Vachal tar vachal Marathi nibandh -वाचाल तर वाचाल या छोट्याशा बाबतीमध्येच किती मोठे आयुष्याचे तत्व लपलेले आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तरच आपण जीवनात प्रगती करू शकतो. आयुष्यातील आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई. जन्माला आल्यापासून आई आपल्याला सर्व गोष्टी शिकवते. त्यानंतर आपण शाळेत जायला सुरुवात करतो. आणि इथून पुढे चालू होतो आपल्या आयुष्याचा आपल्या स्वप्नांकडे घेऊन जाणारा प्रवास .
Vachal Tar Vachal Marathi Nibandh : वाचाल तर वाचाल मराठी निबंध
आणि या प्रवासातील सर्वात मोठा गुरु म्हणजे आपली पुस्तके. या पुस्तकातून मिळणारे ज्ञान आपल्याला आपल्या स्वप्नांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यास मदत करते. आपल्या आयुष्यातील पुस्तके आपल्याला सर्व काही शिकून जातात. अ आ इ ई पासून १ २ ३ ४ ते वकीलची डिग्री डॉक्टरीची डिग्री शिक्षकांची डिग्री हे सगळं आपण साध्य करू शकतो ते म्हणजे या पुस्तकामुळे. त्यामुळे पुस्तके आपले आयुष्यभर साथ देणारे गुरु आहेत.
आपल्या थोर महापुरुषांनी आपल्याला एक चांगली शिकवण दिलेली आहे ती म्हणजे वाचाल तर वाचाल म्हणजेच आयुष्यात जर शिकाल तर आयुष्यात प्रगती करू शकाल.
आजचे जग हे एकविसाव्या शतकापासून सर्व जग तंत्रज्ञानाने भरलेले आहे. मोबाईल पासून ते विमानापर्यंत. किचन पासून ते रस्त्यांपर्यंत सगळ्या ठिकाणी आजकाल भरपूर प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि प्रगती केलेली आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे.
आणि हे ज्ञान तेव्हाचे जेव्हा आपण चांगल्या प्रकारे पुस्तकातून या सर्व गोष्टी शिकून घेऊन. किंवा आपली आकलन शक्ती इतकी प्रबळ या पुस्तकांच्या सहाय्याने करून घेऊ तेव्हाच आपल्याला सर्व गोष्टी सहजतेने समजत जातात.
आता उदाहरण घ्यायचे म्हटले तर एक चांगला शिकलेला इंजिनियर याला कोणतेही गोष्ट शिकण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. तसेच एखादा न शिकलेला अडाणी शाळेला न गेलेला शेतकरी याच्यासाठी कोणतेही नवीन गोष्ट शिकून घेण्यासाठी वेळ लागते किंवा नवीन तंत्रज्ञान समजून घेणे त्याला अवघड वाटते. यासाठी आवश्यक असते ते ज्ञान जे आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये शिकवले जाते.
हे सुद्धा वाचा –संतांचे विचार काळाची गरज निबंध
पुस्तके हे अशा प्रकारचे एक साधन आहे जे तुम्हाला खूप स्वस्त किमतीमध्ये इतके अफाट आणि अनमोल ज्ञान देऊन जाते की त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पुस्तकांमध्ये आपण आयुष्यात जगावे कसे त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञान कसे बनवावे या सर्व गोष्टी पुस्तकांमध्ये असतात. फक्त गरज आहे ती पुस्तके वाचून आपले आयुष्य सुखकर करून घेणे .
ज्या ज्या व्यक्ती कायम वाचनामध्ये असतात किंवा थोर पुरुषांचे ग्रंथ, साहित्य, वाचतात त्यांना आयुष्यात जगायचे कसे समाजात वावरताना कसे आपण वागले पाहिजेत माणसासोबत बोलताना कशा पद्धतीने बोलले पाहिजे या सर्व गोष्टींचे जाणीव त्या लोकांना असते. जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजून येईल जे लोक आयुष्यात भरपूर पुस्तके वाचतात ते खूप समजूतदार असतात. कारण आपल्या आयुष्याचे सार या पुस्तकातून मिळालेले असते.
