छत्रपती शिवाजी महाराज असते तर……| Chhatrapati Shivaji maharaj aste tar

Chhatrapati Shivaji maharaj aste tar

Chhatrapati Shivaji maharaj aste tar :नमस्कार मित्र हो भी आणि तुम्ही आज ज्या मातीवर उभे आहोत, ती माती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने आणि शौर्याने पविञ झालेली, ज्या मातीमध्ये शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा उमटल्या अशा महापुरुषाच्या युगपुरुषाच्या पविञ स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी..,…………. माझ्या भाषणाला सुरुवात करते( chhatrapati Shivaji maharaj aste tar)

मित्रानों मातीत जगणारे अनेकजण असतात. पण मातीसाठी जगणारे खुप कमी असतात. आज सर्वत्र पाहीले तर प्रत्येकजण महाराजांचे वंशज म्हणून मिरवताना दिसतात, पण खरा शिवाजी कोण ? हे जाणून घेत नाही. छञपती शिवाजी महाराज कोण होते ? Chhatrapati Shivaji maharaj aste tar

chhatrapati Shivaji maharaj aste tar

शिवाजी कोणाला म्हणावे, ६५ किलोची तलवार वागवतो तो येसाजी, 2000 जणांबरोबर एका खिंड लढवतो तो बाजी हात तुटला तरी लढत राहतो तो तानाजी आठ तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो तो संताजी दीड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरुन आणतो तो घनाजी वाघाला फाडतो तो संभाजी आणि या सगळ्याला एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छञपती शिवाजी महाराज

सध्याच्या परिस्थितीत जेंव्हा एखाद‌या कर्तुत्वावान व्यक्तिमत्त्वाची उणिव भासते तेंव्हा भूतकाळातील कर्तव्यकठोर थोर व्यक्तींची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. सध्या अनेक क्षेत्रातील अंदाधुंदी पाहता सहज मनात विचार येऊन जातो आज शिवाजी महाराज असते तर….

मित्रांनों छत्रपती शिवानी महाराजांना शहाणपण उपजतच लाभले होते. तत्कालीन महाराष्ट्रातील सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून उत्तरेतील औरंगजेब दक्षिणेतील आदिलशहा, कुतुबशहा, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज, पोर्तुगीजांचा साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वराज्य निर्माण केले. आज राजे असते तर पाकीस्तान, चीन सारख्या शत्रूची वारंवार डोकं वर काढण्याची हिंम्मत झाली नसती.

शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणून शिवरायांना ओळखलं जातं. शिवरायांना कोणतीही लालसा नव्हती. हे राज्य प्रजेचे असे ते म्हणायचे. राजा प्रजाहित दक्ष होते. राजांना अन्यायाची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचाऱ्यांना बेदली करणाऱ्यांना त्यांनी कडक शासन केले त्यामध्ये स्वतःचा पोर संभाजी, भाऊ व्यंकोजी हेही सुटले नाहीत अशी छञपती शिवाजी महाराजांची शासन- व्यवस्था होती. थोर पुरुषांच्या गोष्टी फार आवडत. त्याचप्रमाणे साधू- संतांची चरित्रेही खूप आवडत..

छत्रपती शिवाजी महाराज, गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत. ते उच्च नीचअसा भेद, कधीच मानत नसत. ते त्यांच्या पडक्याझडक्या झोपडीत जात. त्यांची असेलती चटणी भाकर मायेने खात. मावळ्यांची मुले जणू रानातली पाखरे !

दादोजींच्याबरोबर शिवराय स्वतः जात. दादोजी शिवरायांच्या समक्ष लोकांचे तटे सोडत, न्यायनिवाडा करत. लोकांना आपलेसे कसे करावे, न्याय कसा करवा, या गोष्टी शिवरायांना कळू लागल्या. राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांनी केलेले पराक्रम शिवरायांना आठवू लागले. शिवरायांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी सतत वाटू लागले,

