chicken biryani in Marathi/ हाँटेल सारखी चमचमीत बिर्याणी आता घरच्या घरी बनवा.

Chicken biryani in Marathi -आपल्या भारतामध्ये चिकन बिर्याणी एक अशी रेसिपी आहे ती म्हणजे सगळ्यांच्या च आवडीची . हॉटेलमध्ये गेलो चिकन बिर्याणी रेसिपी ऑर्डर मध्ये ठरलेली असते.  पण जेव्हा चिकन बिर्याणी आपण घरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र हॉटेल सारखी बिर्याणी आपल्याला जमत नाही.  तर घरच्याच साहित्यामध्ये हॉटेल सारखी  चिकन बिर्याणी घरामध्ये कशी तयार करायची ते आज आपण पाहूयात. तसेच बिर्याणी तयार करताना सोप्या अशा टिप्स आज मी तुम्हाला देणार आहे.  तर हा लेख पूर्णपणे वाचा. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. या बिर्याणीचे प्रमाण पाच ते सहा लोकांसाठी आहे.  तर सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात.Chicken biryani in Marathi

chicken biryani in Marathi

हे सुद्धा वाचा – हाँटेल सारखा चमचमीत पनीर बटर मसाला

चिकन बिर्याणी साठी लागणारे साहित्य –
१) चिकन 800 ग्रॅम
२) बिर्याणी बासमती तांदूळ- १ किलो
३) कांदे पाच ते सहा
४) टोमॅटो -२
५) आले लसूण पेस्ट दोन चमचे
६) दही- चार टेबलस्पून
७) काजू -सात ते आठ
८) तयार चिकन बिर्याणी मसाला. किंवा
    दालचिनी- १ इंच, इलायची-५ते ६ , चक्रीफुल – २, काळीमिरी पाच ते सहा, लवंग पाच ते सहा.
९) पुदिना एक जुडी
१०) कोथिंबीर एक वाटी
११) हिरव्या मिरच्या चार
१२) काश्मिरी लाल-४  चमचे
१३) हळद चवीनुसार
१४) मीठ चवीनुसार
१५) साजूक तूप चार ते पाच चमचे
१६) कसुरी मेथी-एक चमचा

चिकन बिर्याणी पाककृती-
सर्वप्रथम आपण बिर्याणी साठी लागणारे चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत. चिकन जितके मॅरीनेट होईल तितके मसाले चिकनच्या आतपर्यंत मुरतात.chicken biryani in Marathi

सर्वप्रथम पाच ते सहा कांदे आपण बारीक चिरून खरपूस असा मंद आचेवर तळून घेणार आहोत.

चिकनच्या मॅरीनेशन साठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये दही, तळलेला कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, काजू‌, आले लसूण यांची पेस्ट, चार ते पाच हिरव्या मिरच्या, सर्व मिश्रणाची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यामुळे सर्व मसाले एक जीव होतील.

बारीक केलेले मिश्रण चिकन मध्ये ओतावे. तसेच यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, आणि एक चमचा काश्मिरी लाल, तसेच कसुरी मेथी टाकावी. म्हणजे सारे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यावे. सारे मसाले चिकनला व्यवस्थितपणे लागतील त्याची खात्री करावी.

मॅरीनेट केलेले चिकन अर्धा तास बाजूला ठेवावे.chicken biryani in Marathi

आता आपण बिर्याणी साठी लागणारा राईस तयार करून घेणार आहोत.

बिर्याणी राईस तयार करताना एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे आहे. यामध्ये पाणी जास्त झाले तरी काही हरकत नाही. कारण भात शिजल्यानंतर उरलेले पाणी आपण ओतून देणार आहोत. त्यामुळे पाणी उखळत  ठेवताना जरा जास्त पाणी ठेवावे.Chicken biryani in Marathi

chicken biryani in Marathi

या पाण्यामध्ये दोन चमचे मीठ तसेच एक चमचा जिरे, पाच ते सहा वेलची, एक चक्रीफुल , चार ते पाच लवंग, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा असे चार ते पाच काळीमिरी टाकावी. या मसाला मुळे भाताला छान वास येतो आणि चव सुद्धा चांगली येते.

आता या उकळत्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेले एक किलो बासमती तांदूळ टाकणार आहोत.

