Mobile che fayde ani tote marathi nibandh:मोबाईलचे फायदे आणि तोटे.मानसाच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टींचे फायदे त्याचप्रमाणे तोटेही आहेत.माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये भ्रमणध्वनीचा म्हणने मोबाईलचा शोध हा महान शोध मानला जातो. पुरानकथेतील वामणाने साडेतीन पावलांत सर्व विश्व पादाक्रांत केले आहे असे सांगितले जाते. पण मोबाईलने अक्षरशः एका पावलांत सर्व विश्व पादाक्रांत केले. म्हणूनच मोबाईलशिवाय कोणाचे पानही हालत नाही.Mobile che fayde ani tote marathi nibandh

Mobile che fayde ani tote marathi nibandh

यांशिवाय मोबाईलमुळे माणसातील विकृ- तीला वाव मिळाला आहे. इतरांना वाईटसाईट SMS, पाठवणे, वाईट मजकुर पाठवणे हे सर्रास घडत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिक्षेतील गैख्यवहाराला या मोबाईलमुळे चालना मिळाली आहे. ‘गणपती दूध पितो ‘ या अंधश्रद्‌धात्मक अफवा या मोबाईलमुळेच पसरत आहेत मग आपल्या मनात आल्यावाचून राहत नाही, की खरंच हा मोबाईल आपल्यासाठी फायदेशीर आहे का ?तर असे आहेत मोबाईलचे तोटे तर ही झाली नान्याची एक बाजू, आता आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मोबाईल मुळे आपले आयुष्य खुप सोपे ही झाले आहे .

आता तसे पाहिले तर मोबाईल आपल्यासाठी खुप फायदेशीर आहे. मोबाईल एक संपर्काचे उत्तम साधन आहे. आपण कोठूनही जगाच्या कानाकोपन्यौतील व्यक्तीशी सहज संपर्क साधू शकतो. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गाँधीजींना आपला भारत कसा आहे, तर ‘सारे जहाँ से अच्छा’ असे मोबाईलमुळेच सांगू शकला. आपण मोबाईलद्‌द्वारे चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे – आपली कामे देखील भराभर होतातः शिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासातील शंकाचे निरसन करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो ( mobile che fayde ani tote marathi nibandh)

.आजच्या आधुनिक जगात तर सिनेमा- चित्रपट यांची तिकिटे काढणे, त्याचबरोबर रेल्वे, विमान यांची तिकिटे काढणे, लाइट बिल भरणे यांसारखी सर्व ऑनलाइन कामे मोबाईलद्वारे शक्य आहे. म्हणून आजच्या धावत्या युगात मोबाईल खुप अत्यावश्यक आहे म्हणून मोबाईल हा आपल्यासाठी देवाने दिलेला एक फायदाच आहे, एक प्रकारे वरदानच आहे. मोबाईलचे दोष सु‌द्धा आहेत पण त्या मोबाईलचा तो दोष नव्हे तर तो मोबाईल वापरणाऱ्या माणसांचा दोष आहे. म्हणून मोबाईल हे उपकरण आपल्या जीवनात खुप फायदेशीर आहे. तर हे आहेत मोबाईलचे फायदे.

तर आता आपण मोबाईलचे तोटे बघुया,(mobile che fayde ani tote marathi nibandh)

इंग्रजांनी आपणास उत्तेजक म्हणून चहाच व्यसन लावलं अशी ओरड करतो. पण आज मोबाईल कंपन्या दरमहा नवीन नवीन व्हर्जन आणून आपले व्यवसाय वृद्धी करत आहेत. आणि आपण मात्र त्यांचे मोहाला बळी पडून आपला अमूल्य वेळ पैसा वाया घालवत आहे.

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहेत जसे की डोळ्यांवरती परिणाम यामध्ये डोळे लहान होणे डोळ्यांमध्ये खाज येणे तसेच लहान वयात लवकर चष्मा लागणे या समस्या लहान मुलांमध्ये उद्भवू लागले आहेत.

