Maharashtra maza marathi nibandh : महाराष्ट्र माझा

Maharashtra maza marathi nibandh

Maharashtra maza marathi nibandh :महाराष्ट्र माझा या सुंदर अश्या विषयांवरील निबंधा विषयी आज आपण लेखनातून पाहणार आहोत.

बहु असोत सुंदर संपन्न की महान
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश  हा |

Maharashtra maza marathi nibandh

Maharashtra maza marathi nibandh
Maharashtra maza marathi nibandh

१ मे १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान च. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहुर्त मेढ रोवली आणि महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती देवून नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.

काळ्या पत्थरावर विसावलेला, काळ्या मातीवर उभा असलेला, सहयाद्रीच्या कपारीमध्ये विसावलेला, कृष्णा कोयनेच्या काठावर हिरवा शालू नेसलेला, गड दुर्गानी भरभरून संपन्न असा आपला महाराष्ट्र पाहिला की अगदी सहज ओठावर शब्दफुले उमटतात. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

राजमाता जिजाऊ आणि इथेच जिजाऊंनी घडविला छत्रपती शिवाजी, . छञपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, चातुर्याचे पोवाडे युगानुयुगे अवीरतपणे महाराष्ट्र तर गातच राहील पन भारताच्या इतिहासातही  छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला तोड नाही.

उदयभानूशी सिंहासारखा लढणारा तानाजी, स्वतःच्या पराक्रमाने पावनखिंड पावन करणारा बाजीप्रभू, अफाट शत्रूसैन्याला सळो की पळो करून सोडणारे संताजी धनाजी याच भुमिचे पराक्रमी पुत्र आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रज्ञांशी लढा देणारा आदय‌क्रांतीकारक वासुदेव बळवंत  फडके माझ्याच महाराष्ट्रातला.

वासुदेव बळवंत फडकेंच्या रूपाने महाराष्ट्रात प्रतिशिवाजीच उद‌यास आले होते, म्हणून तर त्यांच्या बंदोबस्तासाठी राणीने इंग्लंडहून खास प्रशिक्षित पथक धाडले होते.

राज्यकर्ते इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी सतत चाळीस वर्षे झुंज देणारे हिंद केसरी लोकमान्य टिळक खुद्द इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रज अधिकाऱ्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरण्याची हिंम्मत करतात,ते याच महाराष्ट्रातले.  पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ऐकल्यावर पन्नास वर्षे तुमचे सरकार इथे टिकणार नाही असे इंग्रजांना  ठणकावून सांगणारे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर माझ्याच महाराष्ट्रातले .

याच महाराष्ट्रात  निर्माण झाली समर्थांची  श्लोकवाणी, याच महाराष्ट्राने दिली आम्हाला संत एकनाथांची भूतढ्या गाडगेबाबांची मानवपुजा, अण्णा हजारेसारख्या महामानवाची छाया, बाबा आमटेंची करुणा आणि सिंधुताईची माया. आशा भोसले, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, तेजस्विनी सावंत यांनी माझ्या महाराष्ट्राची कीर्ती त्रिखंडात दुमदुमत ठेवली. ‌

गर्द हिरव्यादुलईत स्वतःला लपेटून रूप धारण केलेल्या कोकणभूमीच्या प्रेमात पडून आपण हरवून जातो. “कोकण खुप सुंदर आसा, कोणाक सांगून बी खरा वाटुचा नौय, एकदा तरी कोकणाक येवाच” अशी साद घालणारे कोकण महाराष्ट्रातीलच वेड लावणारा हापूस आंबा कोकणातलाच. येथील निसर्ग वैविध्यपूर्ण इथला कोकण समुद्रकिनारे सागरी किल्ले, वन्यजीवसृष्टी- देखील विविधतेने नटलेली आहे. हाच कणखर आणि राकट महाराष्ट्र कला‌कारांचा देश आहे इथली लावणी, पोवाडे, कोळीगीते झाडे सवाँनाभूरळ घालतात वेरुळ अजिंठा येथील शिल्पकृतानीसाऱ्या जगात महाराष्ट्राचे नाव अजरामर केले आहे. आधी कळस मग पाया असे वेरुळचे कैलास लेणी, म्हणुन ते साक्षात कैलास मंदिर, मुंबई म्हणजे ‘मिनी भारतच, आपली मुंबई ही महाराष्ट्राची हृदयसम्राज्ञी आहे. हिच्याशी साऱ्या जगाच्या व्यापारी नाड्या जोडल्या आहेत.

मुंबईचा वडापाव, कोल्हापूरचा तांबडा- पांढरा रस्सा नी सातारचे कंदीपेढे , पुणेरी मिसळ, पुरणपोळी ही महाराष्ट्राची खासियत.जेंव्हा जेंव्हा आपल्या देशावर संकट आले तेंव्हा – तेंव्हा महाराष्ट्र जनतेच्या रक्षणासाठी उभा राहिला. आजही महाराष्ट्रा तील अनेक जवान भारतमातेचे आणि पर्यायाने कोट्यावधींच्या संख्येने असलेल्या भारतीयांचे सीमारेषेवर रक्षण करत आहेत. म्हणून शौर्य आणि पराक्र‌माची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येचा विचार केला तर दुसरे मोठे राज्य आहे. कृष्णा, कोयना, गोदावरी यासारख्या अनेक नदया महाराष्ट्रात आहेत. पश्चिमेला सह्याद्री पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत. इथल्या माणसांची मने या सहयाद्रीसारखीच भक्कम आहेत. इथले लोक कष्टाळू आहेत. त्यांनी महाराष्ट्राला समृध्द केले आहे.

