Mumbai famous pavbhaji recipe/ मुंबई फेमस पावभाजी रेसिपी

Mumbai famous pavbhaji recipe -पावभाजी म्हटलं की आपल्याला आठवते ते म्हणजे मुंबईचा स्ट्रीट फूड.. तर आज आपण मुंबईची फेमस पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
पावभाजी  ही रेसिपी  लहानपणापासून मोठ्या  माणसांपर्यंत आवडीची ठरलेली डीश‌…. वाढदिवसाच्या किंवा कोणतीही छोटी मोठी पार्टी पाव भाजीची रेसिपी ही ठरलेली असते.
आपण बऱ्याच वेळी हॉटेल सारखी रेसिपी घरी करण्याचा प्रयत्न करतो पण हॉटेल सारखी चमचमीत रेसिपी आपल्याला जमत नाही तर चला मग आज मुंबईची फेमस सरदार पावभाजी घरीच कमी साहित्यामध्ये कशी बनवायची ते बघूया. तर सर्वप्रथम लागणारे साहित्य बघू. या रेसिपी चे प्रमाण चार ते पाच लोकांसाठी आहे ‌. तर कमी वेळात हॉटेल सारखी चमचमीत रेसिपी अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवून तयार होते.Mumbai famous pavbhaji recipe

mumbai famous pavbhaji recipe

साहित्य
बटाटे -६ते ७
टोमॅटो-२
आलं लसूण पेस्ट-१ चमचा
शिमला मिरची -१
फ्लॉवर _१ वाटी
वाटाणे -१ वाटी
कांदे -२

बिट -१वाटी
जिरे – १ चमचा
पावभाजी मसाला -२ चमचे
कसुरी मेथी- पाव चमचा
साखर- चवीनुसार

काश्मिरी तिखट -चवीनुसार
मिठ – चविनुसारMumbai famous pavbhaji recipe

Mumbai famous pavbhaji recipe

हे सुद्धा वाचा – चिकन बिर्याणी ला सुद्धा मागे टाकणारी व्हेज बिर्याणी

कृती
सर्वप्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्याव्यात.
बटाट्याच्या साली काढून बारीक चिरून घ्यावे. त्याचप्रमाणे शिमला चिरून त्यामध्ये बिया काढून घ्याव्यात . ,फ्लॉवर सुद्धा बारीक चिरून घ्यावा , वाटाणे. सोलून घ्यावे. बटाट्याप्रमाणे बिटाचे सुद्धा साल काढून बारीक फोडी करून घ्याव्यात. बिटा मुळे पावभाजीला कलर छान येतो.

सर्व काही बारीक चिरून झाल्यानंतर एका कुकरमध्ये गरजेनुसार पाणी घेऊन त्यामध्ये या सर्व भाज्या घालाव्यात.

कुकरच्या पाण्यामध्ये थोडी हळद आणि चिमूटभर मीठ टाकावे त्यामुळे या मिश्रणाला चांगली चव येईल.

कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या द्यावे. सर्व भाज्या चांगला शिजल्या याची खात्री झाल्यानंतर सर्व भाज्या पुन्हा एकदा रवीने चांगल्या घुसळून घ्यावे. त्यामुळे पावभाजीच्या मिश्रणाला चांगली एकसंध पणा येईल.

त्यानंतर एका कढईमध्ये गरजेनुसार बटर किंवा तेल घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम बारीक चिरलेला कांदा टाकावा. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकावे. पावभाजी मध्ये फोडणीसाठी तेलाऐवजी बटर किंवा साजूक तुपाचा वापर केल्यास पावभाजी छान चमचमीत होईल.

कांदा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची आणि आले लसूण यांची पेस्ट टाकावी. त्यानंतर दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण चांगले भाजून घ्यावे. आलं लसूण ची पेस्ट कढईला लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे मिश्रण सारखे हलवत राहावे.

हे सारे मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घ्यावे.(Mumbai famous pavbhaji recipe)

त्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकावी.
तेलामध्ये किंवा बटर मध्ये गरजेनुसार काश्मिरी तिखट २ चमचे किंवा तुमच्या चवीनुसार टाकावे काश्मिरी तीखा लाल या तिखटमुळे कोणत्याही रेसिपीला एक चांगला रंग आणि चांगली चव येते.

कांदा आणि टोमॅटोची पेस्ट चांगली भाजली गेली आहे याची खात्री झाल्यानंतर यामध्ये भाज्यांचे मिश्रण ओतावे.

त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण गरजेनुसार थोडे गरम पाणी टाकणार आहोत.

त्या मिश्रणामध्ये गरजेनुसार मीठ टाकावे. आणि पाच ते दहा मिनिटे या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यावी.

पाच ते दहा मिनिटानंतर यामध्ये आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत ‌. सगळ्यात शेवटी पावभाजी मसाला टाकल्याने मसाल्याची चव या भाज्यांच्या मिश्रणामध्ये शेवटपर्यंत राहते.

त्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर साखर टाकणार आहोत त्यामुळे आपल्या पावभाजीला चांगली चव येईल.

  मसाला टाकल्यानंतर एक पाच मिनिटे पुन्हा एकदा आपण या मिश्रणाला वाफ देणार आहोत त्यानंतर आपली पावभाजीची रेसिपी तयार होते.(Mumbai famous pavbhaji recipe)

सगळ्यात शेवटी गॅस बंद करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पावभाजी वरती बटर टाकणार आहोत. या बटर मुळेच पावभाजीची चव अधिक वाढते.

पाव भाजण्याची पद्धत
स्ट्रीट स्टाईलने रेसिपी बनवताना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे त्यामुळेच आपली रेसिपी एक परिपूर्ण    स्ट्रीट स्टाईल रेसिपी बनते. पावभाजी सर्व्ह करताना जे पाव आहेत त्यांना  मधोमध कट करून एका तव्यावरती बटर टाकावे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि मधून कट केलेले पाव बटर मध्ये हलक्या हाताने भाजून घ्यावेत. त्यामुळे पाव खाताना कुरकुरीत लागतील.Mumbai famous pavbhaji recipe

mumbai famous pavbhaji recipe

पावभाजी सर्व्ह करण्याची पद्धत-
एका  डिश मध्ये पाव भाजी घ्यावी.
त्यावर बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर टाकावी.
पावभाजी वरती दोन चमचे बटर टाकावे.
आवडीनुसार पावभाजी  वरती ड्रायफ्रुट्स टाकू शकता.
तव्यावरील गरम कुरकुरीत भाजलेले पाव,  पावभाजी सोबत सर्व्ह करावे.

अशाप्रकारे आपली स्ट्रीट फूड स्टाईल पावभाजी तयार आहे. तर खाली काही सोप्या टिप्स दिलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला ही रेसिपी करताना सोपे जाईल तसेच तुमचा टाईम ही वाचेल.

  • पावभाजी बनवताना सोप्या टिप्स –
  • पावभाजी मध्ये फूड कलर चा वापर न करता बिटाचा वापर केला तरीसुद्धा पावभाजीला छान लाल कलर येतो.(Mumbai famous pavbhaji recipe)
  • तुम्हाला अगदीच पावभाजी ची चव‌ स्ट्रीट फूड सारखी हवी असेल. तर तुम्ही हि पावभाजी पसरट तव्यामध्ये करू शकता. किंवा अगदीच पसरट तवा उपलब्ध नसेल, तर तयार झालेली पाव भाजी शेवटी सर्व्ह करताना एकदा बटर टाकून तव्यामध्ये परतली तरी त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो.
  • पावभाजी मध्ये तुम्ही तुमच्या आमच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता. उदाहरणार्थ कोबी, गाजर
  • पावभाजी साठी ताजी वाटाणे नाही भेटले तर तुम्ही वाळलेले वाटाणे आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत घालून ते सुद्धा रेसिपी साठी वापरू शकता.
  • कुकरमध्ये भाज्या शिजवताना भाज्यांच्या बारीक फोडी कराव्यात. त्यामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होते.
  • फोडणीमध्ये भाज्यांचे मिश्रण टाकण्या अगोदर चांगले बारीक रवीने घुसळून घ्यावे त्यामुळे नंतर आपला जास्त वेळ वाया जात नाही.
  • पावभाजी मसाला भाजी तयार होत असताना टाकावा.(Mumbai famous pavbhaji recipe)
  • रेसिपी मध्ये पाणी वापरताना गार पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करावा. त्यामुळे आपल्या रेसिपीला कलर छान येतो.
  • पाव आपण पावभाजी सर्व्ह करण्या अगोदर गरम करावे.. नाहीतर जास्त वेळ झाला म्हणून पाव काही वेळाने वातड व्हायला लागतात.
  • तयार पाकीट मधिल आले लसुन ची पेस्ट न वापरता ताजी पेस्ट वापरल्याने रेसिपी ला चांगली चव येते.
  • भाजी शिजत असताना ती मंद आचेवर शिजवावी. कोणतेही अन्नपदार्थ मंद आचे वरती शिजवल्यामुळे . त्यातील महत्त्वाचे जीवनसत्वे नष्ट होत नाही त्याचप्रमाणे त्यांची चव राखून ठेवायला सुद्धा मदत होते
  • पावभाजी करताना त्यामध्ये थोडीशी भाजलेली कसुरी मेथी टाकली तर त्याला सुगंधी वास आणि चांगली चव येईल.
  • पावभाजी सर्व्ह करताना त्यावर ती लिंबू आणि कांदा तसेच कोथिंबीर त्यांचे मिश्रण वरून नक्की टाका यामुळे चव द्विगुणीत होते.
  • Mumbai famous pavbhaji recipe

mumbai famous pavbhaji recipe

पावभाजी पहिल्यांदा कसे निर्माण झाले तुम्हाला माहित आहे का?

असे म्हटले जाते की एकोणिसाव्या काळात मुंबईमध्ये पावभाजीची उत्पत्ती झाली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मिल कामगार होते. रात्री काम झाल्यानंतर खाण्यासाठी जेवण लवकर तयार होईल असे अन्य पदार्थ ही त्यांची गरज होती. तेव्हा त्यांनी शिजवलेल्या भाज्या सगळ्या एकत्र करून त्यामध्ये काही मसाले घालून पावभाजी तयार केली. आणि पाव हा बाजारामध्ये आरामात मिळत होता. म्हणून रात्रीच्या झटकेपट जेवणासाठी पावभाजी हा त्यांच्या आवडीचा अन्नपदार्थ ठरला. आणि ही भाजी लवकर शिजावे यासाठी त्यांनी मोठ्या तळ्याचा वापर करत असाल. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये पावभाजीचा उगम झाला. आणि ही रेसिपी जगप्रसिद्ध झाली.

तुम्हाला नव नवीन निबंध वाचण्यासाठी आवडत असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

महाराष्ट्र माझा मराठी निबंध