Graphic design course information in Marathi: आज काल भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये ग्राफिक डिझायनर यांची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कारण तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग आणि त्यांची गरज समजून घेता ग्राफिक डिझाईन या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे चांगले करिअर करू शकता. तर ग्राफिक डिझायनर म्हणजे विज्युअल स्टोरी टेलर असतात. विजुअल स्टोरी टेलर म्हणजे शब्दरचना, फोटो, आणि ग्राफिक्स यांच्या मदतीने माहिती तयार करणे. तसेच मोठमोठ्या कंपनीसाठी छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी लोगो तयार करणे हे सुद्धा ग्राफिक डिझाईन मध्ये येते. ऑनलाइन बिजनेस करण्यासाठी ग्राफिक डिझायनर ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे.
Graphic design course information in Marathi
त्यामुळे भविष्यात ग्राफिक डिझायनर या करिअरला चांगला प्रतिसाद आपल्याला दिसून येईल एका अभ्यासामध्ये असे लक्षात आलेले आहे की 2020 ते 2030 या काळामध्ये ग्राफिक डिझायनर साठी रोजगाराच्या संधी या दहा टक्क्यांनी वाढलेल्या असतील. ग्राफिक डिझाईन तुम्ही घरी बसून सुद्धा काम करू शकता वर्क फ्रॉम होम साठी भरपूर अशा संधी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भरपूर प्रमाणात त रोजगाराच्या संधी आत्ताच्या काळात उपलब्ध आहेत.
१) ग्राफिक डिझायनर या क्षेत्रामध्ये का उतरावे?
२) ग्राफिक डिझायनर म्हणजे कोण असतात?
३) ग्राफिक डिझायनर ची कामे काय?
४) ग्राफिक डिझायनर साठी कोणते कौशल हवे ?
५) ग्राफिक डिझायनर कसे बनावे ?
६) ग्राफिक डिझायनर साठी शिक्षण काय असावे?
७) ग्राफिक डिझायनर चे प्रकार
८) ग्राफिक डिझायनर कोर्स
९) या कोर्स साठी कसे अप्लाय करावे?
१०) भारतामधील टॉप ग्राफिक डिझाईनच्या युनिव्हर्सिटी कोणते आहेत?
ग्राफिक डिझायनर या क्षेत्रात का उतरावे?
सध्याचा ऑनलाइन बिजनेस तसेच तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे ग्राफिक डिझाईन यांची सुद्धा बाजारात मागणी वाढलेली आहे.या क्षेत्रात तुम्हाला कायम नवीन गोष्टी शिकायला भेटतील.भरपूर साऱ्या प्रमाणात जॉब्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
भविष्यकाळात याची वाढ भरपूर वाढलेली असेल. त्यामुळे यातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता
.
ग्राफिक डिझायनर म्हणजे कोण असतात?
ट्राफिक डिझायनर म्हणजे जे लोक शब्दरचना फोटो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोशन वापरून एक ग्राफिक डिझाईन करतात आणि त्याच्यामुळे महत्त्वाच्या अशी माहिती आपण सोप्या पद्धतीने व्हिडिओद्वारे सांगू शकतो. तसेच वेगवेगळ्या कंपनीसाठी लागणारे लोगो ग्राफिक डिझायनर तयार करण्याचे काम ग्राफिक डिझायनर करतात.
ग्राफिक डिझायनर ची कामे काय?
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो एडिट करणे लेआउट सॉफ्टवेअर चा वापर करून डिझाईन बनवणे. लोगो डिझाईन करणे.
वेबसाईट बनवणे, पुस्तक तसेच पत्रिकांच्या वरती जे आकर्षक कव्हर असते ते बनवणे तसेच आज-काल वापरात येणाऱ्या सोशल मीडियाच्या आकर्षक पोस्ट तयार करणे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग फोटोज तसेच आपल्या कौशल्याचा वापर करून आकर्षक असे फोटोज तयार करणे.
