birthday wishes for father in Marathi/ बाबांसाठी शब्दरूपी भावना

Birthday wishes for father in Marathi:वडिलांचे स्थान सगळ्यांच्याच आयुष्यात खूपच लाख मोलाचं असते. आईचा गुणगान करताना वडिलांचे कौतुक आपण मात्र करायला विसरतो. वरून कणखर दिसणारे आपले वडील जरी असले तरी आतून तितकेच प्रेमळ असतात. आणि अशा आपल्या वडिलांचा वाढदिवस म्हणजे प्रत्येका साठी एक पर्वणीच असते. वडिलांना कोणत्या प्रकारच्या महागड्या गोष्टींमध्ये कधीच आवड नसते त्यांना आपल्या मुलांच्या आवडीनिवडी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात त्यांच्या आयुष्य निघून जाते, वडिलांना घट्ट मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकलो नाही तरी त्यांच्यासाठी खालील काही कवितांच्या चार ओळी जरी आपण अर्पण केल्या तरी त्यांच्यासाठी त्या‌ लाख मोलाच्या ठरतील.

आयुष्यभर आमच्यासाठी झिजत राहणाऱ्या , रात्रं दिवस काबाडकष्ट करणाऱ्या आणि आमच्या घराचा आधार स्तंभ म्हणजे च  आमचे    लाडके बाबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.🙏💐Birthday wishes for father in Marathi

birthday wishes for father in Marathi

आमच्या घराच्या अस्तित्वाला आणि घराला घरपण देणाऱ्या माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुमचा आजचा दिवस तुमच्या सारखाच खास जावो.

बाबा तुमचेआयुष्य म्हणजे परी जातकाचा सडा ,अंगणभर सांगून सगळ्यांना कायम सुगंध देणे.आजच्या दिवशी माझ्या या शब्दरूपी कवितेला माझ्या भावना समजून तुम्ही स्वीकार करावा. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जितके आयुष्यभर तूम्ही आमच्या साठी सुख दिलात . तितकेच भरभरून सुख आम्ही तुमच्या पदरात देवो. ईतके देवाने आम्हाला ‌
कर्तुत्ववान बनवावे हीच आजच्या खास दिनी इच्छा. माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

(birthday wishes for father in Marathi)

आमचे नावच काय तर आमचे आयुष्य सुद्धा तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. आमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या माझ्या लाडक्या बाबांना आजचा दिवस खूप सुखाचा जावो. 💐🎉❤️

स्वतः आयुष्यभर  जळत राहून आपल्या लेकरांच्या आयुष्याला प्रकाश देणाऱ्या मशालीला बाप म्हणतात. अशा माझ्या वडिलांना आई अंबाबाई आयुष्यभर सुख-समृद्धी आणि चांगले आयुष्य देवो.

जगाच्या बाजारात सगळं काही मिळेल पण माझ्या लाडक्या बाबांचे प्रेम या जगाच्या पाठीवर कुठेच भेटणार नाही अशा माझ्या लाडक्या बाबांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ,💐

मनामध्ये ज्याच्या आभाळात एवढं प्रेम. आणि डोळ्यांमध्ये पेक्षा धाक . आणि आपल्या लेकरावर जीव ओवाळून टाकणारा राजा माणूस म्हणजे  बाप ,अशा माझ्या लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉💐Birthday wishes for father in Marathi

Birthday wishes for father in Marathi

जिथे सगळे लाड न मागताच पूर्ण होतात. ज्यांच्या असण्यामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते. जिथे सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण होतात असे एकमेव ठिकाण म्हणजे बाबा. आणि अश्या माझ्या लाडक्या बाबांचा हा खास दिवस त्यांच्यासारखाच सुंदर जावो.

बाबा वाढदिवस जरी तुमचा असला तरी कामावरून येताना आमच्याच आवडीचा केक आणणाऱ्या 😅 माझ्या लाडक्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

बाबा याच जन्मात काय पुढच्या प्रत्येक जन्मात मला तुम्हीच माझे बाबा म्हणुन हवे आहात. तुमचा हा दिवस तुमच्यासारखाच स्पेशल जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ‌.🙏❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

वडिलांपेक्षा मोठे काही नाही. आपण स्वतःही नाही आणि तो देवही नाही. 💐(Birthday wishes for father in Marathi)

आई नसताना लहानपणापासून तुम्ही आमचा एकट्याने सांभाळ केला पण तिची पोकळी कधी तुम्ही आम्हाला जाणवू दिली नाही. म्हणून की काय माहित बाबा तुमचा दर्जा आयुष्यात देवा पेक्षा कमी नाही. आजच्या या मंगलदिनी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो इतकिच प्रार्थना 🙏

“मी आहे ना!” या चार शब्दांनी आमच्या आयुष्यातील संकटांना बाबा तुम्ही कायमच आधार दिला. बाबा तुमचा आजचाखास दिन आमच्यासोबत आयुष्यभर असाच आनंद देत राहो.🎉💐 तुम्हाला देव कायमच दीर्घायुष्य देवो.

