Me mukhyadhyapak zalo tr marathi nibandh:शिक्षक दिन जवळ येत होता. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे विषय शिकवण्यासाठी घेतले होते. मला आधीपासूनच मुख्याध्यापक होण्याची कुतूहल कायमच होते. म्हणून मी ठरवलं की आपण मुख्याध्यापक व्हायचं. एक दिवसाचा मुख्याध्यापक होण्या पेक्षा ही पुढे खूप शिकून मुख्याध्यापक होण्याचा प्रयत्न करेन. जर मी मुख्याध्यापक झालो तर एक आदर्श शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेविषयी आपुलकी, प्रेम, आदर निर्माण होईल असे वातावरण मी शाळेमध्ये निर्माण करेन.
मी मुख्याध्यापक झालो तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा तसेच आधुनिक बदलत्या युगाबरोबर जे काही नवीन तंत्रज्ञान आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देईन. काही विद्यार्थ्यांना शाळा म्हटलं की कंटाळा येतो कारण त्यांना शाळेमध्ये तसे अनुकूलित आनंदी वातावरण मिळत नाही. त्यामुळे माझा पहिला प्रयत्न हाच असेल की विद्यार्थ्यांना असे आनंदी वातावरण मिळवून देणे ज्या वातावरणात सर्व विद्यार्थी हसत खेळत शिक्षण घेतील. मी मुख्याध्यापक झालो तर दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीला घेऊन जाईल यामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपले गड किल्ले, प्राचीन मंदिरे, कला या सगळ्यांची सांगड घालणारी शैक्षणिक सहल एक आदर्श सहल ठरली जाईल.
me mukhyadhyapak zalo tr marathi nibandh
मी मुख्याध्यापक झालो तर वर्षातून दोन वेळा शाळेच्या परिसरात गावामध्ये, तसेच गावाच्या आजूबाजूच्या परिसरात माळ रानावरती झाडे लावून झाडे लावा झाडे जगवा ही जनजागृती विद्यार्थ्यांमध्येच तसेच गावांच्या लोकांमध्ये ही जनजागृती करेन. विद्यार्थ्यांना लहानपणीच पर्यावरणाचे महत्त्व, प्रदूषणाचा वाढता धोका, दुष्काळ, ओझोनचा वाढता थर यासारख्या भयानक समस्यांना आधीच ओळख करून देईन त्यामुळे शैक्षणिक स्तरावरती छोट्या रूपात का होईना झाडे लावल्यामुळे त्यांचा पर्यावरणाला हातभार लागेल. आणि लहानपणापासून त्यांना पर्यावरणाची गोडी वाटू लागेल.
लहान मुले ही मातीच्या गोळ्या सारखी असतात आपण जसे त्यांना आकार देऊ तसे ते आकार घेत जातात त्यामुळे शाळेमध्ये दरवर्षी त्यांच्यासाठी असे उपक्रम राबवीण ज्यामध्ये मोठे मोठे अधिकारी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभेल त्यांच्या भाषणामुळे त्यांना सुद्धा एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल. आणि लहानपणापासूनच आपण कोणत्या मार्गाने जायचे आहे याची थोडीफार त्यांना आयडिया येईल. मी मुख्याध्यापक झालो तर एक महत्त्वाचे काम नक्की करेन ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच सर्व जाती समान आहेत ही एक भावना आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये कोरली जाईल यासाठी मी आता प्रयत्न करेन. आजकालचा वाटता जातिभेद यामुळे आपली सततची होणारी भांडणे, समाजातील कलह यांचा वाढता प्रभाव बघून हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी मुख्याध्यापक झाले तर कोणताही विद्यार्थी जातीभेद ला बळी पडणार नाही.
