Dasara marathi nibandh 2024 दसरा म्हणजे सत्याचा असत्यावरती विजय . असे म्हटले जाते की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनी आपल्या सैन्याबरोबर देवी सीतेची सुटका करून राक्षस रावणाचा वध केला होता. आणि विजय मिळवला होता त्याच विजयाचा आनंद म्हणून सगळीकडे दसरा उत्साहाने साजरा केला जातो. यालाच विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा दसरा हा सन रामायण तसेच महाभारत या दोन्ही पौराणिक कथांशी संबंधित आहे.
या दिवशी सर्व शस्त्रांची देखील पूजा केली जाते. असे म्हटले जाते की दसऱ्याच्या दिवशी देवी महिषासुरमर्दिनी महिषासुर राक्षसाचा वध केला होता आणि विजय मिळवला होता. म्हणून दसऱ्यामध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. आणि दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटून म्हणजेच सोने वाटून हा आनंद साजरा केला जातो.
Dasara marathi nibandh 2024 : नवरात्रीचे नऊ रंग २०२४
हे सुद्धा वाचा – रक्षाबंधन मराठी निबंध
दसरा हा सण फक्त धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा नाही त्यामागे आपली संस्कृती चा ठेवा जपलेला आहे. दसरा म्हणजेच दशहरा . आणि दशहरा म्हणजे दहा दुर्गुणांवरती विजय मिळवणे. दसरा हा सन हिंदू लोकांच्या मध्ये खूप पवित्र असा सन मानला जातो. कोणत्याही कामाची नवी सुरुवात करायची असेल तर दसरा हा दिवस कायमच लोक निवडतात. त्या दिवशी सोन्याची खरेदी करायची मान्यता आहे. कारण सोने हे लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून अशा पवित्र दिवशी सोने खरेदी करणे यासाठी लोक प्रोस्ताहन देतात.
दसऱ्याच्या या नऊ दिवसांमध्ये घटस्थापना म्हणजेच प्रत्येक घरात किंवा मंदिरात घट पुजवून त्याची पूजा केली जाते. तर हा घट बसवताना एका मातीच्या भांड्यामध्ये गाडी किंवा गहू पेरून त्याची पूजा केली जाते. आणि नऊ दिवस अखंड दिवा पेटवला जातो. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास सुद्धा लोक करतात. लोकांच्या अशी मान्यता आहे नऊ दिवस उपवास केल्याने मन पवित्र होते. नवरात्रीच्या उपवासामध्ये फक्त वरीचे तांदूळ बटाटे, रताळे खिचडी असे पदार्थ ग्रहण करून उपास करतात.
या नऊ दिवसांमध्ये दुर्गाशक्ती पिठाचे वाचन केले जाते. हे पठन अत्यंत पवित्र मानले जाते. देवीचा आशीर्वाद मिळावा आणि संसारातून सगळी दुःख कष्ट दूर व्हावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी लोक पठण करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कन्या पूजनला विशेष महत्त्व आहे. ते म्हटले जाते की लहान मुलींच्या रूपामध्ये पृथ्वीतला वरती हे नऊ दिवस फिरत असते. त्यामुळे हिंदू धर्मात कन्या पूजन ला फार विशेष महत्त्व आहे. लहान कन्या स्वरूप मुलींना आदराने पूजा करून त्यांना गोडधोड खायला घातले जाते. म्हणूनच दसरा हा सण फक्त धार्मिक पौराणीक कथांशी निगडित नसून हा सण, साधना, एकता सर्व गोष्टींचे श्रद्धास्थान आहे.
हे सुद्धा वाचा – संस्कारांचे महत्त्व मराठी निबंध
नवरात्री संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळे ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. गुजरात मध्ये दांडिया गरबा नऊ दिवस खेळून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कलकत्ता मध्ये आई दुर्गेचे पूजन करून विशिष्ट प्रकारचे नृत्य करून साजरी केली जाते. तसेच वेगवेगळ्या भागात प्रत्येक ठिकाणी चालीरीती वेगवेगळ्या बदलत जातात. नवरात्रीच्या नऊ दिवसात लोकांचा उत्साह मात्र तुडुंब भरलेला असतो.नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी दुर्गेचे पूजन केल्यामुळे भक्तामध्ये असे श्रद्धास्थान आहे की सुख-समृद्धी समाधान, आरोग्य, धन यांची प्राप्ती होते. नवरात्रीच्या नऊ पवित्र दिवसांमध्ये उपवास केल्यामुळे शरीराची आणि मनाची पूर्ण शुद्धी होते अशी मनोकामना भक्ताच्या मनामध्ये असते.
दसऱ्याचे धार्मिक महत्त्व
पौराणिक रामायणातील महत्त्व
रामायणामध्ये अशी कथा आहे की प्रभू श्रीरामांनी दसऱ्याच्या दिवशी रावण नावाचा एक राक्षस होता. त्याने माता सीतेचे अपहरण केले होते. तरी याच दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून वाईट शक्ती वरती विजय मिळवला होता. आणि सत्याचा विजय झाला होता. म्हणूनच या विजयाचा आनंदोत्सव म्हणजेच दसरा. दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा करून त्याचे दहन केले जाते. असे मानले जाते की सत्याचा हा असत्या वरती विजय आहे.
