मी सरपंच झालो तर, मराठी निबंध | mi sarpanch zalo tar nibandh lekhan

Mi sarpanch zalo tar nibandh lekhan: आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही होण्याची इच्छा मनाशी बाळगत असतो. मात्र मी सरपंच झाले तर या कल्पनेनेच ‘मी अगदी भारावून गेले आहे. आपली पंचायत राज्यव्यवस्था ही तीन टप्प्यांवर अवलंबली आहे. ती म्हणजे ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद, या तीन घटकांद्वारे आपल्या राज्याचा विकास होत असतो. याचाच एक भाग म्हणजे मी सरपंच झाले तर गावामध्ये एक नवक्रांती निर्माण करण्याची माझ्यात ताकद आहे..

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या घटनेनुसार आपण जीवण जगत आहोत, मात्र मनुष्य आपल्या विचारांनी आणि वर्तणुकीने स्वतंत्र झाला नाही. आज गावाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. यामध्ये मुख्य म्हणजे व्यसनाधिन‌ता, स्वच्छतागृहांची समस्या, भाऊबंदकीतून उत्पन्न झालेल्या समस्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवी प्रदूषण, मानवी प्रदूषणाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या बांधवांना आणि भगिणींना पुढे, जाऊ देत नाही. खेकड्याच्या प्रवृत्तीची माणसेही आज गावामध्ये आहेत. त्यांच्यातील द्वेष मत्सर काटुन टाकण्याचा मी प्रयत्न करेन.Mi sarpanch zalo tar nibandh lekhan

mi sarpanch zalo tar nibandh lekhan

मी सरपंच झाले तर सर्वप्रथम गावातील महिला निराधार आणि अनाथांसाठी महत्वपूर्ण कार्य करेन. दारूमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय गरीबीमुळे व अल्प शिक्षणामुळे अनेक महिलांग कर्तुत्वाची इच्छा असुनही विकासापासून दूर रहातात त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी लघुउद्योगातून म्हणजेच कुक्कुटपालन, शेळी पालन, बचत गट, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळवून देईन, यातून त्या नक्कीच स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील

गावा मध्ये पाण्या साठी उन्हाळ्यात खुप ञास होतो. गावातील मुली आणि स्त्रियांना थोड्याशा पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. आणि त्या मुळे शिक्षण घेणाऱ्या मुलिंना आपला निम्मा वेळ पाण्या साठी द्यावा लागतो. म्हणून मी सगळ्यात आधी गावांमध्ये नळ योजना घेऊन येईन.Mi sarpanch zalo tar nibandh lekhan

mi sarpanch zalo tar nibandh lekhan

आजकाल गावांमध्ये मुलींचे प्रमाण खुप कमी होत चालले आहे. कारण वंशाचा दिवा हवा म्हणून स्ञी भ्रुण हत्या केली जात आहे. त्या साठी लोकांना जागरूक करणे खूप महत्त्वाचे आहे तरच समाजाचा विकास होईल. म्हणून मी सरपंच झाले तर समाजात घरोघरी जन जागृती करेन.

गावामधे सुद्धा दिवसेंदिवस झाडांची संख्या खुप कमी होत आहे. त्यामुळे आपल्याला प्रदुषणा सारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे मी सरपंच झाले तर मी स्वतः पुढे झाडे लावेन आणि गावातिल लोकांमध्ये जनजागृती करेन . कारण जर आपल्याला भारतीय स्तरावरती काही मोठे बदल घडवायचे असतील तर आपल्या ला गावच्या स्तरावर राहुन सुरुवात करावी लागेल.मी सरपंच झाले तर माझ्या गावी मी वाचनालय सुरू करेण ‌. सगळ्या लोकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करेन

mi sarpanch zalo tar nibandh lekhan

Mi sarpanch zalo tar nibandh lekhan

mi sarpanch zalo tar nibandh lekhan

गावातील अनेक मुले मुली आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण अर्धवट सोडून देतात.त्यामुळे त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसतात. म्हणून मी सरपंच झाले तर तरूण पिढी साठी रोजगार उपलब्ध करून देईन. शेतकरयांना आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून देईन.. गावांमध्ये छोटे मोठे उद्योग धंदे सुरू करेण जसे की तेलाचा घाणा , गुळाची निर्मिती. शेतिमधील चांगल्या प्रकारची कडधान्ये देशभर निर्यात करणे. त्यामुळे गावातील तरूण पिढीला रोजगार चालु होईल.आणि त्यामुळे बेरोजगारी पण कमी व्हायला पण मदत होईल.

