Maza avadta san diwali nibandh in marathi:दिवाळी सण म्हटलं की आनंदाची पहाट. दिवाळीचा सण म्हटला की एकच गोष्ट आठवते ती म्हणजे भरपूर सारा खाण्यासाठी गोडधोड पदार्थ आवडीचा फराळ, दिवाळीची मंगलमय पहाट, पहाटे लवकर उठून अभंग स्नान करण्याची मजा तर काही वेगळीच असते . दिवाळी म्हटलं की सगळीकडे दिवे लाइटिंग सगळे वातावरण अगदी प्रकाशमय होऊन जाते.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा अंधारावरती विजय आपल्या आयुष्यातील अंधार दुर होऊन माझ्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होऊन आपल्या आयुष्य सफल व्हावे यासाठी पूजा करणे हाच येतो या सणा मागे असतो
दिवाळीचा सण हा माझ्या आवडीचा सण दिवाळी सणाची वाट तर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण पाहत असतात. दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारस या दिवसापासून होत असून भाऊबीज पर्यंत अगदी पाच ते सहा दिवस हा उत्सव सगळ्या घरामध्ये चालू असतो.
maza avadta san diwali nibandh in marathi
हे सुद्धा वाचा – रक्षाबंधन मराठी निबंध
वसुबारस दिवशी गाईची आणि तिच्या वासरूची आरती केली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गाय ही आपली माता असून. तिच्याविषयी कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यादिवशी गाईच्या आरती केली जाते आणि तिला गोडधोड खाऊ दिलं जातं मायेने तिची ओटी भरली जाते.
दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी त्यादिवशी धने, तांदूळ तसेच आपल्या घरातील जे सोने आहे त्याची पूजा केली जाते. कारण सोन्याला आपण लक्ष्मीच्या रूपात मानतो. त्यामुळे त्यांची पूजा करून आपण धनत्रयोदशी साजरी करतो.
त्यानंतरचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या कोपऱ्यात प्रत्येक जातीचे लोक लक्ष्मीपूजन मोठ्या थाटामाटाने करतात. त्यादिवशी घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये जो झाडू आहे ते सुद्धा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी झाडूची सुद्धा पूजा केली जाते.
आणि लक्ष्मी मातेचे मोठ्या आदराने सायंकाळच्या वेळी घरामध्ये सगळीकडे दिवे , पणत्या, समया लावून सगळीकडे थाटामाटा पूजा केली जाते पूजा केल्यानंतर सगळीकडे फटाके, आतिश बाजी, लावून आनंद साजरा केला जातो. सगळी घरे लाइटिंग ने झगमगत असतात.( Maza avadta san diwali nibandh in marathi)
लक्ष्मीपूजन नंतर पाडवा केला जातो पाडवा म्हणजे पत्नीने पतीला आदरापूर्वक ओवाळणी करणे. त्याबद्दल बायकोला गिफ्ट सुद्धा दिले जाते. खेड्यापाड्यांमध्ये तर आपली जुनी संस्कृती म्हणून सेना पासून छोट्या छोट्या मुर्त्या बनवल्या जातात आणि त्या अंगणामध्ये रांगोळी मध्ये सजवल्या जातात. घराच्या प्रत्येक उंबऱ्यावर या मुर्त्या ठेवतात. आणि प्रत्येक मुर्त्यांजवळ दिवे रांगोळीचा सडा काढून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी तर उसांचा वापर करून त्यांच्यासाठी मनोरा बनवला जातो आणि पूजा केली जाते. प्र
त्येक खेड्याची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते.आपली जुनी संस्कृती आपल्याला खूप काही शिकवले जाते.हल्ली शहरीकरणामुळे या संस्कृती आणि परंपरा काळाच्या आड चाललेले आहे.
पाडव्यानंतर सगळीकडे भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आपल्या भावाला ओवाळते. आपल्या भावाला सुख-समृद्धी लाभावे यासाठी की देवाकडे प्रार्थना करते. आणि भाऊबीज झाल्यानंतर दिवाळी या सणाची सांगता होते.
Maza avadta san diwali nibandh in marathi
दिवाळीमध्ये माझाच काय तर सगळ्या लहान मुलांचा आवडीचा विषय म्हणजे किल्ला बनवणे. सुट्ट्या सुरू होताच सगळे मित्र जमून किल्ला बनवायचा. त्यामध्ये मावळे बसवायचे,ही मज्जा तर वेगळीच असते.
दिवाळीचा सण सुरू झाला म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा फराळ सुरू होतो. चकली, चिवडा, शंकरपाळी, लाडू, करंजी, अनारसे, शेव, चिरोट, काय खावे आणि काय नको असे होते. दिवाळी सणाची सुट्ट्यामुळे ना अभ्यास ना कोणते टेन्शन फक्त मनसोक्त खेळायचं आणि गावी जायची मजा घ्यायची.
दिवाळी सण आला की सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले असते. दिवाळी सणाच्या बाबतीत आपल्या पुराण कथांमध्ये असे सांगितलेले आहे की देव श्रीराम माता जानकी आणि लक्ष्मण 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर ते आयोध्याला परत आले होते त्यामुळे सर्व लोकांनी आनंदी होऊन सगळीकडे दिवे लावले होते तेव्हापासून हा सण साजरा करण्यात येतो असे आपले पूर्वज सांगतात.( Maza avadta san diwali nibandh in marathi)
दिवाळी सुरू होणाच्या आधीपासूनच पंधरा दिवस आधी प्रत्येक घरामध्ये स्वच्छता केली जाते. घरे रंगवली जातात, सगळीकडे फुलांच्या माळा सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. एकमेकांना आनंदाने मिठाई तसेच गिफ्ट दिले जाते. जे व्यापारी लोक आहेत ते आपल्या दुकानांमध्ये अवश्य लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोक त्यांच्या बिझनेस साठी ज्या वह्या वापरतात त्यांची पूजा लक्ष्मीपूजन दिवशी करतात.