आधीच्या काळी शिक्षण पद्धतीला जास्त महत्व नव्हते. इतके शिकून करायचे काय अशी लोकांची धारणा होती पण जसे जसे काळ बदलत गेला. तसे लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजत गेले. म्हणून आज काल जुने अडाणी लोक आपल्याला आवर्जून सांगतात की आयुष्यात खूप शिका आणि मोठे व्हा. कारण त्यांना समजलेले असते आयुष्यात ज्ञान किती महत्त्वाचे आहे. म्हणूनच तर पुरुषांनी सांगितलेले आहे वाचाल तर वाचाल.
वाचनामुळे आपले ज्ञान वाढले तर आपले कुटुंब सुद्धा सुशिक्षित होते. म्हणून तर असे म्हटले जाते की घरातील एक आई शिकली तर सारे कुटुंब शिकते.
आज-काल लहान मुलांमध्ये दिवाळीच्या किंवा उन्हाळी सुट्ट्या लागल्या की लगेच आपण त्यांना वेगवेगळ्या क्लासेस साठी पाठवतो. हे सर्व आपल्या आयुष्यामध्ये गरजेचे तर आहेत पण यापेक्षा आपल्या मुलांना भरपूर पुरुषांचे ग्रंथ, साहित्य हे वाचायला द्या म्हणजे आयुष्यात समाजात वावरताना कसे वागले पाहिजे हे सुद्धा समजेल.
बाहेरच्या देशातील लोकांसोबत जर आपल्या भारतीय लोकांची पुस्तके वाचण्यात तुलना केली तर आपले भारतीय खूप मागे पडतात .
आपल्या भारताला संस्कृतीचा असा अफाट वारसा लाभलेला आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये महाभारत रामायण यासारख्या कथा खऱ्या आयुष्यात होऊन गेले आहे. ते आपल्याला समजले ते फक्त त्या ग्रंथामुळेच. त्यांचा अभ्यास केल्यामुळेच वर्षानुवर्ष चालत आलेल्या चालीरीती तसेच आपली संस्कृती इतके वर्ष आपण जोपासत आलेलो आहे.
आपली खरी संस्कृती काय आहे हे आपल्याला या ग्रंथांनी समजून दिलेले आहे. तसेच आधीच्या काळात जेव्हा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा आपले पूर्वज कोणते आयुर्वेदिक इलाज करत असायचे. या ज्ञानाचा मूल्य ठेवा सुद्धा आपल्याला या ग्रंथांनीच दिलेला आहे
आपल्या भारताला संस्कृतीचा असा अफाट वारसा लाभलेला आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये महाभारत रामायण यासारख्या कथा खऱ्या आयुष्यात होऊन गेले आहे. ते आपल्याला समजले ते फक्त त्या ग्रंथामुळेच. त्यांचा अभ्यास केल्यामुळेच वर्षानुवर्ष चालत आलेल्या चालीरीती तसेच आपली संस्कृती इतके वर्ष आपण जोपासत आलेलो आहे. आपली खरी संस्कृती काय आहे हे आपल्याला या ग्रंथांनी समजून दिलेले आहे. तसेच आधीच्या काळात जेव्हा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा आपले पूर्वज कोणते आयुर्वेदिक इलाज करत असायचे. या ज्ञानाचा मूल्य ठेवा सुद्धा आपल्याला या ग्रंथांनीच दिलेला आहे.
हे ग्रंथ वाचल्यामुळेच तर हे सगळे ज्ञान आपण संपूर्ण जगाला देऊ शकलो. म्हणूनच आयुष्यात वाचन हे खूप गरजेचे आहे. घरातील एक स्त्री चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करून ती तिचे ध्येय लग्नानंतर ही साध्य करू शकते. आणि संपूर्ण कुटुंबाला सांभाळू शकते इतकी ताकद या पुस्तकांमध्ये आहे गरज आहे ती फक्त त्यामधील ज्ञान घेण्याची.
