Save water marathi nibandh/ पाणी वाचवा

पाणी वाचवा जीवन वाचवा

Save water marathi nibandh:पाणी वाचवा= पाण्याला आपल्या जीवनात कसे काय इतके महत्व आहे? पंचमहाभुतातील सहा तत्वापैकी अधिक महत्त्वाच तत्व म्हणजे जलतत्व होय. पाण्याने आपल्या जिवनातिल  अणू रेणू व्यापला आहे भारत सरकारने 2019 हे  वर्ष जलसहयोग वर्ष म्हणून घोषित केले आहे.पृथ्वीवरील पाण्याच्या हाल‌चालींचा, वितरणाचा आणि उत्कृष्टतेचा अभ्यास म्हणजे जलविज्ञान होय.

हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू यांच्या सहसंयोजक बंधातून पाण्याची निर्मिती होते. पृथ्वीचा एकूण 71. भाग हा पाण्याने व्यापला आहे. त्यापैकी 96.5% पाणी समुद्र व महासागरात सामावाले आहे. 1.५% पाणी जमिनीखाली त  बर्फाचे माध्यमातून सामावले आहे. हवेत वाफेच्या रूपात आहे आणि 0.3 पेक्षाही कमी पाणी पिण्यायोग्य आहे, त्यापैकी १०% पाणी हे कृषीक्षेत्रासाठी वापरले जाते पाण्याचा उत्कलनांक पृथ्वीवरती वेगवेगळ्या विकाणी वेगवेगळा आढळतो .तो समुद्रसपाटीवर १००° c आहे तर  एव्हरेस्ट शिखरावर तो 68° c ईतका आहे.

निसर्गाने मानवाला एक अनमोल दिलेली देणगी म्हणजे पाणी  होय, अतिप्राचीन काळापासून मानव या देगणीचा उपयोग आपल्या हिता साठी करून होत आला आहे पाणि आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी  पडते पिण्यासाठी, भांडी व कपडे धुण्यासाठी, शारिरीक स्वच्छतेसाठी, सिंचना. चार साठी, जलविद्युत निर्मितीसाठी, मनोरंजनासाठी, उद्योगधदयासाठी पाण्याचा वापर केला जातो .आपल्या शरिरात 70% टक्के पाणी असते. तसेच भाजी. गार पाल्यात 95% तर मासात 60% असते. जागतिक अर्थकारणात पाण्याची भुमिका  महत्वाची आहे पाण्यामध्ये साधारणतः  रासायनिक पदार्थ विरघळले  जातात, पाण्याच्या पारदर्शीपणामुळे त्यातील जलचर जीवंत राहू शकतात शुद्ध पाण्यामध्ये कॅलरीज, आणि औरगनिक न्यूट्रीयंटन्स ची  संख्या अधिक असते. अशा विविध उपयोगी महत्वाच्या नैसर्गिक देणगीला म्हणजेच पाण्याला अमृत अथवा जीवन ही म्हटले जाते. (Save water marathi nibandh)

. Save water marathi nibandh

पण या अमृतारूती जीवनाला विष बनवणार नसेल तर तो मानव कसला?  १प्रदूषणाचा अत्युच्च विक्रम गाठणार्या मनुष्याला – जलप्रदूषण ही आवाक्या बाहेरचीगोष्ट नाही .आज जलप्रदूषाणाची समस्या गंभीर बनत आहे.  पाण्यात मिसळणारया औद्योगिक अपशिष्टे ,अवसाद, रासायनिक खते, किटकनाशके, जंतुनाशके, तेलगळती, घरगुती सांडपाणी, किरणोत्सारी पदार्थ, गरम पाणी, इ पदार्थांमुळे पाण्याची गुणवत्ता घसरते, ते पिण्यायोग्य राहात नाही परिणामी ते पोटात गेल्यावर अनेक रोगांना निमंत्रण मिळते. अशा प्रकारामुळे रोगराई पसरल्याची उदाहरणे  कमी नाहीत.  कोल्हापूर शहरातील जीवनदायीणी पंचगंगा ही आज पंचगंगा म्हणून नव्हे तर गटारगंगा म्हणून वहात आहे. या प्रदुषणामुळे आज आपल्याला पिण्यासाती, शेतीसाठी इतर उद्योगांसाठी स्वच्छ पाण्याची गरज भासत आहे आणि हे जर असेच चालत राहील तर पाण्याबरोबरच आपलेही अस्तित्व संपुष्टांत येण्यास फार वेळ लागणार नाही.

