Rakshabandhan marathi nibandh : रक्षाबंधन म्हणजेच रक्षा भावाने बहिणीच्या पाठी आयुष्यभर खंबीरपणे प्रत्येक संकटात उभे राहून तिची रक्षा करणे आणि बंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्यासारखे या जगामध्ये कुठलेच नाते पवित्र नाही. आपला पहिला मित्र ही तेच आणि आपला पहिला शत्रू ही तेच , आपण लहानपणापासून सगळे काय त्यांच्यासोबत शेअर करतो, मग तो आपल्या आई-वडिलांनी आणलेला चॉकलेट का असेना आणि मोठे झाल्यानंतर आपल्या आयुष्यातील सुखदुःखाचे भागीदार ही तेच असतात. बहिण भाऊ हे आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिले मित्र आणि मैत्रीण.
आपण जन्माला आल्यापासून त्यांच्यासोबतच मोठे होतो. आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच आपले बालपण आपले तारुण्य त्यांच्यासोबत घालवतो. आई-वडिलांच्या नंतर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले भावंडेच तर असतात. आपल्याला काय हवंय काय नको हे त्यांना सांगण्याची गरज पडत नाही.
लहानपणापासूनच भांडण आणि प्रेम यांचा बहिण भावांसोबत समतोल साधत आपण मोठे होतो. जरा काही चुकले तर आपण त्यांच्यासोबत भांडायलाही पाटी पुढे बघत नाही. आणि आपल्या भावंडांना काय त्रास झाला. तर सगळ्यात आधी आपण त्यांच्या पुढे खंबीरपणे उभे राहतो. त्यांना कोणताही त्रास झाला तरी ते आपण बघू शकत नाही. आयुष्यात आपण किती मोठे झालो आणि जगाच्या कुठल्याही पाठीवरती असलो तरी दुःखाच्या छायेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भावंडांचीच गरज आपल्याला भासते.
Rakshabandhan Marathi Nibandh : रक्षाबंधन मराठी निबंध
बहिण भावाच्या नात्याला उणीव भासते ती म्हणजे जेव्हा एखादी बहीण लग्न करून ती तिच्या सासरी जाते तेव्हा तो दोन्ही भावंडांसाठी खूप भावनिक क्षण असतो. नक्कीच लग्नानंतर हे बहिण भावाचे नाते अधिकच दृढ होत जाते. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर राहते तेव्हाच त्यां नात्याची खरी किंमत आपल्याला कळते ..अशाच पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.
तो श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला हा सण मोठ्या आनंदाने सगळीकडे साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला प्रेमाचा धागा म्हणजेच राखी बांधते आणि या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी, सुख समाधान साठी देवाकडे प्रार्थना करते. आणि त्याबद्दल भावाचे कर्तव्य म्हणून बहिणीच्या पाठीशी प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहणे याचे वचन तो आपल्या बहिणीला देतो. राखी बांधून झाल्यानंतर बहिण आपल्या भावाचे औक्षण करते. आणि हा प्रेमाचा धागा भाऊ आपल्या मनगटावर वर्षभर सांभाळून ठेवतो.
हा सण फक्त एका दिवसा पुरताच मर्यादित नसून. आयुष्यभर या बहिण भावाच्या नात्याला कशाचीच तोड नाही. आपल्या जन्मामधील सगळी नाती बदलत जातात पण हे बहिण भावाचे नाते आजन्म तुटत नाही.भाऊ छोटा असू दे किंवा लहान त्याची जागाही बहिणीच्या मनामध्ये कायमच उच्च स्थानी असते.
लग्नानंतर एक मुलीला सगळ्यात जास्त आठवण येते ती म्हणजे आपल्या भावंडांची. आणि म्हणून रक्षाबंधन साठी ती वर्षभर या सणाची वाट पाहते कारण या सणाच्या निमित्ताने भावंडांना एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवता यावेत. बहिण भावाचे नाते इतके खोडकर असते की वेळ आली तर ते आपल्या भावंडासाठी जगाबरोबर भांडण करतील पण वेळ आली तर एकमेकांना ग्लासभर पाणी सुद्धा आणून देणार नाही. टीव्हीचा रिमोट साठी भांडणे ही तर प्रत्येक घरातील गोष्ट आहे. कोणती ही स्पर्धा असून आपल्याला सगळ्यात जास्त धाडस देणारे आपली भावंडे च असतात.
हा सण भारतामध्ये तर सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातोच. त्याचप्रमाणे भारताबाहेर सुद्धा खूप ठिकाणी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.रक्षाबंधन या सणामुळे बहिण भावाच्या नात्याला अजूनच दृढता प्राप्त होते. या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या भावंडाविषयी असणारे प्रेम आणि कर्तव्य यांच्या विषयी अजूनच आत्मीयता व्यक्त करतो.