काही पुराणकतेच्या मान्यतेनुसार असे म्हटले जाते की पांडव बारा वर्षांच्या वनवासानंतर ते परत आले होते आणि त्यांच्या येण्याच्या आनंदासाठी म्हणून दिवाळी सण साजरी केली जाते.(Maza avadta san diwali nibandh in marathi) असे म्हटले जाते की ज्यावेळेस समुद्रमंथन चालू होते त्यावेळेस त्यामधून माता लक्ष्मी प्रकट झाली होती आणि त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. वेगवेगळ्या धर्मा नुसार वेगळ्या मान्यता आहेत.
दिवाळीच्या सणाला की सगळेजण नवीन कपडे घेतात. नवीन सोन्याची खरेदी करतात, व्यापार वर्गामध्ये तर भरपूर पैशांची उलाढाल होत असते. बाजारपेठा गच्च गर्दीने भरून गेलेले असतात. अगदी फुलवाल्यापासून ते किराणामाल, सोन्याच्या दुकानांपासून कपड्यांच्या दुकानापर्यंत सगळीकडे गर्दीच गर्दी असते. दिवाळी सणामुळे व्यापाऱ्यांचा सुद्धा चांगला व्यापार होतो.
maza avadta san diwali nibandh in marathi
म्हणूनच तर दिवाळी असं माझ्या आवडीचा सण आहे. दिवाळी हा सण ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्यात येतो वातावरण हे अगदी सुंदर असते ना जास्त गर्मी आणि थंडीची चाहूल त्यामुळे शरीराला सुद्धा एक प्रकारचा गारवा जाणवतो. दिवाळीच्या धुके पडलेल्या पहाटे उठून जेव्हा आपली आई आणि आजी आपल्याला लावून अभंग स्नान घालते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो.
तसे बघायला गेले तर मला सकाळी लवकर उठून आंघोळ करायला खूप कंटाळा येतो .पण दिवाळी सणाची पहाटेची अभंग स्नान याची मी आवर्जून वाट पाहत असतो. दरवर्षी आकाश कंदील कोणत्या आकारामध्ये घ्यायचा यासाठी आम्हा भावंडांचे आधीपासून चर्चा सुरू होते
माझी आई आणि माझी बहीण कोणती रांगोळी काढायची याची प्रॅक्टिस तर आधीच आठ दिवस करत असतात . त्यांच्या रांगोळी मी अंगणाचा सडा रंग बरंगी दिसतो. रांगोळी मध्ये ठेवलेल्या पणत्या जणू आकाशामध्ये टिमटिमणारे तारे असे वाटत असतात.
सायंकाळ झाली की दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये घरामधील दिवे लावण्यासाठी आमच्या भावंडांची स्पर्धा चालू होते. सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे कधी आम्ही मामाच्या गावी जातो किंवा आमची भावंडे आमच्या गावी सुट्टीसाठी येतात. मग सगळेजण आम्ही मिळून रात्री वेळ पर्यंत वेगवेगळे गमतीशीर खेळ खेळत असतो. सर्वजण एकत्र आल्यामुळे ही सुट्टी संपुच नये असे वाटत असते.
Maza avadta san diwali nibandh in marathi
दिवाळीमध्ये आम्ही हौशेणे खूप फटाके फोडतो. पण त्यानंतर हवेमध्ये दिसणारे प्रदूषण पाहून वाईट सुद्धा वाटते. यावर्षी आम्ही सर्व भावंडांनी हा प्रण घेतलेला आहे की पुढच्या वर्षीपासून आम्ही फटाके फोडणार नाही आणि पर्यावरणाचे प्रदूषण करणार नाही कारण या प्रदूषणामुळे फक्त हवेचे प्रदूषण होत नाही तर त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण आणि मातीचे सुद्धा प्रदूषण होते
. फटाक्यामधील भयानक रासायनिक पदार्थामुळे ते पदार्थ जमिनीमध्ये मिसळले की मातीचे सुद्धा प्रदूषण होते. फटाक्यांच्या मोठ्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलांना वृद्ध माणसांना आणि पक्षांना खूप त्रास सहन करावा लागतो हे आम्ही आमच्या यावर्षीच्या दिवाळीमध्ये आमच्या डोळ्यात देखत बघितलेले आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी फटाके अजिबात फोडणार नाही असा प्रण घेतलेला आहे. ( Maza avadta san diwali nibandh)
त्या प्रत्येकाने आपण असा विचार करू तर नक्कीच खूप असा आपल्या समाजामध्ये बदल घडेल.
ज्या पैशाने आम्ही फटाके फोडतो त्याच पैशाने जर आपण गरिबांना तसेच अनाथाश्रमां मधील लोकांना त्यांना गरजेच्या वस्तू अन्नधान्य, कपडे, त्यांच्या गोळ्यांसाठी पैसे हे जर आपण घेऊन दिले तर आपण खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू असे मला वाटते
तर अशी आम्ही दिवाळी साजरी करतो हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद चैतन्य जगण्याची नवी उमेद आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण आहे , भरपूर सारा गोड खाऊ, शाळेच्या सुट्ट्या, आकाश कंदील, अभंग स्नान, रोशनाई या सर्व गोष्टीमुळे वातावरणामध्ये एक नवीन चैतन्य भरून येते म्हणूनच हा सण मला खूप आवडतो. तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या . फटाके फोडणे बंद करा आणि दिवाळी साजरी करा म्हणजेच खऱ्या अर्थाने दिवाळी सार्थक होईल( maza avadta san diwali nibandh in marathi)