Tawa pulao recipe in Marathi -तवा पुलाव हे एक स्ट्रीट फूड आहे. रस्त्यावरच्या ठेल्यावर मिळणारा तवा पुलाव आपण आज घरी तयार करून पाहणार आहोत. जर आपण घरी पावभाजी केली असेल आणि ती पावभाजी उरलेली असेल तर अशा या उरलेल्या पावभाजी पासून भन्नाट अशी तवा पुलाव ही रेसिपी घरच्या घरी करून पाहणार आहोत. जर पावभाजी असेल तर खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते. तर या रेसिपी साठी लागणारे सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात.
तवा पुलाव रेसिपी साठी लागणारे साहित्य–
1) पावभाजी
२) बासमती तांदूळ पाव किलो
३) टोमॅटो एक
४) एक कांदा
५) आलं लसूण पेस्ट चमचा
६) मटार अर्धी वाटी
७) गाजर अर्धी वाटी
८) शिमला मिरची अर्धी वाटी
९) हिरवी मिरची एक ते दोन
१०) बटर किंवा तूप दोन चमचे
११) काश्मिरी तिखट चवीनुसार
१२) मीठ चवीनुसार
हे सुद्धा वाचा – चिकन बिर्याणी ला मागे टाकणारी व्हेज बिर्याणी
तवा पुलाव पाककृती – tawa pulao recipe in Marathi
सर्वप्रथम आपण तवा पुलाव साठी लागणारा राईस तयार करून घेऊया. त्यासाठी पाव किलो बासमती तांदूळ चांगले स्वच्छ धुऊन दहा ते पंधरा मिनिटे पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवणार आहे.
त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी खेळण्यासाठी ठेवणार आहोत. या पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून पाणी उकळले की स्वच्छ धुतलेले बासमती तांदूळ आपण या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत.
पंधरा ते वीस मिनिटांनी तांदूळ चांगला शिजला आहे याची खात्री झाली की या भांड्यामधील जास्त असणारे पाणी आपण चाळणीच्या साहित्याने ओतून टाकणार आहोत. बासमती तांदूळ शिजवताना तो 90% शिजवावा.
आता दुसरीकडे आपण एक कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहे. तसेच आले लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार भाज्या मटार ,गाजर ,फरसबी, ढोबळी मिरची स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेणार आहोत.(Tawa pulao recipe in Marathi)
आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तवा पुलाव हा नेहमी खोलगट अशा तव्यावर तीच करावा. म्हणजे त्याची चव अधिक खुलून येते.
तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये तूप किंवा बटर घ्यायचे आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकावे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला हलका परतून घ्यायचा आहे.
हे सुद्धा वाचा – लोण्यासारखे लुसलुशीत उकडीचे मोदक
कांदा चांगला शिजला असेल त्यामध्ये टोमॅटो तसेच आले लसणाची पेस्ट टाकून पुन्हा एकदा चांगले शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो शिजताना यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकावे.
हे मिश्रण चांगले शिजले गेले की त्यामध्ये बारीक कट केलेल्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. या भाज्यांना चांगली वाफ लागली की त्यामध्ये आपण चवीनुसार काश्मिरी लाल तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकणार आहोत.(Tawa pulao recipe in Marathi)
हे सर्व भाज्यांचे मिश्रण चांगले वाफले गेले याची खात्री झाली की पावभाजी ची भाजी त्या मिश्रणामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. च मिश्रण जास्त घट्ट झाले असेल तर तुम्ही पाण्याचा हलका हात या मिश्रणावरती मारू शकता. पण जास्त पाणी होणार नाही याची नक्की काळजी घ्या.
आता यामध्ये आपण शिजवलेला राईस टाकून सारे मिश्रण एकजीव करून येणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडासा वरून लिंबू पिळू शकता. पाणी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे.
तवा पुलाव तयार झाला की त्यावरती आपण पुन्हा एकदा वरून बटर टाकणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे तेव्हा पुलाव करताना नेहमी तव्याचाच वापर करा कारण त्यामुळे एक स्मोकी फ्लेवर पुलाव मध्ये उतरतो. त्यामुळे त्याची चव ही स्ट्रीट फुड सारखी लागते.
तुम्हाला जर हवे असेल तर या तवा पुलावला तुम्ही कोळशाचा धुर देखील देऊ शकता.
(tawa pulao recipe in Marathi)
जर पावभाजी उपलब्ध नसेल तर–
जेव्हा तुम्ही कांदा टोमॅटो त्यांचे मिश्रण तेलामध्ये परतवत असता , तेव्हा त्या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या जसे की मटार, शिजलेला बटाटा गाजर, वाटाणे, यांचे कुकरला एक शिट्टी करून घ्यायची आहे.