बहिण भावाच्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास तसेच एकमेकांविषयी सन्मान आयुष्यभरा साठी लपलेले असते. आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी या नात्याला कोणीच तोडू शकत नाही.
जर प्राचीन इतिहास बघायला गेला तर अशी समजत आहे की एकदा भगवान श्रीकृष्णांने आपल्या हाताचे बोट कापून घेतले होते. तेव्हा देवी द्रोपदीने आपल्या साडीच्या धाग्याचा एक तुकडा भगवान श्रीकृष्णांच्या रक्त वाहणाऱ्या बोटाला बांधला होता त्या क्षणी तो रक्तस्राव थांबला होता. तेव्हापासून रक्षाबंधन सुरू झाले अशी एक अख्यायिका आहे. म्हणून रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधणे इतक्या पुरताच मर्यादित नसून त्याला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. त्याला सगळीकडे रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत.
ज्याप्रमाणे देश ,प्रांत बदलत जातो , त्याचप्रमाणे भाषा चालीरीती संस्कृती सण साजरी करण्याची पद्धत बदलली जाते. आपल्या सख्या भावां साठीच राखी बांधली जाते असे नाही. तर आपल्या मानलेल्या भाऊराया साठी राखी बांधली जाते. या दिवशी घरामध्ये गोडधोड केले जाते. सणाच्या निमित्ताने घरामध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण असते. भावाला राखी बांधण्याच्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.
जसे बहिणीने भावाला राखी बांधली की भाऊ तिला वचन देतो की मी तुझे प्रत्येक परिस्थितीमध्ये रक्षण करेन . हीच जर भूमिका समाजातील प्रत्येक व्यक्तीने घेतली तर आपल्या समाजातील स्त्रियांच्या वरती होणाऱ्या अत्याचारांना आळा बसेल. आज-काल दिवसाढवळ्या रस्त्यावरती अत्याचार वाटले आहेत. सगळ्यांच्या समक्ष स्त्रियांच्या वरती बलात्कार खून असे गुन्हे केले जातात. आणि रस्त्यावरचे लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात. हे कुठेतरी बदलले पाहिजेत.
रक्षाबंधन हा सण आपल्या रक्ताच्या नात्यांपुरताच मर्यादित न ठेवता तो आपल्या आजूबाजूच्या सर्व स्त्रियांमध्ये संगीत आणि जिथे जिथे स्त्रियांच्या वरती अत्याचार होतात तेथे आपण भावाची भूमिका घेतली पाहिजे. तेव्हाच कुठे जाऊन या सणांचा महत्वाला खरा अर्थ परत येईल.
प्राचीन धर्मामध्ये जे पण काही सण साजरे केले जायचे त्याला एक महत्त्व असायचे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली सणासुदीच्या निमित्ताने आपल्या माहेरी यायच्या. त्याचे एक वेगळाच आनंद त्यांच्यासाठी असायचा. हल्लीच्या धावत्या युगात सगळे काही बदलले आहे. सण तर साजरे केले जातात. पण त्या पाठीमागे असणारे कारण कुणालाच समजून घ्यायचे नाहीये . जग फक्त आज-काल घड्याळाच्या काठावर पळत आहे. आधीच्या काळात सासुरवासिनी माहेरी यायच्या पण आजच्या बदलत्या काळात सण साजरे करायचे पद्धत सुद्धा बदलले आहेत. आज-काल प्रत्यक्षात भेटून सण साजरे करण्याविषयी फोन वरतीच शुभेच्छा देऊन त्या सणांचा आनंद कमी केला जातो. आधीच्या काळी माणसांच्याकडे पैसे कमी होते, पण सगळे गुण्यागोविंदाने राहत होते.
आज-काल माणसांच्याकडे भरपूर सारा पैसा असूनही सगळे जग धावपळीचे झाले आहे. आपल्या नात्यांसाठी सुद्धा आज-काल माणसांच्याकडे वेळ नाही आहे. माणूस हे विसरत चालला आहे की गेलेला पैसा परत कधी ना कधी येऊ शकतो पण गेलेली वेळ , नाती , आपली माणसे ही एकदा कालबाह्य झाली की परत आपण त्यांना कधीच मिळवू शकत नाही.
माणसाने वेळेप्रमाणे नक्कीच स्वतःला बदलले पाहिजेत पण जी आपली संस्कृती पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यांना कुठेच बदल न करता ती संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे तर जी संस्कृती आपल्याला समजले तोच संस्काराने संस्कृतींचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीला समजेल.
धन्यवाद 🙏
असेच तुम्हाला नवनवीन निबंध वाचायला आवडतं असतील तर खाली निबंधाची लिंक दिली आहे. नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
नवनविन निबंध येथे वाचा
Recent Comments