Mukhyamantri annapurna yojana 2024-आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी आपल्या महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प दिला होता. महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्यातील लोकांना सक्षम बनवण्यासाठी तसेच सर्व समाज घटकांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना आखल्या होतात. आपले सरकार तरुण वर्ग, मागास वर्ग, शेतकरी वर्ग यांच्यासाठी कायमच नवनवीन योजना टाकत असतो. या योजनेमुळे निश्चितच गृहिणीला ज्या महिला स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करतात त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे आनंददायी बातमी. या योजनेमुळे आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यास मदत होईल.
Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४
त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही सुद्धा एक यशस्वीरित्या पार पडलेली योजना आहे. आता त्याच बरोबर अजून एका योजनेचा समावेश केला आहे. ज्यामुळे विकासामध्ये अजून थोडी भर पडेल. त्यामधील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 .
विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना या योजनेसाठी पात्र असलेल्या व्यक्ती सुद्धा या योजनेला अर्ज करू शकतात. वाढत्या महागाईमुळे सिलेंडरचे गगनाला भेटलेली किंमत ही सामान्य माणसाला परवडण्यासारखी राहिली नाही आहे त्यामुळे या योजनेचा निश्चितच गरीब जनतेला फायदा होणार आहे
.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब जनतेला, तसेच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या समाजातील काही घटकांना आपल्या सरकार मार्फत तीन मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत. अंतसंकल्पाच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील 53 लाख याचा फायदा होणार आहे. तर काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 आपण जाणून घेऊया.
हे सुद्धा वाचा –शिलाई मशिन योजना
अन्नपूर्णा योजना सादर करताना काय बोलले अजित पवार ?
ही योजना सादर करत असताना अजित पवार यांनी सांगितले आहे की ही योजना म्हणजे यांच्या आरोग्याशी निगडित असलेली आणि त्यांच्या आरोग्यविषयक काही समस्या असतील तर त्या कमी करणारी ही योजना फायद्याची आहे.
स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन यासोबत स्त्रियांचा थेट संबंध येतो. त्यामुळे स्त्रियांना स्वच्छ इंधन पुरवणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही एक जबाबदारी आहे.
दारिद्र रेषेखालील स्त्रियांना स्वयंपाक करताना लाकडांचा वापर करावा लागतो कारण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे . लाकडाच्या धुरामुळे स्त्रियांना आरोग्य संबंधित समस्या उद्भवू शकतात.
इंधनासाठी एलपीजी हा एक सुरक्षित वापर आहे.
या योजनेचा लाभ 14.2 किलोग्रॅम वजन असलेल्या गॅस सिलेंडरचे जोडणी सदस्यांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 पात्रता
१) या योजनेसाठी पात्र असलेला रहिवासी हा महाराष्ट्रातील असावा.
२) योजनेसाठी पात्र असलेले सदस्य यांच्याकडे स्वतःच्या नावाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
३) योजनेसाठी पात्र असलेले व्यक्तीच्या घरातील सदस्यांची संख्या पाच असावी.
४) संबंधित व्यक्ती हा दारिद्र्यरेषेखालील असावा.
५) सरकारने ज्या नियमावली आखून दिलेले आहेत त्या नियमावलींना ती व्यक्ती पात्र हवी.
६) एका कुटुंबातील एकच व्यक्ती या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी पात्र आहेत.
७) मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेले सदस्य सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ८) महाराष्ट्र राज्यातील पंतप्रधान उज्वल योजनेसाठी जे सदस्य पात्र आहेत ते सुद्धा या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी पात्र राहतील.
९) या अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेच्या नावावर गॅस जोडणी असणे आवश्यक आहे.
१०) पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना देखील या योजनेचा फायदा घेता येणार आहे. रात्रीच्या कुटुंबाकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
११) अर्जदार सदस्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने नेमून दिलेल्या मर्यादा पेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 लागणारी कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) रहिवासी दाखला
४) फोटो
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या सदस्यांनी अर्ज कुठे आणि कसा करावा यावरती अद्याप कोणतेही माहिती सादर केली गेली नाही. पण लवकरच आपल्या महाराष्ट्र सरकारकडून संबंधित योजनेविषयी माहिती सादर केली जाईल.
