Kanya pujan 2024 -आपण लहानपणापासून असे ऐकत आलो आहोत की लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. आणि लहान मुलींमध्ये तर देवीचे रूप आपण कायमच पाहतो. लहान मुलांचे मन हे अगदी निर्मळ, तसेच मनामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. त्यामुळे लहान मुलींचे पूजन केल्यामुळे आपल्या पूजेला सकारात्मक पूर्तता भेटते. नवरात्रीमध्ये कन्या पूजन करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे पूजन करणे असे मानले जाते.
आपला हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता लक्ष्मी लहान मुलींच्या रूपामध्ये आपल्या पृथ्वीतला वरती फिरत असते.त्यामुळे हिंदू संस्कृतीनुसार या काळात कन्या पूजन करणे अतिशय पवित्र मानले जाते. नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कन्या पूजन केले तरी चालते पण शक्यतो अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्या पूजन करण्यास प्राधान्य दिले जाते. कन्या पूजन केल्यामुळे देवीला प्रसन्न करून घेता येते. आपल्या मनातील सर्व इच्छा कन्या पूजन केल्यामुळे पूर्ण होतात.
Kanya Pujan 2024 : देवीला प्रसन्न करण्यासाठी असे करा कन्यापूजन
कन्या पूजन एकदा सुरुवात केली तर ते दोन ते दहा वर्ष तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्टार नऊ किंवा 11 कुमारिकांना बोलवून पूजा करू शकता. कन्या पूजन करून त्या कुमारीकांना गोडधोड जेवू घालून त्यांना तृप्त करावे. त्यांना छान छान शाळेला उपयोगी पडतील असे तुम्ही त्यांना देऊ शकता.. तसं तुमच्या सोयीनुसार अन्नदान वस्त्रदान त्याला सुद्धा कन्यापूजन मध्ये विशेष महत्त्व आहे. तुमच्या सोयीनुसार त्यांना दक्षिणा देऊ शकता. देवीचा सगळ्यात आवडता नैवेद्य म्हणजे काळे वाटाण्याची भाजी, गुळाचा शिरा हा देवीचा आवडीचा नैवेद्य आहे. त्यामुळे जेवणामध्ये यांचा समावेश तुम्ही करू शकता.
कन्या पूजन झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्या पाया पडावेत. कारण कुमारी का हे साक्षात देवीचे रुप आहे. आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. कन्या पजन मुळे घरामध्ये सुख-समृद्धी, ऐश्वर्या आरोग्य, त्यांचा वास नांदतो. तसेच मानवी जीवनात समृद्धी येते.
कन्या पूजन कधी करावे?
कन्या पूजन अष्टमी किंवा नवमीला करावे.
कन्या पूजन करताना कुमारी त्यांचे वय काय असावे?
कन्या पूजन करताना कुमारिकां चे वय दोन ते दहा वर्षांमधील असावे.
कन्या पूजन कोणी करावे?
कन्या पूजन घरातील स्त्रीने करावे. तसेच घरातील नवरा बायको जोडीने कन्या पूजन केले तरी चालते.
कन्या पूजन साठी लागणारे साहित्य ?
१) कन्यांसाठी बसायला लागणारे आसन – चटई
२) फुलांचा हार किंवा केसात माळण्यासाठी गजरा.
३) हळदी कुंकू, अक्षता
४) अगरबत्ती, धुप
५) आरती
६) फळे, पाणी, पंचामृत
७) कन्यांना खाण्यासाठी गोड नैवेद्य, मिठाई
८)लाल चुनरी
कन्या पूजन साठी किती कन्यांचे पूजन करावे?
तुमच्या सोयीनुसार ५,७ , किंवा 11 कुमारीका मुलींचे पूजन केले तरी चालते .
हे सुद्धा वाचा – नवरात्रीचे नऊ रंग २०२४ आणि दसरा विषयी माहिती
कन्या पूजन कसे करावे.
सर्वप्रथम त्यादिवशी आपण कन्या पूजन करणार आहोत. त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपले सारे घर स्वच्छ करावे. शक्य असल्यास संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे.
कुमारिका ज्यावेळी घरी येतील तेव्हा त्यांच्या पायावरती पाणी ओतून आदराने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत करावे.
त्यानंतर स्वच्छ धुतलेले आसन त्यांना बसण्यासाठी द्यावे. त्यांना काही पाणी पिण्यासाठी विचारणा करावी.
त्यांना आसनावरती बसवल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय आपण धुवून त्यांचे पाय पूजन करायचे आहे. यासाठी एका ताटामध्ये त्यांचे पाय ठेवावेत. आणि पाण्याने त्यांचे पाय धुवावे आणि स्वच्छ रुमालाने त्यांचे पाय पुसून घ्यावे.
पाय स्वच्छ पुसल्यानंतर पायावरती स्वस्तिक काढावे. त्यानंतर त्यांना हळदीकुंकू लावावे. त्याचबरोबर जर केसांमध्ये माळण्यासाठी. गजरा आणला असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये गजरा घालावा.
