Shyamchi aai marathi nibandh:एक स्त्री खूप वेदना सहन करून आई बनू शकते, पण मिळालेलं मातृत्व सर्व वेदनांना शांत करतं. स्त्री ही माता होऊ शकते हे स्त्रीचे सर्वांत मोठे भाग्य ! पण दुदैवानं पुरुषांना हे भाग्य मिळत नाही. आजपर्यंत जगात तीनच पुरुष मातृत्वापर्यंत पोहोचू शकले. मी ज्या पंढरपुरात राहतो त्या सावळ्या विठ्ठलाला सारे भाविक आई मानतात. विठाई म्हणतात. त्यानंतर ज्याने अखिल विश्वाच्या शांतीचा, मानवतेचा ध्यास घेतला, विश्वकल्याणाची प्रार्थना केली त्या ज्ञानमाऊली ज्ञानेश्वरांना मोठ्या भक्तीने माऊली म्हटले जाते.
ज्ञानदेवांनंतर कदाचित असा लोकोत्तर पुरुष होणे नाही असं वाटत असतानाच १८ व्या शतकाच्या शेवटी एक माणूस जन्माला आला. ज्या माणसानं संपूर्ण भारतवर्षाला सहदय आणि सुजनशीलतेचा संदेश दिला. मोठमोठे महापुरुष तलवारींनी, रक्तपाताम क्रांती घडवतात. पण त्याने माणसांना प्रसवलेल्या, अंत: करणातून वाहिलेल्या निर्मळ अश्रूच्या पावित्र्याने क्रांती घडविली. ज्याने साहित्य आणि विचार रडके आहे. अशी टीका समकालिन करत असताना स्वातंत्र्यलढ्यात उडी घेऊन,
भारत माझा लावण्याची खान आहे मी तिचे नेहमिच गान गात राहिले.
shyamchi aai marathi nibandh
अशा संघर्ष गीतांनी प्रतिकाराचीही प्रेरणा दिली. दया, शांती, त्याग, संयम, संघर्ष या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाप ज्यांच्या
व्यक्तिमत्वात झाला आणि जगात धर्माची सर्वांत सुंदर व्याख्या ज्यांनी केली, फक्त केलीच नाही तर ती ते प्रत्यक्ष जगले
फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे जगाला प्रेम अर्पन करणे,
असे सांगुन जो माणूस अखंड भारतात मातृहृदयी म्हणून मान्यता पावला त्या महा- मानवगनं लिहिलेल्या गीताईवर बोलण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे. त्या माणसांचं नाव होतं, पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजीला हे मोठेपण का मिळाले याचा विचार केला तर त्यांचं उत्तर त्यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ मध्ये मिळत. कारण अखंड गीतेवर टिका लिहून दहा वाक्यांच्या पसायदानात मांडणाऱ्या ज्ञानमाऊलींच्या अधिकारी वाणीएवढे सामर्थ्य माझ्या सारख्या माणसात नाही. तरीही लिहिष्याचा प्रयत्न करतोय. * मराठी साहित्यातील सोनेरी पान- श्यामची आई’
जेव्हा अफाट ताकदीची माणसे, पुस्तके समोर येतात तेव्हा
(shyamchi aai marathi nibandh)
Shyamchi aai marathi nibandh
शब्दांची ताकद कमी पडते. शब्द फिके ठरतात. सोनेरी पान…… हे म्हणण्यापेक्षा मराठी साहित्यातील परीस म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. कारण सोनं स्वतः मौल्यवान आहेच परंतु गांजलेल, कुजलेल लोखंडही सोन्याच बनवतो. तर अनेकांचे गांजलेले, सडलेले जीवन सुंदर बनवण्याचे सामर्थ्य श्यामची आई या पुस्तकात आहे. हा विषय मांडताना सर्वांत मोठा प्रश्न होता की, हा विषय कसा मांडायचा ? एक लेखक म्हणून गुरुजींच्या सरळ, कारुण्यपूर्ण लेखनाच्या हातोटीवर बोलायचे का, गुरुजींच्या निष्याप, सत्वशील जीवनावर बोलायचं ? गुरुजींच्या निष्पाप, सत्वशील जीवनावर बोलायचं की गुरुजींच्या आदराचं स्थान असणाऱ्या कारुण्यमूर्ती आईवर बोलायच? नेमक कशावर बोलू ? पण ठरवले एक आई म्हणून काय केलं पाहिजे अन् एक अपत्य म्हणून कसं जगलं पाहिजे.
