डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम निबंध | Abdul Kalam Marathi nibandh

Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh: आजच्या या लेखनात भारताचे राष्ट्रपति व ‘मिसाईल मॅन’ या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तथा लहान मुलांचे आवडते व्यक्तीमत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान असणारे व्यक्तिमत्त्व यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत.पाकीर जैनुलाब दिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्‌धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती झाले. तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे मध्यमवर्गिय जैनुलाबदिन कलाम या अशिक्षित पित्याच्या व सहनशिल माता आशियम्मा यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १९३० रोजी डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामेश्वरमूला येणाऱ्या व्यत्तिकरूंना होडीतून धनुष्कोडीला ने-आण करण्याचा व्यवसाय करत होते.

Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh
Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh

डॉ कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम् येथे पूर्ण झाले. लहान वयात वडीलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्ते विकून तसेच अन्य लहान-मोठी कामे करून पैसे कमावत व घरी मदत करत त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.रामेश्वरम् च्या किनाऱ्यावर वाळूत खेळणारी चार मुलांचा संघ, त्यात चार पैकी तीन उच्चकुलीन सनातनी ब्राम्हण कुटुंबातील आधि चौथा मुसलमान समाजातील मुलगा अब्दुल कलाम या चौघांच्या मैत्रीत धर्म, रितीरिवाज कधीच आडवे आले नाहीत. ते चौघे वाळूत खोपा, किल्ले बनवण्यात दंग झालेले इतक्यात एकमुलगा धावत येऊन आपल्या पायाने सगळं उध्वस्त करुन निघून जातो, याविळी चौघेही दुखावतात. पण कलाम म्हणतात ” मित्रानों आपण अशी वस्तू बनवायची, घडवायची की ती कुणालाही बिघडवता येऊ नये. इतकी सुंदर असली पाहीजे की तिला पाहून कुणाच्या मनात बिघडवन्याचा विचार ही येऊ नये.

निळ्या समुद्राबरोबरच त्यांना निळ्या आकाशाकडे तासन्‌तास पाहण्यात मौज वाटे किनाऱ्यावर भराऱ्या घेणारे सिंगल पक्षी पाहीले की आपल्यालाही या पक्षांप्रमाणे आकाशात भरारी मारता येईल का ? विमानात बसून कापसाच्या गाठीसारख्या ढगापलीकउचा चंद्र आपल्याला पाहता येईल का ? असे प्रश्न त्यांना पडायचे. पक्ष्यांप्रमाणे आपल्याला अवकाशात झेपावता येईल का ? असे स्वप्न उराशी बाळगून त्यांचे शिक्षण सुरु झाले.शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड होती. तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी एस्सी  झाल्यानंतर त्यांनी मुद्रास ऑफ टेक्‌नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला, प्रवेशासाठी लागणारे पैसेही नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन डॉ. कलामांना पैसे दिले. या संस्थेतून त्यांनी एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. (Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh )

पुढे अमेरिकेतील नासा या संस्थेत एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळात चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या dr. कलाम याना अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्म‌सात केले त्यानंतर त्यांचा १९५८ ते १० या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी अर्थात DRDO शी संबंध आला.

Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh


Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh
Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh

अब्दुल कलाम हे विक्रम साराभाईना आपल्या गुरुस्थानी मानत. कलामांची जडणघड‌ण करण्यात विक्रम साराभाईंचा फार मोठा वाटा आहे. देशातील अवकाश संशोधनाची जबाबदारी इस्रो या अवकाश संशोधन संस्थेवर सोपवली होती. डॉ. साराभाई प्रमुख होते.  SLV हा  भारतीय बनावटीचा उपग्रह बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ण जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर सोपवली. SLV-3 प्रकल्पाच्या वेळी एक घटना घडली त्यावरून सहकाऱ्यांना मदत करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. SLV-3 प्रकल्पाच्या चाचणीवेळी अचानक स्फोट झाला. नायट्रीक अॅसिडची टाकी फुटून अब्दुल कलामांचे सहकारी जखमी झाले. कलामांनी लगेच त्यांना त्रिवेंद्रमच्या हॉस्पीटल‌मध्ये नेले व तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु केले. रात्रभर ते त्यांच्याजवळ बसून होते. अथक परिश्रमानंतर SLV-3  चे  यशस्वी प्रक्षेपण करून विज्ञान क्षेत्रात इतिहास घडवला, त्याचीच पोहोच म्हणून १९८१ साली त्यांना पद्‌मभूषण व पद्‌मविभूषण या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.