आपणही प्रजेला सुखी करावे. ते जिजाईजवळ जाऊन हितगुज करत. तेव्हा जिजाई म्हणत, “शिवबा, भोसल्यांच्या पूर्वज श्रीरामाने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले; जाधवांच्या पूर्वज श्रीकृष्णाने दुष्ट कंसाला ठार केले आण प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. “अरे ! तू सुध्दा दुष्टांचा संहार करु शकशील, गरीब प्रजेला सुखी करु शकशील. जिजाईच्या उपदेशाने शिवरायांचे हृदय हुरुपाने भरुन आले.Chhtrapati Shivaji maharaj aste tar

chhtrapati Shivaji maharaj aste tar

आजच्या काळात महाराज असते तर देशात चाललेला भ्रष्टाचार, दरोडे, खून, मारामाऱ्या परकीय देशांची आक्रमणे यांची हिंमत झाली नसती.आधुनिक स्री प्रत्येक क्षेत्रात मोठ्या समर्थपणे वावरताना दिसते. तरीही कोपर्डीसारख्या अमानुष घटना घडतात, काय चाललंय या देशात असा प्रश्न पडतो, इतिहासातील उदाहरणचं दयायचं झालं तर नजराणा म्हणून आणलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईचा दर्जा देऊन तिची खणा नारळाचे ओटी भरून आहेर देऊन सन्मानाने घरी पाठवणारे तुम्ही, ज्या राज्याच्या पाटलाने गोरगसबे पोरीला दिवसाढवळ्या लूटली त्या रांज्याच्या पाटलाचे हातपाय तोडणारे तुम्ही आज अस‌ता तर कोपर्डीसारख्या घटनेतील नराधमांना जनतेसमोर हात-पाय तोडण्याची शिक्षा दिली असती परंतू आजही असे नराधम शिक्षा न झाल्याने बिनधास्त फिरताना दिसतात.

शिवरायांनी पर स्ञी मातेसमान मानली आणि आपल्याला पण तिचं शिकवण दिली.. पण आज आपण जेव्हा रोड वर स्ञीयांची छेड काढली जाते , अपहरण केले जाते, तेव्हा आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो पण शिवराय असते तर छेड काढणे तर दुरच कोणाचीही पर स्ञी कडे मान वर करुन बघण्याची हिम्मत सुद्धा झाली नसती..

आज शिवराय असते तर….कधिच भष्टाचार झाले नसते. ना कधी पर्यावरणाचा ह्यास झाला असता. धर्माच्या नावाखाली केले गेलेले राजकारण कधिच थांबले असते.. आज आपले महाराज असते तर बाहेरच्या आजुबाजुच्या देशांच्या कुरापती करण्याची हिंमतच झाली नसती.

राजे धर्मनिष्ठ होते. शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना जातीधर्माचा विचार केला नाही. कोणत्या जातीत जन्माला आला, कोणत्या पंथात जन्माला आला हे पाहीले नाही. माणसांची मनं किती धडधाकट आहेत. स्वराज्यासाठी लढण्याची किती त्यांच्या हृद‌यामध्ये हिंम्मत आहे, अशी माणसं गोळा केली. राजांनी अन्य धर्मियांचा कधीही दवेष केला नाही, परंतु आताचे राज्यकर्ते जातीधर्माचे राजकारण करताना दिसतात. शिवाजी राजे असते तर जातीधर्माला थारा दिला नसता महाराजांची संरक्षण व्यवस्था कठोर होती लष्कर आरमार दल सक्षम होते. स्वराज्य रक्षणासाठी आरमार उभे केले. समुद्रमार्गे येणारी परकीय आक्रमणे सहजपणे थोपवली परंतु आज त्याच समुद्र‌मार्गे परकीय देशातून दहशतवादी आपल्या देशात घुसून हाहाकार माजवतात. काय करते आपली सरक्षण व्यवस्था ? काय म्हणावे या राज्यकर्त्यांना ?

छत्रपती शिवाजी महाराज असते तर. भारताने स्विकारलेली लोकशाही राज्यपद्‌धती धर्मनिरपेक्षता या साऱ्या मूल्यांचे कठोर पालन झाले असते.मित्रांनो शिवरायांनी सहयाद्रीच्या कडेक‌पाऱ्यात फिरुन स्वराज्य रक्षणासाठी मावळे जमवले. राजे तुमच्या काळात तरुणाई, व्यस‌नाधिनता बेरोज‌गारीच्या जाळ्यात अडकलेली, भरकटलेल्या अवस्थेत दिसतेः डॉल्बीच्या तालावर थिरकताना दिसते.

