आई पाहिजे? तर लेक वाचवा
Mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi: मित्र हो, ‘परमेश्वराने घडवलेली वेल ही एक कलाकृतीच असू शकते.चार मुलीनंतर होऊ दे मुलगा पाचवा,
हवं तर त्याला डोक्यावर घेऊन नाचवा,
पण त्या गर्भाशयातील नानुकशा कळीला वाचवा.
ही कविता ऐकून तुम्हाला कळलेच असेल की, माझ्या भाषणाचा विषय आहे ‘आई पाहीजे.. मग लेक वाचवा.’ आई म्हणजे काय हो?
आई म्हणजे
आत्मा ई म्हणजे ईश्वर, ज्यात ईश्वराचा आत्मा आहे ती म्हणजे आई आदर्श आई जिजाऊ मुळे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, देवकीसारख्या मायाळु आईमुळे श्रीकृष्ण जन्मले, माता कौसल्या होती म्हणून श्रीराम जन्मले, आज तुमचे आमचे आस्तित्व आहे ते आपल्या आईमुळेच.
विठ्ठलाबरोबर रूक्मिणी असतेच शंकराबरोबर पार्वती, गणपती येतो तेंव्हा गौरी आणतोच ना ! रक्षाबंधनाला बहीण मनगटावर राखी बांधतेच ना, मग तुम्हीच सांगा गर्भाशयात वाढणारी चिमुकली का बरं नकोशी झाली. धनदेवता, विदयेची देवता, शक्तीची देवता या स्त्रीयाच आहेत. विश्वाच्या निर्मितीचा उगम ही स्त्रीच आहे. निसर्गातील महत्वाच्या पदावरही स्त्रीच विराजमान आहे.(Mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
आमच्या डोळ्यासमोर असताना देखील भ्रुण हत्या का होतात ? हा माझ्या कोवळ्या मनासमोर पडलेला प्रश्न आहे. ज्यांनी ज्यांनी स्त्री कर्तृत्वाचा अभ्यास केला त्या क्रांतीज्योती म्हणून पेटल्या आणि प्रतिभाताईंपर्यंत जाऊन पोहचल्या आपल्या यशाद्वारे समाजापुढे आदर्श देवणाऱ्या IPS अधिकारी किरण बेदी, अंतराळात भरारी घेणारी कल्पना चावला, गानसंग्राज्ञी लता मंगेशकर, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, कोल्हापूरची तेजस्विनी सावंत. स्त्रीच आहेत. घर व समाज यामध्ये समतोल साधण्याचे काम फक्त अन् फक्त स्त्रीच करू शकते . म्हणून मला अभिमानाने असे म्हणावेसे वाटते की,
मुलगी जन्माला आलीच पाहिजे.
(mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
खरं सगळं असूनही तिला स्वतंत्रपणे जगु दिलयं का? नववधूस आशिर्वाद देताना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असे म्हटले जाते परंतू या अष्टपुत्राचा इष्टपुत्र झालेला पाहीलाय का ?
तुझ्या पोटी छान गोंडस
मुलगी जन्माला येवो असा आशिर्वाद का दिला जात नाही
श्रोतेहो आजच्या स्त्रीने सर्वच क्षेत्रात गरुड भरारी घेतलेली असतानासुद्धा स्त्रीभ्रुण हत्या का होते? मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगी म्हणजे परक्याचे धन? असे समजून मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाते .
मुलीचा गभ असेल, तर तो गर्भातच खुडला जावून मुलीला हे जग पाहुचं दिलं जात नाही, काय भयंकर प्रकार आहे हा.देव मानव जातीला जन्माला घालताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाचे आपण आनंदाने स्वागत केले पाहिजे. मग जर ति मुलगी असेल तर आपल्या ला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही की आपण तिचे जगणे जन्माला येण्या च्या आधिच हिरावून घेऊ.सुशिक्षित समजले जाणारे आईवडील- सुद्धा हे पाप बिनधास्तपणे करताना दिसतात.हे असेच सुरु राहीले तर सर्वांना आई मिळेल?
(mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
हॅलो मी बोलतेय. पण कोण? मी, मी म्हणजे कुणाची तरी मुलगी, ताई, आई ,मावशी, पत्नी, ही नाती केंव्हा सांगेन, तुम्ही. मला जन्माला येऊ दयाल तेंव्हाच. आज विज्ञानाने खुप प्रगती केली तसतसे मानवी जीवन अधिकाधिक सुखसोईनी समृद्ध होत गेलं , त्यातूनच एक गर्भलिंग परीक्षण हा सुखसोयी मुळे माझ्यासारखे जीव गर्भातव मारले जात आहेत. पण का ?….. मी मुलगी आहे म्हणून
तुम्हाला हवा मुलगा, वंशाचा दिवा पण हा वंशाचा दिवा तेवत रहावा म्हणून वातीची भूमिका निभावणारी स्त्रीच नसेल तर ?तुमचा वंशाचा दिवा काय कामाचा ? कशाला हवा वंशाचा दिवा; भाग्याची पणती जपून ठेवा.(Mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
मित्रहो खरं तर स्त्री जन्म यशदायी आहे तीच खरी मोक्षाची
अधिकारी आहे. ती उभय मुलतारिणी आहे. बालकावर संस्कार करण्यात पुरुषापेक्ष्या स्त्रीचाच वाटा मोठा आहे. स्त्रीचे आस्तित्व कुटुंबाचा आधार आहे. जिच्यामुळेच पुरुषाचा जन्म आहे. स्त्रीरूप हे मांगल्याचे प्रतिक आहे. तिलाच जर मुळापासून उखडून। टाकणार असू केवढं दुदैव पाप कर्म असेल. स्त्रीभ्रूण हत्या’ या कुर कृत्यामुळे समाजजीवनावर अत्यंत भयावह प्रतिकूल, दुरगामी दृश्य परिणाम होत राहतील म्हणून मुलगी वाचली पाहीजे काय हो, आज पुरोगामी समजल्या जाणाऱ्या, बुद्धीजीवी महाराष्ट्रात सर्व काही अलबेल आहे?
mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi
मिञ हो घरात एखादी मुलगी असेल तर घर अगदी भरल्यासारखे वाटते , तिच्या पैंजणाच्या आवाजाने घर सगळं निनादून उठतं . एखादा सण असेल तर सणासुदीच्या दिवसांत सडा रांगोळी ने घर सारं उजळून उठतं, आपला बाप कधी पर गावी गेल्यावर तिचा बाप येईपर्यंत त्या घराच्या उंबरठ्यावर वाट बघत बसणारी एक मुलगी च असते.घराच्या स्वयंपाक घरापासून ते आकाशात उंच गगनभरारी सगळीकडे मुलीं नी आपल्या यशाचा डंका वाजवला आहे.
प्रत्येक क्षेत्रा मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. आधिच्या काळात लोक म्हणत असायचे, ही कामे मुलींना जमणार नाही पण स्त्रीयांनी सगळ्या रुढी, परंपरा, प्रथा मागे ठेवून आपल्या घराचा उंबरठा ओलांडून सगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत. असे म्हटले जाते की घरात एखादी स्त्री शिकलेली असेल तर पुर्ण घर शिकते . आता आपल्या घरातीलच बघाना आपली आई शिकली म्हणून तिने आपल्याला जन्मापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या.