पुढे ए.पी. जे अब्दुल कलाम यांनी संरक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. आपल्या देशात् स्वदेशी बनावटीचे रॉकेट बनवावे असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी पृथ्वी, त्रिशूल, अग्नी, आकाश,, नाग या प्रकल्पांना सुरुवात केली. हे कार्य चालू असताना भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना राजस्थानातील पोखरण येथील अणुस्फोट चाचणीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली, तशी ती त्यांनी पुढे यशस्वी पण करून दाखवली. याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २५ नोव्हेंबर‌१९९८ ला ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. (Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh )

डॉ ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून देशभर साजरा केला जातो. आपले माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १ ऑक्टोबरला ‘वचन प्रेरणा दिवस’ साजरा केला जातो. आपल्या कार्यकाळाच्या शेवटी राष्ट्रपती पद सोडल्यानंतर डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या त्यांच्या जुन्या आवडीकडे वळले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे देशासाठी अगणित योगदान आहे परंतु ते त्यांच्या सर्वात मोठ्या योगदानासाठी प्रसिद्ध होते ते म्हणजे अग्नी आणि पृथ्वी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा विकास.

Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh


Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh
Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh

मिसाईल मॅन म्हणून त्यांची कामगिरी कौतुकास्पद होती. 2020 पर्यंत भारत महासत्ता व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. जुलै 2002 ला ते भारताचे १३ व्या वे राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले. अग्निपंख है त्यांचे आत्मचरित्र, इंडिया 2020,
इग्नायटेड माइंड्स इ. पुस्तके त्यांनी लिहीले . त्यांना वीणा वाजवण्याचा व मुलांशी गप्पा मारण्याचा त्यांना छंद होता. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देतील.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार |Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh

  • 1981 भारत शासनाद्वारे पद्म भूषण पुरस्कार मिळाला.
  • 1990 भारत शासनाद्वारे पद्म विभूषण पुरस्कार मिळाला.
  • 1997 भारत शासनाद्वारे भारतरत्न पुरस्कार मिळाला.
  • 1997 राष्ट्रीय एकतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला.
  • 1998 वीर सावरकर पुरस्कार.
  • 2000 मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर ने रामानुजम पुरस्कार दिला.
  • 2007 ब्रिटिश रॉयल सोसायटी युके द्वारे किंग चार्ल्स द्वितीय पदकाचा सन्मान.
  • 2007 वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ युके कडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
  • 2008 नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर कडून डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी मिळाली.
  • 2009 अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स द्वारे हूवर पदक मिळाले.
  • 2009 अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कडून आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार.
  • 2010 वॉटरलू विद्यापीठ कडून डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग ही पदवी मिळाली.
  • 2011 न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे सभासदत्व.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके |Dr APJ Abdul Kalam Marathi nibandh

  • भारत 2020: नवीन सहस्राब्दीसाठी एक दृष्टी
  • आगीचे पंख
  • प्रज्वलित मन: भारतातील शक्ती मुक्त करणे
  • अतिक्रमण: प्रमुख स्वामीजींसोबतचे माझे आध्यात्मिक अनुभव
  • बदलासाठी जाहीरनामा: भारत 2020 चा सिक्वेल

असेच नवनवीन निबंध वाचा

छञपती शाहू महाराज मराठी निबंध

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध