Misal recipe in Marathi -मिसळ म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय असतो. स्ट्रीट फूड मध्ये. मिसळला आवर्जून पसंती दिली जाते. मिसळ मध्ये भरपूर प्रमाणात विविधता आलेली आहे. यामध्ये पुणेरी मिसळ, दही मिसळ, तर्री मिसळ ,कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून प्रत्येक मिसळमध्ये आपल्याला विविधता आढळून येते. आज मी तुम्हाला अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ कशा प्रकारे केली जाते तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि मिसळ वरती जो कट असतो त्याची रेसिपी कशाप्रकारे करायची म्हणजे आपली कोल्हापुरी मिसळ चवीला स्वादिष्ट होईल याची रेसिपी दाखवणार आहे. तर या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते हे आपण आधी बघूया. या मिसळचे प्रमाण ४ जणांचे आहे.
misal recipe in Marathi
कोल्हापुरी मिसळ साठी लागणारे साहित्य
१) सुके खोबरे- पाव वाटी
२) मोड आलेली मटकी 250 ग्रॅम
३) मोड आलेले काळे वाटाणे- अर्धी वाटी
४) एक मोठा बटाटा
५) कांदे-२
६) टोमॅटो-१
७) कोथिंबीर
८) तीळ – एक चमचा
९) खसखस अर्धा चमचा
१०) कांदा लसूण मसाला-२ चमचे
११) काश्मिरी लाल-२ चमचे
१२) मीठ चवीनुसार
१३) आले लसूण पेस्ट -१ चमचा
१४) गरम मसाला-१ चमचा
१५) पाव
हे सुद्धा वाचा – हॉटेल सारखा चमचमीत पनीर बटर मसाला
पाककृती-(misal recipe in Marathi)
सर्वप्रथम मोड आलेली कडधान्य म्हणजेच मटकी आणि मोड आलेले काळे वाटाणे आपण नीट स्वच्छ करून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बारीक खडे असतील तर ते बाजूला होतील.
त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे या पाण्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून मोड आलेली कडधान्य आणि बटाट्याचे बारीक काप करून आपण शिजवून घ्यायचे आहेत. जर आपण कुकरच्या भांड्यामध्ये कडधान्य शिजवाण्यासाठी ठेवत असाल ते जास्त शिजणार नाही त्याची काळजी घ्यावी. कडधान्य शिजवताना ती 80 टक्के शिजतील याची काळजी घ्यावी.
misal recipe in Marathi
कडधान्य शिजेपर्यंत आपण दुसरीकडे मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये दोन बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. .
कांदा चांगला लालसर भाजल्यानंतर तो आपण बाजूला काढून घेऊन त्याच कढईमध्ये सुके खोबरे बारीक किसून चांगले लालसर होईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहे.
खोबरे खरपूस भाजून झाल्यानंतर त्या कढईमध्ये तीळ आणि खसखस परतून घेणार आहोत. तीळ आणि खसखस भाजताना ते जास्त करपले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
हे सुद्धा वाचा –मुंबई फेमस पावभाजी रेसीपी
हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावे. तसेच या मिश्रणामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकावा आणि हे सारे मिश्रण मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.(Misal recipe in Marathi)
मिश्रणाची बारीक पेस्ट झाल्यानंतर कढईमध्ये तेल घेणार आहोत. विचार करताना तेलाचा वापर थोडा जास्त करावा जेणेकरून मिसळला तर्री येण्यास मदत होईल.
तेल चांगले तापल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून या तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्ता यांची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर यात तेलामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तेलामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यामुळे पदार्थाला छान चव येते.
त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले आणि लसणाची बेस्ट टाकणयची आहे . आणि पाव वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे
फोडणी चांगली झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर हे सारे मिश्रण तेलामध्ये चांगले भाजून घ्यावे.
मिश्रण भाजल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तसेच हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.(Misal recipe in Marathi)
मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेले कडधान्य टाकायचे आहे. आणि आता या मिसळ ला चांगली उकळी येऊ द्यायची आहे..
आपल्या पसंतीनुसार मिसळ मध्ये पाणी कमी जास्त याचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर मिसळ जास्त पातळ हवी असेल तर गरम पाणी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता.
मिसळला उकळी देत असताना त्यावरती झाकण ठेवावे. आणि मंद आचेवर मिसळला उकळी द्यावी.
मिसळ तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर अंथरावी.
अशाप्रकारे आपली मिसळ तयार होते. आता ही रेसिपी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाव आणि फरसाण त्याच्यासोबत सर्व्ह करू शकता.
misal recipe in Marathi
सोप्या अशा ट्रिक्स पुढील प्रमाणे-
१) मिसळ तयार करत असताना कायम गरम पाण्याचा वापर करावा. गरम पाण्यामुळे मिसळला तर्री येणार मदत होते.
२) आता तयार करताना तेलाचा थोडा जास्त वापर करावा.
३) मिसळ सर्व्ह करतानाच मिसळ मध्ये फरसाण घालावा. अन्यथा अगोदरच फरसाण घातले तर फरसाण मऊ पडण्याची शक्यता असते .
४) मिसळ साठी वापरला जाणारा फरसाण शक्यतो गोडसर असावा जेणेकरून मिसळची चव छान लागते.
५) लहान मुलांसाठी जर तुम्ही मिसळ करत असाल तर तेलाचे प्रमाण थोडे कमी करावे. आणि या कडधान्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. जसे की फ्लॉवर, ताजे हिरवे वाटाणे इत्यादी.
६)मसाला तयार करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाच ते सहा काजू खरपूस भाजून कांदा आणि खोबरे यांच्या वाटणामध्ये बारीक पेस्ट केली तरी ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो.(Misal recipe in Marathi)