त्यानंतर सगळ्या भाज्या शिजल्या की त्यांना स्मॅशरच्या मदतीने एक जीव करून घ्यायचे आहे. आता या शिकलेल्या भाज्यांचे मिश्रण कांदा टोमॅटो मध्ये त्यामध्ये पावभाजी मसाला, तुमच्या चवीनुसार काश्मिरी तिखट, तसेच चवीनुसार मीठ घालून सारे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे आहे. जर हे मिश्रण भरपूरच घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे पाणी घालू शकता.
त्यानंतर आपला जो वेगळा शिजून घेतलेला राईस आहे. तो या संपूर्ण भाज्यांमध्ये घाला. आणि पुन्हा एकदा हे सारे मिश्रण एकजीव करून घ्या. संपूर्ण भाजी आणि राईस पूर्णपणे एकजीव झालेले आहेत याची खात्री करून घ्या. अशाप्रकारे आपला स्ट्रिट स्टाईल तवा पुलाव तयार आहे.
तवा पुलाव करताना वापरात येणाऱ्या टिप्स tawa pulao recipe in Marathi
१) तवा पुलाव साठी वापरात येणारा राईस हा शिजवून घेत असताना 90% शिजवा. जेणेकरून जेव्हा आपण तव्यावरती हा राईस पुन्हा एकदा परतून घेऊ तेव्हा त्याचे दाणे तुटणार नाहीत.
२) तवा पुलाव करताना बाजार मधील विकत मसाले वापरणे ऐवजी जर घरच्या घरीच ताजे गरम मसाले वापरला तर त्याचा स्वाद अजूनच खुलून येईल.
३) तवा पुलाव करताना नेहमी तव्याच्याच वापर करा.
४) जर तुम्ही राईस स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल. तर तांदळाच्या दीडपट पाणी घ्यावे. आणि फक्त दोनच शिट्ट्या द्याव्यात.
5) तवा पुलाव करताना तुम्ही उरलेल्या शिळ्या भाताचा सुद्धा वापर करू शकता.. शिळ्या भातामुळे होणारा पुलाव हा सडसडीत,सुटसुटीत होतो.
६) पुलाव करताना नेहमीच मीडियम टू हाय फ्लेम चा वापर करावा यामुळे भाज्या आणि भात चांगला शिजून येईल.
७) पुलाव मध्ये जिसके जास्त बटर किंवा तूप यांचा वापर करा तितका जास्त चवीला पुलाव बनतो.
८) पुलाव तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यावरती लिंबू आणि कोथिंबीर टाकायला अजिबात विसरू नका त्यामुळे पुलावला आंबट गोड अशी छान चटपटीत चव येते.
९) तवा पुलाव करण्याच्या अगोदर बासमती तांदूळ एक ते दोन तास भिजत ठेवा. त्यामुळे तांदूळ छान मोठा आणि सुटसुटीत होण्यासाठी मदत होते.
१०) ब्लाउज साठी वापरण्यात येणारा तांदूळ शिजल्यानंतर जर तुम्हाला भाऊ आणि फ्लफी हवा असेल. तर भात शिजल्यानंतर तो भात थोडा बटर मध्ये परतवून घ्या.
पुलाव सोबत चारायचा कसा बनवावा? tawa pulao recipe in Marathi
रायता बनवत असताना घट्द ह्याचा वापर करा. या दह्यामध्ये बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक टोमॅटो, किसलेला बीट हे सारे दह्यामध्ये मिक्स करून घ्या.
आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून चांगले मिक्स करून घ्या. आता यावरती आपण जिरे आणि मोहरीची फोडणी टाकणार आहोत.
त्यासाठी छोट्या एका पॅनमध्ये एक चमचा तेल घाला . तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी आणि चिमूटभर हिंग, तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून हे मिश्रण दह्याचा मिश्रणावरती ओता.
आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. तर तयार आहे आपला पुलाव साठी लागणारा रायता.
रायता बनवताना एक काळजी घ्या ती म्हणजे जेव्हा पुलाव रायत्या सोबत सर्व करणार त्याचवेळी रायत्यामध्ये मीठ घाला . कारण रायत्या मधील कांद्याला पिठामुळे पाणी सुटू शकते. आणि रायता पाणीदार होतो. हे टाळण्यासाठी नीट सर्वात शेवटी घालावे.
.
धन्यवाद
(tawa pulao recipe in Marathi)
पहा कसा बनतो स्ट्रीट वरती तवा पुलावhttps://youtu.be/m6-KH-ugeX4?si=jgliZ-F3f8lRdwPv
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!