Me mukhyadhyapak zalo tr marathi nibandh
विद्यार्थ्यांसाठी शाळा म्हणजे फक्त अभ्यास असे समीकरण नसून शाळा म्हणजे आपल्या सर्व सर्वांगीण विकास आणि तेही हसत खेळत सर्व शिक्षण घेणे अशी संकल्पना मी राबवेन. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त असे क्रीडांगण आणि त्यांच्या खेळासाठी लागणारे असे उत्तम प्रशिक्षक त्यांना मी उपलब्ध करून देईन. कारण हल्लीच्या जगात खेळामध्ये आपल्या सर्वांगीण विकास होणे हे सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण पुढे जाऊन मोठ्या मोठ्या होणाऱ्या खेळांच्या स्पर्धा जसे की ऑलिंपिक आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावर ती होणाऱ्या क्रीडा स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मी मुख्याध्यापक झालो तर शाळेमध्ये मोठी असे वाचनालय म्हणजेच ग्रंथालय चालू करेन. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी मी कायमच विचार करेन जर एखाद्या विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमी असेल किंवा त्याला शिक्षण घेण्यासाठी त्याची कौटुंबिक स्थिती चांगली नसेल तरीसुद्धा मी त्याला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघांचा समन्वय घडवून आणण्याचा मी कायमच प्रयत्न करेन.
Me mukhyadhyapak zalo tr marathi nibandh
शाळेतील शिक्षकांच्या सल्ल्यानुसार आणि योग्य मार्गदर्शनानुसार जर काही बदल करण्याची गरज भासली तर त्यासाठी सुद्धा मी तत्पर सेवा मध्ये उपलब्ध राहील. वेळोवेळी पालक मेळावे घेऊन विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या काही अडचणी असते तर त्या सोडवण्यासाठी मी वेगळी अशी एक टीम तयार करेल ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवण्यास मदत होईल. प्रत्येक विद्यार्थी हा सर्वगुन संपन्न असेलच असा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे काही चुकत असेल तर सगळ्यांच्या समोर त्यांना शिक्षा न करता त्यांचे कुठे चुकत आहे याचे मार्गदर्शन करायला मला आवडेल.मी मुख्यमंत्री झालो तर विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अशी प्रयोगशाळा सुरू करेन. शाळेमध्ये दरवर्षी वकृत्व स्पर्धा, डान्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत स्पर्धा यासारख्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या स्पर्धांचे कायमच आयोजन करत राहीन.
मी मुख्याध्यापक झालो तर शालेय विषया शिवाय सहज शालेय उपक्रमांतही माझ्या शालेय विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल याची मी काळजी घेईन. शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा यांचे आयोजन करेन . म्हणजे भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देताना त्या सोप्या जातील. विद्यार्थ्यांसाठी मी कायमच असे आनंदी वातावरण तयार करेल ज्यामध्ये विद्यार्थी कधीच शाळेला येण्यासाठी कंटाळा करणार नाहीत त्यामुळेच तर त्यांच्या अभ्यासामध्ये आवड निर्माण होईल.
me mukhyadhyapak zalo tr marathi nibandh
कधी वेळ आली तर मी एक शिस्तबद्ध मुख्याध्यापक सुद्धा बनेन. कारण की शिक्षकांच्या हातातील छडीच विद्यार्थ्यांना आयुष्याच्या चांगल्या वळणावरती घेऊन जाते. मी मुख्याध्यापक झालो तर आदर्श विद्यार्थी घडवण्यासोबत त्यांना आयुष्यामध्ये चांगले व्यक्तिमत्व जे की लोकांना त्यांच्या अडचणीमध्ये मदत करणारे कसे घडवले पाहिजेत हे सुद्धा मी त्यांना शिकवेन. एक चांगला माणूस यांची सांगड मी विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय आयुष्यातच करून देईन. मी मुख्याध्यापक झालो तर पेपर फुटी सारख्या आजकाल वाढणाऱ्या समस्यांना थारा देणार नाही. किंवा यासारख्या गोष्टी शाळेमध्ये होणारच नाहीत याची मी पूर्ण खात्री कारेण .
मला या गोष्टीची जाणीव आहे ती आपण या समाजामध्ये जन्माला येतो म्हणजेच आपण काहीतरी या समाजाचे देणे लागतो. त्यामुळे आयुष्यात जन्माला येऊन या समाजाला उपयोगी पडेल असे काहीतरी कार्य करावे असे मला कायमच वाटते. बनवून मुख्याध्यापक बनूण आदर्श विद्यार्थी आणि या समाजाला आदर्श व्यक्तिमत्व देऊन मी हे समाजाचे ऋण भेटू शकतो. म्हणूनच मला मुख्याध्यापक व्हायला फार आवडेल.
नवनवीन निबंध येथे वाचा
राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध
me mukhyadhyapak zalo tr marathi nibandh https://youtu.be/gOVAGvL9jjs?si=vJWYVyRsS_IYC77q
धन्यवाद