Navratri upay 2024 / या उपायांनी करा देवी मातेला प्रसन्न

Navratri upay 2024 नवरात्री  २०२४ मध्ये काय करावे आणि काय  नाही त्याविषयी आज आपण पाहणार आहोत.  नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि धार्मिक पद्धतीने खूप महत्त्वाचे असे दिवस मानले जातात. या काळात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर काही गोष्टींना विशेष ध्यान पण दिले पाहिजेत. आपण देवाची पूजा तर मनापासून करतो. पण नकळत आपल्यातून अशा काही गोष्टी होऊन जातात त्यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे फळ मिळत नाही. तर चला पाहूया नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवले पाहिजे.Navratri upay 2024

Navratri upay 2024

सुख-समृद्धीसाठी घरगुती उपाय –
एक नारळ लाल स्वच्छ फडक्यामध्ये  गुंडाळून  तो नारळ देवी मातेला अर्पण करा. नऊ दिवस या नारळाची पूजा करून दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करा यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी आणि धन यांची प्राप्ती होते.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस श्रीसूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. श्री सूक्त पठाण देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस दररोज याचे पठण करा.

नवरात्रीच्या नऊ दिवस तसेच दररोज सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

कुबेर यंत्र याची नेहमी आपण पूजा करावी तसेच कुबेर मंत्र सायंकाळच्या वेळी जप करत राहिल्यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद लागतो. तसेच नवरात्रीमध्ये कुबेर यंत्र तुम्ही घराच्या देवारात स्थापन करू शकता.

नवरात्रीच्या शुक्रवारी मातेला खीर, कमळाचे फळ अर्पण करायला अजिबात विसरू नका.( Navratri upay 2024)

आपल्या घरातील झाडू म्हणजे साक्षात देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे झाडूला कधीही उभे ठेवू नका. आणि हा झाडून बाहेरच्या व्यक्तींना दिसणार नाही याची काळजी घ्या. रात्रीच्या वेळी नवरात्रीच्या दिवसांमध्ये अजिबात झाडून मारू नका.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदा पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसायला घ्या. या मिठाच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते.

नऊ दिवस संध्याकाळच्या वेळी घरात धुप आरती नक्की करा.

नवरात्रीच्या दिवशी सायंकाळी तसेच हा उपाय जर तुम्ही दररोज केला तरी चालेल दररोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा नेहमी लावा. आणि यावेळी लक्ष्मी मंत्र किंवा कुबेर मंत्र किंवा विष्णू मंत्र यापैकी कोणताही एक मंत्र यांचा जप परत राहावा त्यामुळे लक्ष्मी माता खुश होऊन लक्ष्मी मातेची विशेष कृपा प्राप्त होते.

.

हे सुद्धा वाचा – लक्ष्मी ला प्रसन्न करून घेण्यासाठी असे करा कन्यापूजन

घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी वाटत असते तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवसांमध्ये माता दुर्गेला एक लिंबू आणि सात मिरच्या अर्पण करा आणि त्या नंतर आपल्या दरवाजाच्या बाजूला अडकून ठेवा..  त्यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर होईल ‌ Navratri upay 2024

माता दुर्गेला कमळाचे फूल विशेष करून आवडते. त्यामुळे नवरात्रीमध्ये आईला कमळाचे फूल अर्पण करायला अजिबात विसरू नका.

माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस सप्तशतीचा पाठ अवश्य करा. त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतील.

Navratri upay 2024जर

Navratri upay 2024

तुमच्यावरती कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले असेल तर नऊ दिवस मातेला एक सुपारी अर्पण करा . आणि शेवटच्या दिवशी या सुपारी एका लाल फडक्यामध्ये बांधून ठेवा. हे सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता.


दुर्गा मातेला गुळ आणि चणे याचा नैवेद्य नक्की दाखवा. त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल कारण हा नैवेद्य देवीच्या आवडीच्या नैवेद्या आहे.

पिंपळाची पाच पाने घेऊन त्यावरती स्वस्तिक काढा. आणि हे पाने माता दुर्गेच्या चरणावरती अर्पण करा. आणि देवीकडे कर्ज मुक्तीसाठी प्रार्थना करा.Kanya pujan 2024

navratri upay 2024

गोमातेला आपला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गोमातेची पूजन केल्यामुळे आपल्या हजारो पापान पासुन आपल्याला मुक्ती भेटते. त्यामुळे विशेष करून  गोमातेला   अन्न जरूर अर्पण करा.

कुटुंबाचे सदस्यांना विशेष करून आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे या साठी  नवरात्रीमध्ये देवी मातेला लाल कुंकू अवश्य अर्पण करा.

नवरात्री मध्ये काय केले पाहिजे
१) उपवास आणि पूजा-
  ‌. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये नऊ दिवस उपवास केल्याने पापा पासून मुक्ती भेटते. नऊ दिवस देवाजवळ अखंड दिवा तेवत  ठेवल्याने घरावर कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर ते दूर होते.  नवरात्रीमध्ये उपवास ठेवल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात अशी भावना आहे.