सध्या सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमु‌ळे अनियमित पावसाचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी आपल्या महाराष्ट्र सरकार ने सहा  जिल्हे दृष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले पण याच वर्षी उत्तराखंडात झालेल्या अतिवृष्टीत शेकडो घरे वाहुन गेली. या असंतुलित स्थितीला आपणच जबाबदार आहोत, ना ?

.Save water marathi nibandh

. Save water marathi nibandh

सध्या आपल्याच बांधवाच्या विघातक कृत्यामुळे जागतिक ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. त्यामुळे वापर योग्य पाणी देखील कमी होत आहे. पूर्वी विदर्भ व मराठवाडा या ठिकाणी पाण्याचे जास्त दुर्भिक्ष असायचे. पण आज शासनाच्या ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ व ‘जलयुक्त शिवार’ या अभियानामुळे तसचे उन्हाळ्यामध्ये स्थानिक प्रशासनामार्फत टैंकर पुरवठा केला जात असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. पण आज वाढत्या वृक्षतोडीमुळे आणि पावसाच्या अनियमित पडण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर जलसंकट ओढवत आहे. एवढेच नव्हे ही परिस्थिती अशीच राहिली तर पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल. असं भाकीत जलतज्ञ ‘राजेंद्रसिंह’ यांनी केले आहे. पण त्याकडे गांभीयनि कोण पाहतो जो तो भौतिक सुविधाच्या मागे धावत आहे. आज स्थावर संपत्तीपेक्षाही जलसंपत्ती महत्त्वाची आहे. आपल्या भावी पिढीसाठी कोणत्याही मौल्यवान मालमत्तेपेक्षाही पाणी व्यवस्थापन जास्त गरजेचे आहे. जेथे पाणी आहे तेथे सुबत्ता आहे.( Save water marathi nibandh )

22 मार्च जागतिक जलदिन पाणी वाचवण्याचा संकल्प  करण्याचा दिवस, पाण्याचा महत्व जाणण्याचा दिवस, पाण्याला संरक्षण देण्याचा दिवस,  काही शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनता असे आढळून आले की 1.5% लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसते त्याचबरोबर 2025 पर्यत जगातील निम्म्या लोकांना पाण्याला मुकावे लागेल..निसर्ग आपल्याला पाण्याच्या रुपात जीवनदायीनी संपदा पुरवतो , पाणी एक चक्र आहे आपण या चक्राचा एक हिस्सा आहोत. त्याला गतीशील ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ते थांबले म्हणजे आपले जीवन थांबले.आपण निसर्गाकडून ज्या रुपात पाणी होतो त्यांच रुपात ते परत करणे आवश्यक आहे. आपण पाणी निर्माण करू शकत नाही व ते स्वच्छ ठेवण्याची व जपून वापरण्याची खबरदारी तरी घेऊ शकतो. Save water marathi nibandh

