Sant vichar Marathi :
मिञ हो विज्ञानाच्या युगात आजही साधुसंतांचे विचार महत्वाचे वाटतात, कारण विचार हे परोपकाराची भावना निर्माण करणारे दुःखितांचे अश्नु पुसण्यासाठी मदत करणारे आहेत. संत साहित्य असो, की संत विचार असो, संतांच्या गाथा असो यातून सामाजिक जाणिव ठेवून समाज प्रबोधनाचे काम संतांनी आयुष्यभर केले आहे. माझ्या महाराष्ट्राला साधुसंतांचा वसा नि वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम मुक्ताबाई, संत नामदेव, संत गाडगेमहाराज चोखामेळा, संतू गोरा कुंभार, जनाबाई यासारख्या कित्येक थोरांच्या स्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. माझा महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतसाहित्यांने महत्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचे काम एका तेजस्वी ज्ञानसूर्याने केलं हा ज्ञानसूर्य म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज होय. वडील विठ्ठलपंत आणि माता रूक्मिणी यांनी प्रायश्चित म्हणून स्वतःचे आयुष्य संपवल्यावरही आळंदीकरांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा छळ थांबवला नाही. ज्या कर्मठ माणसांनी अनाथ ज्ञानदेवांच्या झोळीत भिक्षा ही घातली नाही. त्या माणसांच्या अज्ञानी झोळीत ज्ञानाचं भांडार ओतण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं.
sant vichar Marathi
इ.स. १३ व्या शतकात महाराष्ट्रात अज्ञान व अंधश्रद्धचे राज्य होते. अशा परिस्थितीतून माणसाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी मायबोली मराठीत ज्ञानेश्वरी ग्रंथ रचून ज्ञानाची कवाडे खुली केली. हा ग्रंथ सर्व ग्रंथसाहित्यात सर्वश्रेष्ठ त्यात मानला जातो.
जो रंजल्या गाजला आहे त्यालाच आपले म्हणारा करा साधु आहे , आणि तेथेच देव ओळखावा.
असे म्हणणारे संत तुकाराम है संत चळवळी तील कळस बनले. ते म्हणत पोट भरण्यासाठी ढोंग करु नका कष्ट करायला शिका, या जगात कुष्टाशिवाय कोणतेही गोष्ट शक्य नाही. तुस्तव देवात्त, पुजेत गुंतून बसू नका, कामात परमेश्वर शोधायला शिका है संत साहित्याने शिकवले
sant vichar Marathi
तुमचे मन जर स्वच्छ नसेल तर साबण. अंगाला घासून काहीच उपयोग नाही. साबणानं अंग स्वच्छ होईल पण मन स्वच्छ होणार नाही. संत तुकाराम हे नुसतेच कीर्तन करत नव्हते तर ते तितकेच पर्यावरणवादी, निसर्गाच्या सानिध्यात् राहूनु निसर्गाचे रक्षण करा म्हणणारे संत होते.
साहित्यामधून समाजातल्या लोकसंख्येविषयी स्वतःचे परखड मत मांडणारे तुकाराम हे तितकेच स्पष्ट वक्ते म्हणून पहावयास मिळतात.
संत नामदेवांनी, संत साहित्यातून सांगत जातीभेदावर त्यांनी हल्ला केला. बहुजन समाजासाठी भारुडामधून आध्यात्मिक व प्रापंचिक दैववाद दाखवून दिला. अशाप्रकारे महाराष्ट्राला मराठीला तीनशे वर्षे जगविण्याचे महान कार्य एकनाथांनी केले.
गोपाला, गोपाला असं म्हणत हातामध्ये देवकीनंदन गोपाल खराटा, फुटलेल मडक घेऊन ज्या माणसाने गावातली घाण स्वच्छ केली आणि रात्री आपल्या अमोघ
वत्कृत्वाच्या माध्यमातून गावातल्या लोकांची मनं स्वच्छे दारुबंदी व्यसनमुक्तीची चळवळ घरापासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या महामानवाने नेली त्या महापुरुषाचे नाव आहे राष्ट्रसंत गाडगेमहाराज.
गाडगेबाबांना ज्यावेळी कन्यारत्न झाले त्यावेळी एक प्रथा होती. मुलाच्या जन्मावेळी मांसाहार करावा. आजही ही प्रथा आपल्याला पहायला मिळते. आपल्याला मुल झालं हा आनंदाचा क्षण एखादया जीवाचा बळी घेऊन का साजरा करावा यात कसला आलाय आनंद. या प्रथेला फाटा देऊन गाडगेबाबांनी मुलाच्या जन्माचे स्वागत गोडधोड पद्धतीने करूया असा संदेश लोकांना दिला. असा आदर्शवाद येणाऱ्या पिढीसमोर ठेवण्याचे कार्य त्या काळात गाडगेबाबांनी केले. त्याची आज गरज आहे असे मला वाटते. राष्ट्रसंत गाडगेमहाराज या देशात करोडो लोकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. त्या काळात त्यांनी स्वतःच्या कृतीने स्वच्छतेचा जो मुलमंत्र दिला आहे तो आजही आपल्याला उपयोगी आहे. महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबांच्या स्मरणार्थ संत गाडगेबाचा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले आहे.
आधी हाताला चटकेतवा मियते भाकर ।
ही बहीणाबाईची ओवी आजही प्रसिद्ध आहे. ज्यातून त्यांनी अतिशय समर्पक शब्दात संसाराचे वर्णन केले आहे. पती निधनानंतर त्यांच्यावर लहान दोन मुलांची व कुटुंबाची जबाबदारी आली पण त्या डगमगल्या नाहीत हे त्यांच्या ओवीतून दिसून येते. धरित्तीच्या आरशामध्ये सरग पाहणारी ही कवयित्री या हीणसाला रोखठोक प्रश्न विचारते हे त्यांच्या ग्रामीण साहित्याचं मोठे पण आहे.
