sanskar Marathi nibandh|संस्काराचे महत्त्व मराठी निबंध

sanskar marathi nibandh – रसिक श्रोते हो आज आपण संस्काराचे महत्त्व माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात ते या निबंध लेखनामध्ये पाहणार आहोत.

तेजःस्पर्शान दूर होईन अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार

शिल्यास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार

कुणाकडून काय घ्यावे या संभ्रमात वावरणारी आजची पिढी राजकारण, समाजकारण शिक्षण या सर्वच क्षेत्रातील विदार‌क वास्तव, मदारी राजकारण्यांनी माकड म्हणून जनतेचा सुरु केलेला कोपर व्यसनाधिन समाज, बेकारीला है चोरीसारख्या शार्टकट कडे वळलेले तरुण  यांच्याविषयी बोलावे तेवढे कमीच आहे तरीही एक विश्वास वाटतो की या सर्वांतून आजच्या  पिढीला तारु शकतील ते संस्कारच.

जिजाऊने शिवबाला रामायण व महाभारतातील धडे दिले. न्याय व नीतीच्या शिक्षणाबरोबरच स्वदेश प्रेमाचा संस्कार केला, त्यामुळेच छञपती शिवाजी महाराज मोठे झाले. मोजक्या मावळ्यांसह हिंदवी उभे करू शकले. कोल्हापूरच्या इतिहासात् स्वराज्य सुवर्णाक्षरांनी नाव कोरणारे छञपती शाहू महाराज,दलितोद्धारक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशी कितीतरी संस्कारशिल व्यक्तिमत्वे या भूमीत जन्माला आली. रसिक स्रोते हो। कुटुंब हे मानवी जीवनातील प्रमुख संस्कार केंद्र मानले जाते. आईचे मायाळू प्रेम, बाबांचे कडवट प्रेम,

भाऊ-बहिणीचे एक अदृश्य नाते
संबंध कुटुंबातूनच निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबात प्रेमाचा अर्थ समजतो. आजोबांचे बोट ते आजीचा बटवा, त्याला आयुष्यभर साथ देतिल सकाळची देवपूजा सायंकाळचे शुभंकरोति कल्याणम्’ ची प्रार्थना व रात्री झोपताना आजोबा व आजीकडून गोष्टी रूपाने मिळणारे संस्कार मानवी मनामध्ये जणू अमृतच निर्माणSanskar Marathi nibandh

sanskar marathi nibandh

करीत असतात. परंतू आजच्या काळात आईवडील दोघेही करिअर प्रेमी असतात. संस्कार करायला घरात आजीआजोबा असतातच असे नाही कारण हम दो, हमारे दो’ ही संकल्पना सध्या समाजात रुजत चालली आहे.

आई ही मुलाची पहिली गुरु असते व तिच संस्काराची गाथा असते. मुलाच्या इवल्याशा हाताला धरून त्याला चालायला शिकवणाऱ्या मातेने आपल्या मुलाला जीवनाच्या मार्गावरून चालताना उपयोगी पडतील असे संस्कारही दिले पाहिजेत. श्रोते हो चोराच्या आईने लहानपणीच चोरी न करण्याचे संस्कार मुलांवर केले नसते तर मुलगा दरोडेखोर झालाच नसताः ही गोष्ट आपण ऐकलीच आहे. म्हणून संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत.

ज्या प्रसारमाध्यमांनी स्वातंत्र्य संग्रामाती आपला महत्वाचा वारा उचलून तो यशस्वी रित्या  पूर्ण केला होता. तिचं प्रसारमाध्यमे आज पाश्चात्य संस्कृतीच्या विळख्यात आहे. दूरदर्शनवर आज असंख्य मालिका दाखवल्या जातात. त्यातील किती मालिका युवकांना प्रेरणादायी आहेत, हाच मला प्रश्न पडतो. चित्रपटातील अश्लील गाणी, कमी कपड्यातील नायिका याचा परिणाम युवक-युवतींवर होत आहे त्यामुळे बलात्कार, मुलींची छेडछाड ही प्रकरणे पहायला मिळतात. या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपल्या आयुष्यात संस्कार खुप आवश्यकता आहे.(Sanskar marathi nibandh)

असे म्हटले जाते की एक लहान मुलं म्हणजे काचेचे ग्लास असते . त्या मध्ये आपण काय घालणार आहे त्या वरून ते बाहेरून दिसणार म्हणजे सोने घातले कि ते नक्कीच चमकणार .हिरे घातले की नक्कीच चमकणार पाणी घातले की ते पारदर्शी दिसणार.गढुळ पाणी घातले की ते बाहेरून घाण दिसणार त्याच प्रमाणे एका लहान मुलांचे पण आहे .आपण त्याला काय शिकवणार काय संस्कार देणार यावर त्यांचे चरित्र अवलंबून असते. म्हणून आपल्या आयुष्यात संस्कार खुप महत्वाचे आहेत.एखाद्या व्यक्ती सोबत आपण कसे बोलतो असे वर्तवणुक करतो यावरूनच समाजामध्ये आपला दर्जा ठरवला जातो. Sanskar Marathi nibandh

sanskar Marathi nibandh

आज कुटुंब व समाज दुषित आणि व्यसनी होताना दिसत आहेत. याचा मुलावर परिणाम सहाजिकच होत असतो. घरातील आई वडीलांचे भांडणं मुळे मुलांवर, त्यांच्या वडिलांचे दारूचे व्यसन यामुळे मनावर परिणाम होत असतो. हेच चुकीचे आहे ‌‌ कारण कुटुंब हेच संस्काराचे पहिले केंद्र आहे. चांगल्या संस्कारामुळे कुटुंबातील सदस्यांना एकञ राहण्याची प्रेरणा मिळते.

आजकाल बालसंस्कार ही पद्धत फारच हृढ झाली आहे. बालसंस्कार म्हणजे जेव्हा बाळ पोटा मध्ये असताना चं त्याच्या वरती संस्कार करणे . असे म्हटले जाते की एखादे बाळ हे आईच्या गर्भातच शिकुन येते .तो जो ९ महिन्याचा कालावधी असतो त्या काळात बाळा वरती छान बालसंस्कार केले तर त्या बाळाची आकलनशक्ती वाढते . एकाग्रता वाढते, गर्भावस्थेत केले जाणारे संस्कार आपल्या सोबत आयुष्यभर टिकतात. म्हणून आपल्या आयुष्यात संस्कार खुप महत्वाचे ठरतात.

श्यामची आई हे जर पुस्तक तुम्ही वाचला असाल तर तुम्हाला समजेल की चांगल्या संस्कारामुळे किती चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण होते म्हणून मात्र मला म्हणावेसे वाटते की संस्कार हाच आपल्या आयुष्यातील एक मेव आधारस्तंभ आहे जो माणसाच्या शेवटपर्यंत राहतो. एखादा चांगला व्यक्ती चे मरणानंतर ही पिढ्यान् पिढ्या नांव काढले जाते कारण संस्कारांचा जोरावरती त्या व्यक्तीने समाजाचे कसे चांगले होईल यासाठी ती व्यक्ती आयुष्याभर झटत आलेली असते‌. त्या मुळेच संस्कारामुळे ती व्यक्ती पिढ्यान पिढ्या अजरामर होते. आणि आपल्या इतिहासाची पुस्तके त्यांची साक्ष देते.Shyamchi aai marathi nibandh

sanskar Marathi nibandh

माणसाचा जन्म कुठे असावा हे जरी माणसाच्या हातात नसले तरी संस्कारांचा आधारावर आपल्या आयुष्यात किती लोकांची मने जिंकायची व आपल्या आयुष्यात चांगली माणसे जोडायची हे मात्र नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. संस्कारामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला चांगले वळण लागतेच माञ त्याचा समाजा वरती पण चांगला‌‌ परीणाम पडतो.विचार करा जर या समाजातील प्रत्येक मनुष्या‌ वर चांगले संस्कार होतिल‌ तर समाजात किती शांतता नांदेल. सगळीकडे होणाऱ्या चोरी , खुण , स्ञीयांची छेड छाड अश्या असंख्य गोष्टींना विळखा घातला जाईल.

मित्रहो, घर, शाळा, पुस्तके, ग्रंथ, मित्र ही संस्काराची केंद्रे आहेत. संस्काराने घडतो माणूस वाचनाने संस्कार घडतात. वाचन संस्कार लहानपणी ज्ञान देण्याचे काम करतात, तारुण्यात  रक्षणा- साठी विवेक आणि सद्‌भावना निर्माण करण्याचे तर वारध्यक्यात दुःख हरण करून आनंद देण्याचे काम माणसाला वाचन संस्कार प्राप्त करून देतात. (Sanskar Marathi nibandh)

संस्कारासाठी सुसंगतीपण अतिशय महत्वाची आहे. आपण कुणाच्या संगतीत राहतो, कुणाशी मैञी करतो हे सुद्‌धा अतिशय महत्वाचे आहे. चांगल्या संगतीमुळे किती लोकांचे आयुष्य सद्म‌मार्गाला लागले आहे.मञ वाईट संगतीचा परिणाम नेहमी वाईटच दिसतात..

म्हणूनच म्हटले जाते.
‘सुसंगति सदा घडो सृजन वाक्य कानी पडो.”
माणसास जशी संगती मिळेल तसे त्याचे विचार व कृती घडत असते. ज्याप्रमाणे आंब्याच्या करंडीत – एखादा खराब आंबा निघाला की करंडीलील सर्व आंबे कुजतात. तसेच संगतीचेही आहे.” आपल्या मित्रपरिवारात एखादा जरी व्यसनी असेल तर त्याच्यामुळे अनेक मित्र व्यसनी होतात. म्हणजेच मनुष्याच्या जडणघडणीत संस्कार जि संगतीचाही महत्वाचा वाटा आहे.(Sanskar marathi nibandh)

संस्कारामुळे राक्षसातील माणूस् जागा होतो. वाल्याचा वाल्मिकी झाला हे जैसे इतिहास सांगतो तसेच किरण बेदींनी आपल्या कैद्यातील  व माणूस जागा करून त्यांच्यात परिवर्तन  घडवून आणले. ते फक्त संस्कारामुळेच म्हणून म्हणावेसे वाट्‌ते पांडवही संस्कारामुळेच घडले राम, कृष्ण अन् छत्रपती वाजी , छत्रपती संभाजी अन् तानाजीही ,लाल, बाल, पाल गाँधीही. सगळे घडले ते संस्कारा मुळेच.

खरचं ! भारत देशातील अनेक महापुरुष संस्कारामुळेच घडलेले आहेत. म्हणून आजच्या युगात अशी माणसे निर्माण व्हावी असे गाव वाटत असेल तर संस्कार काळाची गरज आहे. आज प्रत्येक आईने जिजाऊ, श्यामची आई यांचा आदर्श घ्यावा तेंव्हाच परत  छञपती शिवाजी जन्मला येतील. ,साने गुरुजी जन्माला येतील.

आपण सारे भारतीय संस्कारमुळे प्रिय आहोत म्हणुन मी शेवटी एवळेच म्हणेन अंगी बाणाल संस्कार मिळेल स्वप्नांना आकार मिळेल. स्वतापासून ते  समाजाच्या आदर्शाच्या धुंडाळत वाटा भावी पिढीकडून आशा करुया उदयाच्या-

(sanskar Marathi nibandh)

असेच नव नवीन निबंध वाचा

sanskar Marathi nibandh https://youtu.be/32qcE2SQ3JI?si=tJY6EELnlehEMwhs