Vyayamache Mahatva Nibandh Marathi : आयुष्यात व्यायामाचे महत्त्व निबंध

Vyayamache mahatva nibandh marathi

vyayamache mahatva nibandh marathi: निरोगी आयुष्य आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जायचे असेल तर आपल्याला साथ हवी ती व्यायामाची. व्यायामामुळे माणसाच्या आयुष्य नक्कीच वाढत जाते. उत्तम आहार आणि शरीराला पूरक असा व्यायाम असला तर आपले शरीर सुद्धा बळकट राहते. जसे एखादे इंजन उत्तम काम करण्यासाठी ते कायम वापरात वे असले पाहिजेत त्याचप्रमाणे आपले शरीर सुद्धा आहे ते नीट चालण्यासाठी त्याला सुद्धा व्यायामाची गरज आहे.

Vyayamache Mahatva Nibandh Marathi : आयुष्यात व्यायामाचे महत्त्व निबंध

Vyayamache Mahatva Nibandh Marathi : आयुष्यात व्यायामाचे महत्त्व निबंध
Vyayamache Mahatva Nibandh Marathi : आयुष्यात व्यायामाचे महत्त्व निबंध


मोठ्या मोठ्या खेळाडूंना आपण पाहिलं तर त्यांना त्यांचे ध्येय साध्य करता आले ते म्हणजे व्यायामामुळेच. व्यायामामुळे आपल्या शरीर लवचिक बनते. आज भारतीयांच्या जीवनात खेळाचे महत्व खूप आहे . पण हा खेळ परिपूर्ण बनवण्यासाठी गरज आहे ती फक्त व्यायामाची. जर एखाद्या खेळाडूचे शरीर पाहिले तर त्याचे शरीर एकदम धडधाकट ,लवचिक, आणि बळकट असते तेच जर एखाद्या व्यायाम न करणाऱ्या फक्त बसून खाणाऱ्या अति लट्ट माणसाचे शरीर पाहिले तर आपल्याला समजते की त्याचे शरीर त्या व्यक्तीला पूर्णपणे साथ देत नाही.

थोडेसे जरी काम केले तर तो लगेच थकून जातो त्याचबरोबर त्याला कोणत्याही कामांमध्ये उत्साह राहत नाही. त्याच्याकडे फक्त पाहिले तरीसुद्धा तो माणूस आजारांनी ग्रस्त आहे हे आपल्याला लगेच समजून येते. हा फरक कशामुळे तर फक्त व्यायामामुळेच . व्यायामामुळे माणूस निरोगी राहतो.

व्यायामाचे महत्त्व आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर एखाद्या आजारी माणसाला नक्की विचारा. आयुष्यात आपले आरोग्य जर शेवटपर्यंत निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्या दररोजच्या जीवनात व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आज कालचे धकाधकीचे जीवन ते गुंतून गेलेले आहे की आपल्याला व्यायामासाठी वेळच नाही, सकाळी उठले की ऑफिस आणि त्यानंतर दिवसभर कामाचा ताण आल्यानंतर कंटाळा करून आपण जेवण करून झोपलो जातो. पुण्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा किती वाईट परिणाम होत आहे हे आपल्याला समजून येत नाही आहे.

हे सुद्धा वाचा – खाद्यपदार्था मुळे होणारी एलर्जी

आजकालचे तंत्रज्ञानिक झाल्यामुळे आपले जीवन तर सुखकर झालेच आहे पण त्यामुळे आपला व्यायाम खूप कमी झालेला आहे उदाहरण द्यायचे म्हटले तर स्वयंपाक घरामध्ये आदिशा काळामध्ये कोणत्या प्रकारचे उपकरणे उपलब्ध नव्हते आधीच्या बायका किचनमध्ये मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा यासारख्या प्राचीन गोष्टींचा वापर करत असत.

भेट देण्यासाठी जात्याचा वापर करत असाल त्यामुळे एक प्रकारचा त्यांच्यासाठी तो उत्तम व्यायाम होता त्यामुळे त्यांना शरीरासंबंधी कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नव्हत्या. आजकाल तंत्रज्ञानामुळे काही मिनिटांमध्येच आपली कामे होऊन जातात पण त्यामुळे आपले काम खूप सोपे झाले पण आपला व्यायाम थांबला. त्यामुळे आपल्याला याचा फायदा होत नसून तोटा होत आहे. 

आधीच्या काळी वाहने खूप कमी होते त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी माणसे पायी चालत जात असत. डॉक्टर सांगतात की दररोज कमीत कमी एक ते दोन किलोमीटर तरी चालले पाहिजेत. त्यामुळे आधीच्या लोकांचा खूप सारा व्यायाम होत असेल पण आज आपल्याकडे वाहने आले आहेत कुठेही जायचे असेल तर काही सेकंदांमध्येच आपण कामे करून येतो. आणि यामुळेच आपले पाठीचे कण्याचे आधार वाढले. कारण आपल्याला व्यायामाचे महत्त्व काय आहे हे आपण विसरत चाललेला आहोत.


  आजकाल माणसांना कोणत्याही प्रकारचा शरीराला त्रास नको आहे फक्त आपली कामे कशी सोपी होतील याकडे सगळ्यांची धडपड लागलेली असते. घरामध्ये तर कपडे धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत तसेच  पीठ मळण्यापासून ते मिक्सरला मसाला बारीक करण्यापर्यंत सगळीच कामे अगदी चुटकीसरशी होतात. क्षणार्धात मोबाईल मध्ये खुर्ची वरती बसून आपण फॅन चालू बंद करू शकतो म्हणजे या तंत्रज्ञानामुळे माणसाला निरोगी नसून दिवसेंदिवस आजारी बनवत चालले आहे.तंत्रज्ञानामुळे माणसाचे व्यायामाचे स्वातंत्र्य हीराहून घेतलेले आहे.


