Bandhkam kamgar diwali bonus 2024 आपले महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील गरीब ,आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, अल्पसंख्यांक, कामगार लोक, शेतकरी लोक, तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हेच आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे. जनतेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय सक्सेसफुल झालेली योजना आहे. आता आपल्या सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारचा जीआर सुद्धा जाहीर झालेला आहे.
Bandhkam Kamgar diwali bonus 2024 : या दिवाळीला कामगारांना मिळणार बोनस
एन दिवाळीच्या तोंडावरती ही घोषणा करून त्यांनी कामगारांना खुशखबर दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील कामगारांना दिवाळीसाठी बोनस देणे म्हणजे त्या कामगारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजकालच्या वाढत्या महागाईमुळे त्यांचे उत्पन्न म्हणजेच त्यांना त्यांच्या रोजगारातून मिळणारा पैसा आणि घर खर्च चालवणे म्हणजे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत. सामान्य जीवन जगताना त्यांना त्यांचा रोजगार खूप विचार करून खर्च करावा लागतो. पण दिवाळी म्हटली तर आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतामधील सगळ्यात मोठा सण. आणि सण म्हटला तर खर्च हा होणारच. पण हा खर्च सामान्य कामगारांना परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे दिवाळीत त्यांना बोनस मिळणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
महाराष्ट्र राज्यातील 54 लाख 38 हजार 585 नोंदी असलेल्या बांधकाम कामगारांना बोनस मिळणार आहे अशी घोषणा केलेली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती याचे निमंत्रण शंकर पुजारी यांनी आपल्याला दिलेली आहे . याबाबत जास्त माहिती देताना शंकर पुजारी यांनी सांगितले की, ज्या कामगारांच्या नोंदी आहेत त्यांना दिवाळीपूर्वी 5000 चा बोनस देण्यात येईल. यामध्ये जवळपास 27 19 कोटी 29 लाख रुपये रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे.
हे सुद्धा वाचा – शिलाई मशीन योजना २०२४
दिवाळीच्या पुर्वी बोनस मिळावा म्हणून या कामगारांनी आझाद मैदानामध्ये आठ ऑक्टोंबर 2024 त्यादिवशी मोर्चा काढण्यात आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी कामगार सुरेश खाडे यांनी सुद्धा ज्या कामगारांची नोंद आहे त्यांना बोनस द्यावा असे सरकारकडे निवेदन केले होते.
शेवटी या कामगारांच्या सरकारने मागणी मान्य केली असून त्यांना बोनस देण्यात येणार आहेत असे घोषित केलेले आहे. परंतु त्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी असणे खूप आवश्यक आहे.
त्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारने या कामगारांचा विचार करून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेऊन ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. आणि या योजने द्वारे कामगारांना आर्थिक बळ देण्याचे त्यांनी काम केले. तसेच या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील नोंदणी बांधकाम कामगार यांना होणार असून या योजनेअंतर्गत कामगारांना पाच ते दहा हजार असा बोनस देण्यात येईल.
तसेच या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना इतर प्रकारच्या योजना सुद्धा सरकार मार्फत पुरवल्या जातात त्यामध्ये कामगारांसाठी आरोग्याचा विमा, त्यांच्या आरोग्याची तपासणी, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना, आणि भविष्य निर्वाह निधी यांचा सुद्धा समावेश आहे.
तर चला आता आपण पाहूयात बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 या योजनेअंतर्गत कोणत्या अटी पात्रता, अपात्रता तसेच सरकारच्या या धोरणा मागे उद्दिष्ट आणि फायदे काय आहेत सविस्तरपणे पाहून घेऊयात.
काय आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजना ?
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम विभागातील कामगारांना दिवाळीमध्ये पाच हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. योजना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत केली जाणार आहे.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस पात्रता
१) अर्ज करणाऱ्या कामगाराचे वय 18 ते 60 या वयोगटातील असावे.
२) त्या कामगारांनी मागील बारा महिन्यांमध्ये किमान 90 दिवस तरी काम केलेले असावे.
