paneer recipe in Marathi/ घरीच बनवा हाँटेल सारखा पनीर बटर मसाला

Paneer recipe in Marathi -पनीर बटर मसाला ही रेसिपी म्हणजे व्हेज रेसिपी मधील अगदी महत्त्वाची आणि सर्वांच्या आवडीची रेसिपी. व्हेजिटेरियन फूड म्हटलं तर पनीर शिवाय चांगला पर्याय कोणता नाही. पनीर बटर मसाला खायचा असेल तर आपण प्रत्येक वेळी हॉटेलला जातो. कारण घरच्या घरीच हॉटेल सारखे रेसिपी करणे प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळे अशा रेसिपींना आपण हॉटेलमध्ये जास्त किंमत असली तरीही विकत घेतो. पनीर बटर मसाला या रेसिपीमध्ये महत्त्वाचे असते ती म्हणजे ग्रेवी. ग्रेव्हीचा जो बेस असतो तो जर परफेक्ट जमला तर आपण हॉटेल सारखी कोणतीही रेसिपी घरामध्ये आरामात करू शकतो तेही अगदी कमी प्रमाणामध्ये. आजकाल बाजारामध्ये खूप सारे इन्स्टंट मसाले तयार आहेत. त्यामुळे कोणी पाहुणे जरी आले तरी आपण अशा रेसिपी अगदी च पंधरा मिनिटांमध्ये तयार करू शकतो. तर आज आपण सुहाना पनीर मसाला वापरून घरच्या घरीच हॉटेल सारखी च रेसिपी कशी करू शकतो हे आपण पाहणार आहोत.(Paneer recipe in Marathi)जर ही रेसिपी खाली दिलेल्या प्रमाणानुसार तुम्ही करून बघितली. तर तुम्हाला बाहेर अशा रेसिपींना जास्त पैसे वाया घालण्याची गरज नाही. तुम्ही कधीही कमी साहित्यामध्ये अशा प्रकारच्या रेसिपी करू शकता.
तर सगळ्यात आपण या रेसिपी साठी लागणारे साहित्य बघूया. आणि रेसिपी च्या सगळ्यात शेवटी आपण काही ट्रिक्स आणि सोप्या पद्धती बघणार आहोत त्यामुळे आपली रेसिपी अगदिच कमी वेळात‌ बनवून तयार होईल.  या रेसिपी चे प्रमाण चार ते पाच व्यक्तींसाठी आहे.
Paneer recipe in Marathi

paneer recipe in Marathi

साहित्य
१) पनीर २५० ग्राम
२)  मोठे कांदे _३
३) छोटे टोमॅटो -२
४) सुहाना बटर पनीर मसाला
५) आले लसूण पेस्ट-१ चमचा
६) काजू -९ते १०
७) गरम मसाला
८) तूप / बटर – २ चमचे
९) तेल-४ चमचे‌
१०) काश्मिरी तिखा लाल -३ चमचे किंवा तुमच्या चवीनुसार
११) मीठ चवीनुसार
१२) खडे मसाले- दालचिनी एक तुकडा, इलायची चार ते पाच, लवंग चार ते पाच, काळी मिरी चार ते पाच.

पनीर बटर मसाला कृती-(paneer recipe in Marathi)
सर्वप्रथम बाजारातून आणलेले पनीर कोमट पाण्यामध्ये दहा मिनिटे ठेवावे. त्यानंतर त्याचे बारीक तुमच्या आवडीनुसार बारीक तुकडे करून तेलामध्ये दोन ते तीन मिनिटे शॅलो फ्राय करावे.

दुसऱ्या बाजूला सुहाना पनीर बटर मसाला हा एका एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये हा सारा मसाला ओतून भिजण्यासाठी ठेवावा.

सुहाना पनीर बटर मसाला भिजेपर्यंत आपण या रेसिपी साठी लागणारे मसाला करून घेणार आहोत.

तर सगळ्यात आधी आपण कांदा बारीक चिरून तेलामध्ये मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजावा.

कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाच ते सहा काजू शॅलो फ्राय करून घेणार आहोत.

कांदा आणि काजूचे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत.

तसेच या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत आणि या सगळ्यांची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत.(Paneer recipe in Marathi)

मिश्रण चांगले वाटले गेले याची खात्री झाली की. कढईमध्ये तीन ते चार चमचे आपण तेल घेणार आहोत याच तेलामध्ये थोडेसे आपल्या आवडीनुसार बटर किंवा तूप घालणार आहोत. पनीर बटर मसाला या रेसिपीसाठी तुम्ही तेलाऐवजी पूर्ण बटर वापरला तर ही रेसिपी अजूनच चविष्ट बनते. पण जर जास्त प्रमाणात बटर अवेलेबल नसेल तर आपण थोडे तेल आणि थोडे तूप फोडणीसाठी वापरू शकतो.

तर चांगले बटर किंवा तेल तापले गेले की यामध्ये आपण चिमूटभर थोडाच हिंग टाकयचा आहे. त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे.

