Food Allergy Symptoms In Marathi -आपल्या दररोजच्या जेवणातील काही अन्य पदार्थामुळे आपल्याला एलर्जी होते . या अलर्जीमुळे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांवरती या एलर्जी ची वेगळी वेगळी लक्षणे जाणवतात. सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण काही अन्य पदार्थ ग्रहण करतो तेव्हा आपल्याला शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होते पण आपल्याला समजत नाही की आपल्याला हा त्रास का जाणवत आहे ते मग आपल्या डॉक्टरांच्या फेऱ्या चालू होतात.
Food Allergy Symptoms in Marathi : खाद्यपदार्थांमुळे होणारी एलर्जी
मग यापासून वाचण्यासाठी ज्या अन्य पदार्थामुळे आपल्याला ऍलर्जी होते ,त्यांची निरीक्षण करून जर आपण अशा अन्नपदार्थ पासून दूर राहिलो तर आपले शारीरिक नुकसान होण्यापासून आपण वाचू शकतो. आपल्या शरीराच्या लहान आतड्यांमध्ये एक प्रती रक्षक प्रणाली असते त्याला इम्युनोग्लो ब्युलिन असे म्हणतात. तर याचे मुख्य काम म्हणजे जे एलर्जीकारक घटक आहेत त्यांना रक्तामध्ये मिसळू न देणे. त्यामुळे आपल्या अन्य पदार्थांमधून जर काही एलर्जी कारक पदार्थ आपल्या शरीरात गेले तरी आपल्याला त्यांचा जास्त त्रास होत नाही.
आहारामुळे होणारी एलर्जी-दुधाची एलर्जी–
ज्या नवीन माता आहेत त्यांच्या सर्रास बोलणे असते की , जेव्हा लहान बाळाला गाईचे दूध देतो तेव्हा त्याला त्रास होतो. तर हा त्रास कशामुळे होतो ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया.आईचे दूध पिताना बाळाला त्रास होत नाही. पण जेव्हा गायचे दूध लहान बाळाला दिले जाते तेव्हा त्याला अपचन ,उलटी, पोट दुखी, ताप अशा गोष्टींचा त्रास होतो . तर गाईच्या दुधामध्ये बिटा लक्टोग्लोब्युलिन नावाचे प्रथिन असते . तर हे प्रथिन दूध उखळल्यानंतर सुद्धा यामध्ये काहीच बदल होत नाही.त्यामुळे लहान मुलांना या समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे ज्या अन्न पदार्थामुळे लहान मुलांना त्रास होतो शक्यतो अशे पदार्थ लहान मुलांना देऊ नये.
इतर अन्य पदार्थ–
जवळपास सगळ्याच अन्न पदार्थामुळे आपल्याला एलर्जी होते. पण प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्रत्येकाला त्याची जाणीव होत नाही. अन्नपदार्थां मध्ये दूध, अंडी ,मासे, चिकन, खेकडा, शेंगा इत्यादी अन्नपदार्थामुळे एलर्जी होण्याचे शक्यता आहे.
फळभाज्या-
फळे आणि भाज्या या आपल्या दररोजच्या जेवणामधल्या गोष्टी आहेत. खूप लोकांना या फळभाज्यांचा त्रास होतो पण आपण बारीक सारी गोष्टींकडे लक्ष देत नसल्यामुळे कुठल्या अन्नपदार्थांमुळे आपल्याला त्रास होतो हे आपल्याला समजून येत नाही. फळ आणि भाज्यांमध्ये वांगे , केळी, दुधी भोपळा, पालक, लालमाठ, संत्री, नारळ इत्यादी गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला एलर्जीचा त्रास होतो.
एलर्जी होण्याची कारणे–
आज-काल अन्य पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी रासायनिक आणि कृत्रिम रंग आणि रसायने यांचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे केमिकल रसायनामुळे एलर्जीचे प्रमाण वाढले आहे.
आहारातिल रसायणे आणि एलर्जी ची लक्षणे .
टॉट्रॅजिन –
नावाचे रसायन हे अन्नपदार्थ प्रामुख्याने पिवळा रंगासाठी वापरले जाते. यामुळे आपल्याला पित्ताचा आणि दमा याचा त्रास होतो. तसेच आपल्याला काही त्वचारोग त्यांचा सुद्धा त्रास होऊ शकतो यामध्ये त्वचेला खाज येणे, त्वचेखाली सूज येणे यासारख्या गंभीर समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.
चायनीज साल्ट/ मोनो सोडियम ग्लुटामेट-
अन्नपदार्थांना चांगली चव आणि चांगला सुहास येण्यासाठी हे चायनीज साल्ट वापरले जाते. त्यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. तसेच पोटदुखी उलटी आणि जुलाब यांचा सुद्धा त्रास होऊ शकतो.
सलफाईट
सुक्या मेवाच्या दीर्घकाळ टिकवण्यासाठी, तसेच फळे आणि फळांच्या रसामध्ये सुद्धा आहे रसायन वापरले जाते. त्यामुळे पोट दुखी व दम लागण्याचा त्रास होऊ शकतो. फळे आणि भाज्या यांचा थेट संबंध तोंड आणि घसा यांच्याशी येतो त्यामुळे आपल्याला ओरल एलर्जी सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो.
काही रसायनांच्या थेट संपर्क मुळे डोळ्याखाली सूज येणे, ओठांना सूज येणे, डोळ्यांना खाज येणे, आपल्या शरीरावरती त्वचेवर लाल चट्टे उठणे, तसेच त्वचेवरती खाज , एकसारखे शिंका येणे, खोकला इत्यादी एलर्जीला सामोरे जावे लागते.
