक्षा जास्त कॅफेन शरीरामध्ये आढळले तर मिस्कॅरेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉफी आणि चहा यापासून लांब राहा.(Avoid food in pregnancy in Marathi)
५) चायनीज फूड –
चायनीज फुड मध्ये अजिनोमोटो हा रासायनिक पदार्थ चव वाढवण्यासाठी आणि चांगल्या वासासाठी वापरला जातो. गर्भावस्थेत असे रसायन पोटामध्ये गेले तर पोट खराब होण्याची शक्यता असते आणि काही केसेस मध्ये मिस्कॅरेज होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे संपूर्ण गभावस्थेमध्ये अशा रसानापासून दूर राहा.
६) अर्ध शिजलेले मांसाहार –
मांसाहारामधे प्रोटीनचे प्रमाण जरी गर्भावस्थेमध्ये पोषण देणारे असले तरी जर अर्ध शिजलेले मांसाहार जर तुम्ही ग्रहण केलात तर नक्कीच त्याच्यापासून पोट खराब होण्याची शक्यता असते. पोट खराब झाल्यामुळे जुलाब लागू शकतात आणि त्यामुळे शरीरातील तसेच बाळाच्या पिशवी भोवती पाणी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण शिजलेले अन्न ग्रहण करा.( Avoid food in pregnancy in Marathi)
७) पपई-
पपई हा पदार्थ भरपूर उष्ण पदार्थ आहे. गर्भावस्थेमध्ये शरीरामध्ये गर्मी होईल असे अन्नपदार्थ नेहमीच टाळावेत त्यामुळे मिस्कॅरेज होण्याची शक्यता असते. तसेच पपईच्या बियांमध्ये असे एंजाइम असतात ज्यामुळे लेबर स्टार्ट होते आणि ब्लीडिंग होऊन मिस्कॅरेज होण्याची शक्यता असते.
८) अननस –
अननस यामध्ये bromelain नावाचे रसायन असते . यामुळे आपल्याला लवकर labour contraction जाणू लागतात. त्यामुळे ब्लीडिंग होऊन मिस कॅरेज होण्याची शक्यता असते.
९) पीच-
पीच हे पण जर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये गर्भावस्थेमध्ये ग्रहण केला तर शरीरामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात उष्णता वाढून मिस्कॅरेज शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला या फळाचे डोहाळे गरोदरपणात लागले असतील तर अगदी कमी प्रमाणात ग्रहण करा.
१०) शिंपले-
अर्धवट शिजलेल्या शिंपल्याचे तर त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे शक्यता असते त्यामुळे आपल्या गर्भातील गर्भाच्या वाढीसाठी त्रास उद्भवू शकतो.
(avoid food in pregnancy in Marathi)
गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घडामोड असते. या गर्भावस्थेच्या वळणावरती चालत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ही म्हणजे गर्भावस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, टेन्शन यापासून दूर राहावे. आपल्याला जमेल तितके मेडिकेशन, व्यायाम करावा. चांगली पुस्तके वाचावी. मन अगदी शांत ठेवावे. कारण या सगळ्या गोष्टींचा आपल्या गर्भात वाढत असणाऱ्या गर्भावर्ती परिणाम होतो. हे नऊ महिने त्याच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही जितके स्ट्रेस फ्री राहाल तितके होणारे बाळ सुद्धा शांत आणि त्याचा मेंदू छान विकसित झालेला तुम्हाला दिसून येईल. तसेच योग्य असा आहार आणि भरपूर सारे पाणी आपल्या आहारात समाविष्ट करावे.( Avoid food in pregnancy in Marathi)
गरोदर पणा ची लक्षणे https://youtu.be/QCa4xvqoGeA?si=9Ee7YSD0-nmks5gv