तुमचा वाढदिवस आज आनंददायी खास आहे
लाभो तुम्हाला चिरतरुण आयुष्य हाच फक्त ध्यास आहे
माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💯Birthday wishes for father in Marathi

birthday wishes for father in Marathi

बाबा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा ,समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच आई अंबाबाईला प्रार्थन🙏

बाबा तुमचा हात आयुष्यभर चाललो आणि आमच्या आयुष्यातील वेडी वाकडे वळणे सुद्धा सरळ होत गेली. आजचा तुमचा जन्मदिवस म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणीच…🎉🙏💐 माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

आयुष्यभर असंख्य पुस्तके वाचली. पण माझ्या वडिलांनी जे ज्ञान आम्हाला दिले ते जगाच्या कुठल्याच पुस्तकात सापडले नाही. तुमचा आजचा वाढदिवस तुम्हाला भरपूर सारी सुख देऊन जावो.

आमचे दुःखाच्या काळजावर घातलेली सुखाची पांघर म्हणजे माझे बाबा , माझ्या लाडक्या बाबांचा वाढदिवस त्यांना दीर्घायुष्य देवो.

आयुष्यभर तुम्ही आमच्यासाठी झटत आलात आता फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे तुम्ही इथून पुढे आराम करावा आणि आम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधार द्यावा. आजचा हा शुभ दिन तुमच्यासाठी खूप सारे प्रेम, चांगले आरोग्य, सुख-समृद्धी घेऊन येवो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏💐

बाबा तुमच्या सावलीत आम्ही कायमच राज्य केलं. तुम्ही आयुष्यभर आम्हाला कोणत्याच गोष्टींची कमी पडू दिली नाही. तुमच्यासाठी जितके बोलावे तितके कमीच आहे, आजच्या या खास दिवशी फक्त इतकेच सांगू इच्छितो की,  तुमच्या धाकामुळे आमच्या आयुष्याला चांगल्या संस्कारांची शिदोरी लाभली . आजचा हा दिवस तुम्हाला वर्षानुवर्षी असाच सुखाचा जावा हीच देवाकडे इच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐Birthday wishes for father in Marathi

birthday wishes for father in Marathi

दिन आजचा खास, जन्मदिन तुमचा आज 🎉🙏💐 बाबा तुम्हाला खूप सारे प्रेम . वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

आम्ही आयुष्यात काही जरी केले , तरी आम्ही तुमचे पांग कधीच भेटू शकत नाही कारण तुमच्या एवढे प्रेम आमच्यावर आजपर्यंत कुणी केलेच नाही. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आमच्या जगण्याला खरा अर्थ तुम्हीच दिला.आज आम्ही आयुष्यात जे पण काही आहे ते फक्त आमच्या बाबांच्या पुण्याई मुळेच . तुमचे हे उपकार बाबा आम्ही कधीच फेडू शकत नाही.आज तुमचा जन्मदिन हा जन्मदिवस तुम्हाला खुप सारे प्रेम देवो.

आई जगदंबेच्या कृपेने तुमचा हा खास दिवस वर्षानूवर्ष असाच कायम तुमच्या आयुष्यात येतं राहो. आई जगदंबा तुमच्या पदरात भरपुर सुख देवो.हिच सदिच्छा.🙏

आशा व्यक्त करतो की आपल्याला या वडिलांच्या वरती लिहिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतिल . असेच तुम्हाला नवनवीन निबंध वाचायला आवडतं असतिल.तर खाली लिंक दिली आहे.नक्की भेट द्या, आणि तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका.

(birthday wishes for father in Marathi)

नवनवीन निबंध येथे वाचा

बाबा तुम्ही ग्रेट आहात

संतांचे विचार काळाची गरज

छत्रपती शिवाजी महाराज असते तर मराठी निबंध

श्यामची आई मराठी निबंध

माझी सहल मराठी निबंध

राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

बाबांचे गुणगान आणि त्यांचे महत्व कवितेमधून जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://youtu.be/LkBncejT90E?si=ktJ7C_IFzmOotntN