mukhyamantri mazi ladki bahin yojana /

Mukhyamantri Mazi ladki bahin Yojana या योजनेची घोषणा महाराष्ट्र च्या अर्थसंकल्पा मध्ये करण्यात आली. माननीय मंत्री अजित दादा पवार यांनी ही घोषणा केली असून ही योजना खुपच वेधनिय ठरली. आणि राज्य भरातिल महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या राज्यातील महिलांचे आर्थिक सामाजिक शारीरिक सबलीकरण तसेच त्यांना सामाजिक आणि त्यांना आर्थिक दृष्टीने प्रबळ करण्यासाठी ही योजना स्त्रियांसाठी खुप फायदेशीर ठरेल तर मुख्यमंत्री  माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे तर याचा फायदा राज्यातील महिलांना होणार आहे.   मध्यप्रदेश सरकारच्या “लाडली बहणा” या योजनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने ही योजना आखली आहे. निश्चितच या योजनेचा लाभ भरपूर महिलांना मिळणार आहे.त्या साठी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आली आहे. ( Mukhyamantri mazi ladki bahin Yojana)

तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना १ जुलै पासून रुजू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील ज्या महिला वय वर्ष २१ ते ६०  या गटात असतील त्यांना दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम देण्यात येईल. या मधे विवाहित महिला तसेच घटस्फोटित, विधवा आणि निराधार महिलांचा समावेश आहे.. मुख्यमंत्री लाडकी बहिन योजने साठी सरकार दरवर्षी ४६००० कोटी रुपयांचा निधी सादर करणार आहे. आणि याची अंमबजावणी १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.

अर्ज करून झाल्यानंतर  फक्त पात्र महिलांनांच या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेच्या पहिल्या दिवसा पासूनच महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी पात्रता वार्षिक उत्पन्न २५०००० पेक्षा कमी असावे महिला महाराष्ट्र ची रहिवाशी असणे आवश्यक आहे . तर आता आपण या योजनेसाठी लागणारी पात्रता , अपात्रता तसेच लागणारी कागदपत्रे आपण पाहूया.Mukhyamantri mazi ladki bahin Yojana

mukhyamantri mazi ladki bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लागणारी पात्रता मधे केलेले बदल

सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत काही बदल करण्यात आली असून आता ती  मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर महीना रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले

होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे

१. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३.  योजनेतून ५ एकर शेतीची अट काढण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट रद्द  करून२१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे. ( मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना )

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील राहणाऱ्या  पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र स्वीकारण्यात येईल.

६)वार्षिक उत्पन्न २५०००० पेक्षा कमी असावे

७)योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करत्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

८)अन्य विभगा मधे ज्या आर्थिक योजना आखल्या आहेत त्या मध्ये १ हजार ५०० पेक्षा ज्यास्त लाभ घेतला नाही पाहिजे

( mukhyamantri mazi ladki bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लागणारी अपात्रता

  • कुटुंबातील सदस्यांचे २.५० लाख पेक्षा जास्त उत्पन्न
  • घरात कोणी आयकरदाता असेल
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
  • घरातील सदस्य कडे ४ चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून)
  • वय ६० पेक्षा ज्यास्त असेल तर
  • ज्या घरातील सदस्य माझी आमदार खासदार असतील
  • महिला स्वतः सरकारी नोकरी मधे नसावी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लागणारे कागदपत्रे

उत्पन्न दाखला

१) तलाठीकडील उत्पन्नाचा दाखला

२) रेशनकार्ड झेरॉक्स

३) शेती असलेला ८ अव ७/१२ उतारे

४) नोकरी असलेस १६ नंबर फॉर्म

५) पेन्शन असलेस पेन्शन बुक झेरॉक्स

६) अर्जदाराचे आधार कार्ड व कलर फोटो

डोमीसाईल/नॅशनॅलिटी

१) शाळेचा किंवा जन्माचा दाखला

२) रेशनकार्ड झेरॉक्स

३) सन २००४-०५ चा घराचा उतारा तसेच

४) चालू वर्षीचा घराचा उतारा

५) अर्जदाराचे आधार कार्ड व कलर फोटो.