save water marathi nibandh

मार्च, एप्रिल पर्यंत पुरणारे पाणी आता जानेवारी पासूनच संपू लागले आहे. एप्रिल ते मे मध्ये तर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणू लागले आहे. जनू अर्घा संपला तरी पावसाचा पत्ता नसतो. मग आपण निसर्गाला दोष देवू लागतो. निसर्गचक्र बदलले आहे. देवदृष्ट झालाय, मान्सून लहरी आहे असे ऐकता अनेक तर्क काढतो. पण याला जबाबदार कोण मानवच ना? ढग जमतात, पाऊस येतो व आल्या रस्त्याने निघूनही जातो. पाणी वाहून जाते. नेहमीप्रमाणे जमिनी कोरड्याच !तुम्हाला माहित आहे का, भारतातील चेरापूंजी या ठिकाणी सर्वांत जास्त म्हणजे ११००० मि. मी. पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. याउलट इस्राईल मध्ये ५०० ते ७०० मि. मी. पाऊस पडतो. पाणी अडविणे आणि जिरविण्याच्या योग्य नियोजनामुळे वर्षभर त्यांना पाणी पुरते. याचप्रमाणे महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी, व हिवरे बाजार या ठिकाणी देखील पाण्याच्या नियोजनाने वापरामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. पाण्याचा वापर गरजेनुसार केला तरच ही समस्या गंभीर रुप धारण करणार नाही. उदा. घोटभर पाण्यासाठी ग्लासभर पाणी वापरणे. थेंब थेंब लाखमोलाचा मानूया ! दैनंदिन प्रसंगीही पाणी वाचवण्याचे छोटे-छोटे उपाय आपण करवूया ।आज पावसाचे पाणी सावून ठेवण्याची वेळ, आपल्यावर आली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. तो थेबन् – थेंब सुरक्षित ठेवला पाहीजे. आपण पाणी वाचवले नाही तर ते केवळ आपल्या डोळ्यात फक्त अश्रूच्या रूपातच पाहता येईल. आपल्याला पावसाचे महत्त्व हे आपल्या बोली भाषेतील वाक्प्रचारांवरूनच समजते. – आजची ही पाण्याची दशा पाहुन आपल्या चेहत्यावरील पाणी उतरले आहे. भविष्यात अंशी वेळ येणार आहे की, मेल्यावर तोंडात घालायला थेंबभर  सुद्धा पाणी मिळणार नाही. आपण अनेकांना पाणी पाजवलं, पण पाणीच आपल्याला रडवत आहे . विचार करा, आपलं रडणं कसं होईल? जेव्हा आपल्या डोळ्यांतच पाणी उरणार नाही. ज्या दिवशी सारे पाणी आपल्या डोळ्यांसमोरून वहात जाईल, तेव्हा आपण नुसते पहात बसु.( Save water marathi nibandh)

आज पाण्याच्या या वाढत्या समस्येवर नुसतेच बोट ठेवून किंवा लिहून-भाषण करून काम होणार नाही ,तर आपण सर्वांनी पाणी वाचव‌ण्याची  व जलसंवर्धनाची प्रतिना केली पाहिजे, नुसतीच प्रतिज्ञा उपयोगाची नाही तर ती अमंलात आणली पाहिजे. तरचं आपल्याला आपले जीवन वाचवता येईल व निर्धोकपणे जगता येईल.

पिण्याच्या पाण्यापरमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या  वा कितीही पाण्याचे पंप बसवले तरी ले सर्व निरूपयोगी ठरणार आहे. कारण जमिनी- खालील पाण्याची पातळी खालीच जात आहे .ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिलं पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहीजेत एक म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, झाडे आपल्या मुळांद्‌वारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात, झाडांची संख्या वाढली तर जमिनीखाली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसूमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे, तसेच “पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही दूसरी योजनाही युद्धपातळीवर राबवली पाहिजे. यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे विहिरी, नद्या यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठया प्रमाणासर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खरंच बहरू लागेल,  आणि पाणी वाचवा हे वाक्य खरया अर्थाने सार्थ ठरेल

  वाचवा एक एक थेंब पाण्याचे             

आयुष्य लाभेल मोलाचे

save water marathi nibandh

महाराष्ट्र माझा या निबंधा साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा कराhttps://knowledge.org.in/wp-admin/post.php?post=257&action=edit

Save water marathi nibandh|पाणी वाचवा जीवन वाचवा या कविता साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://youtu.be/w_PbRP7Wgcw?si=6MlOW5TQ0Ni4MwGB

धन्यवाद