Skin Brightening Home Remedies in Marathi : सणांमध्ये कोरीयन सारखी स्कीन बनवा आता ७ दिवसात

Skin brightening home remedies in Marathi

Skin brightening home remedies in Marathi : या सणाच्या धावपळीमध्ये पार्लर ला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर घरच्या घरीच. कोरियन सारखी चमकदार त्वचा घरीच मिळवा. आपला चेहरा सुंदर आणि नितळ असावा असे प्रत्येकालाच वाटत असते पण प्रत्येकाला मिळालेली त्वचा ही नितळ नसून दररोजच्या काही रुटीन फॉलो करून ही त्वचा आपल्याला सुंदर बनवावी लागते. पार्लरमध्ये गेल्यास खूप साऱ्या प्रमाणात पैसा आपल्याला खर्च करावा लागतो. जे की  प्रत्येकाला शक्य नसते. पण पार्लर मध्ये जाऊन हानिकारक केमिकल्स ची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने घरातीलच घटक वापरून आपण आपली त्वचा सुंदर बनवू शकतो चला तर मग पाहूया आपल्या किचनमध्ये असे कोणते सुपर फूड आहेत ज्यांच्यामुळे आपली त्वचा सुंदर बनेल.

Skin Brightening Home Remedies in Marathi : सणांमध्ये कोरीयन सारखी स्कीन बनवा आता ७ दिवसात

Skin Brightening Home Remedies in Marathi : सणांमध्ये कोरीयन सारखी स्कीन बनवा आता ७ दिवसात
Skin Brightening Home Remedies in Marathi : सणांमध्ये कोरीयन सारखी स्कीन बनवा आता ७ दिवसात

तांदळाचे पीठ आणि बीटा रुट मास्क


हा मास्क बनवायला अतिशय सोपा असून यामध्ये वापरले जाणारे  इन्ग्रेडियंट घरी सहजपणे मिळतात. तर हा मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदळाचे पीठ चार चमचे घ्या. त्यामध्ये छोट्या आकाराचे बीटाचे वरचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. आणि यामध्ये आपला मास्क भिजेल  इतपत आपण शाई आणि थोडेसे दूध टाकणार आहे. आता हे सारे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या. आणि हा मास्क चेहऱ्याला पाच ते दहा मिनिटे जाडसर असा थर लावून घ्या. मास्क वाळल्यानंतर चेहरा पण पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर चेहऱ्याला तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या हा मास्क सात दिवस न चुकता चेहऱ्याला पण लावायचा आहे. त्यामुळे याचा रिझल्ट तुम्हाला लगेच जाणून येईल. तांदळाचे पीठ आणि बीट आपली स्किन तजेलदार तसेच चमकदार करण्यास मदत करते.

बेसन पीठ आणि दह्याचा मास्क


बेसन पीठ हे स्किन चे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा मास्क तयार करण्यासाठी‌ सर्वप्रथम दोन चमचे बेसन पीठ घ्या त्यामध्ये एक चमचा तसेच चिमूटभर हळद यामध्ये घालू शकता. आता हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
फेस मास्क चेहऱ्याला लावण्या अगोदर चेहरा चांगला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर हा मास्क पाच ते दहा मिनिटे चेहऱ्याला लावा. आणि मास्क चांगला वाळल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

शिजलेला भात आणि एलोवेरा जेल मास्क 


आता तुम्ही विचार करत असाल की शिजलेला भात चेहऱ्याला  कसा लावायचा. पण यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात आपल्या त्वचेला तजेलित करणारे मायक्रो ऑरगॅनिझम असतात. त्यामुळे चेहऱ्याला लावणे खूप फायदेशीर ठरते. तर हा मस्त बनवताना शिजलेला भात दोन चमचे आणि एलोवेरा मास्क मिक्सर मधून फिरवून घ्या. त्यामुळे एलोवेरा मास्क आणि भात चांगला एकजीव होईल

. जर तुम्हाला हे मिश्रण जास्तच कोरडे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडे मलाई असलेले दूध घालू शकता. किंवा थोडेसे पाणी सुद्धा घालू शकता. आता हा  मास्क चेहऱ्याला लावताना सर्कुलर मोशन मध्ये चेहऱ्यावरती आपल्या हाताने फिरवा. त्यामुळे हे मिश्रण आपल्या स्किनमध्ये मुरण्यासाठी मदत होईल.  थोड्या वेळाने आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका.

हे सुद्धा वाचा – आता घरच्या घरीच ओळखा अन्न पदार्थ मधील भेसळ

ओट्स आणि मध


ओट्स आणि मधाचा मास्क आपल्या चेहऱ्यावर जादू सारखा काम करतो. ओट्स   मुळे आपल्या चेहऱ्यावरील जी काही घाण साठलेली आहे ती निघून जाण्यास मदत होते. आता हा मास्क बनवण्यासाठी मास्क दुधामध्ये पाच मिनिटे भिजत ठेवा त्यामुळे मिक्सरला लावल्या नंतर ते छान बारीक होईल. त्यामध्ये एक चमचा मध टाका. यामुळे स्किनला चकाकी  येण्यासाठी मदत होईल. हा मास्क चेहऱ्याला लावताना आपल्या चेहऱ्यावरती सर्कुलर मोशनने  हा मास्क आपल्या चेहऱ्यामध्ये  चांगला मुरेल याची काळजी घ्या‌ . मास्क चांगला वाळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा.