खेळाडूंकडे पाहिले तर आपल्याला सुद्धा वाटते की त्यांची लाइफस्टाइल आपल्याकडे सुद्धा हवी पण त्यासाठी ते किती व्यायाम करतात याकडे आपले लक्ष नसते ‌. आपण सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला हवे ते स्थान निर्माण करायचे असेल तर दररोज फिक्स असा व्यायाम आणि प्रॅक्टिस करून आपण सुद्धा आपले ध्येय मिळू शकतो.


  आपण लहान मुलाकडे बघितले तर ते दिवसभर फक्त इकडून तिकडे बागडत असते. त्याचा पुरेपूर व्यायाम होत असतो. त्यामुळे तो भरपूर उर्जेने भरलेला असतो. जर आपण एखाद्या फक्त दिवसभर खुर्चीवर बसून असणाऱ्या माणसाकडे पाहिले तर त्याला कोणत्याही कामांमध्ये रस वाटत नाही कारण त्याच्या शरीरामध्ये व्यायामाची कमी असते


  काही लोक व्यायामासाठी महिन्यासाठी हजारो पैसे खर्च करून जिम ला जातात. पण घरामध्ये काहीच काम करणार नाहीत किंवा कोणत्याही काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते ते खूप चुकीचे आहे. जर तुम्ही जिमला जात नसेल आणि घरातील सर्व काम स्वतःची स्वतः करत असाल दररोज पाच ते सात किलोमीटर चालत असाल तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करून जिमला जाण्याची सुद्धा गरज नाही तुमच्या शरीर आपोआपच तंदुरुस्त राहील.

आपण जे अन्न खातो. त्याला पचवणे सुद्धा खूप गरजेचे आहे. डॉक्टर सांगतात की जेवल्यानंतर कमीत कमी शंभर पावले चालली पाहिजेत. पण आपण जेवतो आणि लगेच झोपी जातो. त्यामुळे आपल्याला अपचन ऍसिडिटी गॅस यांचा त्रास होऊ लागतो आणि मग आपण यासाठी परत पैसे खर्च करून औषधे खातो त्यामुळे आपल्या शरीराची हानी  होत आहे हे आपण विसरतो. नियमित व्यायाम करणारा माणूस हा खूप कमी आजारी पडतो. त्याला पचनासंबंधी कोणताही त्रास होत नाही. त्याची हाडे कायम घट्ट राहतात.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेजण चिंतेने ग्रस्त आहेत. त्यामुळे लोकांना डॉक्टर कडे जाऊन वेगळी अशी मेंटल थेरपी घ्यावी लागते. पण जर तुम्ही नियमित व्यायाम आणि ध्यानावस्था केली तर तुम्हाला मानसिक शांती लाभते. सतत घाबरणे तसेच कायम चिंता करत राहणे या गोष्टींपासून आपल्याला मुक्तता भेटते.

व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स तयार व्हायला मदत होते. आणि यामुळेच आपण आपल्या भावनांवरती संयम ठेवायला शिकतो. आपल्या शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे हार्ट अटॅक यासारख्या गोष्टीमुळे आपण लांब राहतो. प्रत्येकाला झोप नाही येणे हे आता सामान्य गोष्ट झालेली आहे. व्यायामामुळे आपल्याला शांत झोप लागते. थोडक्यात काय तर आपले शारीरिक मानसिक आणि भावनांवरती आपल्याला संयम हवा असेल तर नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.


आज-काल लहान मुलांना हातामध्ये मोबाईल देऊन बसवले जाते. त्यामुळे लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज खूप कमी होत आहेत. आधीच्या काळी जेव्हा एक आई आपल्या लहान बाळाला जेवण भरवत असायची तेव्हा आपल्या घराचे अंगण ते बाळ फिरून त्याचा खाऊ खात असायचा. त्यामुळे त्याचा व्यायाम पण होत असेल आणि जास्त अ्न  पोटामध्ये जात असायचे.

पण आजकाल मोबाईल मुळे लहान मुलांचा व्यायाम थांबलेला आहे. त्यांना बाहेर अंगणामध्ये खेळ खेळायचे सोडून मोबाईल आणि टीव्हीचा आहारी लहान मुले गेलेले आहेत. हे खूप चुकीचे आहे. त्यांना लहानपणी व्यायामाचे महत्त्व शिकवले पाहिजेत तर असते आयुष्यभर निरोगी राहतील आणि एक जबाबदार पालक म्हणून ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे.

तुम्ही किती पैसे कमवा पण जर तुमचे शरीरच धडधाकट नसेल तर त्या पैशांचा काही उपयोग नाही. त्यामुळे आयुष्यात पैसा कमावण्यापेक्षा आपल्या शरीर कमावण्यामध्ये जर तुम्ही वेळ घालवला तर आयुष्य सुखाने आणि निरोगी म्हणून घालवाल. आपणच दररोज एक तास आपल्या शरीराला दिला तर आपली मुले सुद्धा आपल्याला बघून त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये व्यायामाला  सुरुवात करतील.

त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आजपासून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तसा आपला व्यायाम होईल हे पहा. आपले आरोग्य आणि शरीर निरोगी बनवा. कारण जर आपले आरोग्य उत्तम असेल तरच आपले जगणे सुद्धा आनंददायी होईल आणि उत्तम शरीर आणि उत्तम आहार हेच आपल्या जीवनाचे सार आहे हे लक्षात घ्या.

या व्यायामामुळे होईल पाठदुखी कंबरदुखी कमी