ग्राफिक डिझायनर साठी कोणते कौशल्य हवे?
सर्वप्रथम म्हणजे यामध्ये आवड असणे खूप आवश्यक आहे. आपल्याला जर आवड असेल तर आपल्या कौशल्याचा आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. तर ग्राफिक डिझायनर साठी खालील कौशल्य प्रामुख्याने लागता
टेक्निकल स्किल-
ग्राफिक डिझायनर मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेक्निकल स्किल तर यामध्ये त्याला वर्डप्रेसची चांगली माहिती हवी. च्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे HTML आणि CSS याची सुद्धा माहिती त्याला हवी. Ux आणि UI याची सुद्धा समज हवी. त्याचप्रमाणे भरपूर सारे असे सॉफ्टवेअर आहेत जसे की Adobe Photoshop, Adobe design यांची माहिती हवी.
कौशल्य-
ग्राफिक डिझाईन मध्ये जेवढे तुमचे काम इतरांपेक्षा वेगळे आणि आकर्षक असेल तितका तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फायदा होईल. प्रत्येक कंपनीसाठी वेबसाईट तसेच लोगो, फोटो याकर्षक हव्या असतात. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा किती वेगळा विचार करता आणि किती आकर्षक काम करता यावरती तुमच्या कामातील विकास अवलंबून आहे.
कम्युनिकेशन स्किल –
तुम्ही तुमच्या क्लाइंटला तुमच्या कामाविषयी किती चांगल्या पद्धतीने सांगू शकता तसेच तुमचे काम इतरांपेक्षा किती वेगळे आणि चांगली आहे हे समजावून देऊ शकता यावरती तुमचे काम अवलंबून आहे. कारण समोरच्या क्लायंटला जर तुमचे काम आवडले तर नक्कीच तुम्हाला काम भेटेल. म्हणून या कामांमध्ये कम्युनिकेशन स्किल तसेच समोरच्या व्यक्तीला आपल्या कामाविषयी विश्वास आणि पारदर्शकता पटवून देणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही या क्षेत्रात काम करताना एकापेक्षा अनेक प्रोजेक्ट वरती काम करत असता त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टचे काम टाईम वरती करून देणे आणि आपल्या क्लाइंटला विश्वास देणे खूप महत्त्वाचे आहे
ग्राफिक डिझायनर कसे बनावे?
ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी एक पात्रता लागते . जर तुम्हाला बॅचलर डिग्री हवी असेलत्यासाठी तुम्ही बारावी मध्ये चांगल्या मार्कांनी पास झालेले हवे.आणि जर तुम्हाला ग्राफिक डिझायन मध्ये मास्टर डिग्री घ्यायचे असेल तर तुम्हाला बारावी सोबतच तुमच्याकडे ग्राफिक डिझाईनची बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.भारतातील काही युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. प्रत्येक युनिव्हर्सिटी ची ग्रेड साठीची योग्यता वेगवेगळी असते. त्या युनिव्हर्सिटीने नेमून दिलेल्या ग्रेडनुसार तुम्ही ती एक्झाम देऊ शकता.
बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला जर बॅचलर डिग्री घ्यायची असेल SAT या कोर्ससाठी GRE च्या गुणांची मागणी केली तसेच तुम्हाला चांगले इंग्लिश आणि गरजेचे आहे..
ग्राफिक डिझायनर चे प्रकार कोण कोणते आहे?
- ग्राफिक डिझाईन
- लोगो डिझाईन
- मल्टीमीडिया डिझाईनर
- ऍड डिझायनर
- यु आय डिझायनर
- यु एक्स डिझायनर
- वेबसाईट डिझाईन
- मोबाईल डिझाईन
- प्रिंट डिझाईन
- पॅकेजिंग डिझाईन
ग्राफिकफिक डिझायनर चे कोर्स
ऑनलाइन कोर्स
- Graphic design course by MIT open courseware
- Adobe certified online graphic design course by Shaw academy
- Canva design school course
- Fundamental of creative design by California institute of art
- Graphic design visual and graphic design by Allison
- Introduction to typography by California institute of art
डिप्लोमा कोर्सेस
- Diploma in wave and graphic designing
- Graduate certificate in information architecture and design
- Graduate certificate in graphic design
- Certificate in art and design
- Certificate in graphic and web design and development
बॅचलर डिग्री कोर्स आणि सर्टिफिकेट
- BSc in data visualisation
- BA graphic design
- BA in graphic and communication design
- B.Des in visual communication and graphics.
- B.Des in graphic design
मास्टर डिग्री कोर्स
- MA graphic design
- Master in information design and strategy
- MFA in graphic desig
- MA in communication design and information design pathway
कोर्स साठी कसे अप्लाय करावे?
- सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांमध्ये करिअर करायचे आहे तो कोर्स नीट अभ्यास करून निवडून घ्या.
- युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करा.
- तुमचे युनिव्हर्सिटी मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून एक युजरनेम आणि पासवर्ड भेटेल.
- मिळालेल्या पासवर्ड आणि युजरनेम चा वापर करून तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करा त्यामध्ये तुमचे शिक्षण, तसेच बाकीची माहिती भरून फॉर्म भरा.
- प्रत्येक युनिव्हर्सिटी ची वेगळी वेगळी रजिस्ट्रेशन प्रक्रिया असते काही युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन साठी सुरुवातीला प्रवेश परीक्षा घेतल्या जातात आणि त्यावरती तुम्हाला ऍडमिशन भेटते. त्यामुळे ऍडमिशन ची प्रक्रिया एकदा नीट समजून घ्या.
- बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला जर बॅचलर डिग्री घ्यायची असेल SAT या कोर्ससाठी GRE च्या गुणांची मागणी केली तसेच तुम्हाला चांगले इंग्लिश आणि गरजेचे आहे.
एंट्रन्स एक्झाम कोणकोणते आहेत?
National aptitude test in architecture
NIFT ENTRANCE EXAM
Graduate aptitude test in engineering ( GATE )
Common entrance exam for design
ग्राफिक डिझाइन्स च्या भारतामधील युनिव्हर्सिटीज
- प्रशांत विश्वविद्यालय
- कॉलेज ऑफ आर्ट्स
- वर्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन
- डिझाईन गाव
- एम ए एस सी
- नॅशनल डिझायनिंग इन्स्टिट्यूट
- आर्क कॉलेज ऑफ डिझाईन अँड बिझनेस
- ग्राफिक डिझाईन यावरती काही पुस्तके सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर ती कोणती हे आपण खाली पाहुया
- Logo design love
- thinking with type
- how to be a graphic designer without losing your sound
- grand system in graphic design
करिअरमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही टिप्स
सध्याच्या चालू असणाऱ्या लेटेस्ट फड वरती विचार करून तुम्ही डिझाईन बनवू शकता. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड आणि कौशल्य आहे असे प्रोजेक्ट निवडू शकता.तुमच्या प्रोजेक्टमध्ये अशा कलर्स चा वापर करा ज्यामुळे तुमचे प्रोजेक्ट अधिकाधिक उठून दिसेल.असे फोटोज तयार करा जे दिसायला नीट आणि सुटसुटीत असतील.
लेआउट करण्यासाठी grid system चा वापर करा.शब्द ठळक दिसण्यासाठी emphasis चा वापर करा.तर ही आहे ग्राफिक डिझायनर ची संपूर्ण माहिती, तुम्ही तुमचे कौशल्यानुसार कॅटेगरी निवडून या क्षेत्रामध्ये करिअर घडवू शकता तर कसे वाटले हे आर्टिकल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.
हे सुद्धा वाचा – वाचाल तर वाचाल
Recent Comments