Balguti ingredients in Marathi -बाळगुटी म्हणजे आईचे स्तनपान सोडून दिले जाणारे पहिले अन्न. बाळगुटी लहान बाळांना त्यांच्या शारीरिक विकासासाठी खूप आवश्यक असते. आपण जे स्वयंपाक घरामध्ये मसाले वापरतो त्यातील काही असे मसाले आहेत ज्यांच्या वापरामुळे लहान बाळांचा आजार आपण घरच्या घरी कमी करू शकतो. तर बाळगुटी ही आईच्या दुधामध्ये उगाळून बाळाला दिले जाते. तर आता आपण बाळगुटी आणि त्यांचा वापर कशासाठी केला जातो हे आता आपण पाहूयात.
Balguti ingredients in Marathi : बाळगुठी
जायफळ
जायफळाचा वापर आपण स्वयंपाक घरामध्ये करतो. जायफळ लहान मुलांना उगाळून दिल्यास लहान मुलांना झोप शांत लागते. लहान मुलांना जुलाब झाले असतील तर आईच्या दुधामध्ये जायफळ दोन ते तीन वेडे ( balguti ingredients in Marathi) वाढवावेत आणि लहान मुलांना याचीच आठवण द्यावी त्यामुळे जुलाब कमी होण्यास मदत होते. जायफळ मुळे लहान मुलांची स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा – लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी हे करा
मुरुड शेंग
लहान मुलांमध्ये मुरडा कमी करण्यासाठी मुरुड शेंगचा वापर केला जातो. लहान मुलांमध्ये पोटातील कृमी कमी होण्यास मदत होते. लहान मुलाला वारंवार पातळ शौचास होत असेल तर बाळगुटी मध्ये मुरुड शेंगचे प्रमाण वाढवावे.
ज्येष्ठमध
लहान मुलांच्या छातीमध्ये कफ जमा झाला असल्यास बाळगुटी मध्ये जेष्ठमधाचे प्रमाण वाढवावे आणि या बाळगुटी मध्ये दोन ते तीन थेंब मध आणि जेष्ठमधाचे मिश्रण लहान बाळाला दिल्याने कफ कमी होण्यास मदत होते. ज्येष्ठमधामुळे आवाज मंजूळ होण्यास मदत होते. तसेच लहान मुलांचे पोटही ज्येष्ठमधामुळे साफ राहते. ज्येष्ठमध लहान मुलांची त्वचा उजळण्यासाठी मदत होते.
वेखंड
लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी ताप खोकला होत असेल तर वेखंड हा त्रास कमी करण्यास मदत करते तसेच वारंवार जंतुसंसर्ग होत असेल तर वेखंडाच्या सेवनामुळे आराम मिळतो. लहान मुलांमध्ये स्पष्ट उच्चारा साठी वेखंड खूप मदत करते. बाळगुटी मध्ये पाच ते सहा वेढे वाढवावेत.
हे सुद्धा वाचा – लहान मुलांसाठी घरगुती उपाय
हळकुंड
हळकुंड हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सर्रास वापरले जाणारे मसाला आहे. याच्या वापरामुळे लहान मुलांमध्ये सर्दी खोकला यापासून आराम मिळतो. तसेच कोणत्याही प्रकारचा त्वचारोग होण्यापासून वाचण्याची शक्ती यामध्ये असते. हळकुंड बाळ गुटी मध्ये देताना दोनच फेरे वाढवावेत.
काकड शिंगि
काकड शिंगी ही मुलांमध्ये दात येताना खूप फायदेशीर ठरते. तसेच सर्दी खोकला उलटी या आजारांवर सुद्धा काकड शिंगे उपयोगाची ठरते. लहान मुलांमध्ये उचकी साठी सुद्धा कापड शेंगेचा वापर केला जातो.
अश्वगंधा
काही मुलांच्या मध्ये बाळसे येत नाही म्हणजेच लहान मुले गुटगुटीत होत नाहीत. त्यामुळे अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे बाळाचे वजन वाढायला मदत होते तसेच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास खूप मदत होते.
सुंठ
सुंठ हा अतिशय महत्त्वाचा भाग बाळगुटी मध्ये येतो. सुंठ मुळे लहान मुलांमध्ये आवाज सुधारण्यामध्ये मदत होते. तसेच लहान बाळांमध्ये वात झाला असेल तर सुंठ चे प्रमाण बाळगुटी मध्ये वाढवून बाळांना दिल्यास त्यांचा त्रास कमी होतो. तसेच लहान मुलांमध्ये जर पोट दुखीचा त्रास होत असेल तर सुंठ चे प्रमाण वाढवून लहान मुलांना आपण देऊ शकतो.
बदाम
आपल्याला सर्वांना माहित आहेच की बदाम हे लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते. नवजात मुले असतील तर आदल्या दिवशी रात्री बदाम भिजत घालावे आणि दुसऱ्या दिवशी ते चांगल्या दगडावरती उगाळून लहान मुलांना द्यावे. बदाम मुळे लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती तर वाढतेच त्याचबरोबर त्यांचे वजन वाढायलाही मदत होते. मुल एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला एक पूर्ण बदाम देण्यास काही हरकत आणि जसे जसे मुल मोठे होत जाईल तसेच दोन-तीन बदाम भिजवून त्याचे साल काढून लहान मुलांना देण्यास हरकत नाही.