आपल्या शिक्षणा मुळे समाजाचा उद्धार होतो.म्हणजेच आपल्या सर्वांगीण विकासाचा करा पाया तर स्ञीच आहे. मग ईतके सगळे असताना आपण त्या छोट्याश्या कळी ला पोटातचं कसे मारुन टाकतो. आपण कितीही प्रगती केली तरी आपली मानसिकता कधी बदलणारचं नसेल तर काय फायदा आपल्या शिक्षणाच. जर एका निरागस कळी ला आपण फुलण्यापासून चं थांबवत असु तर आपल्या ला सुद्धा किती हक्क आहे जगण्याचा यावर आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
(mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
Mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
ती सुद्धा आई च्या पोटात असताना किती स्वप्ने रंगवत असेल. त्याचा कोणी का विचार करत नाही? जेव्हा आपण त्याला मारत असतो तेव्हा त्या गर्भाला किती यातना , वेदना होत असतील त्यालाही या जगात यावंस वाटत असेल ना . झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुनिता विल्यम्स, किरण बेदी, कल्पना चावला या कर्तृत्ववान महिलांनी सुद्धा एका स्ञी त्याच पोटी जन्म घेतला. मग आपण मुलगी म्हणून आलेल्या गर्भाला का मारतो ? आज विज्ञानाने खुप प्रगती केली.अनेक तंत्रज्ञान शोधुन काढली ,पण या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी योग्य ठिकाणीच करायला हवे .
असे एखाद्या निष्पाप जिवाला मारुन तो या तंत्रज्ञानाचा चुकिचा वापर करत आहोत.आज समाजामध्ये लोक म्हणतात मला मुलगा व्हावा त्यानंतर म्हणता माझ्या मुलाला देखील मुलगा व्हावा. प्रत्येकवेळी मुलग्याची अपेक्षा. समजा मुले झालीत तर या मुलाचं लग्न करण्यासाठी तरी मुलगी हवी की नको. केवळ मुलग हवा म्हणून सगळ्या पिढीनं गर्भपाताचं पाप करायचं यावर तुम्ही विचार करणार आहात की मुलगा हवा असा हट्ट धरणार आहात. मित्रांनो झाडे आपल्याला फळे, फुले देतात. पण आपण ते झाडंच मुळापासून उपटून टाकलं तर फळाची व फुलाची अपेक्षा आपण का करावी आणि या समाजामध्ये पुरुषांइतकंच स्त्रीयांनाही महत्त्व दिलं पाहिजे
Mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi
शेवटी मी एवढचं म्हणेन.
राखी बांधायला बहीण पाहीजे.
गोष्ट सांगायला आजी पाहीजे
हट्ट पुरखायला मावशी पाहीजे.
पुरणपोळी भरवायला मामी पाहीजे.
जिवनाच्या सोबतीला मैत्रिण पाहिजे
आयुष्याच्या साथीला पत्नी पाहीजे
आणि काय हो… हे सर्व निभवायला मुलगी पाहीजे….
मुलगी वाचली तर आई मिळेल’.. आई पाहीजे मग मुलगी वाचवा,
(mulgi vachava mulgi shikwa nibandh in marathi)
१)मुलींचे दर वाढले पाहिजे यासाठी सरकारने ही खुप योजना सुरू केल्या आहेत याचा उद्देश
- महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमी कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य करणे हा आहे.
- राज्यात मुलीचा जन्मदर वाढवणे
- राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे
- भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांना आळा घालणे.
- या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे.
२)लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला
- पालकांचे आधार कार्ड
- पिवळे आणि केशरी रे)शन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंतिम टप्प्याच्या वेळेस विवाह न झाल्याबाबतचे स्वयं-घोषणापत्र.
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
धन्यवाद
असेच नव नवीन निबंध वाचा
महाराष्ट्र माझा मराठी निबंधhttps://knowledge.org.in/maharashtra-maza-marathi-nibandh/
बाबा तुम्ही ग्रेट आहात मराठी निबंधhttps://knowledge.org.in/baba-marathi-nibandh/ Lek wachava marathi nibandh:https://youtu.be/DHecdzJ70hE?si=IcKWNji5Qvxkbnkj
संत विचार काळाची गरज मराठी निबंध https://youtu.be/w_PbRP7Wgcw?si=6MlOW5TQ0Ni4MwGB
राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध
Lek wachava marathi nibandh
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!