Veg Biryani Recipe in Marathi : चिकन बिर्याणी ला मागे टाकणारी हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी.

Veg biryani recipe in Marathi

Veg biryani recipe in Marathi नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत व्हेज बिर्याणी कशी करायची.  करायला अतिशय सोपी आणि नॉनव्हेज पेक्षा सुद्धा चवीला चांगली लागते. अशी भरपूर सारी मंडळी आहे ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी ही डिश  अतिशय आवडीची आहे. हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कशी बनवायची हे आता आपण पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पाहूया. ही डिशचे प्रमाण चार ते पाच लोकांसाठी दिले आहे.

Veg Biryani Recipe in Marathi : चिकन बिर्याणी ला मागे टाकणारी हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी.

Veg Biryani Recipe in Marathi :  चिकन बिर्याणी ला मागे टाकणारी हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी.
Veg Biryani Recipe in Marathi : चिकन बिर्याणी ला मागे टाकणारी हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी.

हे सुद्धा वाचा –हॉटेल सारखी चमचमीत बिर्याणी आता घरच्या घरी

व्हेज बिर्याणी साठी लागणारे साहित्य


१) वसमती तांदूळ अर्धा किलो
२) कांदे दोन ते तीन
३) टोमॅटो एक
४) पुदिना अर्धी वाटी
५) बटाटे वाटाणे बीन्स -प्रत्येकी अर्धी वाटी
६) आले लसूण पेस्ट एक चमचा
७) बिर्याणी मसाला दोन चमचे
८) दही  तीन ते चार चमचे
९) कोथिंबीर
१०) तूप दोन चमचे
११) मीठ चवीनुसार

१२) काश्मिरी तिखट चवीनुसार

हे सुद्धा वाचा -अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ

व्हेज बिर्याणी पाककृती


सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ निवडून घेऊन ते पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि दहा मिनिटे बासमती तांदूळ पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आहे.

त्यानंतर बटाटे बीन्स गाजर तसेच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्या घेऊन चांगल्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यायचे आहेत.

आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहे त्यामध्येच एक ते दोन चमचे तूप ऍड करायचे आहे तुपामुळे व्हेज बिर्याणीला चव चांगली येते.

तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये गरम मसाले म्हणजेच एक ते दोन विलायची , दोन ते तीन लवंग, तीन ते चार काळीमिरी , तमालपत्र  हे टाकून चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला कांदा हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेणार आहोत.

कांदा चांगला हलका सोनेरी रंग झाल्यानंतर त्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून हे सारे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे.  त्यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडे मीठ टाकून ते मिश्रण शिजवून घेतल्यास लवकर शिजण्यास मदत होते. . तसेच त्या मसाल्याला चवही चांगली येते.

त्यानंतर आता आपण या मिश्रणामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या टाकून पाच ते दहा मिनिटं चांगली वाफ देऊन घेणार आहोत. चिरलेल्या भाज्यांना  चांगली वाफ लागल्यानंतर आपण या भाज्यांमध्ये अर्धी वाटी दही टाकणार आहोत. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेला तांदूळ टाकून परत एकदा पाच मिनिटे सारे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. हे सारे आपण मंद आचेवरती करून घेणार आहोत.

आता यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून टाकणार आहे बिर्याणीला एक चांगली अशी चव येते.
आता या तांदळामध्ये काश्मिरी तिखट तुमच्या चवीनुसार एक ते दोन चमचे आणि चवीनुसार आपण सारे तांदूळ  चांगले मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये तयार बिर्याणी मसाला टाकायचा आहे. आणि चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे.

जितके तांदूळ आहे तितक्याच प्रमाणात पाणी गरम करून घ्यायचे आहे. आता हे गरम पाणी या तांदळामध्ये ओतायचे आहे. गरम पाणी असल्यामुळे भात चिकट होत नाही . म्हणून नेहमी कोणत्याही प्रकारचा पुलाव किंवा बिर्याणी करताना कायम गरम पाण्याचा वापर करावा.

आता दहा ते पंधरा मिनिटं भात चांगला शिजु द्यायचा आहे. आणि आता आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. तांदूळ चांगले शिजल्यानंतर  त्यावरती दोन ते तीन चमचे तूप टाकू शकता.

जर तुम्हाला हॉटेल सारखी चव हवी असेल तर त्या बिर्याणीला तुम्ही कोळशाची वाफ देऊ शकता. यासाठी पैशाचे दोन तुकडे चांगले गरम करून घ्यायचे आहेत. कोळसे चांगले तापल्यानंतर एका वाटीमध्ये ते कोळशे घेऊन त्यावरती दोन चमचे तूप टाकायचे आहे आणि ही वाटी बिर्याणीच्या भांड्यामध्ये ठेऊन त्या भांड्याला वरती चांगले घट्ट झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटं तसेच ठेवायचे आहे. त्यामुळे कोळशाची वाफ साऱ्या बिर्याणीला लागेल. आणि चवीला ती व्हेज बिर्याणी अगदी हॉटेल सारखी लागेल.

