छञपती शाहू महाराज | chhatrapati shahu maharaj marathi nibandh

छञपती शाहू महाराज

Chhatrapati shahu maharaj marathi nibandh: छञपती शाहू महाराज या महान राजा विषयी आजच्या लेखनात आपण पाहणार आहोत

इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरी,

झुकवून मस्तक करशील

तयांना मानाचा मुजरा

तयांना मानाचा मुजरा

उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज आपणासमोर विषय मांडत आहे. दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा ‘शाहू महाराज’ कोल्हापूरचे संस्थानिक ख्यातनाम समाजसुधारक, दलितोद्धारक, सार्वजनिक कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावरील एक छोटंसे गाव म्हणजे कागल. गाव जरी लहान होत तरी त्याला इतिहास होता. कागल एक संस्थान होते आणि त्या संस्थानचे संस्थानिक जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे हे मनाने मोठे दिलदार बाणेदार होते. त्यांना त्यांच्या पत्नी राधाबाई या भाग्यवंत जोडीच्या पोटी खरे तर आधुनिक भारताच्या भाग्यविधात्याचा आरक्षणाच्या जणकाचा आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा पाया घालण्याऱ्या खऱ्या खुऱ्या महर्षीचा जन्म झाला असे आपण म्हणू शकतो.Chhatrapati shahu maharaj marathi nibandh

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

जन्मानंतर यशवंत नाव लाभते. पण अवघ्या दहा वर्षानंतरच कोल्हापूरच्या राजमाता आनंदीबाई यानी १७ मार्च १८८७ रोजी त्यांना दत्तक घेतले आणि यशवंताचे ‘शाहू’ झाले, हेच शाहू पुढे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज झाले. आपल्या सत्तेचा उपयोग ऐषआरामासाठी न करता गोरगरीब, दीन दुबळ्या, अनाथ अबालवृद्धांच्या सेवेसाठी खर्च केला. आपल्या कार्य कर्तृत्वाने कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे अशा सर्वच क्षेत्रात ते यशवंत झाले.

गोरगरीबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे तेवत राहणारा, एक नंदादिप .अठरापगड जातीच्या माणसांना एकाच पंक्तीला बसवून जेऊ घालणारा महामानव, रंजल्या गांजल्यांच्या शिरावर मायेचे छत्र उभा करणारा एकमेव छत्रपती, कोल्हापूर संस्थानातील रयत रयतेतील माणसं त्या माणसांची मनं आणि मनावर अधिराज्य गाजवणारा रयतेचा वाली म्हणजे लोकराजे  छञपती शाहू महाराज होय.Chhatrapati Shahu maharaj marathi nibandh

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

प्रजेच्या कल्याणाची नेहमी काळजी घेणारे अहोरात्र आपला देह ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ याप्रमाणे बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्रय, अंधश्रद्‌धा व अज्ञान नष्ट होणार नाही है जाणून त्यांनी २१ सप्टेंबर १९१७ रोजी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. व छञपती शाहू महाराजांनी तो अंमलात आणला.  छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते.

He was the king among men and man among the king.
शाहू  महाराजांनी संस्थानाचा कारभार निरिच्छ बुद्धीने केला ते एक चतुरस्त्र राजे होते. तळागाळातील लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दलित समाजाचा उद्‌धार फक्त शिक्षणामुळेच होईल हे  त्यांनी आधिच जाणले होते. अस्पृश्यता ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे ती नष्ट केली पाहीजे अशी त्यांची धारणा होती. यासाठी त्यांनी प्रयत्नदेखील केले. वयाच्या 20 व्या वर्षी सत्ता, संपत्ती, वैभव हाती असतानासुद्धा त्या मोहपाशातगुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजिकरणारा राजा भेटला हे कोल्हापूरच्या मातीचे सद्‌भाग्यच समजावे लागेल.( Chhatrapati shahu maharaj marathi nibandh)

कोल्हापूरमध्ये  अस्पृश्य विदयार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केले. सार्वजनिक नळ व खानावळी दलितांसाठी खुल्या केल्या. स्त्रियांच्या कल्याणासाठी विधवा पुनर्विवाह, बालविवाह, प्रतिबंध व.घटस्फोट विरोधी कायदे छ. शाहू महाराजांनी केले त्या काळीत जातिव्यवस्थेचे शिकार झालेल्या अनेक जमाती चोरी, दरोडेखोरी अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करत होत्या. अशा लोकांना शाहू महाराजांनी संघटीत करून गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त केले. शाहू महाराजांचे प्रेम त्यांना मिळाले त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून माणूस म्हणून जगायला सुरुवात केली. गंगाराम कांबळे या अस्पृश्यास उपहारगृह काढून देऊन ते स्वतः तिथे चहा घेऊ लागले. अनेकांना आपल्या पदरी पहारेकरी माहूत अशा नोकऱ्या दिल्या.

Chhatrapati shahu maharaj marathi nibandh

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

शाहू महाराजांनी अनेक कलावंतांना राजाश्रय दिला. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी जी आर्थिक सहकार्य केले. तसेच त्यांनी कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. कोल्हापूरला मल्लविद्येची पंढरी म्हटले जाते ते यामुळेच.