कशी निष्ठा, कसं प्रेम, कसे संस्कार समजून घेतले पाहिजेत तेच या विषयावरच मर्मसूत्र आहे. मराठी साहित्यात या पुस्तकाच स्थान एकमेवाद्वितीय आहे. कारण वाचक पुस्तकाला वाचायला सुरुवात करतो. तेव्हा तो वाचक असतो, मात्र पुस्तक संपते तेव्हा तो भक्त बनलेला असतो. त्यांचं हृदय पावित्र्यान, मांगल्यानं भरलेलं असतं. हे पुस्तक माणसाला देवत्वाकडे नेत. प्र. के. अत्र्यांनी तर या पुस्तकाला माणुसपण ठरविण्याची कसोटी म्हटलंय. ते म्हणतात की, हे पुस्तक वाचताना ज्याचे डोळे ओलावत नाहीत, हृदया कारुण्यानं भरून येत नाही त्यानं खुशाल आपण माणूस नाही असं
समजावं. हे पुस्तक गुरुजींच्या जीवनाची कथा नसून चांगला माणूस होऊ पाहणाग्यांना दीपस्तंभ आहे.काय आहे असे या पुस्तकात ? मी तर म्हणेन की या पुस्तकात लिहिलेली कोणती गोष्ट आमच्या जीवनात घडत नाही. जे साने गुरु जीनी श्याम असताना अनुभवलं ते सारे प्रसंग आमच्याही जीवनात घडतात. पण आम्ही आमच्या घरात आईसमोर श्यामसारखे आर्त राहत नाही आणि आजकाल श्यामच्या आईसारखी आई होण स्त्रिया ना जमत नाही.(Shyamchi aai marathi nibandh)
अंगावर नखशिखान्त दागिने मिरवण्यापासून ते सर्वस्व जाऊन एका खोपट्यात दारिद्रयाचे चटके सोसण्यापर्यंत सारी दुःखे मोठ्या खंबीर मनाने पचवत स्वतःच्या मुलाच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवशी संस्काराच बीज पेरणारी श्यामची आई आणि प्रत्येक नव्या गुणासोबत स्शाडखपऔ परमला मोठ बनविण्याचे कार्य करणाऱ्या या आईचा अभ्यास केला तर एक स्तिमित करणारी जीवन मालिका आमच्यावर उभी राहते.(Shyamchi aai marathi nibandh)
पहिल्यापासून स्वतःच्या जीवनाच्या वर्तनातून श्यामच्या आईचे मुलावर संस्कार केले. घरात काम करायला येणारी कांडपीण आजारी आहे म्हणून गरम भात आणि लिंबाचं लोणचं देणाऱ्या आईने श्यामला परोपकार शिकवला. माणूस, मग तो नोकर असो किंवा मालक, तो माणूस आहे हे पायाभूत तत्व सांगितले. गुरुजी या प्रसंगाबाबत सांगताना म्हणतात, ‘माझ्या आईन मला गरिबांच्या कृतज्ञतेची जाणीव करून दिली. जगातील सारी सुक्चने फिकी पडतील एवढं सुंदर विधान गुरुजी लिहितात. ते म्हणतात, ” कृतज्ञताबुद्धीसारखी दुसरी थोर व सुंदर गोष्ट पृथ्वीवर नाही. माणसानं नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. पेर परमेश्व राने जीवन दिलं आहे. आईवडिलांनी जन्म दिला, सिनिसर्गाने प्रेम दिलं, राष्ट्रानं ओळख दिली.
मित्रांनो तुम्ही ममता दिलीत. मग यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत का?” एका वाक्यात गुरुजींनी साग्या समस्यांचा विनाश कृतज्ञतेन होतो हे सांगितलं आणि ही कृतजना श्यामच्या आईने पावलोपावली श्याममध्ये रुजवली: देवाला वाहायला फुले तोडू नयेत म्हणून कळ्या तोडणाऱ्या श्यामला “श्याम अशा मुक्या कळ्या तोडू नयेत, त्यांना नीट फुलू द्याव” असं सांगताना सहज-सहज संस्कार करणारी श्यामची आई, आज एकतर्फी प्रेम कर- णाव्या तरुणांना लाभली असती तर कित्येक चालत्या बोलत्या कळया( shyamchi aai marathi nibandh)
कुस्कुरल्या गेल्या नसत्या, हा विचार मन अस्वस्थ करतो.स्वतःच जीवन शुद्ध करण्याचे तर श्यामच्या आईने शिकवलेच पण भूतदयेचा जो वारसा तिने दिला तो वारसा साने गुरुजीना घडविण्यास कारणीभूत ठरला. उंचावरून पडलेले पाखराच पिल्लू मेल तेव्हा त्याची सेवा करणारा श्याम आणि पाखरू मेल्या वर रडणाऱ्या श्यामला आईनं काय सांगावं , श्यामची आई म्हणाली, श्याम, तू पाखरू मेल्याचे सुतक धरू नकोस. त्याला शेवंतीजवळ पुर तुम्ही त्याला प्रेम दिलंत. आता ते मातीच्या रूपान वर येईल व तुम्हांला सुगंध देईल. जसे त्या पाखरावर प्रेम केलंत तसं एकमेकांवर करा कारण प्रेम हाच खरा धर्म आहे”
केवढ मोठ तत्वज्ञान, केवढी मोठी गीता चिमुकल्या पाखरासाठी रडणारा श्याम, माणसांच्या दुःखासाठी रडू शकला. आजकाल गाढवाच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधून गाढवाची थट्टा उडविणाऱ्या आजच्या पिढीला हे कळणार आहे का ? माणसांच्या मुंख्या पिरगळताना हे कळेल ? म्हणून की काय आजकाल पाखरेसुद्धा माणसाने शिवलेल पिल्लू आपल्यात आपल्यात घेत नाहीत. कारण माणसांच्या स्वार्थी हातांनी बाटलेलं ….. आणि स्वार्थाचा एकही अंश पुढच्या पिढीत नको म्हणून माणसाच्या स्वार्थी हातांनी बाटलेलं ते पिल्लू पाखरे ठार करतात
(shyamchi aai marathi nibandh)
.