आणि आपण हा बिर्याणी साठी लागणारा राईस शिजवून घेणार
आहोत. राईस शिजवताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे हा राईस 90% शिजला पाहिजेत.  त्यानंतर आपण एका चाळणीमध्ये हा शिजलेला राईस ओतून घेणार आहोत ज्यामुळे भांड्यामध्ये जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल.chicken biryani in Marathi

हे सुद्धा वाचा –लोण्यासारखे लुसलुशीत उकडीचे मोदक

शिजलेल्या राईस मध्ये शिजवलेले खडे मसाले सुद्धा आपण काढून टाकायचे आहेत. कारण या मसाल्यांचा वास आणि चव आपल्या राईसला लागलेली आहे त्यामुळे हे खडे मसाले काढून टाकले तरी चालतात.

बिर्याणी साठी लागणारा राईस तयार होईपर्यंत मॅरीनेट केलेले चिकन छान मॅरीनेट होऊन तयार झालेले आहे.

आता आपण एका कढईमध्ये सात ते आठ चमचे तेल आणि या तेलामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचे आहे. ‌ आणि एक बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे.

कांदा छान खरपूस भाजला गेला की यामध्ये आपण काश्मिरी लाल, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मॅरीनेट केलेले चिकन घालायचे आहे.chicken biryani in Marathi

गॅसची आच मोठी करून हे चिकन छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. मॅरिनेट केलेल्या चिकन मध्ये पाणी घालण्याची गरज नाही. कारण यामध्ये असणारे दही ,टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना यांच्यामुळे चिकनला पाणी सुटते. तसेच चिकन मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे छान ग्रेवी तयार होते. पण जर तुम्हाला वाटत असेल , की चिकन  शिजण्यासाठी थोडे पाणी हवे आहे, तर अर्धी वाटी पाणि यामध्ये टाकू शकता.

यावरती तयार चिकन बिर्याणी मसाला टाकायचा आहे.Chicken biryani in Marathi

chicken biryani in Marathi

आता पंधरा ते वीस मिनिटे चिकन वर झाकण ठेवून चिकन चांगली शिजवून घ्यायचे आहे.

चिकन शिजत आले की चिकनची ग्रेव्ही जास्त पातळ होणार नाही आणि जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

आता बिर्याणी साठी लागणारा राईस  आणि चिकनची ग्रेव्ही दोन्ही तयार आहे.

आता आपण  चिकन बिर्याणी ला दम लावुन  घेणार आहोत.

चिकन बिर्याणी ला दम लावण्यासाठी वेगळ्या एका.    पसरट  भांड्याला आपण तुपाचा एक हात  फिरवून  घ्यायचे आहे.

त्यानंतर सगळ्यात तळाशी तयार झालेला थोडा राईस पसरवायचा आहे. त्यानंतर चिकन ग्रेव्हीचा एक थर लावून घ्यायचा आहे. परत त्या चिकन ग्रेव्ही वरती राईस चा एक थर लावून घ्यायचा. अशाप्रकारे एकावरती एक असा चिकन ग्रेव्ही आणि राईस चा थर लावून झाल्यानंतर सगळ्यात वरती आपण तळलेला थोडा कांदा पसरवणार आहोत. तसेच चवीनुसार वरून कोथिंबीर टाकणार आहोत. आणि सगळ्यात वरती दोन चमचे तूप टाकायचे आहे.chicken biryani in Marathi

चिकन बिर्याणीचा थर लावून झाल्यानंतर या भांड्यामध्ये एका वाटीमध्ये तापवलेला कोळसा घेऊन त्यावरती एक चमचा तूप सोडायचे आहे.

म्हणजेच कोळशाचा धूर आपल्या बिर्याणीला लागेल. आणि बिर्याणी चवीला छान होईल.

आणि गॅस वरती तवा ठेवून मंद आचेवरती पुन्हा एकदा दहा मिनिटे वाफ द्यायची आहे. त्यामुळे आपण राईस करत असताना उरलेला जो दहा टक्के राईस आहे तो सुद्धा शिजेल. आणि चिकन बिर्याणी चवीसाठी चांगली लागेल.

अशा पद्धतीने आपली चिकन दम बिर्याणी तयार आहे.