बिर्याणी करताना सोप्या टिप्स 

  • बिर्याणी करताना त्यामध्ये दह्याचा वापर आवर्जून करावा. कारण दही  मुळे बिर्याणीला एक ग्रेव्ही सारखे रूप येते. आणि चवीला सुद्धा उत्कृष्ट होते.
  • बिर्याणी सुटसुटीत होण्यासाठी जेवढे तांदूळ आहेत तितकेच पाणी तांदूळ शिजण्यासाठी घ्यावे. बिर्याणी करण्या अगोदर तांदूळ अर्धा तास भिजवून वापरल्यानंतर तो छान सुटसुटीत होतो.
  • बिर्याणी मध्ये तांदळाचे दाणे सुटसुटीत होण्यासाठी  बिर्याणी मध्ये थोडासा लिंबू पिळा.
  • बिर्याणीच्या वरती तळलेला कांदा सुद्धा तुम्ही टाकू शकता.
  • व्हेज दम बिर्याणी करायची असेल तर भाजी वेगळी शिजवून घ्यावी. आणि तांदूळ  वेगळे शिजवून घ्यावे. आणि एकमेकांच्या वरती  थर लावून  दहा मिनिटे चांगली वाफ दिल्यानंतर व्हेज दम बिर्याणी तयार होते.
  • बिर्याणी करताना जितका जुना तांदूळ असेल ‌ इतका वापरण्यासाठी चांगला असतो
  • बिर्याणी करत असताना शक्यतो ताज्या गरम मसाल्यांचे वापर केल्यास त्याचा फ्लेवर अजूनच बिर्याणी मध्ये उतरतो. बिर्याणी करताना जर तांदूळ वेगळा शिजवत असाल तर तो 70% शिजवावा.
  • बिर्याणी करत असताना फ्लेवर्स कमी जास्त झाले असतील म्हणजेच तिखट किंवा मीठ कमी जास्त झाले असेल. तर त्याचा बॅलन्स करण्यासाठी तुम्ही रायत्यामध्ये तुमच्या चवीनुसार फ्लेवर्स ॲड करा म्हणजेच बिर्याणी सोबत रायता खाताना. कमी जास्त झालेले फ्लेवर्स बॅलन्स होतील.
  • बिर्याणीला कोळशाची वाफ देत असताना ती वाफ अजिबात बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. हवे असल्यास कणकेचे पीठ मळून वरच्या झाकण ला तुम्ही सगळीकडून बंद करून घेऊ शकता.
  • बिर्याणी तयार झाल्यानंतर जर त्यामध्ये ग्रेव्ह कमी पडली असेल, तर तुम्ही शेंगदाण्याची आणि कांद्याची चटणी बनवू शकता यासाठी गरम तेलामध्ये कांदा चांगला परतून घ्यावा भाजलेल्या शेंगदाण्याची कुटाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी. कांदा चांगला लालसर परतून झाला असेल तर यामध्ये गरम मसाले, चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर मिक्सरला बारीक केलेली शेंगदाण्याची पेस्ट घालून तेलामध्ये छान परतून घ्यावे. तेलामध्ये मसाले छान भाजल्यानंतर वरून चार ते पाच चमचे गरम पाणी घालावे. ही चटणी तुमच्या आवडीनुसार जास्त पातळ करू शकता. अशी ही बिर्याणी मध्ये ग्रेव्ही कमी पडली असेल तर पटकन होणारी चटणी तुम्ही वापरू शकता.

बिर्याणीसाठी रायता असा तयार केला जातो?

  • बिर्याणीसाठी रायता बनवण्यासाठी कायम ताज्या दह्याचा वापर करा. एका बाऊलमध्ये ताजे घट्ट दही घेऊन ते चमच्याच्या साह्याने चांगले फेटून घ्या. त्यामुळे रायत्याचे टेक्चर सॉफ्ट होईल.
  • आता या दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घाला. तसेच यामध्ये पाव चमचा चाट मसाला, तुमच्या चवीनुसार काश्मिरी तिखट, चवीनुसार मीठ, आणि चिमूटभर साखर टाकून हे सारे मिश्रण एकजीव करून घ्या.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अंथरावी. तुमच्या आवडीनुसार या राहत्या मध्ये गाजर , काकडी ,बीट तुम्ही घालू शकता. तसेच तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता ‌.
  • बिर्याणी सर्व्ह करतानाच रायत्यामध्ये मीठ घाला. कारण जास्त वेळ रायत्यामध्ये मीठ घालून ठेवले तर कांद्यातील पाण्यामुळे रायत्याला पाणी सुटू आणि रायता पातळ होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्व्ह करणार असाल त्याचवेळी रायत्यामध्ये मीठ घाला.

पहा कशी बनते पुरस्कार भेटलेली व्हेज दम बिर्याणी