Shyamchi aai marathi nibandh
श्यामची आई वाचताना श्यामचं जीवन सुंदर व्हाव म्हणून क्षण-क्षण धडपडणारी, श्यामला पत्रावळी लावायला यावी म्हणून उपाशी ठेवणारी, पोहायला जात नाही म्हणून मारणारी, माझ्या मुलाला कोणी भित्रा म्हणून हिणवू नये म्हणून प्रयत्न करणारी, श्यामने रामरक्षा पाठ करावी म्हणून आणि मनातला अहंकार जावा म्हणून टाकून लो बोलणारी पण त्याला तत्पर बनविणारी, भोजनाच्या वेळी दक्षिणा घेतली म्हणून उपास घेणारी आणि गरीब असलो तरी लाचार नाही हे श्यामला शिकविताना, स्वाभिमानी बनविताना मोहरून येणारी श्यामची आई. स्वार्थान बरबटलेल्या, षडरिपुंनी बरबटलेल्या दुनियेत स्वतःचं बळ निष्पाप रहावं म्हणून धडपडणारी श्यामची आई पाहिली की तिचे व्यक्तिमत्व पटुन जाते.
एक आई म्हणून श्यामची आई श्रेष्ठच होती. कारण सुंस्काराचा ध्यास त्या माऊलीन आयुष्यभर जोपासला. एकीकडे श्यामची आई आम्हाला प्रेरणा देतेच पण दुसरीकडे आईच्या प्रत्येक
(shyamchi aai marathi nibandh)
shyamchi aai marathi nibandh
संस्कारात रंगुन जाणारा श्यामही मनाला भुरळ पाडतो आईवर नितांत प्रेम करणारा, प्रचंड भक्ती असणारा श्याम हा आदर्शापेक्षा मोठा वाटतो. लहानपणी खोडकर असणारा श्याम, पुस्तकांसाठी चोरी करणारा पण आईचा विश्वास पाहून ती कबूल करणारा श्याम, आईसाठी वडाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालणारा श्याम. पाखरू मेल म्हणून हमसून हमसून रडणारा श्याम आई पासून दूर गावी शिकायला असताना आईच्या आठवणीने व्याकूळ होणारा स्याम….. आईनं रूजवलेला प्रत्येक संस्कार आपल्या कर्तृत्वान जिवंत करणारा श्याम….. आईच्या स्वप्नां नंतर आईसाठी धावत पळत येणारा स्याम आणि आईच्या मृत्यूनंतर अगतिक झालेला श्याम… आम्ही वाचतो तेव्हा मक्ती व भक्तीची आर्तता काय असते हे समजलं.
मीरेला कृष्णेच्या भक्तीच्या धुंदीत जसं विषाचं भान मात्र नव्हतं, गोरा कुंभाराला स्वतः च मूल पायाखाली तुडवलेलं समजले नाही. अगदी तसचं आयुष्यभर गुरुजींच्या हृदयात फक्त आई होती म्हणून ते आई बनू शकले ‘श्यामची आई’ या पुस्तकाची फलनिष्पत्ती काय असेल तर हे पुस्तक वाचून घडलेली पिढी आणि माणसाच्या मनात निर्माण होणारा भक्तीभाव कित्येक वर्षाणसून मराठी साहित्यातील हा ‘परीस’ सोन्यासारखी माणस घडवत आला आहे. येणाऱ्या काळात ही संस्काराची गीता असणारे हे पुस्तक आपल्या जगण्यातून प्रवाहित व्हावं एवढीच अपेक्षा.
(shyamchi aai marathi nibandh)
असेच नव नवीन निबंध वाचा