शस्त्रपूजन
दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील वाहन तसेच वापरात येणारे शास्त्र यांची पूजा केली जाते. शेतकरी वर्षभर लागणाऱ्या अवजारांची पूजा करतात. विद्यार्थी आपल्या पुस्तकांचे पूजन करतात. घरातील गृहिणी आपल्या दररोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूंचे पूजन करतात.
देवी महिषासुरमर्दिनीच्या विजय
पौराणिक कथेनुसार देवी महिषासुरमर्दिनी या दिवशी महिषासुर राक्षसाचा वध केला होता. या दोघांच्या मध्ये जवळपास दहा दिवस युद्ध चालले होते. दहाव्या दिवशी देवी महिषासुरमर्दिना त्या युद्धामध्ये विजय मिळाला होता. म्हणून दसरा हा दिवस मोठ्याने साजरा केला जातो.
आता आपण नवरात्रीमध्ये उत्साहाने साजरा करणाऱ्या नऊ रंगांची माहिती घेऊया . तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोणत्या दिवशी कोणता रंग आलेला आहे ते आता आपण पाहूयात. नवरात्रीची सुरुवात ही तीन ऑक्टोंबर पासून होत आहे.
कोणते आहेत नवरात्रीचे नऊ रंग 2024?
पहिला दिवस – पिवळा
आपला हिंदू संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे कोणत्याही प्रकारची पूजा असो. पिवळी कपडे परिधान करण्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. तर हा रंग मनाला आनंद आणि शांतता देणार आहे.
दुसरा दिवस- हिरवा रंग
हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. हिरव्या रंगामुळे डोळ्यांना शितलता भेटते.
तिसरा दिवस- राखाडी रंग
राखाडी रंगा साधेपणा दर्शवतो.
चौथा दिवस- नारंगी रंग
हा रंग सकारात्मकता तसेच ऊर्जा यांचे प्रतीक म्हणजे नारंगी रंग. मन प्रसन्न आणि तजेलदार ठेवतो.
पाचवा दिवस- पांढरा रंग
पांढरा रंग हा शांतता दर्शवतो. पांढऱ्या रंगाला नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहेच त्याचप्रमाणे महाशिवरात्री श्रावण यासारख्या दिवसांमध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व आहे.
सहावा दिवस- लाल रंग
लाल रंगा प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीमध्ये माता दुर्गेला लाल रंगाची ओढणी परिधान केली जाते. भक्ती आणि शक्ती याचा मिलाफ म्हणजे लाल रंग.
सातवा दिवस- निळा रंग
निळा रंग उस्फूर्तपणा तसेच मनाला समृद्धी देणारा रंग आहे.
आठवा दिवस- गुलाबी रंग
गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे मनाला शितलता येते.
नऊवा दिवस – जांभळा रंग
जांभळा रंग हा भव्यता दर्शवतो. तसेच या रंगामुळे मनाला एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती भेटते.
दहावा दिवस- मोरपंखी रंग
मोरपंखी रंग हा सगळ्यांच्याच आवडीचा रंग असून मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद या रंगापासून भेटतो.
नवरात्रीमध्ये उपवास कोणी करू नये?
नवरात्रीमध्ये एखादी व्यक्ती वारलेली असेल. म्हणजे ज्या घरात सुतक चालू असेल त्यांनी नवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालतो.
स्त्रिया मासिक पाळी मध्ये असतील तर उपवास करू नये.
ची महिला गरोदर आहे, किंवा जी महिला स्तनपान करत असते . उपवास नाही केला तरी चालतो.
ज्या व्यक्ती आजारी आहेत म्हणजे हृदय ,किडनी यासारख्या आजाराने ग्रस्त आहेत. तेव्हा ज्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे.
जे लोक गोळ्यावरती अवलंबून आहेत.
मनामध्ये देवाविषयी पवित्र भावना असेल तरच उपवास करावा. जर आपले मन पवित्र असेल तर आपण केलेल्या उपवास देवापर्यंत कधीच पोहोचणार नाही.
नवरात्री मध्ये काय करू नये ?
- नवरात्रीमध्ये केस आणि नखे कापू नयेत.
- नवरात्रीमध्ये जर आपल्या घरी कोणी व्यक्ती आली तर तिला उपाशी पाठवून देऊ नये.
- घरामध्ये मोठ्या मोठ्याने कर्कश असे आवाज करू नये.
- नवरात्रीच्या काळात घरामध्ये भांडण तंटा टाळावा.
नवरात्रीमध्ये काय करावे ?
- नवरात्रीमध्ये कन्या पूजन नक्की करावं
- घरात कोणती महिला आली असेल तर तिची ओटी भरूनच तिला पाठवावे.
- नवरात्रीमध्ये अन्नदान वस्त्रदान नक्की करावं.
- कसा केला दुर्गा मातेने महिषासुरचा वध
Recent Comments