बटाट्याचा रस आणि तांदळाचे पीठ यांचा मास्क 


बटाट्याचा रस सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती खूप उत्तम प्रकारे काम करतो आणि तांदळाचे पीठ तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तर सर्वप्रथम बटाट्याचे वरचे साल काढून बारीक किसणीने किसून त्याचा रस काढून घ्या किंवा मिक्सरमध्ये फिरवून गाळनिने त्याचा रस गाळून घ्या. या रसामध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ तसेच जमत असल्यास एलोवेरा जेल किंवा चिमूटभर हळद यापैकी कोणतेही एक टाकून हा मास्क चेहऱ्यावरती लावू शकतो याने सुद्धा काही दिवसातच आपल्या चेहऱ्यावरती एक उजळपणा येण्यास सुरुवात होईल. मात्र हा उपाय सलग सात दिवस न चुकता
नक्की करा.

टोमॅटोचा रस आणि मध 


टोमॅटोचा रस आणि मध या मास्क मुळे आपल्या त्वचेला उजाळी येण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये खूप असे महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या सावळ्या त्वचेला उजळण्यासाठी मदत करतात तर चला आता आपण पाहूयात त्याचा मास्क कसा तयार करायचा. तर सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या कारण त्याच्यावरती काही पेस्टिसाइड मारलेली असते तर ते निघून जातील. आता मधोमध चिरून मिक्सरला बारीक करून घ्या किंवा किसणीने किसून घ्या त्यामध्ये एक चमचा मध घाला जर तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये एक चमचा गुलाबजल सुद्धा घालू शकता. हा मास्क दररोज सात दिवस वापरून पहा स्कीन मध्ये फरक नक्की जाणवून येईल.

एलोवेरा मास्क


जर धावपळीच्या वेळी तुम्हाला कोणताच उपाय करण्यास जमत नसेल तर साधा सोपा उपाय म्हणजे एलोवेरा मास्क यासाठी एक एलोवेरा घ्या मधोमध कट करून त्याचा गर तुम्ही एका पॅकबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता आणि दररोज रात्री झोपताना एलोवेरा फेसला लावून झोपा. सकाळी उठल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय कायम केला तरी चालेल यामुळे तुम्ही पहाल की तुमच्या स्किनमध्ये किती फरक पडत त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा.

योगट आणि हळदी मास्क


योगात किंवा दही यांच्यामुळे आपल्या स्किनला नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळते. त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे. तर एक ते दोन चमचा दही यामध्ये पाव चमचा  मध आणि पाव चमचा हळद टाका. चांगले एकजीव करून घ्या. आणि चेहऱ्यावरती लावा. तुमचा चेहरा खूपच ड्राय झाला असेल. तर तुमच्या स्किनला त्या मास्क मुळे इन्स्टंट मॉइश्चरायझर मिळेल. आणि स्किन उजळण्यासाठी सुद्धा मदत होईल.

आपली त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा हे नक्की करा.


चांगल्या स्क्रीन साठी आठवड्यातून एकदा स्क्रब करायला अजिबात विसरू नका.

मेकअप केल्यानंतर रात्री झोपताना मेकअप काढून तो स्वच्छ पाण्याने धुऊन मगच झोपा.

उन्हामध्ये बाहेर पडताना सन स्क्रीन लोशनचा जरूर वापर करा आणि ज्या सन स्क्रीन लोशन मध्ये फिफ्टी प्लस पेक्षा जास्त अवेलेबल असेल तेच सनस्क्रीन त्वचेला लावा.

रात्री झोपताना शक्य असल्यास एलोवेरा जेल चेहऱ्याला लावून झोपा.

कोणतीही घरगुती स्किन ट्रीटमेंट करत असाल तर ती कमीत कमी सात दिवस न चुकता करा असे केल्यामुळे त्याचा रिझल्ट चेहऱ्यावरती दिसून येईल.

आपले ओठ काळवंडले असतील तर त्याला बीटाचा रस नक्की लावा त्यामुळे काळपटपणा दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गुलाब पाकळ्यांचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता.

पंधरा दिवसातून एकदा मिठाच्या पाण्याने अंघोळ करा त्यामुळे आपल्या स्किनवरचे पोर्स ओपन होतील. आणि  त्वचेमधील घाण सगळे निघून जाईल.

तर तुम्हाला खूपच डार्क सर्कल असते तर त्यासाठी बटाट्याचा रस कॉटनच्या मदतीने लावू शकता.

तुम्हाला जर जास्तच डार्क सर्कल ची समस्या जाणवत असेल तर ग्रीन टी पाण्यामध्ये वितळून घेऊन ते पाणी फ्रिजमध्ये बर्फ होण्यासाठी ठेवून द्या. आणि एक क्यूब तुमच्या सोयीनुसार हलक्या हाताने डोळ्यांच्या खालती फिरवा त्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.

आठवड्यातून एकदा चांगल्या पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावरती लावा यामुळे चेहरा उदर उजळण्यासाठी मदत होईल.

best skin care products