२) दान धर्म-
  दान धर्म हे आपल्या धर्मामध्ये अतिशय सर्वात पवित्र स्थान आहे. विशेष करून नवरात्रीमध्ये गरीब लोकांना कपडे तसेच अन्नदान केल्यामुळे माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. अन्नदान सेवेमध्ये लोकांना तांदूळ, गहू , गुळ, डाळी यांचे दान करावे. तसेच गरिबांना  अन्नदान दिले तरी चालते. सर्वात पुण्य कर्म काय असेल तर ते म्हणजे अन्नदान.

३) सात्विक भोजन ग्रहण करणे-( Navratri upay 2024)
   नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये कोणत्याही प्रकारच्या मांसाहारी पदार्थ ग्रहण न करता. पूर्णपणे सात्विक भोजन ग्रहण करणे गरजेचे आहे. त्यामध्ये दूध फळे साबुदाणा बटाटा यांचा समावेश आहे. तसेच नवरात्रीमध्ये कांदा लसूण वर्ज्य करावेत.

४) घरातील स्वच्छता –
नवरात्रीमध्ये विशेष करून घराची स्वच्छता याच्याकडे विशेष ध्यान दिले जाते. मुख्य म्हणजे नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच सर्व घराची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरातील आणि विशेष करून आपल्या घराच्या अंगणातील स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जिथे स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मी राहते.

५) कन्या पूजन-
नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी या दोन दिवशी कन्या पूजन करणे म्हणजे साक्षात देवी दुर्गा मातेला प्रसन्न करून घेणे असे मानले जाते. हे दोन दिवस अतिशय पवित्र असतात तसेच माता दुर्गा ही पृथ्वीतलावर या नऊ दिवसांमध्ये कुमारीकेच्या रूपामध्ये फिरत असते अशी आख्यायिका आहे त्यामुळे कन्या पूजनाला नवरात्रीमध्ये विशेष केले जाते.Navratri upay 2024

Navratri upay 2024

६) ध्यान आणि मंत्र
  नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणताही देवीचे पवित्र ग्रंथ याचे वाचन केले तरी चालते. ग्रंथ वाचन करण्यास जमत नसेल तर मुखामध्ये देवीचा मंत्र तुमचे काम करताना सुद्धा पठन करू शकता.


७) गोमातेचे पूजन-

गो माता ही आपली हिंदू संस्कृतीमध्ये देवता मानली जाते. गोमातेला नवरात्रीमध्ये गोड धोड खाऊ घालावे. तसेच जमत असल्यास गोमातेची ओटी सुद्धा भरावी.

८) नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये मोठ्या माणसांचे त्याचप्रमाणे लहान मुलांचे कोणाचे मन दुखवू नका कारण या दिवसात देव कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येईल ते सांगता येत नाही त्यामुळे कायमच थोऱ्या मोठ्यांचा आदर करा.

नवरात्रीमध्ये काय नाही केले पाहिजे ( Navratri upay 2024 )
१) मांसाहारी सेवन
    शुद्धते कडे तसेच मन आणि शरीर पवित्र ठेवण्यासाठी मांसाहार नवरात्रीमध्ये वर्ज करावे तसेच कोणत्याही प्राण्याची हत्या करणे पाप आहे. तसेच कोणत्याही मुक्या जनावरांना हानी पोहोचेल  असे काम करू नको.

२) केस कट करणे तसेच नखे  कट करणे-
     नवरात्रीमध्ये केस तसेच नखे कट करण्यापासून वाचले पाहिजे.

३) उशिरापर्यंत झोपणे –
  असे म्हटले जाते उशिरापर्यंत  झोपल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.  त्यामुळे कायमच  उशिरापर्यंत तसेच सायंकाळच्या  दिवे लागण्याच्या वेळी झोपणे कायमच  टाळावे.

४)खोटे वचन-
  कोणत्याही व्यक्तीला खोटे वचन देणे म्हणजे माता लक्ष्मीला स्वतःहून नाराज करणे ‌. छोटे वचन तसेच चुकीचे व्यवहार करणे नवरात्रीमध्ये टाळावे.

५) नकारात्मक विचार
   नकारात्मक विचार यापासून आपल्या मनाला दूर ठेवा तेव्हाच आपले मन पवित्र राहील.

६) मास मधीरा यांचे सेवन-

मास आणि मधिरा यांचे सेवन नवरात्रीमध्ये करू नये कारण यामुळे प्राण्यांची हिंसा होते. तसेच मदिराचेसेवन‌ हे खरंतर कधीच करू नये पण नवरात्रीमध्ये याचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.

(Navratri upay 2024)
‌ 

दुर्गा सप्तशती पाठ येथे वाचा –https://youtu.be/uNb1wykwFRE?si=r8HUqyOymDb-drly