Ukadiche modak in Marathi/ मऊ लोण्यासारखे लुसलुशीत मोदक

Ukadiche modak in Marathi -आपल्या महाराष्ट्रात. प्रामुख्याने महत्त्वाच्या अशा खूप  रेसिपी आहेत. त्यामध्ये पुरणपोळी, उकडीचे मोदक, पाटोळ्या,, अळूवडी    यासारख्या खूप अशा रेसिपी आहेत . त्यामध्ये उकडीचे मोदक म्हटले की , सर्वांच्या च  आवडीचा  विषय. ही आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि सर्वांच्या आवडीची अशी  रेसिपी आहे.  उकडीचे मोदक हे आपल्याला गणपती बाप्पाचे सुद्धा आवडीचे. गणेशोत्सवाला किंवा गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवायचे म्हटले तर उकडीचे मोदक ही  रेसिपी प्रत्येक घरोघरी ठरलेली असते.   तसे बघायला गेले तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे. पण जर अंदाज चुकला तर मात्र ही रेसिपी जमत नाही. त्यामुळे उकडीचे मोदक करताना त्यामधील साध्या सोप्या ट्रिक्स आणि प्रमाण कशाप्रकारे  घ्यायचे  हे आपण या लेखामध्ये पाहूया त. सर्वप्रथम उकडीचे मोदक करतात कोणते साहित्य लागते हे आपण पाहूयात.

उकडीचे मोदक पाककृती साठी लागणारे साहित्य( Ukadiche modak in Marathi)
१) एक वाटी तांदळाचे पीठ
२) एक तर दोन चमचे साजूक तूप
३) दोन वाट्या खोवलेला ओला नारळ
४) एक वाटी गुळ
५) एक चमचा खसखस
६) एक चमचा वेलची जायफळ पावडर
७) चवीनुसार मीठ
८) ड्रायफ्रूट्स – काजू आणि बदामUkadiche modak in Marathi
 

 हे सुद्धा वाचा – मुंबई ची फेमस पावभाजी रेसिपी

उकडीच्या मोदकाची पाककृती-
आपल्या सर्वांच्याच घरामध्ये तांदळाचे पीठ उपलब्ध असते तर आता घरात उपलब्ध असणाऱ्या तांदळाच्या पिठापासून आपण उकडीचे मोदक करणार आहोत. तांदळाचे पीठ उकडीच्या मोदकासाठी घेताना ते पीठ चिकट असेल याची काळजी घ्यावी.( Ukadiche modak in Marathi)

तर सर्वप्रथम आपण मोदकासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम एक वाटी तांदळाचे पीठ चांगले चाळून घ्यावे.

गॅस वरती मोठ्या आचेवरती एक कप तांदळासाठी एक कप पाणी उकळत ठेवावे. त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. तसेच त्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचा साजूक तूप घालावे. आणि पाण्यावरती झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी.

पाणी चांगले उकळले आहे याची खात्री झाली की, गॅसची आच कमी करावी. आणि या उखळत्या पाण्यामध्ये आपले एक वाटी तांदळाचे पीठ घालावे आणि  सारखे हे पीठ हलवत रहावे. त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर गॅसची आच बंद करावी.

आणि या पाण्यावरच्या पिठावरती एक झाकण ठेवावे आणि त्याला एक पाच मिनिटे वाफ लागेल याची काळजी घ्यावी

हे सुद्धा वाचा – अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ

.Ukadiche modak in Marathi (Ukadiche modak in Marathi)

आता पिठाला वाफ लागेपर्यंत उकडीच्या मोदकासाठी लागणारे सारण आपण तयार करून घेऊ. तर या सारणासाठी दोन वाटी खोवलेला नारळ एका कढईमध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकावे.

या नारळामध्ये एक वाटी गूळ किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असा गोड तुम्ही यामध्ये घालू शकता. गुळ टाकल्यानंतर तुपामध्ये हे सारे सारण चांगले भाजून घ्यावे. या सारणामध्ये चिमूटभर मीठ घालावे म्हणजे सारणाला छान चव येईल.

या सारणामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू आणि बदाम घालून पुन्हा एकदा भाजून घ्यावेत.

सारण तयार झाल्यानंतर त्यामध्ये गॅस बंद करावा आणि त्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालावी. आणि गॅस बंद करावा .

तयार केलेले सारण थंड होण्यासाठी ठेवावे.

हे सुद्धा वाचा –

पाच मिनिटानंतर चांगले वाफ लागलेले पीठ परातीमध्ये घ्यावे. सर पिठाला गुठळ्या झाल्या असतील. तर त्या गुठळ्या गरम असतानाच फोडून घ्याव्यात. त्यासाठी तुम्ही बटाटा स्मॅशर किंवा एक वाटी याचा वापर करू शकता.(Ukadiche modak in Marathi)

त्यानंतर हे सारे पीठ एकजीव करून चांगले मळून घ्यावे. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे जेवढे तुम्ही पीठ मळाल तेवढी मोदकाची पारी म्हणजेच मोदक करताना त्याचे वरील आवरण फाटणार नाही. त्यामुळे पीठ चांगले मळून घ्यावे.

मळून झालेल्या पिठाचे छोट्या आकाराचे छोटे गोळे करून  छोट्या कारण लाटून घ्यावे . तर तुम्हाला हातावरती छोटी पोळी करता येते असेल तर हातावरची  तुम्ही मोदकाची पारी तयार करू शकता.Ukadiche modak in Marathi

या मोदकाच्या पारी मध्ये थंड झालेले सारण भरायचे आहे. आणि मोदकाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाकळ्या तयार करायच्या जसे की आपण गणपतीला मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो म्हणून काहीजण सात, अकरा, किंवा 21 पाकळ्यांचे मोदक तयार करतात.

मोदकाच्या पारीचे तोंड घट्ट बंद होईल अशा पद्धतीने मोदक वळायचे आहे.

सारे मोदक तयार करून झाले की. एका इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवायचे आहे.(Ukadiche modak in Marathi)

साधारणता दहा ते पंधरा मिनिटं चांगली वाफ दिली की , उकडीचे मोदक तयार होतात.

मोदकाला चांगली वाफ लागल्यानंतर हे आपली मोदक खाण्यासाठी तयार आहे. मोदक खातात त्यावरती एक चमचा तुपाची धार सोडावी.

उकडीचे मोदक करताना काही सोप्या  टीप्स –
१) मोदक तयार करताना एक वाटी  तांदळाच्या पिठामध्ये एक चमचा साबुदाण्याचे पीठ घातले की मोदक फाटणार ही नाहीत आणि चवीला सुद्धा छान होतील.

२) मोदकाच्या सारणामध्ये जर आपण ड्रायफ्रूट्स टाकत असाल तर ते एकदम बारीक करून टाकावे कारण जर ड्रायफ्रूटचे तुकडे मोठे राहिले तर मोदकाची पारी फाटण्याची शक्यता असतेUkadiche modak in Marathi .(Ukadiche modak in Marathi)

३) उकडीच्या मोदकाला वाफ देताना घट्ट झाकण नसावे म्हणजेच त्यामध्ये थोडी वाफ बाहेर जाऊ द्या वी.

४) मोदक चांगल्या प्रकारे वाळण्यासाठी जेव्हा आपण पाणी गरम करतो त्यामध्ये जर आपण लोणी घातली तर ते पीठ हलके आणि चिकट  होते.

५) मोदक उकडल्यानंतर तिच्यावरती गार पाणी शिंपडावे.  आणि मोदक बाजूला काढून ठेवावे. म्हणजेच मोदकाला तडे जाणार नाहीत.

६)जेव्हा आपण पीठ तयार करून  घेणार असतो तेव्हा पाणी उकळत असताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकली तरी पीठाला चिकटपणा येतो, आणि जेव्हा आपण पिठाची पोळी लाटत असतो तेव्हा ती छान पातळ लाटली जाते. Ukadiche modak in Marathi

७) उकडीचे मोदक तयार करताना तुम्ही पाण्या ऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता. दुधाच्या वापरामुळे मोदक चवीला मऊ आणि लुसलुशीत होतात.

८) मोदक उकडताना मोदकाच्या चाळणी वरती तुम्ही हळदीची पाणे सुद्धा वापरू शकता यामुळे मोदकाला चव छान येते.

९) तयार मोदक चे पीठ सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असते. घरी तांदळाचे पीठ उपलब्ध नसेल तर बाजारात मिळणाऱ्या पिठाचा वापर करू शकता.

१०) मोदक शिळे झाले असतील तर इडलीच्या पात्रात त्याला १० मिनिटे वाफ काढावी म्हणजे कडक झालेले मोदक मऊ होतिल.( Ukadiche modak in Marathi)

११) मोदकासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाच्या पिठासाठी तांदूळ जितके जुने असतील इतके पीठ जास्त चिकट होते.

१२) खोबरे आणि गुळाचे सारण कोरडे करण्याचा प्रयत्न करा , त्यामुळे मोदक उकडताना त्यामधील सारण बाहेर येणार नाही.

मोदकासाठी लागणारे पीठ घरी कसे तयार करावे?

मोदकासाठी वापरण्यात येणारे तिथे नेहमी चिकट असावे. तर घरच्या घरी हे पीठ कसे तयार करावे हे आता आपण पाहूयात तर यासाठी सर्वप्रथम रेशनचे तांदूळ किंवा मोठे तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्या. जर रेषांच्या तांदूळ वापरत असाल तर अतिउत्तम.

त्यानंतर कडक उन्हामध्ये एका सुट्टी पडक्यावरती हे तांदूळ वाळवून घ्या.

तांदूळ चांगले वाळले की तांदूळ तुम्ही मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकता. पण गिरणीच्या साह्याने केलेले पीठ अगदी बारीक होते त्यामुळे ते कायमच उत्तम ठरते.

घरच्या घरी पीठ तयार केल्यामुळे. पिठाला चांगला चिकटपणा येतो.

हे पीठ साठवून ठेवताना हवाबंद डब्यामध्ये घट्ट साठवून ठेवा. त्यामुळे हे पीठ 15 ते 20 दिवस किंवा महिना आरामात टिकते.(Ukadiche modak in Marathi)

येथे ३६५ दिवस उकडीचे मोदक मिळतात.-https://youtu.be/E6lgotX3BQw?si=4b2O9m6aXovm32D_