झोपायचे रुटीन सुद्धा लहान मुलांचे पूर्णपणे बदलून गेलेले आहे. कमी झोपेमुळे लहान मुलांची सतत चिडचिड होताना पालक लोक नेहमीच तक्रार करत असतात.
     सतत जवळ मोबाईल ठेवल्यामुळे  कॅन्सर सारख्या आजारांना आपण आमंत्रण देतो. तरुण वर्गामध्ये तर पूर्ण पिढी ही मोबाईल वरती अवलंबून आहे. मुलांना आज-काल फक्त मोबाईल राहिला म्हणजे आपल्या सोबत कोणी नको असे वातावरण तयार झाले आहे.

सकाळी उठल्या उठल्या कोसो दूर असणाऱ्या मित्राला ज्याचा प्रत्यक्षात कधीच परिचय नसतो अशा लोकांना गुड मॉर्निंग सारखे मेसेज पाठवण्यात आपण मग्न असतो. पण आपल्यासाठी घरात जिवाचं रान करणाऱ्या आई-वडीलांची कधीच विचारपूस करत नाही.

एवढेच नव्हे तर फेसबुकवर एखाद्या सुंदर चेहऱ्याच्या स्त्रीने सर्दी झाली. असा मेसेज टाकताच दिवसभरात हजार एक कमेंट येतात. हा बाम लावा, ही गोळी घ्या, हा काढा घ्या, वाफ घ्या अशी औषधाची यादीच तयार होते. पण घरात चार दिवस आई, बहीण, पत्नीपैकी कोणी आजारी असेल तर त्यांना एखादी मेडिकल मधून गोळी आणून देणे जिवावर येते.

विज्ञानाने प्रगती झाली त्यामुळे जग जवळ आहे. असे आपण म्हणतो. पण मी म्हणेन जवळच नाही तर जग प्रत्येकाच्या खिशात आले. जगाच्या कानाकोपऱ्यात काही क्षणातच आपणास संपर्क साधता येतो. जगातील अनेक घडामोडी आपणास लगेच समजतात. नवनवीन माहिती जाणून घेण्यास आज मोबाईल उपयुक्त ठरु लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून उद्योजकापर्यंत सर्वच क्षेत्रातील लोकांना त्याचा चांगल्याप्रकारे उपयोग होत आहे.

जगभरातील तज्ञाशी इंटरनेटच्या माध्यमातून चर्चा करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे विज्ञानाचे आभार मानावयास हरकत नाही. पण आज आपल्या समस्येच्या निराकरणासाठी मोबाईल, संगणक वापरणारे तुरळकच लोक पहावयास मिळतात. प्रतिष्ठेसाठी हातात मोबाईल घेवून फिरणारे अनेक लोक पाहायला मिळतात.

गरज नसताना व्हॉटस्अप, फेसबुक, ट्विटर यात डोकावणारा मध्यम वयीन गट, तर प्ले स्टोअर, गेममध्ये अडकलेला लहान मुलापासून तरुण वर्ग आपणास पहावयास मिळत आहे. यामध्ये आपल्या जीवनातील अमुल्य वेळ किती वाया जातो याचे भान राहात नाही. मोबाईलमुळे आज नात्याबाहेरील लोकांशी संभाषण वाढले. पण संवाद तुटू लागले. घरातल्या घरात मेसेजद्वारे संपर्क होवू लागले. या साऱ्यात किती वेळ बरबाद होतो. याचे भानच आपणास उरले नाही.Mobile che fayde ani tote marathi nibandh

.(Mobile che fayde ani tote marathi nibandh)