त्यानंतर या तेलामध्ये थोडे खडे मसाले जसे की दोन छोटी तमालपत्र, तीन ते चार लवंग, तीन ते चार वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा, आणि तीन ते चार काळीमिरी तेलामध्ये परतून घेणार आहोत.

खडा मसाल्यांचा अर्क तेलामध्ये चांगला उतरला की यामध्ये आपण बारीक केलेले कांदा टोमॅटो आणि काजूचे वाटण टाकणार आहोत.Paneer recipe in Marathi

paneer recipe in Marathi

या वाटणाला तेलामध्ये चांगले तेल सुटेपर्यंत आठ ते दहा मिनिटे चांगले परतून घेणार आहोत. आपल्या वाटणाला तेल सुटले की यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ , हळद, काश्मिरी तिखा लाल टाकायचे आहे. आणि वरून कोणताही घरातील गरम मसाला किंवा किचन किंग मसाला एक चमचा टाकणार आहोत.

हे सारे मिश्रण पुन्हा एकदा चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण दुधामध्ये भिजत घातलेला सुहाना पनीर बटर मसाला घालायचा आहे. आणि पुन्हा एकदा कढई वरती झाकून चांगली वाफ देणार आहोत. यामुळे हा सुहाना पनीर बटर मसाला चांगला फुलून येईल. आणि आपली ग्रेव्ही थिक व्हायला मदत होईल.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही ग्रेव्ही पातळ किंवा दाट करू शकता, जर तुम्हाला वाटले की रेसिपी मध्ये पाणी कमी आहे तर तुम्ही थोडे गरम पाणी करून या ग्रेव्हीमध्ये टाकू शकता. पण सुहाना पनीर बटर मसाला हा आपण दुधामध्ये भिजवल्यामुळे पाण्याची शक्यतो गरज लागत नाही. पण गरजेनुसार तुम्ही गरम पाणी वापरू शकता.(Paneer recipe in Marathi)

पाच ते दहा मिनिटानंतर हे मिश्रण चांगल्या प्रमाणे शिजले गेले की आपण यामध्ये शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाकणार आहोत. पनीर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ते सॉफ्ट राहतील. कारण पनीर जास्त वेळ शिजवले. तर ते थोड्यावेळाने वातड व्हायला लागते. त्यामुळे पनीर कधीही जास्त वेळ शिजवायचे नाही.

यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या जसे की बीन्स, गाजर, फ्लॉवर टाकू शकता.

या पनीर बटर मसाला रेसिपीमध्ये तुम्ही शॅलो फ्राय केलेले काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ग्रेव्हीमध्ये टाकू शकता.

आणि रेसिपी वरती सगळ्यात शेवटी दोन चमचे बटर किंवा घरातील उपलब्ध असलेले तूप वरून टाकायचे आहे.Paneer recipe in Marathi

paneer recipe in Marathi

रेसिपी करताना काही सोप्या ट्रिक्स-
पनीरची कोणतीही रेसिपी करताना सगळ्यात अगोदर पनीर फ्रेश असणे खूप गरजेचे आहे जर पनीर शिळे असेल तर तुम्ही कितीही चांगली ग्रेवी केली तरी त्या भाजीला इतकी चव येत नाही. त्यामुळे बाजारामध्ये जर पनीर फ्रेश अवेलेबल नसेल तर घरच्या घरीच ताजे पनीर करून रेसिपी साठी वापरू शकता.

पनीर शॅलो फ्राय करताना दोन ते तीन मिनिटेच करायचे आहेत नाहीतर‌ पनीर चा सॉफ्टनेसपणा निघून जातो

ग्रेव्हीमध्ये काजू ची पेस्ट वापरल्यामुळे ग्रेव्हीला हॉटेल सारखी चव
येते.

कोणताही  बाजारातील तयार पनीर मसाला दुधामध्ये घालून दहा मिनिटे ठेवले. तर‌ ग्रेव्ही चांगली फुलून तयार होते.

जर सुहाना पनीर बटर मसाला बाजारामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही फक्त कांदा टोमॅटो काजूची पेस्ट या ग्रेव्हीमध्ये सुद्धा भाजी केलीत तरी सुद्धा ही ग्रेव्ही चवीला लागते.(Paneer recipe in Marathi)

कोणत्याही भाजीमध्ये चिमूटभर हिंग वापरले तर ती भाजी पचनाला हलकी जाते.

पनीर मध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे जे लोक मांसाहार खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर आपल्याला ग्रेव्ही खायची नसेल तर अगदीच तव्यामध्ये थोडे मसाले टाकून शालो फ्राय केले तरीही पनीर ची रेसिपी तयार होते. त्यामुळे पनीर हा खूप सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे.

नवनवीन रेसिपी साठी खालील लिंकवर क्लिक करा

मुंबई फेमस पावभाजी रेसिपी

paneer recipe in Marathi 👉https://youtu.be/nscPsoCGkyQ?si=_CwLXbjqFAVOu4Uv