आपल्या भविष्यकाळात काय झाले होते हे आज वर्तमानात आपण सर्व काही वाचू शकतो ते फक्त या ग्रंथामुळेच. थोर पुरुषांचे चरित्रे वाचले की त्यांनी आपल्या आयुष्यात असे यश मिळवले हे आपण समजून घेऊ शकतो. प्रत्येक देशात प्रत्येक भागात वेगळी वेगळी भाषा जाती चालीरीती खाण्यापिण्याच्या पद्धती विभिन्न आहेत हे सर्व आपण घरी बसून पुस्तकांद्वारे समजून घेऊ शकतो.
नवीन पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते. सतत वाचन करणारी माणसे ही आपले म्हणणे मुद्देसूद मांडू शकतात. कथा कादंबऱ्या चरित्रे हे सर्व असल्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच याशिवाय त्यांच्या आयुष्यात किती अडचणी आल्या आणि त्या अडचणी वरती त्यांनी मात करून असे आपले आयुष्य सुखकर केले हे सुद्धा आपल्याला समजते. ज्ञानामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वांमध्ये खूप फरक पडतो.
आपला आत्मविश्वास वाढतो. समाजामध्ये चार लोकांच्या वावरताना आपल्याला कोणत्याही गोष्टीचे भय नसते. कारण एखाद्या गोष्टीची पूर्णपणे माहिती आपल्याला असली की आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. आणि हा आत्मविश्वास आपण पुस्तकांद्वारा मिळवू शकतो.
वाचनामुळे माणूस विचारशील बनतो . एखादी गोष्ट बोलण्या अगोदर तो त्या गोष्टीचे नीट निरीक्षण करतो आणि मग आपले मत व्यक्त करतो इतके सामर्थ या पुस्तकांच्या ज्ञानामध्ये आहे.
आज तंत्रज्ञान इतके विकसित झालेले आहे की या तंत्रज्ञानाने आपले संपूर्ण स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे. जो तो मोबाईल इंटरनेट याच्या पाठी लागलेला आहे. यामुळे आपले वाचनाची सवय खूपच कमी झालेली आहे.
लहान मुले सर मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत तरुण वर्ग ज्याने जास्त पुस्तके वाचली पाहिजे ते सर्व लोक या सगळ्या गोष्टींना पाठ फिरवतात मुले 24 तास मोबाईल घेऊन बसतील पण त्यांना दिवसातून एक तास पुस्तके वाचायला कंटाळा येतो.
जर तुम्ही वाचनालयामध्ये गेला तर तिथे गर्दी कमी जाणवेल आणि चित्रपट गृहे इंटरनेट कॅफे या सर्वांमध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग आढळून येईल. त्यामुळेच हल्ली तरुण वर्गामध्ये सर्व गोष्टींचे ज्ञान आढळून येत नाही. त्यांच्या विचारांना बंधने लागतात. त्यांना सोशल मीडियावरील सर्व गोष्टी माहीत असतात पण एखाद्या थोर महापुरुषाविषयी काही गोष्टी विचारला तर त्यांना इतके ज्ञान नसते. हे खूप चुकीचे आहे आपण तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला पूर्णपणे विकसित करण्यासाठी केले पाहिजे कारण थोर पुरुषांनी सांगितलेले आहे वाचाल तरच वाचाल.
म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये पुस्तकांचे ज्ञान घेण्याचे काही वय नाही दिवसातून किमान एक ते दोन तास पुस्तकांसाठी द्या त्यामुळे तुमचे मेडिटेशन सुद्धा होईल आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर जा पण पुस्तकांचे ज्ञान घेणे थांबवू नका.
कारण आयुष्यात प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन अनुभव येत असतात आणि या अनुभवांना तोंड द्यायचे असेल तर आपल्याला ज्ञान असणे गरजेचे आहे. हल्लीचे जब तक पूर्णपणे तंत्रज्ञानाचे आहे. आणि तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला शिकायचे आणि टिकायचे असेल तर पुस्तके वाचण्यास अजिबात विसरू नका. कारण वाचाल तरच वाचा.
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!