बाबा तुम्ही ग्रेट आहात
Baba marathi nibandh:बाबा तुम्ही तुम्ही ग्रेट आहात ग्रेट आहात या विषया बद्दल आज आपण पाहणार आहोत.तर ही फक्त एकाच बापाची कहाणी नाही आहे.तर ही गोष्ट त्या प्रत्येक बापाची आहे जो प्रत्येक घरात आहे . आणी जो फक्त स्वतः साठी न जगता तो आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला चांगले आयुष्य लाभो यासाठी प्रयत्न करत असतो.
रसिक श्रोते हो, विद्यैचे आराध्य दैवत सु:खकर्ता दुःखहर्ता आणि विघ्नहर्ता, चैतन्याचे आणि मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या गणेशाला वंदन करून मी माझ्या लेखनाला सुरुवात करते.
.
Baba marathi nibandh
मिञहो वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटतं ना ?पण आपण कधी-कधी जाणून-भुजून “बाप” आज अशाच माझ्या बापाची एक कहानी
आई घराचे मांगल्य असते, तर वडील घरांच अस्तित्व असतं पण या अस्तित्वाला खरचं आम्ही कधी समजून घेतलय का ? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसे बोललं जात नाही. एवढं असूनही आजपर्यंत बाबांवर एकही कविता नाही लोकांनी बाबा ,वडील रेखाटले पण ते तापट, व्यसनी, मारझोड करणार
पण नाही, बाबा तुम्ही ग्रेट आहात……
Baba marathi nibandh
आईकडे अश्रुंचे पाट असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन हे वडीलांनाच – करावे लागते. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापले ना ? पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिळते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण सोइस्करपणे विसरुन जातो. मित्रांनो बापाचं महत्व किती सांगावं, जिजाऊंनी शिवबांना घडवले असे अवश्य म्हणावं पण… त्याचवेळी शहाजी राजांची ओढाताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक जरूर करावं पण भर पुरातून आपला जीव धोक्यात घालूने पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात घ्यावा. श्रीराम कौशल्येचा पुत्र अवश्य पण पुत्रवियोगाने तडफडणारा पिता दशरथच होता हेही आपण जाणतो. अशा बापांना धन्यवाद दयावेत तितके थोडेच.
मित्रहो आपल्या मुलाची मुलीची रात्रंदिवस काळजी घेणारा तो बाप ऐपत नसताना सुद्धा कधी-कधी पोराला मेडीकल इंजिनिअरींगला प्रवेश घेतो आर्थिक ओढाताण सहन करून पोराला शिक्षणासाठी दर महिन्याला पैसे पाठवतो. पाठवलेल्या पेशाची इमान राखणार अनेक मुलमुली असतात पण काही अशीही मुलमूली असतात की ठरल्या तारेखाला पैसे येताच मित्रांसोबत, परमिट रूम मध्ये पार्टी देतात आणि ज्या वडीलांनी पैसे पाठवले त्यांची टिंगल करतात. असेही चित्र आपण पाहतो, मुलगा सलूनमध्ये 3०० रुपये सहन खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये ५०० एक रुपये खर्च करते पण त्यांच घरातील बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरखडतो. कधी-कधी फक्त पाणी लावून दाढी करतो असाही काटकसर करणारा बाप असतो.(Baba marathi nibandh)
खरचं बाबा तुम्ही ग्रेट आहात किती सांगू, किती बोलू, चार ओळीमध्ये बंदिस्त करण्यासारख बाबांचं व्यक्तिमत्व नाही . ज्याघरात वडील आहेत त्या घराकडे कुणी वाकड्या नजरेनं बघू शकत नाही कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो, तोच घराचं अस्तित्व असतो चटका बसला, ठेच लागली, फटका बसला की. आई गं हा शब्द बाहेर पडतो. हायवेचा रस्ता ओलांडताना एखादया मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला तर बापरे ! हेच शब्द बाहेर पडतात. कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते हो पण वादळे पेलताना बापचं आठवतो. काय पटतय काय? मंगलप्रसंगी अख्ख कुटुंब जातं पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागते असा तो बाप.
खरचं किती ग्रेट आहेत बाबा असेच माझे बाबा आहेत माझा जन्म झाल्या झाल्या मला पहिल्यांदा हातात घेतले. माझे बाबा अतिशय शिस्तप्रिय खुप प्रेमळ आहेत. तितकेच ते कटोर, कडक, कणखर खंबीर आहेत की ज्यांच्यामुळे आज भी तुमच्या समोर उभी आहे. सतत घराच्या सुखासाठी झटणारे, घरच्यांची काळजी घेणारे, आईवडील बायको मुले सगळ्यांच्या भावनांचा आदर करणारे बाबा किती महान आहेत. कशाची उपमा दयावी माझ्या बाबांना ‘भरल्या आभाळाची की जे नेहमीच पावसासारखं आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात असे आहेत माझे बाबा, खरचं बाबा तुम्ही ग्रेट आहात.
