weight gain recipe for babies / या रेसिपी ने झपाट्याने वजन वाढेल.

Weight gain recipe for babies -नवजात मुले जन्माला आली की सगळ्यात अगोदर त्यांचे वजन चेक केले जाते. तसे बघायला गेले तर प्रत्येक बाळाचे वजन हे वेगवेगळे असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार निरोगी बाळासाठी त्याचे वजन हे अडीच किलोच्या वरती हवे. बऱ्याच वेळा असे होते की जन्माला आल्यावर लहान मुलांचे वजन जास्त असते आणि ते जसे जसे मोठे होत जातात असे त्यांचे वजन कमी होत जाते. याउलट ज्या नवजात बाळांचे वजन कमी असते त्यांचे वजन त्यांच्या वाढीनुसार दुप्पट वाढत जाते. पण ज्या नवीन माता आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न पडतो की आपल्या लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी त्यांना कोणते असे अन्नपदार्थ द्यावेत ज्यामुळे त्यांचे वजन लवकर वाढले जाईल. तर  या लेखामध्ये मी तुम्हाला लहान बाळांसाठी वजन वाढीसाठी उपयुक्त असे काही पदार्थ सांगणार आहे. जे लहान बाळांसाठी हेल्दी असतील आणि वजन सुद्धा लवकर वाढेल. तर चला तर मग बघूया असे कोणते अन्नपदार्थ आहेत.( Weight gain recipe for babies)

हे सुद्धा वाचा -लहान मुलांच्या आजारांवर घरगुती उपाय

1) बटाटा-
   जेव्हा लहान बाळाला आपण बाहेरचे अन्य पदार्थ सुरू करतो. तेव्हा बटाटा हा एक लहान बाळांच्या वाढीसाठी उपयुक्त असा अन्नपदार्थ आहे. पण सुरुवातीला बटाटा लहान बाळांना देत असताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे बटाटा मुळे लहान बाळांना गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात लहान बाळाला बटाटा द्यावा. बटाटा हा चांगला शिजवून त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून आपण लहान बाळाला देऊ शकतो. किंवा एक वर्षाचे झाले असल्यास त्याला बटाट्याची भाजी  मिरची थोडी कमी घालून केलेली भाजी आपण बाळाला देऊ शकतो.(Weight gain recipe for babies)

२) साबुदाणाWeight gain recipe for babies
    साबुदाणा हा सुद्धा एक उत्तम प्रतीचा अन्नपदार्थ म्हणून वजन वाढीसाठी ओळखला जातो. तसेच लहान मुलांच्या वाढीसाठी आवश्यक  असणारे घटक साबुदाणा मध्ये उपलब्ध असतात. साबुदाण्याची खीर जर लहान मुलांना दररोज खायला दिली तर  तेजिने वजन वाढायला सुरुवात होते. साबुदाण्याच्या खिरीमध्ये साखरेऐवजी खडीसाखर घालून खीर केली आणि जर ती लहान मुलांना खाऊ घातली तर लहान मुलांचे वजन वाढण्यास फार मदत होते.(Weight gain recipe for babies)

३) केळी-
  लहान मुलांना केळी हा पचायला हलका असणारा आणि भरपूर पोषण देणारा अन्नपदार्थ आहे. लहान मुलांना दररोज एक तरी केळी खायला द्यावी. त्यामध्ये असणारे पोटॅशियम लहान मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच केले लहान मुलांना भरपूर एनर्जी सुद्धा मदत करते. जर तुम्ही लहान मुलांना इलायची केळी देत असाल तर अजूनच उत्तम. इलायची केळी मुळे लहान मुलांना सर्दी,कफ, खोकल्याचा त्रास होत नाही. अर्धा वाटी दुधामध्ये एक इलायची केळी मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट्स पावडर आणि चिमूटभर साखर टाकून लहान मुलांना दिली तर लहान मुलांना रोज खायला दिले तर वजन झपाट्याने वाढते.

weight gain recipe for babies

Weight gain recipe for babies

४) सफरचंद-
सगळ्या फळांमध्ये लहान मुलांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम असे फळ म्हणजे सफरचंद. लहान मुलांना सफरचंद देताना जर मूल एक वर्षाच्या आतील असेल. तर सुरुवातीच्या काळात  सफरचंदाची साल काढून. त्याचे बारीक तुकडे करून पाण्यामध्ये वाफवून घ्यावे आणि मग लहान मुलांना खायला द्यावं. आणि जर मुल एक वर्षाच्या वरील असेल तर फक्त सफरचंदाची साले काढून आपण लहान बाळाला देऊ शकतो.Weight gain recipe for babies

