मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना / mukhyamantri mazi ladki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेची घोषणा महाराष्ट्र च्या अर्थसंकल्पा मध्ये करण्यात आली. माननीय मंत्री अजित दादा पवार यांनी ही घोषणा केली असून ही योजना खुपच वेधनिय ठरली. आणि राज्य भरातिल महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या राज्यातील महिलांचे आर्थिक सामाजिक शारीरिक सबलीकरण तसेच त्यांना सामाजिक आणि त्यांना आर्थिक दृष्टीने प्रबळ करण्यासाठी ही योजना स्त्रियांसाठी खुप फायदेशीर ठरेल तर मुख्यमंत्री  माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे तर याचा फायदा राज्यातील महिलांना होणार आहे.   मध्यप्रदेश सरकारच्या “लाडली बहणा” या योजनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने ही योजना आखली आहे. निश्चितच या योजनेचा लाभ भरपूर महिलांना मिळणार आहे.त्या साठी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आली आहे.

तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना १ जुलै पासून रुजू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील ज्या महिला वय वर्ष २१ ते ६०  या गटात असतील त्यांना दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम देण्यात येईल. या मधे विवाहित महिला तसेच घटस्फोटित, विधवा आणि निराधार महिलांचा समावेश आहे.. मुख्यमंत्री लाडकी बहिन योजने साठी सरकार दरवर्षी ४६००० कोटी रुपयांचा निधी सादर करणार आहे. आणि याची अंमबजावणी १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करून झाल्यानंतर  फक्त पात्र महिलांनांच या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेच्या पहिल्या दिवसा पासूनच महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी पात्रता वार्षिक उत्पन्न २५०००० पेक्षा कमी असावे महिला महाराष्ट्र ची रहिवाशी असणे आवश्यक आहे . तर आता आपण या योजनेसाठी लागणारी पात्रता , अपात्रता तसेच लागणारी कागदपत्रे आपण पाहूया.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लागणारी पात्रता मधे केलेले बदल

सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत काही बदल करण्यात आली असून आता ती  मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर महीना रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले

होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे

१. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३.  योजनेतून ५ एकर शेतीची अट काढण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट रद्द  करून२१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील राहणाऱ्या  पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र स्वीकारण्यात येईल.

६)वार्षिक उत्पन्न २५०००० पेक्षा कमी असावे

७)योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करत्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

८)अन्य विभगा मधे ज्या आर्थिक योजना आखल्या आहेत त्या मध्ये १ हजार ५०० पेक्षा ज्यास्त लाभ घेतला नाही पाहिजे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लागणारी अपात्रता

  • कुटुंबातील सदस्यांचे २.५० लाख पेक्षा जास्त उत्पन्न
  • घरात कोणी आयकरदाता असेल
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
  • घरातील सदस्य कडे ४ चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून)
  • वय ६० पेक्षा ज्यास्त असेल तर
  • ज्या घरातील सदस्य माझी आमदार खासदार असतील
  • महिला स्वतः सरकारी नोकरी मधे नसावी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लागणारे कागदपत्रे

उत्पन्न दाखला

१) तलाठीकडील उत्पन्नाचा दाखला

२) रेशनकार्ड झेरॉक्स

३) शेती असलेला ८ अव ७/१२ उतारे

४) नोकरी असलेस १६ नंबर फॉर्म

५) पेन्शन असलेस पेन्शन बुक झेरॉक्स

६) अर्जदाराचे आधार कार्ड व कलर फोटो

डोमीसाईल/नॅशनॅलिटी

१) शाळेचा किंवा जन्माचा दाखला

२) रेशनकार्ड झेरॉक्स

३) सन २००४-०५ चा घराचा उतारा तसेच

४) चालू वर्षीचा घराचा उतारा

५) अर्जदाराचे आधार कार्ड व कलर फोटो.

६) विवाह नोंद दाखला किंवा गॅजेट

५) पेन्शन असलेस पेन्शन बुक झेरॉक्स

६) अर्जदाराचे आधार कार्ड व कलर फोटोमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

अर्ज करण्याची पद्धत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी तूम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या मधे योजनेचे अर्ज पोर्टल /मोबाईल ॲप  किंवा सेतू  सुविधा केंद्रात जाऊन तूम्ही  ऑनलाईन अर्ज भरू शकता.आणि ज्यांना अर्ज भरता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात भेट देऊ शकतात .अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै दिली होती .पण महाराष्ट्र तील महिलांच्या आग्रहास्तव हि मुदत २ महिन्यांनी वाढवली आहे.

अर्ज केलेले फॉर्म ची पडतळणी अंगणवाडी सेविका, मुख्यादापिका, ग्रामसेवक, प्रकल्प अधिकारी करतील

आणि जे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांची अंतिम यादी जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केली जाईल. तसेच जिल्हाधिकऱ्यांमार्फत जी यादी जाहीर केली जाईल आणि त्यांना त्यांच्या दिलेद्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल.

धन्यवाद

नवनविन निबंधासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्र माझा मराठी निबधलेखन

आई पाहिजे ? तर लेक वाचवा मराठी निबधलेखन

संत विचार काळाची गरज