- एलर्जी वाढवणारे अन्य पदार्थ
शेंगदाणे- शेंगदाण्याची एलर्जी ही एक गंभीर प्रमाणात आढळणारी ऍलर्जी आहे. - ड्रायफूट्स – काजू , बदाम, अक्रोड यासारखे ड्रायफूट्समुळे सुद्धा एलर्जीचे प्रमाण काही जणांमध्ये आढळून येते. त्यामुळे लहान मुलांना सुद्धा ड्रायफ्रूट्स देताना काळजीपूर्वक द्यावे.
- दूध- दुधाची एलर्जी लहान मुलांमध्ये खूपच कॉमन आहे. शक्यतो गाईचे दूध एलर्जी निर्माण करते यामध्ये गाईचे दूध प्यायला नंतर लहान मुलांमध्ये अपचन, उलटी जुलाब यासारख्या गंभीर त्रासांना सामोरे जावे लागते.
- अंडे- अंड्यामुळे सुद्धा एलर्जी निर्माण होते. आणि यामध्ये अंड्याचा जो पिवळा बलक आहे त्यामुळे शक्यतो एलर्जी निर्माण होते.
- थंड पदार्थ- थंड अन्नपदार्थांमध्ये आईस्क्रीम, बर्फ घातलेले कोल्ड्रिंक्स यासारख्या गोष्टीमुळे खोकला आणि घसा दुखणे यांची एलर्जी होऊ शकते.
उपाय
आजच्या वाढत्या प्रदूषणामुळे अन्नपदार्थांमध्ये भेसळ वाढलेली आहे त्यामुळे एखाद्या पदार्थाचा आपल्या. त्रास होत असेल तर अशा अन्नपदार्थ आपण सेवन करू नये.
- बाजारातून आणलेले भाजीपाला फळे वापरण्याच्या अगोदर दहा मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणे
- फळे चांगले पाण्याने स्वच्छ करूनच खाल्ले पाहिजे.
- रोडवरचे अन्नपदार्था यां पासून दूर रहावे.
- एखाद्या अन्नपदार्थांचा आपल्याला त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा.
- सततच्या अन्नपदार्थ मुळे जर तुम्हाला एलर्जीचा त्रास होत असेल तर काही दिवस असे अन्नपदार्थ सेवन नाही केले तर पुढे जाऊन याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- कोणतेही घरगुती उपाय न करता लगेचच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा थेट संबंध आपल्या शरीराशी आणू नये.
- मुलांना कोणतेही नवीन खाद्यपदार्थ देणे अगोदर त्यां पाकिटावरील घटक यांची पडताळणी नक्की करा.
फूड ऍलर्जी दिवसेंदिवस वाढत जाणारी गंभीर समस्या बनलेली आहे कारण की आज काल मोठ्या प्रमाणात अन्य पदार्थांवरती केमिकलची प्रक्रिया केली जाते बाजारात असा कोणताच अन्नपदार्थ मिळत नाही तिच्यावरती रसायनिक फवारलेली नाही. त्यामुळे या रसायनामुळे आपल्या शरीरात भयानक अलर्जी निर्माण होत आहेत यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होत आहे.
- फूड ऍलर्जी मुळे होणारे लक्षणे –
- त्वचेवरती बारीक फोड येणे
- चेहरा आणि घशामध्ये सूज येणे.
- पोटामध्ये जोरात कळ मारून दुखणे.
- उलटी मळमळ तसेच खोकला सारखे सारखे जाणवणे.
- चक्कर येणे.
- बीपी कमी जास्त होणे.
- श्वास घेण्यासाठी त्रास होणे
जोराचा ताप -धूळ, कचरा, परागकन , प्रदूषण
यामध्ये गळ्यामध्ये दुखणे, ताप येणे आणि ताप येऊन डोळ्यामधून पाणी येणे सर्दी शिंका होऊ शकतात.
एलर्जी कायमचे बंद करण्यासाठी उपाय
एलर्जी टेस्ट-
कोणत्या गोष्टींपासून किंवा कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांपासून आपल्याला त्रास होतो यावरती लक्ष ठेवून जर आपण ती ऍलर्जी टेस्ट डॉक्टर काढून करून घेतली. तर आपल्याला त्यावरती इलाज करणे सोपे जाईल.
डॉक्टरांची ट्रीटमेंट-
एकदा आपल्याला कोणत्या पदार्थांची एलर्जी आहे हे समजल्यास त्यावर ती डॉक्टरांच्या सहाय्याने आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो यामध्ये डॉक्टर आपल्याला एलर्जी कमी करण्यासाठी योग्य ती औषधे देऊन शिंका येणे, सर्दी होणे खोकला होणे, यासारख्या एलर्जींपासून आपण नियंत्रित आणू शकतो.
आयुर्वेदिक ट्रीटमेंट-
पेशंटला शक्य असेल तर शक्यतो आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी. त्यामुळे आपल्याला गोळ्यांचा त्रास सुद्धा होणार नाही. आणि मुळापासून एलर्जी आपली निघून जाण्यास सुद्धा मदत होईल.
नेब्युलायझर-
अस्थमा सारख्या पेशंटसाठी नेबुलायझर म्हणजे त्रासाच्या वेळी मदत करणारा डॉक्टरच. अस्थमाचा अटॅक आला तर नेबुलायझर चा वापर खूप फायदेशीर ठरतो.
तसेच डॉक्टरांची ट्रीटमेंट प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये स्वच्छता ठेवणे, तसेच घरामध्ये काही पाळीव जनावरे असतील तर त्यांची स्वच्छता ठेवणे त्यांचे केस घरामध्ये पडून देणे त्यांची काळजी घ्यावी, शक्य असल्यास घरामध्ये एअर पुरिफायर चा वापर करावा. आणि जेवणामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढेल अशा गोष्टींचा समावेश करावा.
नवनवीन निबंध येथे वाचा
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!