Flash Sale! to get a free eCookbook with our top 25 recipes.

rashtriya ekatmata nibandh in Marathi / राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

Rashtriya ekatmata nibandh in Marathi

Rashtriya ekatmata nibandh in Marathi -श्रोतेहो नमस्कार, मी. विचार मंचावर विषय मांडते.स्वातंत्र्याची ७० वर्ष आणि राष्ट्रीय एकात्मता.आपल्या भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजवला जातो. भारताच्या मातीमध्ये अनेक थोर स्वातंत्र्यसैनिक ते थोर समाज सुधारक यांच्या रक्ताने आपल्याला स्वतंत्र मिळालेले आहे.

असा गौरव केला जातो तो काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासुन कलकत्ता पर्यंत पसरलेल्या या देशामध्ये राम ,कृष्ण, हनुमान यासारख्या देवदेवताचा स्पर्श झाला. ज्या मध्ये भगतसिंग ,राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस सावरकर यांच्या रक्ताने जी भुमी पावन झाली त्या भूमीचा, लोकमान्यांची सिंहगर्जना, महात्मा गांधी ,गौतम बुद्ध यांच्या सत्य अहिंसा , शांतीचा संदेश देशाच्या दऱ्याखोऱ्यात घुमतो आहे ,ज्या देशामध्ये मदर तेरेसा, बाबा आमटे , महात्मा फुले, छञपती शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे समाजसुधारक होऊन गेले त्या देशाचा शांती, हिरवळ आणि बलिदान यांचा संगम त्या देशाच्या रोमारोमात दिसून येतो.त्या भारत देशाचा

रसिक श्रोतेहो, या गौरवशाली देशाचा इतिहास छञपती शिवाजी महाराजांच्यातलवारीने, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने आणिजिजाऊंच्या संस्कारामुळे घड‌लेला आहे.जवळजवळ १५० वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतःअसणारा देश त्याहीपूर्वी मुघलांच्या आक्रमणालाबळी पडलेला हा देश. याच भारत देशानेफिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून आकाशात संकल्प ,संस्कृती आणि संस्कार यांच्या जोरावर प्रगती केली आहे.Rashtriya ekatmata nibandh in marathi

rashtriya ekatmata nibandh in Marathi

सानेगुरुजी यांचे
आपला भारत बलसागर हो आणि संपूर्ण जगामध्ये शोभून दिसावा.
हे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे. आज आपला देश स्वबळावर उभा आहे. इंजिन, रणगाडे, पाणबुड्या, जहाजे  एवढेच नव्हे तर अणुबॉम्ब सुधा निर्माण करत आहे. राकेश शर्मा, कल्पना चावला सुनिता विल्यम्, यांनी अंतराळामध्ये सुद्धा भारताचं नाव केलं आहे, क्रिडाक्षेत्रात सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, तेजस्विनी सावंत् या क्रिडापटूनी देशाचं नाव अजरामर केले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज  तर सारया जगात गुंजत आहे. आज आपण शाळेत दररोज प्रतिज्ञा म्हणतो आम्ही सारे भारतीय आहोत. पण आज प्रत्यक्षात चित्र काय दिसते अलिकडे आपल्याला इतिहासाचा विसर पडला

rashtriya ekatmata nibandh in Marathi

आहे दिसते. आम्ही सारे भारतीय आहोत या भावनेतूनच आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो आणि ते शक्य झाले राष्ट्रीय एकात्मतेतूनच स्वातंत्र्यापूर्वी जेंव्हा जेंव्हा आपल्या देशावर परकीय आक्रमणे झाली तेंव्हा तेंव्हा आम्ही सारे भारतीय एकजुटीने शत्रूवर तुटून पडलो. परकीय आक्रमणे सामाजिक आपत्ती वा नैसर्गिक संकट आपण एकजुटीने त्यावर तुटून मात केली. परवाच देवभूमी केरळ मध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती आपण पाहिली पावसाने थैमान घातले, हजारो बेघर झाले. देशभरातून त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे आले ते राष्ट्रीय एकात्मतेतूनच जात धर्म, पंथ, भाषा, प्रांत हे सर्व  बाजूला सारून आपण सर्व भारतीय( rashtriya ekatmata nibandh in marathi)

आहोत असे मानून गुण्यागोविंदाने एकत्र राहतात 2020 पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती, डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांनी पाहिले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्यात एकता व राष्ट्रीय एकात्मता हवी ज्या युवकांना हाताशी धरून भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न यांनी पाहिले त्या तरुणांचा वापर आज आंदोलने मोर्चे, दंगली, मारामारी यामध्ये केला जातो.

कुठं गेली राष्ट्रीय  एकात्मता. आज देशात जातीच्या नावावर दंगल
जाती वंश, धर्मप्रांत यांच्या नावावर रक्ता मासाचा व्यापार येथे घडतो, दहशतवाद हे तर देशास‌मोरील एक आव्हाने आहे. या दहशतवादानंतर  दिल्ली, मुंबई, काश्मिर या शहरांचे सुखाचं हिरावून घेतले आहे. मग मला सांगा टिळकांनी, गांधीजीनी जी राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली ती गेली कुठे ?(Rashtriya ekatmata nibandh in Marathi)