छत्रपती शाहू महाराज हे नुसते‌च राजे नव्हते तर ते बुद्‌धीमान व दूरदृष्टी असणारे छत्रपती होते. आज कोल्हापूर जिल्हा संपूर्ण हिंदुस्थानात  सुजलाम् सुफलाम् म्हणून प्रसिद्‌ध आहे ते या राजामुळेच, कारण छञपती शाहू  महाराजांच्या या काळात  भूमीत हरीतक्रांतीची बीजे रोवली गेली. कोल्हापूर संस्थानातून वाहणाऱ्या भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधून या भूमीला बारमाही पाण्याची सोय केली. या महान कार्यास महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते आरंभ झाला त्या तलावाचे “लक्ष्मीबाई” तलाव असे नाव ठेवले.Chhatrapati shahu maharaj marathi nibandh

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

श्रोतेही इतिहासामध्ये बऱ्याच वेळा राजाचाच मुलगा राजा होतो. पण याला काही अपवाद असतात हे इतिहासाने मान्य केले आहे, १७ व्या शतकात वयाच्या १४व्या वर्षी हातात् तलवार घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना छञपती. शिवाजी महाराज हे शहाजी भोसले या सरदाराचे सुपुत्र होते. आणि १९व्या शतकात कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण करणारे छञपती शाहू हे जयसिंगराव घाटगे या सरदाराचे सुपुत्र होते. राजा हा जन्माला येत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने नाव‌लौकीक मिळवतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे छञपती शाहू महाराज होय.( Chhatrapati shahu maharaj marathi nibandh)

शाहू महाराजांच्या रु‌पाने महान राजातला माणूस आणि माणसांचा महान राजा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला दृष्य  समाजसुधारक पहायला मिळाला. अठराप‌गड जातीच्या माणसांना आपल्या अंगाखांदयावर होऊन परिवर्तनाच्या वाटेने विकास करत चाललेले छञपती शाहू पाहिले की संतमेळ्यासह उभ्या असलेल्या लेकुरवाळ्या वि‌ठ्ठलाची आठवण होते. आणि ओठातून शब्द बाहेर पडतात.

धन्य धन्य तू शाहूराया

तुजसम राजा तूच एकला

राजा तूच एकला तुच शिवाजी

बुद्धीदेव तु तुच हरी सावळा.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा काढला. २१ मे १९१९ आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ ला शिक्षण खात्याला आदेश देवून अस्पृश्यांना समानतेची वागणूक देण्यास भाग पाडले. तर ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात.कोल्हापूरला एक अमोल देणगी देवून हरितक्रांतीच घडवून आणली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी संघ स्थापन केला. १८९५ साली शाहुपूरी ही गुळाच व्यापारपेठ वसविली. १९०६ साली शाहू (कापड) मिलची स्थापना केली. १९१२ ला बलभीम सहकारी सोसायटींची स्थापना केली आणि महाराष्ट्राला सहकाराच मंत्र दिला. यामुळेच कोल्हापूरच्या गुळाने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविले शेती, व्यापार, उद्योग व सहकाराला भरभराटी यावी म्हणून त्यांनी काळा्म्मावाडीच्या धरणाचा सुद्धा पाया त्यांनीच घालून ठेवला होता.

महाराजांनी समाजातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढली. बेरड, मांग, फासेपारधी या सारख्या लोकांना गुन्हेगार समजून रोज हजेरी द्यावी लागे ती पद्धत बंद केली, त्यांना माणसात आणले. केवढे मोठे मन त्यांचे होते.Shahu maharaj

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

महाराजांना शिकारीचा मोठा छंद होता. शिकारीच्या छंदा इतकाच कला क्रिडेचा छंद होता. लोकजीवनाला कला क्रीडा, नाट्य, आणि संगीत या कलांची एवढी प्रगती के जोड असावी असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन सेल एवढी प्रगत अनेक मल्लांना राजाश्रय दिला. अल्लादिया खाँसारखे गानमहर्षी व बाबूराव पेंटरांसारखे चित्रमहर्षी या सारख्या कलावंताना राजाचे छत्र लाभले. कलांची व कलावंतांची जोपासना करत असतना कोल्हापूरला त्यांनी ‘कलापूर’ करुन टाकले. कलावंताना राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळवून दिला.

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

अशा या मोठ्या दिलाच्या राजाची कार्य कर्तृत्वाची गाथा थोडक्यात सांगणं कठीण आहे.

शेवटी कोल्हापूरच्या या थोर लोकराजाला मानाचा मुजरा करून एवढेच म्हणेन

बुडबुडे  उगा कशाला दवडू माझ्या शब्दांचे

तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ॥

chhatrapati shahu maharaj marathi nibandh

धन्यवाद

अधिक निबंधासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कराhttps://knowledge.org.in/%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae/

छञपती शाहू महाराज यांचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कhttps://youtu.be/rvt0DM0qx3w?si=Ffgeb1mXEkJ8RY-A