         गावाची साक्षरता वाढविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन. आज गावामध्ये आर्थिक परिस्थीती तनसल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. दहावीमध्ये चांगले गुण प्राप्त करुनही त्यांना योग्य मार्गदर्शना अभावी नुकसान  होते . होतकरु आणि गरीव विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमध्ये अशा हुशार  सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मी एक ठराव मंजूर करीन, याद्वारे गावातील  विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत निधीची तरतूद करून त्यांच्या पंखात उंच उडण्याची आशा उत्पन्न करण्याचा मी प्रयत्न करीन मी सरपंच झाले तर बरोबर गावातील स्वच्छतेसाठी रात्रंदिवस झटेन, मानवाचे आरोग्य जर उत्तम असेल तरच तो खरा श्रीमंत, असे मी शाळेमधील सुविचारांमधून शिकले आहे. हाच परिपाठ मी माझ्या गावाला शिकवणार आहे. नगर जिल्हयात हिवरे बाजार नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावाच्या सरपंचांना कोण ओळखत नाही असे नाही, या गावचे सरपंच पोपटराव पवार हे महाराष्ट्राच्या कानाकोपन्यात गाजले, ते केवळ त्यांच्या ग्रामस्वच्छता अभियानामुळे आणि पाणी नियोजनामुळेच. मलाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन माझ्या गावाचा विकास करायचा अहि, मी सर्वप्रथम याच गोष्टींना प्राधान्य देईन.

मी माझ्या गावाला हागणदारी मुक्त करीन, आज ठिकविकाणी स्वच्छतागृहे आहेत, पण ती केवळ पुरषांसाठीच पण महिलांचे काय ? गावातील बाजारपेठ, बसस्थानकाशेजारी स्वच्छतागृहे आहेत . ती सर्वाना दिसतील अशाच विकाणी आहेत. मग आपल्या गावातील महिला सर्वांसमोर  स्वच्छता- गृहांचा वापर कसा करनार यासाठीच मी स्वतंत्र आणि गर्दीपासून दूर अशी स्वच्छतागृहांची निर्मिती करीन, महिलाच जर यापासून वंचित राहतील तर आपला व आपल्या कुटुंबाचा विकास कसा करू शकतील त्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी काय करतील?(Mi sarpanch zalo tar nibandh lekhan)

       मी सरपंच झाले तर गावातील तरुण आणि तरुणींना एकत्र करून त्यांच्याकडून दर आठवड्याला ग्रामस्वच्छता करुन घेईल तरुणांमध्येजो उत्साह असतो तो अवर्णनीय असतो. आपण शाळांमध्ये ‘भारत माझा देश आहे’ अशी प्रतिज्ञा करतो पण आपण भारत  आपला देश नसून माझा देश आहे असे आपण म्हणतो, जेव्हा कोणत्याही गोष्टीत ‘माझ’ हा शब्द येतो तेव्हा सर्वजण एकजुरीने झटून उठतात. अगदी याच प्रमाणे मी माझ्या गावाची सरपंच या नात्याने सर्व नागरीकांना ‘माझा गाव’ म्हणुनच कर्य करा असा संदेश देहेन आणि सर्व आयुष्य गावासाठी खर्च करीन, मी आज ही प्रतिज्ञा करेन की, माझ्‌या गावाचे आरोग्य, स्वच्छता, समृद्धी, समानता आणि दारिद्रय निर्मुलनासाठी प्रयत्न करीन, मी माझ्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मी सर्व कार्या साठी तयार असेन.”

( mi sarpanch zalo tar nibandh lekhan)

  • सरपंचाची कामे कोणती =
  • सरपंचाचे काम म्हणजे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते जबाबदार असतात आणि ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी , कल्याणासाठी तसेच त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सेवा जसे की पिण्याचे पाणी आणि स्वच्छता लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
  • सरपंचाचे किमान वय किती असावे
  • सरपंचाचे किमान वय 25 वर्षांच्या पुढिल असावे

(mi sarpanch zalo tar nibandh lekhan)

असेच नवनवीन निबंध वाचा

माझ्या आठवणीतील सहल

श्यामची आई

छञपती शिवाजी महाराज असते तर

संत विचार काळाची गरज

बाबा तुम्ही ग्रेट आहात

आई पाहिजे तर लेक वाचवा

mi sarpanch zalo tar nibandh lekhanhttps://youtu.be/dR_89AlNH5U?si=HaLOs1mb5rJlo1kcan