आज आपण विसरलोय का ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग राजगुरु सुखदेव तरुणांनी प्राणांचे बलिदान बलिदान दिले, राष्ट्रासाठी एकत्र आले
राष्ट्रीय एकात्मता खरं तर  काळाची गरज आहे
साऱ्या जगाहून ही सुंदर आणि वेगळा असा माझा हिंदुस्थान आहे.
हे गीत कवी इकबाल यांनी स्वातंत्र्यपूर्व  काळात लिहीले होते. तेंव्हाच अखंड भारतात ऐकी , शांती सतत नांदत होती. पण आपल्या या स्वतंत्र भारताला कुणाची दृष्ट लागली आणि अधूनमधून अशांती दुवेष, मत्सर निर्माण होऊ लागले. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला यावर खरचं विचार करण्याची गरज भासू लागली आहे. झालेल्या जखमांनी, त्याला समाजाची त्यावेळी आठवण होते.जाती व्यवस्था ही समाजात झालेली किड आहे व संपूर्ण कीड नष्ट होत नाही. तोपर्यंत इथे एकात्मता नांदणार नाही. Rashtriya ekatmata nibandh in marathi

rashtriya ekatmata nibandh in Marathi

राष्ट्र ही माता आहे. या भूमीत : मी जन्म घेतला आहे. या भूमीचं ऋण मी कसे  फेडू शकतो हीच गीतेतील भक्ती असु शकते. ग्रंथसाहेब मधील पवित्रता असू शकते. हीच महावीरांची खरी अहिंसा ठरु शकते. या जगात जगताना प्रत्येक धर्मियाने आपल्या धर्माचे आचरण करायलाच पाहिजे. कारण प्रत्येक धर्माचं तत्व एकच सांगत “मानवतेशिवाय कोणताही धर्म मोठा असू शकत नाही” हेच आपल्याला राष्ट्रीय एकात्मता जपून दाखवून दयावे लागेल. “एकीचे बळ तोच उत्तम फळ “: असे अनेक संतांनी सांगितले आहे. फुटीर वृत्तीमुळे आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागते राष्ट्रीय ऐक्य जर अबाधित असेल तर आपल्यां देशाकडे कोणीही वाकडी नजर करू शकणार  नाही. निसर्गही हेच शिकवतो. पशुपक्षी प्राणी जीवनातसुद्धा हेच शिकायला rashtriya ekatmata nibandh in Marathi

मिळते.   आज स्वातंत्र्याची ७० वर्षे साजरी करत असताना राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीत अनेक प्रश्न उभे आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातील आम्ही नागरिक धर्माच्या नावाखाली आपल्याच देशबांधवांच्या जीवावर उठलो आहोत आज याच देशबांधवांच्या जीवावरतात हिंसेने थैमान मो मांडले आहे. अनेक भाषा हे भारताचे आगळेवेगळे वैशिष्ट्य व त्याआधारे भाषावार प्रांत रचना पण आज
संकुचित विचारसरणीत अडकलेले आम्ही. राज्या-राज्यातील सीमावादावरून एकमेकांचे वैरी झालो. याचं ज्वलंत उदा. म्हणजे महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न होय. हे भयानक चित्र पाहिले तर मित्रांनों असा प्रश्न की आपल्या भारताची पुन्हा फाळणी तर होणार नाही ना ? तेव्हा मला एकच वाटते की “राष्ट्र म्हणजे मी व मी म्हणजे राष्ट्र” अशी एकात्मतेची भावना आपल्यात असली पाहिजे

मिळत आहे.Rashtriya ekatmata nibandh in marathi

rashtriya ekatmata nibandh in Marathi

राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या भारतातील सर्व लोकांनी आपली जात धर्म बाजूला ठेवून आपण या भारत मातेचे सर्वजण सुपुत्र आहोत अशी भावना मनात ठेवून एकमेकांसोबत राहू लागले तर कोणतेही राष्ट्रीय गोष्टींना त्रास होईल अशा गोष्टी घडवून येणार नाहीत.जातिवाद, एकमेकांच्या वरती होणारे विघातक हल्ले त्यांना आळा बसेल. एखादे लहान मुलांला जन्मापासूनच जातपात न शिकवतात आपण सर्वजण एक आहोत आणि एका देशाच्या ही भावना जर त्यांच्या मनामध्ये रुजवली तर खूप मोठा असा चांगला परिणाम आपल्या देशामध्ये दिसून येईल आणि खऱ्या अर्थाने हीच खरी राष्ट्रीय एकात्मता असे आपण समजू.( Rashtriya ekatmata nibandh in marathi)

राष्ट्रीय एकात्मता बिघडवणाऱ्या भ्रष्ट, गुंड आणि झुंडशाहीला आळा घातला पाहिजे आज पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव देणारे प्रभावी सामूहिक नेतृत्व उदयाला येणे जरुरीचे आहे. प्रत्येक भारतीयात राष्ट्रीयत्वाची भावना प्रज्वलित झाली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचे चे प्रेम प्रत्येक भारतीयाला असले तरच आमच्यातील हुशार तरुण परदेशात कायम स्वरुपी वास्तव करणार नाहीत. आमच्या देशातील गुपिते परदेशात विकली जाणार नाहीत. देशाला ग्रासणारा भ्रष्टाचाराचा भस्मासुर नष्ट होईल. चोरट्या मागनि आणलेल्या परकीय मालाची खरेदी करून स्वतःच्या देशाला बुडवले जाणार नाही. ‘राष्ट्र म्हणजे मी व मी म्हणजे राष्ट्र’ ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येक भारतीय लोकांच्या मनात तयार होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात, राष्ट्रीय एकात्मता ही आजची खरी आजची गरज आहे.

म्हणून शेवटी मी एवढेच म्हणेन,

आता ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि नव्या भारतासाठी कोणती नवे स्वप्ने पाहता येईल हे आपण लक्ष दिले पाहिजे.

जय हिंद, जय भारत,

(rashtriya ekatmata nibandh in Marathi

असेच नव नवीन निबंध वाचा

आई पाहिजे ? तर मग लेक वाचवा https://knowledge.org.in/wp-admin/post.php?post=419&action=edit

https://youtu.be/w_PbRP7Wgcw?si=6MlOW5TQ0Ni4MwGB