baba marathi nibandh
माझे ते आपल्या बाबा रात्रंदिवस मुलांच्या खूप कष्ट करतात. भल्यासाठी नेहमी झिजत् असतातः आम्ही जर एखाब्या स्पर्धेत यश मिळवले परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते. कारण ती जवळ घेते. कवटाळते. कौतुक करते. पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारे स्पर्धेत नंबर आल्यावर, पेपरमध्ये नाव फोटो कापून आणतात आणि काञण फाईलला लावणारे, बाहेरून येताना माझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणारे , माझं कौतुक करणारे माझे बाबा
मी शाळेतून घरी आल्यावर” मी दमलो आहे आता दिवसभर काम करुन” अशी तक्रार न करता माझ्याशी हितगुज करणारे नेहमी यशाचा मार्ग दाखिविणारे माझे बाबा खरचं ग्रेट आहेत.
आज आपण जे काही आहे तो फक्त माझ्या बाबा मुळेच आहे. कुटुंबाच्या आनंदातच त्यांचा आनंद असतो. आपले बाबा आपल्याला ओरडतात कारण आपण आपल्या जीवनामध्ये काही चांगले करावे म्हणून. बाहेरून कठोर जरी दिसत असला तरी आतुन त्यांच्यासारख्या संवेदनशील माणुस तुम्हाला शोधून सापडणार नाही. जसे फणस बाहेरून काटेरी दिसत असला तरी आत मध्ये माञ त्यांच्या गोड रसाळ गरे असतात त्याचप्रमाणे बापाचही असतं. आतुन तो गोडच असतो. एका मुलीला वाढवताना बाप नक्कीच कठोर वागतो. पण मुलीच्या लग्नात सगळ्यात जास्त रडतो तो बापाचं. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी तो सगळं आयुष्य झटत राहतो . कधी सणासुदीच्या दिवसांत स्वतःसाठी काही खर्च न करता आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगले कपडे आणायचे म्हणून सगळ्यात जास्त हौशी बापच असतो.( Baba marathi nibandh)
मला जेव्हा पण आयुष्यात काही माणसिक दडपण येते. तेव्हा माझे बाबा माझ्या सोबत एका मित्रा प्रमाणे माझ्या सोबत खंबीर पणे उभे राहतात. बघा ना ! किती नाती तो निभावत असतो. आपणचं कधी कधी एका बापाला समजुन घ्यायला कमी पडतो. आपल्या वया पेक्षा सुद्धा त्यांना आयुष्यात आलेले अनुभव खुप मोठे असतात.कधी कधी त्यांनी दीलेल्या सल्यावर आपण आक्षेप घेतो पण पुढे टाईम निघुन गेल्यानंतर आपल्याला माञ त्या गोष्टी चा पश्चात्ताप होतो की आपण ती गोष्ट आपल्या वडिलांची ऐकायला हवी होती. Baba marathi nibandh
आपल्या पेक्षा ही शिकून खुप मोठे व्हावे अशी अपेक्षा एका बापाचीच असु शकते. देवाकडे फक्त इतकेच सांगणे आहे की प्रत्येक बापाला भरभरून आयुष्य दे म्हणजे प्रत्येक लेकराला आयुष्यात काहिच कमी पडणार नाही.ऐखादि छोटी मोठी गोष्ट हवी असेल तर आपण देवाकडे त्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो. मग बाप तर आपल्या साठी काही न मागता हातामध्ये आनुन देतो . मग आपला बाप किती ग्रेट आहे याची फक्त कल्पनाच करा. त्यांचे कष्ट ,त्यांचे निरपेक्ष प्रेम, आयुष्य भर कुटुंबा साठी झटणे स्वता साठी न जगता प्रत्येक दिवस कष्ट करुन मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आयुष्य भर प्रयत्न करणे हे सगळे अगणित आहे . याला आपण कश्या बरोबरच तुलनाकरू शकत नाही. (Baba marathi nibandh)
श्रोते हो म्हणतात ना ? आकाशाचा कागद समुद्राची शाई केली तरी आईची महती लिहून संपणार नाही पण आई आणि बाबा यांच्यामध्ये आपल्याला फरक करता येणार नाही. कारण आई व बाबा ही आपल्या जीवनाच्या रथाची दोन चाके आहेत यामुळे सर्वांच्या दुर्लक्षामुळे बापाच महत्व कमी होणार नाही ते तेवढेच राहील म्हणुन मी माझ्या बाबांना म्हणेन बाबा खरचं तुम्ही ग्रेट आहात. (Baba marathi nibandh)
विज्ञान शाप की वरदान निबंध लेखनासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा . rg.in/wp-admin/post.php?post=257&action=edit
वडिलांची कविता ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://youtu.be/VU1m_7kS904?si=KXsH6nOrUgbe_cB4