” मानसा मानसा कधी होशील मानूस “
मानवतेला त्यांनी दिलेल्या या अमर संदेशाने तर मानवतेला मराठी वाङ्मयात अढळ्च करून ठेवलेले आहे. स्थान
sant vichar Marathi
जेंव्हा हाताला चटके बसतात तेंव्हाच भाकरी मिळते आणखी यालाच संसार म्हणतात.
ही बहीणाबाईची ओवी आजही प्रसिद्ध आहे. ज्यातून त्यांनी अतिशय समर्पक शब्दात संसाराचे वर्णन केले आहे. पती निधनानंतर त्यांच्यावर लहान दोन मुलांची व कुटुंबाची जबाबदारी आली पण त्या डगमगल्या नाहीत हे त्यांच्या ओवीतून दिसून येते. धरित्तीच्या आरशामध्ये सरग पाहणारी ही कवयिञी माणसाला रोखठोक प्रश्न विचारते हे त्यांच्या ग्रामीण साहित्याचं मोठे पण आहे.
” मानसा मानसा कधी हशील मानूस “
मानवतेला त्यांनी दिलेल्या या अमर संदेशाने तर मानवतेला मराठी वाङ्मयात अढळ्च करून ठेवलेले आहे
मित्रहो १९ व्या शतकातील म. फुले गांधी, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू. कर्मवीर भाऊराव पाटील, आगरकर राममोहन राय यासारख्या समाजसुधारकांनी संतांचेच अपुरे कार्य पुढे सुरु ठेवले आणि ज्ञानाचा दिवा झोपडीपर्यंत नेऊन पोहचला
sant vichar Marathi
संत काव्याची जोडी केवळ महाराष्ट्रातील भारतीय लोकांपुरतीच मर्यादित राहीलेली नाही तर ती परदेशातही लोकांपर्यंत पोहचली आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संत साहित्यावर संशोधन व अभ्यास वर्गाची सुरुवात झाली आहे. ज्ञानेश्वरांनी लिहीलेली ज्ञानेश्वरी जगातील अनेक भाषांमध्ये रुपांतरीत झाली आहे.
संतांच्या वाणीमुळे आपले आयुष्य सुसंस्कृत झालेले आहे. शाळेमध्ये सगळ्यात पहिला शिकवले जातात ते म्हणजे संतांचे सुविचार कारण यामध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. संस्कृत आयुष्यात चांगला विचारांची संगत मिळाली की मग आपले आयुष्य सुफळ झाले असे म्हणण्यास हरकत नाही.महात्मा गांधींच्या एका विचारामुळे आपल्याला आयुष्यभर कसे वागावे याची शिकवण मिळून जाते. वाईट पाहू नका, वाईट बोलू नका, आणि वाईट ऐकू नका. या छोट्या उक्तीमध्ये जीवनाचे संपूर्ण सार दडलेले आहे.
संत गाडगेबाबांच्या कायम स्वच्छता ठेवा यामध्ये तर आपले सारे आरोग्य निगडित आहे. या सर्व संतांनी आपल्या समाजाला दिलेले विचार इतके प्रभावशाली आहेत की हे विचार वर्षानुवर्ष एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे वाटचाल करत आहेत. कारण त्यांच्या विचारामुळे आपल्या आयुष्यात होणाऱ्या अमुलाग्र बदल घडवण्यासाठी हे विचार कायम प्रयत्नशील आहेत.संत ज्ञानेश्वरांनी दिलेल्या शिकवणीमुळे आजही आपल्या महाराष्ट्रातील वारकरी समाज पायी वारी करून त्यांच्या विचारांचे आभार मानतो. वारकरी समाजात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम तसेच विठू माऊली या संतांच्या शिकवणीमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेले आहे.(Sant vichar marathi)
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस, भरकटलेला दिसून येतो. आजही जातीभेद, पंथभेद उच्चनीचता अंधश्रदध आपल्यात दिसून येतात त्यामुळे मनुष्याने संत साहित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाचं तत्वज्ञान समजावून जर वाटचाल केली तर त्याची दिशाभूल कधीच होणार नाही
संत साहीत्य काळाची गरज आहे. पर्यावरणाचे महत्व , स्वच्छतेचे वृक्षांचे महत्व, संसार म्हणजे काय हे सांगण्याचे कार्य ही या संत साहित्यानेच केलेले आहे. गाडगेबाबांनी दगडात देव नसून माणसात देव आहे हे सांगितले पण अजूनही मानवाला या संत साहित्याचे महत्व कळलेलं नाही. भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या मानवाकडे सुख, शांती याचीच कमतरता दिसून येते. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे मनुष्य मनःशाती, समाधान हरखून बसलेला अशा मानसिक आजारांवर एकच औषध आहे ते म्हणजे संत साहित्य होय.
शेवटी मी एवढच म्हणेन
“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालेसे कळस ।
संत साहित्याची माळ, विठू झालेसे तुळस ॥
(sant vichar Marathi)
धन्यवाद
असेच नव नवीन निबंध वाचा
- राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध https://knowledge.org.in/wp-admin/post.php?post=454&action=edit
- छञपती शिवाजी महाराज असते तर https://knowledge.org.in/wp-admin/post.php?post=423&action=edit
sant vichar Marathi https://youtu.be/w_PbRP7Wgcw?si=6MlOW5TQ0Ni4MwGB