weight gain recipe for babies

हे सुद्धा वाचा – नवजात बाळासाठी बाळगुटी

) ड्रायफ्रूट्स पावडर
    ड्रायफूट पावडर ही अतिशय पोषक आणि पौष्टिक लहान मुलांच्या वाढीसाठी आहे. वाठीभर  वाळलेले खारीक, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू , अर्धी वाटी अक्रोड या सर्व ड्रायफ्रूट्स मंद आचेवर पाच मिनिटे भाजून मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यावी. आणि दररोजच्या दुधामध्ये ही पावडर भिजवून आपण लहान मुलांना देऊ शकतो. किंवा जर शिरा किंवा अन्य कोणतेही गोड पदार्थ केले तर त्यामध्ये एक चमचा ड्रायफ्रूट्स पावडर टाकून आपण लहान मुलांना देऊ शकतो.

६) सर्व डाळींचे मिश्रण-(weight gain recipe for babies)
    लांबच्या प्रवासाला किंवा अगदी झटपट असा होणारा अन्नपदार्थ लहान मुलांना द्यायचा असेल ‌. तर आपण ही पावडर तयार करून ठेवू शकतो. यासाठी एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूरडाळ किंवा तुमच्या आवडीनुसार थोडे ड्रायफ्रूट्स. चांगले स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. तीन ते चार तास हे डाळ तांदूळ चांगले वाळवून घ्यायचे आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा धने जिरे पावडर टाकण्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. हे आपले तयार करायचे मिश्रण तयार झाले. आता जेव्हा आपण लहान बाळाला झटपट असा  पदार्थ करून द्यायचा असेल. तर एक वाटी पाण्यामध्ये दोन चमचे हे मिश्रण टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि गॅसवर पाच ते दहा मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता.

भाज्यांची खिचडी-(weight gain recipe for babies)
    बाळ सात ते आठ महिन्याचे झाले की आपण जेव्हा त्यांना वरचे अन्न द्यायला चालू करतो तेव्हा सर्व भाज्यांची मऊ खिचडी करून बाळाला दिले तर ते अतिशय पौष्टिक आणि पोट भरणारे असे अन्न‌असते . यामध्ये बटाटा गाजर, बिट, गेम्स, तसेच तुमच्या सोयीनुसार कोणत्या आवडत्या भाज्या आहेत त्या भाज्या स्वच्छ दोन बारीक चिरून घ्यायचे आहेत.  आणि या भाज्यांमध्ये थोडासा इंद्रायणी तांदूळ कारण तो शिजायला हलका आणि मऊ होतो आणि थोडीशी मुगडाळ किंवा तूर डाळ हे सारे मिश्रण घेऊन यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आणि थोडेसे चमचाभर तूप टाकून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत.  त्यानंतर एका छोट्या पातेल्यामध्ये चमचाभर तुपामध्ये जिरे आणि मोहरी यांची फोडणी द्यायची आहे. अशी परी पूर्ण खिचडी तब्येतीसाठी अतिशय पौष्टिक आणि लहान बाळांच्या वजन वाढीसाठी उपयुक्त ठरते.Weight gain recipe for babies

weight gain recipe for babies

चिकन सूप-
  
मुख्यतः नॉनव्हेज हे सर्व मुलांना सुरुवातीच्या काळात पचेल असे नाही. त्यामुळे नॉनव्हेज सूप लहान मुलांना देत असताना सुरुवातीच्या काळात अगदी थोड्या प्रमाणात द्यावे. नंतर त्यांना सूट झाल्यानंतर जास्त प्रमाणात दिले तरी चालते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात दक्षता घ्यावी. आता चिकन सूप तयार करण्यासाठी. चिकनचे पाच ते सहा पीस स्वच्छ धुऊन त्याला आलं लसूण आणि टोमॅटो यांची पेस्ट लावावी. यामध्ये चिमूटभर हळद मीठ आणि चवीनुसार लाल तिखट लावून 15 ते 20 मिनिटे मॅरिनेशन साठी ठेवावे. नंतर एका कुकरमध्ये छोट्या आकाराचा कांदा कट करून तेलामध्ये फोडणी द्यावी. लहान मुलांना सूप तयार करत असताना तेलाचे प्रमाण अगदी कमी वापरावे. भाजलेल्या कांदा मध्ये मॅरीनेशन केलेल्या चिकन टाकून. एक ग्लास पाणी ओतावे. त्यानंतर कुकरला पाच ते सहा शिट्ट्या द्यावे. अशाप्रकारे हे चिकन सूप तयार आहे. लहान मुलांना कोणत्याही प्रकारची नॉनव्हेज देताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे नॉनव्हेज हे चांगले शिजलेले असावे. काहीतरी लहान मुलांचे पोट बिघडण्याचे शक्यता असते.(Weight gain recipe for babies)