३) या दिवाळी बोनस साठी नोंदणीकृत कामगार गरजेचा आहे किंवा त्याची नोंदणी चालू असावी.
४) अर्ज करणारा सदस्य हा महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य केलेला असायला हवा.
५) अर्ज करणारा सदस्य हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
६) सरकारने नेमून दिलेल्या नियमावलीनुसार तो सर्व अटींमध्ये पात्र असावा तरच तो बांधकाम कामगार दिवाळी बोनस यासाठी पात्र ठरेल.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस अपात्रता
१) कामगाराचे वय अठरा वर्षाच्या आत मध्ये आणि साठ वर्षाच्या वरील नसावे
२) कामगार हा महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी नसावा.
३) तर त्याचे नोंदणीकृत कामगारांमध्ये नाव नसेल तर तो सदस्य अपात्र ठरेल.
४) राज्य किंवा केंद्र सरकारकडून सुरू असणाऱ्या इतर बोनस सुविधांचा त्याला जर लाभ मिळत असेल तरी या योजनेकडून त्याला बोनस भेटणार नाही.
५) कामगार आणि बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा कमी काम बांधकाम कामगार म्हणून केलेले असेल तर त्याला बोनस मिळणार नाही.
६) सरकारने नेमून दिलेल्या नियमांमध्ये जर कामगार पात्र नसेल तर त्याला बोनस भेटणार नाही.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस २०२४ आवश्यक्य कागदपत्रे
- पुढिलपमाणे –
- कामगाराचे स्वतःचेआधार कार्ड
- कामगाराचे स्वतःचे पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- कामगाराने ९० दिवस बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून केलेले प्रमाणपत्र.
- कामगाराचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
- कामगाराची स्वतःचे बँक पासबुक त्याची झेरॉक्स
- कामगाराचा स्वतःचा मोबाईल नंबर.
- कामगार काम करत असलेल्या ठिकाणाचा पत्ता
- ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र
- महानगरपालिका कडून तो कामगार बांधकाम कामगार आहेत याचे प्रमाणपत्र
- सदस्य चा जन्मदाखला
बांधकाम कामगार दिवाळी बोनस २०२४ सरकारचे उद्दिष्ट
१) दिवाळी सारख्या मोठ्या सणाला गरीब कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लावणे.
२) कामगारांची दिवाळी सुखाची करणे.
३) दिवाळी सणामध्ये आर्थिक मदतीमुळे त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे.
४) 2024 चा दिवाळी सण बांधकाम कामगारांसाठी आनंददायी बनवणे.
५) बांधकाम कामगारांना पाच ते दहा हजार असा दिवाळी बोनस उपलब्ध करून देणे.
अर्ज कसा सादर करावा ?
सरकारच्या या बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजनेसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा.- अर्जासोबत विचारलेली सर्व माहिती नीट भरून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. आणि तो अर्ज आपल्या जवळच्या भागातील कामगार कार्यालयात जमा करावे.
हे सुद्धा वाचा – आता वारकऱ्यांना ही मिळणार पेन्शन
बांधकाम कामगार योजनेचे फायदे
गरीब कामगारांना त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे भेटतील.- कामगारांना विमा तसेच त्यांना काम करत असताना काही शारीरिक इजा झाली असेल तरी या योजनेअंतर्गत अजून काही ज्या योजना आहेत त्यांच्या अंतर्गत इलाज करणे.
- कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.
- दिवाळीच्या अधिक खर्चाच्या महिन्यामध्ये सरकार कडून पैसे भेटत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कर्जाचे सावट कामगारांवर ती राहणार नाही.
- समाजातील मागासलेल्या घटकांचा विकास करणे.
- त्यांच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहन देणे.
- कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे.
- तर वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची नीट पडताळणी करा, बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजनेसाठी कोण कोणती पात्रता अपात्रता आहे हे नीट व्यवस्थित पडताळून पहा. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरताना चूक झालेली नाही हे आवश्यक दोन वेळा चेक करून मगच फॉर्म सबमिट करा. आणि या बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा फायदा घ्या.
धन्यवाद
तुम्हाला नवनवीन निबंध वाचण्यास आवड असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Recent Comments