महाराष्ट्रा मध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.या मध्ये संक्रांत, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी नारळी पौर्णिमा अश्या अनेक सणांचा समावेश होतो.गणपती हा सण तर संपूर्ण महाराष्ट्रात खुप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावा गावाला सुद्धा एक वेगळीच निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे.ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी विविधता आढळते. माझ्या महाराष्ट्र मध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात खाण्या पिण्याच्या पद्धती मध्ये विविधता आढळते मग तो मुंबईचा वडापाव असो कि कोकणातील मासे प्रत्येकाची चवच न्यारी.

महाराष्ट्रा मध्ये संस्कृती मध्ये पण विविधता आढळते. मग ते घर बांधण्याची पध्दत सुद्धा वेगळी आहे. आपल्या आजुबाजुला जसे वातावरण आहे त्या प्रमाणे घरे बांधली जातात. महाराष्ट्राची माणसे माणुसकीला सुद्धा मागे हटत नाहीत. मग या मध्ये ” जगात भारी आम्ही कोल्हापुरी” हा डंका तर जग भर मिरवला जातो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे अन्न धान्य पिकवले‌ जाते ते साय्रा जगामध्ये पाठवले जाते.

“‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । ही उक्ती अगदी सार्थ ठरते कारण आपली राजभाषा मराठी आहे. महाराष्ट्राचे मोठे वैभव म्हणजे मराठी बाणा’ जगाच्या पाठीवर मराठी माणूस कोठेही असला तरी तो आपला मराठी बाणा सोडत नाही. ‘ मोडेन  पण वाकणार नाही’ ही त्याची वृत्ती असल्याने त्याची सदैव घोडदौड असते ती विजयाकडेच आज सर्व च क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली

माझ्या महाराष्ट्राला श्रीमंत असा सांस्कृतिक ठेवा भेटलेला आहे, महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण जगामध्ये गौरवशाली आहे. आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मराठी साम्राज्य कसे स्थापन केले याची पोवाडे तर पूर्ण जगामध्ये गायले जातात.
  आपल्या महाराष्ट्राने अनेक थोर व्यक्तिमत्व दिलेले आहेत. त्यामध्ये  साहित्यिक पु ल देशपांडे, प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांची तर तुलनाच नाही. या थोर व्यक्तिमत्वाने आपल्याला साहित्याचा एक सुंदर असा वसा दिलेला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राने जगाला  संस्कृती निसर्ग आणि इतिहास हे सगळे दिलेले आहे.

तसेच महाराष्ट्रातील लावणी  ही तर जगप्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्राने तर जगाला सचिन तेंडुलकर दिलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई या शहरांमध्ये कित्येक लोकांना एका प्रगत स्थानावरती नेऊन ठेवलेले आहे. असा हा माझा महाराष्ट्र जगात भारी आहे.

पण बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्राची गर्जना थोडी अस्पष्ट होऊ लागली आहे. अनेक समस्या आज महाराष्ट्रापुढे उभ्या आहेत. महाराष्ट्राच्या वैभवाला कलंक लागणार नाही म्हणून आपण जपले पाहीजे ही माती पवित्र कशी राहील इथला सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा कसा जपला जाईल यासाठी सर्वांनी दक्ष राहिले पाहीजे. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात प्रत्येक मनाने प्रेरणा घ्यावी. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीची गंगा वाढत रहावी आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ ही गर्जना आसमंतात घुमत रहावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते. महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र याची जेवढी कीर्ती सांगू तेवढी थोडीच. असा हा सप्तरंगी महाराष्ट्र आहे आणि मी या माझा स्वाभीमानी महाराष्ट्राची लेक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे

सहयाद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा।।

महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे – Maharashtra maza marathi nibandh

  1. औरंगाबाद
  2. जालना
  3. नांदेड
  4. परभणी
  5. हिंगोली
  6. लातूर
  7. उस्मानाबाद
  8. बीड
  9. नागपूर
  10. भंडारा
  11. गडचिरोली
  12. गोंदिया
  13. चंद्रपूर
  14. वर्धा
  15. अमरावती
  16. विदर्भ
  17. बुलढाणा
  18. अकोला
  19. यवतमाळ
  20. वाशिम
  21. पुणे
  22. सातारा
  23. सांगली
  24. सोलापूर
  25. कोल्हापूर
  26. मुंबई शहर
  27. मुंबई उपनगर
  28. ठाणे
  29. रायगड
  30. रत्नागिरी
  31. सिंधुदुर्ग
  32. नाशिक
  33. जळगाव
  34. अहमदनगर
  35. धुळे
  36. नंदुरबार
  • महाराष्ट्र राज्याची राजभाषा = Maharashtra maza marathi nibandh
  • मराठी
  • महाराष्ट्राचा राज्य प्राणी =
  • शेकरु
  • महाराष्ट्राचा राज्याचा राज्यपक्षी =
  • हरियाल
  • महाराष्ट्र राज्याची राजधानी =
  • मुंबई
  • महाराष्ट्राची उपराजधानी =
  • नागपुर
  • महाराष्ट्रातील उंच शिखर =
  • कळसुबाई
  • महाराष्ट्राचे क्षेञफळ=
  • ३,०७,७१३ चौ. किमी

महाराष्ट्र माझा हे राज्यगीत ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक निबंध लेखनासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराज असते तर मराठी निबंध