लाल चुनरी त्यांच्या डोक्यावर परिधान करावे. त्यानंतर मोठ्या सन्मानाने त्यांची आरती करावी. मनामध्ये शुद्धतेचा आणि पवित्रतेचा भाव ठेवून आदरातिथ्याने त्यांची पूजा करावी. माता दुर्गेची आरती करावी.
आपल्या मनामध्ये कोणत्या इच्छा असतील तर मनामध्ये ती इच्छा प्रकट करावी आणि देवीकडे या इच्छेसाठी प्रार्थना करावी.
तसेच लहान कुमारीकांना जर काही गिफ्ट आणले असतील जसे की त्यांना उपयोगी पडणारे वही पुस्तक, पेन किंवा इतर काही वस्तू असतील तर त्या त्यांना द्याव्या.
त्यानंतर घरी केलेला काही नैवेद्य असेल म्हणजेच कुमारिकांना जर तुम्ही घरी जेवण बनवलं असेल तर ते त्यांना प्रेमाने खाऊ घालावे. किंवा जर मिठाई आणली असेल तर ती त्यांना अर्पण करावी.
नवरात्रीचे नऊ दिवस हे खूप पवित्र असतात. त्यामुळे मनामध्ये शुद्ध भावना ठेवून कुमारीकांची पूजा करावी त्यामुळे तुमच्या प्रार्थनेला नक्की यश येईल.
हे सुद्धा वाचा –या उपायांनी करा देवी मातेला प्रसन्न
कन्या पूजन करताना कोणते नियम पाळावे?
कन्या पूजन करताना स्वच्छतेला विशेष ध्यान द्यावे. कन्या पूजन दिवशी घरातील देव्हारा ची आणि स्वतःची देखील स्वच्छता राखावी.- कन्या पूजन ठिकाणी रांगोळी व फुलांची सजावट करावी.
- कुमारिकांसाठी बनवले जाणारे जेवणाचा प्रसाद शुद्ध आणि सात्विक असावा.
- कन्या पूजन करताना घरी आलेल्या कुमारिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी.
- कन्या पूजन करण्यासाठी एक पेक्षा जास्त कुमारिका भेटत नसतील तर एका कुमारीकेचे पूजन केले तरी चालते. फक्त मनातील भाव आपला शुद्ध असावा. शेवटी देव भक्ताच्या मनातील शुद्ध भावना याचीच परीक्षा बघत असतो. त्यामुळे तुमचे मन शुद्ध असेल आणि पवित्र असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ भेटेल .
कन्या पूजन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?
कन्या पूजाच्या दिवशी नखे आणि केस कापू नये.- कन्यापूजन च्या दिवशी कोणत्याही कुमारिकेचे मन दुखवू नये.
- नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये आपल्याकडून कोणतीही हिंसा होणार नाही त्याची दखल घ्यावी.
- कन्या पूजन दिवशी उशिरापर्यंत झोपणे टाळावे.
- कन्या पूजन या पवित्र दिवशी घरातील स्वच्छता याचे विशेष ध्यान राखावे.
कन्या पूजन ला आपण कोणत्या गोष्टी कुमारिकांना देऊ शकतो
कन्या पूजन ला कुमारिकांना आपण वही पुस्तके, कपडे, धान्य, शालेय जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू, फळे इत्यादी गोष्टी आपण कुमारिकांना देऊ शकतो.
कन्या पूजन ची गोष्ट
कन्या पूजन का केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे कथेनुसार समजून घेऊया. पौराणि कथेनुसार , महिषासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने पृथ्वीतलावरती आणि स्वर्गामध्ये थैमान मांडले होते. महिषासुरा नवसाला कोणताही पुरुष किंवा देव मारू शकणार नाही अशी त्याला वरदान मिळालेले होते.
त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांशी युद्ध करून त्यांना युद्धामध्ये पराभूत करून त्यांना तो त्रास देत होता. असह्य या झालेल्या सर्व देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि महादेव त्यांच्याकडे मदतीची याचना केली.. महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे कोणतेही देव त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे एक युक्ती काढून ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांनी आपली सर्व शक्ती एकत्र करून माता दुर्गेची निर्मिती केली.
माता दुर्गेने एका कुमारीकेचे रूप घेऊन महिषासुर राक्षसाचा वध केला होता. या दोघांच्या मध्ये चालणारे युद्ध हे जवळपास दहा दिवसांचे होते. आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचा वध करून स्वर्गातील सर्व देवतांना परत त्यांचे स्थान माता दुर्गेने मिळून दिले होते. म्हणून हा दिवस सगळीकडे दसरा तसेच विजयादशमी या नावाने साजरी केली जाते.
म्हणून नवरात्रीमध्ये कन्या पूजन केल्यास माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच कायमच स्त्री शक्ती सन्मान केला आणि त्यांना आदराने वागवलं तर नक्कीच आपल्या पूजेला सफलता प्राप्त होईल.
Recent Comments