६) विवाह नोंद दाखला किंवा गॅजेट

५) पेन्शन असलेस पेन्शन बुक झेरॉक्स

६) अर्जदाराचे आधार कार्ड व कलर फोटोMukhyamantri mazi ladki bahin Yojana

mukhyamantri mazi ladki bahin Yojana

अर्ज करण्याची पद्धत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी तूम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या मधे योजनेचे अर्ज पोर्टल /मोबाईल ॲप  किंवा सेतू  सुविधा केंद्रात जाऊन तूम्ही  ऑनलाईन अर्ज भरू शकता.आणि ज्यांना अर्ज भरता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात भेट देऊ शकतात .अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै दिली होती .पण महाराष्ट्र तील महिलांच्या आग्रहास्तव हि मुदत २ महिन्यांनी वाढवली आहे.

जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरत असाल, तर तो फॉर्म भरताना स्वतः हजर राहणे गरजेचे आहे. कारण त्यावेळी संबंधित महिलाचे फोटो काढण्यात येतील तसेच त्यांची केवायसी म्हणजेच माहिती पडताळणी करण्यात येईल. त्यावेळी त्यांच्याकडे सरकारने नेमून दिलेल्या नियमावलीनुसार आवश्यक्य असेल कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

अर्ज केलेले फॉर्म ची पडतळणी अंगणवाडी सेविका, मुख्यादापिका, ग्रामसेवक, प्रकल्प अधिकारी करतील

आणि जे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांची अंतिम यादी जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केली जाईल. तसेच जिल्हाधिकऱ्यांमार्फत जी यादी जाहीर केली जाईल आणि त्यांना त्यांच्या दिलेद्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल. जर सरकारने या नियमावलीमध्ये परत काही बदल केले असतील तर ते सरकारच्या वेबसाईट वरती अपडेट करून महाराष्ट्र जनतेला कळवण्यात येईल.

  • मुख्यमंत्री लाडके बहिण योजना उद्दिष्टे mukhyamantri mazi ladki bahin Yojana
  • या योजनेमुळे ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना आर्थिक हातभर लावण्यास मदत होईल.
  • या योजनेचा पैसा मधून त्यांना त्यांचा छोटासा उद्योग सुरू करण्यास मदत होईल.
  • ज्या महिला अपंग आहेत किंवा ज्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे.
  • आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांना आर्थिक बळ देणे.
  • महिलांना स्वावलंबी बनवणे.
  • ज्या महिला वय वर्ष वीस ते वय वर्ष 65 असे आहे त्यांना आर्थिक रोजगार देणे.
  • ज्या सदस्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी असेल त्यांना दरमहा सरकारने नेमून दिलेली ठराविक रक्कम देणे.
  • महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे
  • महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे.
  • स्त्रियांचे निर्णय भूमिका मजबूत करणे.
  • महिलांना दरमहा आर्थिक मदत करणे.

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे फायदे ( mukhyamantri mazi ladki bahin Yojana)

या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य भेटण्यास मदत होईल.

या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधून ते त्यांच्या स्वखर्च चालू शकतात.

सरकारने दिलेल्या दरमहा पैशांमधून ते छोटा मोठा उद्योग सुरू करू शकतात.

महिलांची सबलीकरण होण्यास या योजनेमुळे शक्य होईल.

पात्र महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.

सरकार कडून मिळणाऱ्या पैशामुळे त्यांच्या कौशल्यांना वाव मिळेल. तसेच त्याचा वापर करून त्या अजून पैसे मिळवू शकतील.

या योजनेचा फायदा फक्त स्त्रियांनाच होणार नसून त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी या योजनेचा खूप फायदा होईल.

या योजनेमुळे महिलांचे आर्थिक पुनर्वसन तर होईलच पण त्याच सोबत सामाजिक पुनर्वसन सुद्धा होईल.

(mukhyamantri mazi ladki bahin Yojana)

धन्यवाद

नवनविन निबंधासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्र माझा मराठी निबधलेखन

आई पाहिजे ? तर लेक वाचवा मराठी निबधलेखन

संत विचार काळाची गरज