महाराज्यांनी राज्यकारभार करण्यासाठी राज्यव्यवहारकोश तयार केले होते. राजांचे स्वत:च्या भाषेवर भरपुर प्रेम होते. आज भाषेच्या बाबतीत केले जाणारे राजकारण आणि गोंधळ राजे असते तर आज झालेच नसते. आज राजे असते तर मातृभाषेला उच्च स्तरावर नेवुन ठेवले असते. शिवरायांच्या काळात भले प्रदुषणाचा ञास नव्हता पण त्यांना पर्यावरण संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे शिवराय चांगलेच जाणुन होते.

आज काल गड किल्ल्यांची अवस्था पाहून खुप वाईट वाटलते. शिवरायांनी जिवाची बाजी लावून आपल्याला स्वराज्य मिळवून दिले , आणि आपण त्या गडकिल्लांचे निट काळजी सुद्धा घेवू शकत नाही.आज शिवराय असते तर फक्त विचार करा त्या गडकिल्लांना या अवस्थेत पाहून किती वाईट वाटेल.

शिवजयंती आली की महाराजांची आठवण काढायची, मोठमोठ्याने घोषणा द्यायची शिवजयंती संपली की, शिवरायांचे कार्य विसरून जायचे अशी आहे आजची तरुणाई, अशा या तरुणाईला दिशा देण्यासाठी शिवरायांच्या मुत्सद्‌दी धोरणाची गरज आहे. आज छञपती शिवाजी महाराज असते तर स्वच्छ राज्यकारभार कर्तव्यदक्ष शासन भ्रष्टाचार विरहीत व्यवहार, स्त्री- सुरक्षितता, देशाचे रक्षण वारशाचे जतन झाले असते. एक बलाढ्य राष्ट्र वैभवशाली राष्ट्र म्हणून भारताची संपूर्ण जगात ओळख निर्माण झाली असती.

म्हणून या आजच्या अंधार युगात् या पुण्यश्लोक महामान‌वाने पुन्हा अवतार घ्यावा असेच तुम्हा-आम्हा सर्वांनाच मनोमन वाटते म्हणून मी शेवटी येवढेच म्हणेन

असा मोहरा झाला नाही पुढे न होणार,

सूर्य चंद्र असे तोपर्यंत शिवछत्रपती हे नाव जगात गर्जत रहाणार !

” मित्रांनों अशा अंधःकारात झाकोळलेल्या समाजाला प्रकाशाचा राजमार्ग

दाखवण्यासाठी मला असे म्हणावेसे वाटते.

अंधार फार झाला दिवा पाहीजे:

या राज्याला जिजाऊचा शिवा पाहीजे.

(chhatrapati Shivaji maharaj aste tar)

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

  • पंतप्रधान : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असायचा.
  • पंत सचिव : अण्णाजीपंत दत्तो-शिवरायांच्या पत्रव्यवहारावर सांभाळणे, जमीन महसुलाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे.
  • मंत्री : दत्ताजीपंत त्रिंबक – यांच्याकडे महाराजांचे खाजगी कारभार, भोजन व्यवस्था, वैयक्तिक संरक्षण याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  • सेनापती : हंबीरराव मोहिते – शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती.
  • पंत सुमंत : रामचंद्र त्रिंबक – परराष्ट्रासंबंधातील व्यवहार सांभाळणे.
  • न्यायाधीश : निराजीपंत रावजी – स्वराज्याचे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांबाबत खटले चालवून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते
  • पंडितराव दानाध्यक्ष : रघुनाथराव पंडित – दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे,
  • पंत अमात्य : रामचंद्र निळकंठ- स्वराज्यातील महत्त्वाचे जमाखर्च बघणे.

(chhatrapati Shivaji maharaj aste tar)

डॉ. ऐ पी जे अब्दुल कलाम मराठी निबंधhttps://knowledge.org.in/wp-admin/post.php?post=257&action=edit

छञपती शिवाजी महाराज पोवाडाhttps://youtu.be/w_PbRP7Wgcw?si=6MlOW5TQ0Ni4MwGB