खारीक-
बाळगुटी मध्ये जेव्हा एखाद्या प्रकारचे चाटण आपण लहान बाळांना देतो. तेव्हा त्याची चव वेगळी लागते. म्हणून लहान मुले हे बाळगुटीचे चाटण खाण्यास बघत नाही. त्यामुळे त्या बाळगुटी मध्ये पाच ते सहा फेरे खारीकचे वाढवल्यास ते चाटण गोड होण्यास मदत होते.(Balguti ingredients in Marathi)तसेच या खारीकचे खूप असे उपयुक्त फायदे आहेत. यामध्ये खारीक हे शरीराला मजबूतपणा देते. त्यामुळे खारीक हे लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असे अन्न आहे. तसेच खारीकमुळे लहान मुलांचे वजन वाढण्यास खूप मदत होते.
पिंपळी-
पिंपळी या बाळगुटी चा उपयोग मुख्यपणे पचन संस्थेसाठी केला जातो. बाळाला वारंवार वात होत असेल तर पिंपळी बाळगुटी मध्ये महत्त्वाचा रोल बजावते. तसेच बाळ वारंवार आजारी पडत असेल म्हणजेच बाळाला सारखाच सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर पिंपळी त्यावर गुणकारी आहे. तसेच लहान मुलांना भूक लागत नसेल तर पिंपळी चा फेर बाळगुटी मध्ये वाढवावा आणि लहान मुलांना याचे चाटण घ्यावे.
वावडिंग–
वावडिंग हे रक्त शुद्ध करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वावडिंग याचा वापर जंत मारण्यासाठी सुद्धा केला जातो. असे म्हटले जाते की बाळ वर्षाचे होईपर्यंत हळूहळू वावडिंग याचा फेर वाढवत गेल्यास बाळाला कोणताच त्रास होत नाही.
डिके माली
डिके माली हा एक प्रकारचा डिंक असून याचा वापर बाळगुटी मध्ये केला जातो. प्रामुख्याने बाळाला दात येताना होणारा त्रास थांबवण्यासाठी याचा फार फायदा होतो. तसेच डीकेमाली मुळे बाळाला जंत होत नाही.
जिरे
जिरे प्रामुख्यान बाळगुटी मध्ये वापरले जात नाही. पण जर लहान मुलांना गॅसचा त्रास होत असेल. आणि तुम्हाला आपल्या बाळाला बाळगुटी द्यायची नसेल. तर जिरे, बडीशोप, सुखे खोबरे आणि ओवा यांचे मिश्रण करून एका डब्यामध्ये भरून ठेवा . आणि दररोज जेवल्यानंतर एक चमचा नक्की खा. त्यामुळे लहान बाळांना गॅसचा त्रास होणार नाही. आईच्या दुधामधून हे सारे पदार्थ त्यांना भेटतात. त्या मिश्रणामुळे त्यांना पोट दुखी असेल तरी त्याचा त्रास कमी होऊन जातो.
लहान मुलांना बाळगुटी देण्याचे फायदे पुढील प्रमाणे
- लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवते
- लहान मुलांच्या पचन क्रिया सुधारण्यासाठी बाळगुटी महत्वाची आहे.
- कोणत्या प्रकारच्या श्वसन तक्रारी वरती फायदेशीर
- चांगली झोप लागण्यासाठी फायदेशीर
- खूप वाढण्यासाठी घरगुती महत्त्वाचे काम कर
- दात येताना त्यांना जास्त त्रास होत नाही.
- मुलांचे वजन वाढण्यास मदत होते.
बाळाला बाळगुटी देताना घ्यावयाची काळजी
१) सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे नवजात मुलांसाठी जर आपण बाळगुटी करत असेल तर प्राथमिक स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे.
२) बाळाचा आजार जास्तच वाढत जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वप्रथम गरजेचे असेल.
३) बाळगुटी करताना वापरला जाणारा दगड हा सुद्धा प्रत्येक वेळी स्वच्छ करून घेणे खूप गरजेचे आहे.
४) बाळगुटी मध्ये वापरले जाणारे सामान एकदा वापरल्यानंतर ते स्वच्छ कोरड्या ठिकाणी हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवणे गरजेचे आहे. कारण बाळगुटी तयार करताना आपण दुधाचा किंवा पाण्याचा वापर करतो त्यामुळे बाळगुटी च्या सामानाला शक्यता असते.
५) बुरशी आलेले बाळगुटीचे सामान अजिबात वापरू नये.
६) बाळगुटी नेहमीच ताजी करून बाळाला द्यायची आहे. चुकून सुद्धा बाळगुटी अगोदरच करून ठेवू नये. बाळगुटी तयार केल्यानंतर लगेचच बाळाला द्यावी.
७) बाळगुटी बाळाला दिल्यानंतर त्याचा काही वेगळा त्रास तर बाळाला होत नाही ना याच्याकडे लक्ष द्यावे. आणि जर तसे आढळल्यास योग्य ती काळजी घ्यावी.
Recent Comments