मोबाईल यामुळे आपलं वाचन थांबवलं, वाचनाचा वेळ,मोबाईलवर चॅटिंग करणे, गेम खेळणे, आवडूलागलं. पूर्वी सकाळी-संध्याकाळी मैदानी खेळ खेळले जात होते. त्यामुळेआरोग्य चांगले रहायचे. पण आज हेच खेळ मोबाईल, वर पाहण्यातआपण दंग झालो. त्या क्रिकेटच्या मॅचेस सुरु झाल्यावर तर विचारु नका, कितीमहत्त्वाचे काम असले तरी ती दुसऱ्या दिवसावर ढकलू लागलो. प्रसंगी शाळा,कॉलेजला दांडी मारू लागलो. सुट्टीच्या दिवशी रानावनात फिरणे, मनसोक्तपोहणे, खेळणे, व्यायाम करणे, पै-पाहुणे यांच्या घरी जाणे किंवा त्यांना बोलावणे.त्यांच्याशी संवाद साधणे हे सारे आज संपूष्टात आले. पै-पाहुणे, नाती गोतीयांची अॅलर्जी झाली. गप्पा-गोष्टी, विचारांची देवाण-घेवाण थांबली.

सारा वेळ मोबाईल पाहण्यात जावू लागला. विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढले.सुख-दुःखाची वाटणी थांबली. माणसामाणसांत तुसडेपणा वाढला. मुलांच्यातएकलकोंडेपणा वाढीस लागला. लहान वयातच चष्मा लागून मानेचे त्रास वाढूलागले. सात्त्विक जेवणाची जागा फास्टफुडने घेतली. आरोग्याच्या अनेक समस्यानिर्माण झाल्याने दवाखान्याची भर होवू लागली.लोखंडी वस्तू वापरा विना ठेवल्यानंतर जशी गंजू लागते, तशी वाचनाच्या अभावाने बौद्धिक क्षमता असूनही त्यावर गंज चढू लागला. (mobile che fayde ani tote marathi nibandh)समाजात असंस्काराचे प्रमाण वाढू लागले.

मोबाईल ची वाळवी जीवनाला लागली आहे. ती आपल्या जीवनातील अमुल्य क्षणक्षण कुरतडच आहे. आपण खर्च करत असलेला प्रत्येक क्षण उदात्त कामात घालवता येईल. पण मोबाईल सारख्या आधुनिक तंत्राचा वापर फक्त योग्य कारणासाठीच खर्च केला तर, प्रत्येक क्षेत्रात आपणास यशस्वी होण्यास मदत होईल. विचारपूर्वक वापर केल्यास मोबाईल, जीवनात क्रांती घडवेल. पण अविचाराने वापर जीवनातील प्रगतीत अडथळा ठरवल्याखेरीज राहणार नाही. कारण एकदा गेलेला क्षण पुन्हा मिळत नाही. म्हणून म्हटले जाते.

क्षण मोलाचे मानावे । क्षण प्रयत्ने वेचावे ।

। क्षण जपून खर्चावे । हरक्षण सोने व्हावे ।।Mobile che fayde ani tote marathi nibandh

mobile che fayde ani tote marathi nibandh

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक क्षणाचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. मोबाईल, टी. व्ही. संगणक ही परावलंबी यंत्र आहेत, आपण जसा वापर करणार तशी ती काम करणार. टी. व्ही. वरील चॅनेल फक्त आपण बदलू शकतो. कार्यक्रम आपण ठरवू शकत नाही. म्हणून म्हणतो जागे व्हा. क्षण आपल्या हातात नाही. ऐनवेळी धडपडण्यापेक्षा गरजे पुरताच मोबाईल, संगणक, टी. व्हीचा वापर करा दैवाला दोष देण्यापेक्षा कर्माला महत्त्व द्या.

धन्यवाद !Mobile che fayde ani tote marathi nibandh

( mobile che fayde ani tote marathi nibandh)

नव नवीन निबंध येथे वाचा

राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

माझे बाबा मराठी निबंध

श्यामची आई मराठी निबंध

आई पाहिजे तर लेक वाचवा मराठी निबंध

मोबाईलचे परिणाम जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://youtu.be/RMh7daowZ0Q?si=3bXaxtT3M5nO-iAY