Home remedies for babies in Marathi -ज्या नवीन माता आहेत. त्यांच्यासाठी हा लेख खूप उपयोगी ठरणार आहे. पहिल्यांदा मातृत्वाची चांगली लागली की सगळे काही आनंदाचे वातावरण घरात वाहू लागते. पण ज्या नवीन माता आहेत त्यांच्यासाठी मात्र हा सगळा काही नवीनच अनुभव असतो. त्यामुळे आपल्या बाळासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून येत नाही. त्यामुळे आपल्या लहान बाळाला जर काही आरोग्य विषयी त्रास होत असेल तर आपण घरगुती उपाय केल्याने त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. पण जर लहान बाळाला अधिकच काही त्रास होत असेल तर कोणताही उपाय करण्याबाबत डॉक्टरांचा योग्य सल्ला नक्की घ्या वा. तर खाली आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत जे आपल्या बाळासाठी सोपे आणि आरामदायी असतील.
Home remedies for babies in Marathi : लहान मुलांसाठी घरगुती उपाय
सर्दी खोकला ताप
साधारण लहान मुलांना सर्दी खोकला यांची सुरुवात झाली की लगेच ताप यायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच सर्दी खोकला घरच्या घरीच कमी केला तर बाळाचा ताप सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर आता आपण सर्दी खोकला आणि ताप याच्यासाठी कोणते घरगुती उपाय ते आता पाहूया.
उपाय-
१) सर्दी व खोकला लहान मुलांना झाला असेल तर ओव्याची पुरचुंडी करावी. ही पुरचुंडी तव्यावरती शेकावी आणि लहान मुलांच्या छातीवर आणि पाठीवर या ओव्याच्या पुरचुंडीचा शेक द्यावा. किंवा नुसताच नाकाजवळ ओव्याची पुरचुंडी पकडले असता सर्दी कमी होते.
२) सर्दीमुळे नाक जास्तच बंद झाली असेल तर नाकामध्ये कोमट साजूक तुपाचे दोन ते तीन थेंब टाकल्यामुळे बाळांना श्वास घेण्यास मदत होते.
३) बाळाला खोकला झाला असल्यास चार कप पाण्यामध्ये ज्येष्ठमधाची कांडी बेहडा टाकून चांगले पाणी उकळून घ्यावे आणि या चार कपाचे एक कप पाणी झाल्यानंतर गॅस बंद करावे. या पाण्यामध्ये चवीनुसार खडीसाखर टाकून चमच्याने बाळाला पाजावे यामुळे सुद्धा खोकला कमी होतो.
४) बाळाला ताप आला असल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावरती ठेवावे. मात्र बाळाचा ताप कमी होत नसल्यास ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा.
५) बाळाला जास्त ताप येऊ देऊ नये त्यामुळे त्यांना चक्कर येण्याची संभावना असते त्यामुळे जास्त ताप आला असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
दात येणे
दात येणे ही लहान मुलांच्या शारीरिक विकासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच दात येताना लहान मुलांना त्रासही होतो यामध्ये पोटदुखी उलटी, जुलाब यासारख्या गोष्टींना लहान मुलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची सततची चिडचिड होत राहते. लहानपणापासून योग्य पोषण बाळाला मिळाल्यास त्याचे दात सहजासहजी येण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हा लहान बाळांना दात येण्याचा काळ असतो तेव्हा सतत त्यांना काहीतरी कडक वस्तू खाविशी वाटत असते. तर यासाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो यात आपण पाहूयात .
उपाय-
१) लहान मुले जर सतत चावत असतील तर त्यांना खारीक देणे फायदेशीर ठरते. त्यामुळे त्यांच्या हिरड्यांना सुद्धा आराम भेटतो.
२) ज्येष्ठमधाची जाड काठी आपण लहान मुलांच्या हातामध्ये देऊ शकतो.
३) कच्चा वांग्याची बेस करून त्यामधील बिया काढून टाकून फक्त वांग्याची साल लहान मुलांच्या हातामध्ये द्यावी. या वांग्याच्या सालीमुळे त्यांच्या हिरड्यांना आराम भेटतो.
पोटदुखी
लहान बाळांमध्ये पोट दुखी होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही वेळा बाळ सारखेच किरकिर करत असते पण त्याचे नेमके कारण आपल्याला समजू शकत नाही. तर पोटदुखी हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण लहान मुलांमध्ये आठवण येते. लहान मुलांमध्ये जर आईने काही चुकीचा आहार ग्रहण केला असेल किंवा आईच्या जेवनातून अपचन झाले असेल. तर लहान मुलांना पोट दुखी जाणवते. त्यामध्ये काही वेळा लहान मुलांचे पोट फुगलेले सुद्धा आढळून येते. आणि आपण जेव्हा वारंवार बाळाच्या पोटाला हात लावतो तेव्हा बाळ अधिकच रडत असेल तर समजावे की बाळाला पोट दुखीचा त्रास होत आहे.
उपाय
१)एक हिंगाचा खडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये गरम करून चांगला उगाळून घ्यायचा आहे आणि तयार झालेला लेप थंड झाला की बाळाच्या बेंबी भोवती लावा.
२)ओवा चांगला बारीक करून कोमट पाण्यामध्ये कालवून घ्यायचा आहे नंतर हलक्या हाताने बाळाच्या पोटावरती लेप लावल्याने बाळाची पोटदुखी कमी होते.
३)बाळाच्या पोटावर हलक्या रुमालाने शेक दिल्याने सुद्धा बाळाचे पोटदुखी कमी होते पण जेव्हा तुम्ही बाळाला शेक द्याल तेव्हा रुमाल जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यावी.
४)डिलिव्हरी नंतर आईने जेवल्यानंतर प्रत्येक वेळी ओवा बडीशेप आणि सुके खोबरे यांचे सेवन नक्की करावी ज्यामुळे आईला अपचन होणार नाही आणि बाळाला सुद्धा त्याचा त्रास होणार नाही.
५)आईने आपला आहार साधा आणि हलका घेणे गरजेचे आहे कारण बाळाच्या पोटाचे आरोग्य हे आईच्या जेवणावरती अवलंबून असते.
बद्धकोष्ठता
बाळ लहान असताना सुरुवातीला बाळाला दिवसातून सात ते आठ वेळा पातळ शौचास होणे. मी सामान्य गोष्ट आहे. पण जसे जसे बाळ मोठे होते आणि त्याची पचन संस्था चांगली होण्यास सुरुवात होते तेव्हा मात्र बाळाला हळूहळू बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. त्यामुळे बाळाला खडा स्वरूपात शौचास होते. कधी कधी बाळाला जास्त जोर लावावा लागतो. त्यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा खूप त्रास होतो तर अशावेळी खालील उपाय केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.
उपाय
१)बाळाच्या पोटावर एरंडेल तेल हलक्या हाताने चोळावे.
२)दररोज रात्री काळ्या मनुक्या दहा ते बारा रात्री भिजत घालावे आणि सकाळी उठल्यानंतर याचे पाणी लहान बाळाला द्यावे.
३)आईने आहारामध्ये तुपाचा वापर करणे आवश्यक्य आहे त्यामुळे सुद्धा लहान बाळांचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
उलटी होणे
लहान मुलांमध्ये स्तनपान केल्यानंतर उलटी होणे हे सुद्धा सामान्य गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळी जर लहान बाळाला उलटीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. स्तनपान केल्यानंतर उलटी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे आता आपण पाहूया .
उपाय
१)स्तनपान केल्यानंतर बाळाच्या पाठीवरती हलक्या हाताने पाठी वरून खालून वर हात फिरवावा. असे केल्याने बाळाला ढेकर येईल आणि उलटीचा त्रास कमी होतो.
प्रत्येक वेळी स्तनपान केल्यानंतर बाळाला ढेकर काढणे आवश्यक आहे..
२)स्तनपान केल्यानंतर बाळाला हाताळताना कसेही वेडे वाकडे घेतले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
३)आईने आपला आहार हलका ठेवावा. जास्त मसालेदार किंवा पचनासाठी अवघड असते अन्नपदार्थ घेऊ नये.
जुलाब
तुला बोलण्याची कारणे म्हणजे बाहेरील दूध बाळाला देणे, किंवा दूषित पाणी आणि बाळाला जर दात येत असतील तर जुलाबाचा त्रास उद्भवू शकतो. जर बाळाला दिवसातून तीन ते चार वेळा पातळ शौच्याच होत असेल. तर घरी उपाययोजना कराव्यात, आणि जर बाळाला जास्त पातळ शौचास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उपाय
१)मुरुड शेंग ही चांगली उगाळून बाळाला याची चाटण दिल्यास जुलाबाचा त्रास कमी होतो.
२)जायफळ उगाळून बाळाला याचे चाटण दिल्यास जुलाबाचा त्रास कमी होतो.
३)अधिक अधिक शौचास लागल्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते यासाठी ग्लासभर पाण्यामध्ये चिमूटभर साखर टाकून हे पाणी वारंवार बाळास द्यावे.
४)बाळाला जुलाब लागल्यास आईने फक्त मुगाची खिचडी, तुप भात किंवा काळी मिरची बारीक केलेली पूड भातावरती घेऊन खावी. आईचा आहार जितका हलका असेल तितके बाळाला पचनास सोपे जाते.
५)बाळ जर बाहेरच्या अन्न खात असेल तर प्रत्येक महिन्याला हळूहळू एक एक पदार्थ त्याच्या आहारात समाविष्ट कराव्यात. सगळे नवीन पदार्थ एकत्र बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करू नये त्यामुळे बाळाला पचनाला त्रास होतो.
कमी झोप येणे
लहान मुलांची पूर्ण झोप होणे खूप गरजेचे आहे. अर्धवट झोपेमुळे लहान मुले सतत किरकिर करत राहतात. रात्री झोपेमध्ये लहान मुले अस्वस्थ होऊन रडत उठतात तर शांत झोपेसाठी लहान मुलांना कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण पाहूयात.
उपाय
१)लहान मुलांना रात्री झोपताना डोक्याला तेल लावून झोपावे.
२)बाळाचे पोट नीट भरले आहे का याच्याकडे लक्ष द्यावे.
३)नाकामध्ये कोमट साजूक तूप घालावे. तूप बाळाच्या नाकामध्ये घालताना ते थंड आहे की नाही हे नक्की बघावे.
४)तुपामध्ये जायफळ उगाळून बाळाच्या कपाळावर लावल्यास शांत झोप येण्यासाठी मदत होते.
धन्यवाद
खाद्यपदार्थांपासून होणाऱ्या ऍलर्जी विषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Recent Comments