Silai Machine yojana 2024/ शिलाई मशीन योजना 2024

Silai machine yojana 2024-आपले सरकार दरवर्षी मागासवर्गीय तसेच  आर्थिक दृष्ट्या दारिद्र रेषेखालील खाली लोकांसाठी काहींना काहीतरी उपाययोजना राबवत असते. त्यामध्ये महिलांसाठी वेगळा योजना दरवर्षी विचार करून राबवल्या जातात कारण त्यामागचा एकच मुख्य उद्देश असतो तो म्हणजे स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या त्यांच्या पायावर हे करणे कारण घरातील स्त्री च्या सबल असेल तर ती पूर्ण कुटुंबाचा व्यवस्थितपणे सांभाळ करू शकते ‌. आणि तिचा आत्मविश्वास वाढवणे.

हाच हेतू लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अजून एक योजना आखलेली आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना तर या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे याचा मुख्य हेतू म्हणजे ,ज्या महिलांना शिलाई मशीन आर्थिक दृष्ट्या परवडत नाही आणि ज्यांना घरी बसून काही ना काही रोजगाराची संधी हवी असते त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे ‌ या शिलाई मशीन योजनेद्वारे महिला घरी राहूनच आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात. आणि हा व्यवसाय कमी खर्चामध्ये होत असून त्यामध्ये मिळणारा नफा हा खूप चांगला आहे म्हणूनच स्त्रियांना हा व्यवसाय घरी बसून करणे सोयीचे जाते. (Silai machine yojana 2024)

ज्या स्त्रियांना घरी बसून आपला एक स्वतःचा लघुउद्योग सुरू करायचा आहे पण ज्यांच्याकडे इतकी आर्थिक परिस्थिती नाही की त्या शिलाई मशीन खरेदी करू शकतील त्या स्त्रियांसाठी ही शिलाई मशीन योजना म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे. या शिलाई मशीन योजनेअंतर्गत जवळपास 50000 महिलांना शिलाई मशीन वाटून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे लक्ष आहे. महाराष्ट्र सोडून कर्नाटक, गुजरात ,तामिळनाडू ,मध्यप्रदेश, राजस्थान , बिहार उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील सरकारने सुद्धा शिलाई मशीन योजना अमलात आणलेली आहे.Silai machine yojana 2024

silai machine yojana 2024

ग्रामीण भागात स्त्रियांना खूप कमी रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात . त्यांना आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे घराबाहेर पडून रोजगार मिळवणे अशक्य होते तर त्या इच्छुक स्त्रियांसाठी आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र असते त्यांच्यासाठी ही योजना सरकारने अंमलात आणलेली आहे.

तर मग चला बघूया या शिलाई मशीन योजने साठी कोणते पात्रता अपात्रता तसेच कोणती कागदपत्रे आवश्यक्य आहे. त्याचप्रमाणे आपण कोणत्या पद्धतीने या योजनेसाठी सरकारकडे मागणी करू शकतो. आणि कसा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो ,हे आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्या सगळ्यात पहिल्यांदा आपण सरकारचे या योजने पाठीमागचे उद्दिष्ट काय आहे ते सर्वप्रथम पाहूया.

Silai machine yojana 2024 /शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्टे

 • स्त्रियांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे .
 • आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या स्त्रियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
 • घरातील आर्थिक परिस्थिती बदलणे.
 • स्त्रियांना स्वावलंबी बनवणे.
 • मागासवर्गीय जातींचा तसेच समूहांचा सर्वांगीण विकास करणे.
 • बेरोजगारी कमी करणे.
 • लघुउद्योगांना सहाय्य देणे.
 • 50 हजारांपेक्षा  जास्त शिलाई मशीन वाटण्याचे लक्ष
 • अनुसूचित जाती, जमाती गरीब, अपंग महिलांना प्राधान्य देणे.
 • महिलांचा आत्मविश्वास वाढवणे.
 • ग्रामीण भागातील महिलांना घरी बसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
 • खेड्यांचा सर्वांगीण विकास करणे.

Silai machine yojana 2024शिलाई मशीन योजने च्या अटी खालील प्रमाणे

 • योजनेसाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे कोणत्याही पुरुषाला शिलाई मशीनचा लाभ मिळणार नाही.
 • अर्जदार महिलेला आधीपासूनच शिलाई मशीनचे प्रशिक्षण असेल तर अशा अर्जदारांना प्रधान्य देण्यात येईल.
 • अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 यामधील असावे.
 • अर्जदाराचे वय 40 पेक्षा जास्त आणि 20 पेक्षा कमी असेल तर अशा अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • अर्जदार महिला महाराष्ट्र मधील रहिवासी असावी .
 • महाराष्ट्र बाहेरील ये महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • अर्जदार महिलाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या वरती नसावे.
 • अर्जदार महिलाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या वरती असेल तर ती अर्जदार अपात्र ठरेल
 • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या कमी आणि बेरोजगार असणे गरजेचे आहे.
 • महिला अपंग असल्यास त्याच्यासोबत त्यांच्या कागदपत्रांसोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये नसावी.
 • अर्जदार महिला कोणत्याही प्रकारचे सरकारी वेतन घेत असणारी नसावी.
  महिला अर्जदार जर विधवा असेल तर तिच्या कागदपत्रांसोबत तिच्या पतीचे मृत्यूपञ  जोडणे आवश्यक असेल.
 • कुटुंबातील फक्त एकाच महिलेला शिलाई मशीन चा लाभ होईल.
 • अर्जदार महिलेने कोणत्याही प्रकारची खोटी माहिती दिली असेल तर त्या महिला अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.Silai machine yojana 2024

silai machine yojana 2024

Silai machine yojana 2024 /शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे

पासपोर्ट आकाराचा फोटो

आधार कार्ड

रेशन कार्ड

विजेचे बिल

मोबाईल नंबर

बँक खात्याची माहिती

अर्जदार महिला विधवा असल्यास तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र

अर्जदार महिला अपंग असल्यास त्याचे अपंग प्रमाणपत्र

कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

अर्जदार महिलांचे ई-मेल आयडी

Silai machine yojana 2024शिलाई मशीन योजनेची ऑनलाईन पद्धत –

सरकारच्या अधिकृत लिंक वर क्लिक करा. आणि जे आवश्यक ते माहिती आहे ती फॉर्म वरती भरून तुमचा फॉर्म भरा. आवश्यक्य माहिती असलेली कागदपत्रे  स्कॅन करून जमा करा.अशाप्रकारे तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. सरकारकडून सर्व कागदपत्रांची खातर जमा करून तुम्हाला शिलाई मशीन मिळेल शिलाई

Silai machine yojana 2024मशीन योजनेची ऑफलाइन पद्धत

तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद तसेच नगरपालिका यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता तिथे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती भरून तुम्ही हा अर्ज पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर सरकारकडून सर्व कागदपत्रांची खातरजमा करून तुम्हाला शिलाई मशीन देण्यात येईल.

धन्यवाद

येथे वाचा –मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

नवनविन निबंध येथे वाचा

महाराष्ट्र माझा मराठी निबंध

श्यामची आई मराठी निबंध

राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

संत विचार काळाची गरज मराठी निबंध

आई पाहिजे तर लेक वाचवा मराठी निबंध

माझी सहल मराठी निबंध

शिलाई मशीन योजनेची official link –https://services.india.gov.in/service/detail/apply-for-sewing-machine-scheme-registered-women-workers-of-hbocww-board-haryana-1