तसेच या अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना 2024 तसेच पंतप्रधान उज्वल योजना या योजनेमधील महिला या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरत असल्याने . या कुटुंबातील सदस्यांची यादी तेल कंपन्यांना पुरवली जाणार आहे. कारण आपल्याला मिळणारे सिलेंडर हे तेल कंपन्यांकडून पुरवठा केले जात असल्यामुळे सरकारने नेमून दिलेल्या समितीमार्फत सर्व अर्जांची नीट पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल.
मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्याकडूनच केले जाईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 उद्दिष्टे
समाजातील मागासवर्गीय घटकांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आपल्या राज्यातील गरीब जनतेला दोन वेळेचे जेवण मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपले सरकार नवनवीन धोरणे बनवते.
महाराष्ट्र जनतेला स्वस्त दरात अन्न मिळावे हा मुख्य हेतू आहे.
दारिद्र रेषेखालील जनतेला आर्थिक मदत करणे.
या योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन सिलेंडर मोफत पात्र असलेल्या सदस्यांना मिळवून देणे.
गरीब जनतेचे आरोग्य सुधारणे.
महिलांचे सक्षमीकरण करणे.
सिलेंडरच्या वापरामुळे प्रदूषण रोखण्यास हातभार लावणे.जळाऊ लाकडामुळे भरपूर प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. पण सिलेंडरच्या वापरामुळे हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत होते.
योजनेसाठी पात्र सदस्यांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर मिळवून देणे.
सिलेंडरच्या वापरामुळे महिलांचा भरपूर प्रमाणात वेळ वाचतो.
सिलेंडरच्या वापरामुळे भरपूर साऱ्या प्रमाणात वृक्षतोड थांबली जाते त्यामुळे वृक्षतोडीला प्रतिबंध बसतो.
कसा करावा अर्ज?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०१४ योजनेसाठी पंतप्रधान उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझे लाडके बहिण योजना या योजनेसाठी पात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला या योजनेसाठी पात्र राहतील. त्यामुळे ज्या सदस्यांनी या योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत ते सारे अर्ज पुढे तेल कंपन्यांना पाठवण्यात येतील. आणि जे सदस्य या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 यासाठी पात्र राहतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सदस्यांना या योजनेचा लाभ कसा भेटणार हे आता आपण पाहूया
महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या मोफत सिलेंडर हे वितरण करणाऱ्या तेल कंपन्यांना तीन मोफत सिलेंडर पुरवण्यात येतील. आणि त्यांच्याकडून या सिलेंडरचे वितरण लाभार्थ्यांना होईल.
शासनाच्या सोयीसाठी मुंबई शहरामध्ये तसेच मुंबई नगरमध्ये आणि ठाणे शहरात शिधावाटप क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत वितरण करणारी समिती नेमण्यात आलेली आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सदस्यांना मोफत गॅस सिलेंडर साठी पात्र असणाऱ्या सदस्यांना ठाणे आणि मुंबई या शहरांमध्ये शिधा वाटपासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. तसेच इतर जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरावर समिती आयोजित केलेली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सदस्यांना एका महिन्या त एकापेक्षा जास्त सिलेंडर साठी सबसिडी भेटणार नाही.
अन्नपूर्णा योजनेचे फायदे
- वर्षातून आपल्याला तीन वेळा मोफत सिलेंडर भेटतील. त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या सिलेंडरला आपण पैसे द्यावे लागतील.
- सिलेंडरचे वाढलेले दर पाहता. आर्थिक दृष्ट्या थोडाफार हातभार लागेल.
- ज्यांच्या घरी चुली वरती जेवण बनवले जाते. त्यांच्या आरोग्याला हातभार लावण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल.
- आर्थिक दृष्ट्या आणि मागासवर्गीय लोकांचा सर्वांगीण विकास करणे.
- च्या कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच आहे त्यांना या योजनेचा फायदा भेटणार आहे.
- योजनेचा फायदा प्रामुख्याने महिलांना तसेच त्यांच्या लहान मुलांना आरोग्य सुधारण्यामध्ये फायदेशीर ठरेल.
- आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांचे आर्थिक पुनर्वसन त्याचप्रमाणे सामाजिक पुनर्वसन करण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे थोड्याफार प्रमाणात प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. कारण चुलीच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर अशा दम्यासारख्या रोगांना महिलांना तोंड द्यावे लागते त्यामुळे एकंदरीत सगळा विचार केला गेला तर ही योजना सर्वदृष्ट्या फायदेशीर आहे
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!