shala band zalya tar nibandh/ शाळा बंद झाल्या तर…

Shala band zalya tar nibandh -शाळा बंद पडल्या तर? हा प्रश्न हा प्रश्न जर एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याला विचारलं तर नक्कीच त्याला आनंद होईल कारण शाळा म्हणजे बंधने, अभ्यास त्यांचे समीकरण हे बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठासलेले आहे.  जर शाळा बंद पडला तर निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याला आनंद होईल ना कोणता अभ्यास, कोणती बंधने आहे, फक्त खेळ आणि मुक्त संचार हवे तेवढे खेळावे मनसोक्त बागडावे हे झाले निरागस मुलांचे मन! पण जर शाळा कायमच्याच बंद पडल्या तर आयुष्याच्या शाळेत जगायचे कसे हे ज्ञान आपल्याला कोण देईल?

कारण शाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील गुरु या गुरुमुळे आपण आयुष्यात आपल्या पायावर खंबीर उभा राहतो. आयुष्य जगत असताना आपल्या शाळेने दिलेली शिक्षण हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते. शाळेने दिलेल्या ज्ञानामुळे आपण आपल्या आयुष्यात जे आपले ध्येय आहे आपल्याला मोठे म्हणजे बनायचे आहे म्हणजेच डॉक्टर, इंजिनियर, वकील ,पोलीस, सरकारी अधिकारी आपण कसे बनवू शकणार? आणि यांच्यामुळे आपल्या समाजाचा विकास कसा होणार? हे सारे शक्य आहे ते फक्त शाळेमुळेच.Shala band zalya tar nibandh

shala band zalya tar nibandh

  आपण कितीही बाहेर ट्युशन लावले तरी शाळेतून मिळणारे ज्ञान हे आपल्या आयुष्याच्या मुख्य पाया आहे. शाळेसारखा दुसरा कोणताच गुरु या जगात नाही. कारण तिथे एक प्रकारचा धाक असतो. ज्या धाकामुळे आपले आयुष्य सुसंस्कृत घडत जाते. शिक्षणामुळे या जगाला भरपूर सारी मोठी माणसे भेटलेली आहे जसे की एपीजे अब्दुल कलाम, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, किरण बेदी, न्यूटन असे लाखो शास्त्रज्ञ तयार झाले ते म्हणजे फक्त शिक्षणामुळेच. खेड्यापाड्यातील लोकांचे जीवन हे फक्त शेती वरती अवलंबून असते.

आपली मुले शिकून मोठी व्हावी आणि आपली परिस्थिती बदलावी त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण जर शाळा बंद झाल्या तर खेड्यापाड्यांचा विकास कसा होईल? त्यामुळे माणसांच्या आयुष्य हे संपूर्णपणे शाळा आणि शिक्षण यावरतीच अवलंबून आहे. शाळा बंद झाल्या तर फक्त विद्यार्थ्यांचेच नाही तर खेड्यापाड्यांचे, शाळेवरती अवलंबून असलेल्या सामाजिक घटक, छोटे-मठे उद्योगधंदे
यांच्यावरती सुद्धा भरपूर प्रमाणात फरक पडेल.Shala band zalya tar nibandh     (Shala band zalya tar nibandh)

लहानपणी शाळेतील गोष्टी त्रासदायक वाटत असल्या तरी जेव्हा ही शाळा आपल्यापासून सुटते तेव्हा मात्र आयुष्यातील सुंदर प्रवास म्हणजे शाळाच होती असे वाटते. शाळेमुळे आपल्याला जीवाभावाचे मित्र भेटतात. आणि हे मित्र आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात कारण ही मैत्री भरपूर पक्की असते. आयुष्यात आपल्याला धाडस निर्माण करणारी शाळाच असते. हजारो विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहून भाषण देण्याचे बळ आपल्याला शाळाच देते. इथूनच तर हळूहळू आपल्याला आत्मविश्वास  यायला चालू होतो. या साऱ्या गोष्टी शाळे शिवाय आपल्याला कुठेच भेटू शकत नाही ‌ म्हणूनच जर शाळा बंद पडल्या तर आपल्याला जीवाभावाचे मिञ कुठे मिळणार?

Shala band zalya tar nibandh

शाळा बंद पडली तर , शाळेमध्ये दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या सहली यांची मजा कोठून येणार? शाळेतील सहल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक न विसरणारा अनुभव असतो. सहली मध्ये केली जाणारी मजा‌ खूप वेगळी असते. शाळेमध्ये दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन ,गॅदरिंग, नाटके त्यांची मजा सुद्धा आपल्याला भेटणार नाही. शाळेतील गॅदरिंग साठी आपण दरवर्षी उत्सुक असतो. दरवर्षी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा ,श्रमदान शिबिर यांचा अनुभव आपल्याला कुठे भेटणार? कारण असे कार्यक्रम आपण फक्त शाळेमध्ये सांगू शकतो.

शाळा बंद झाल्या तर शाळेमध्ये जे उत्सव साजरे केले जातात जसे की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे आपल्या राष्ट्रीय सणा दिवशी शाळेमध्ये जे उत्सव साजरे केले जातात त्याचे आपण वर्षभर वाट  पाहत असतो. या सणानिमित्त गावातून निघणारी रॅली, भाषणे हे सारे आनंदाचे वातावरण आपण फक्त शाळेमध्येच अनुभव शकतो. शाळेमध्येच आपण स्वच्छतेचे महत्व, आपल्या सामान्य ज्ञानाचे महत्त्व, झाडे लावा झाडे जगवा यासारख्या महत्त्वाच्या विषयांचे महत्त्व हे आपण शाळेमध्येच तर अनुभवतो. जर शाळाच कायमचा बंद झाल्या तर ही सगळी मजा कुठून भेटणार?(Shala band zalya tar nibandh)

शाळा बंद झाल्या तर मुलांच्या मानसिकतेवर सुद्धा त्याचा परिणम आपल्याला दिसून येईल . कारण त्यांचे मानसिक  विकासाचे केंद्रस्थान हे फक्त शाळा आहे. लहान मुलांचा सामाजिक संबंध कमी होऊन जाईल. त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होईल. आणि यामुळेच याचा प्रभाव समाजावरती सुद्धा पडेल. समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळा येईल.  दरवर्षी होणाऱ्या सहली साहित्य संमेलन, स्पर्धा परीक्षा त्यांची मजा आपल्याला भेटणार नाही.

  शाळा    बंद पडल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याचे नुकसानच आहे. दरवर्षी आपण ऑलिंपिक  सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धा मध्ये बघतोय चे किती सारे खेळाडू त्यांच्या खेळामध्ये घवघवीत यश मिळवत असतात. हे सारे एक दोन वर्षांमध्येच घडते असे नाही. आयुष्यात यश मिळवण्यासाठी त्याचा पाया हा शाळेपासूनच बनवावा लागतो. हे सारे खेळाडू शाळेमध्ये असल्यापासूनच आपल्या खेळांमध्ये आवड निर्माण करून त्यावरती परिश्रम करून हे यश मिळवतात. या साऱ्या गोष्टींची सुरुवात ही शाळेपासूनच होते     म्हणूनच म्हटले जाते की शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आयुष्य घडवणारी देवता आहे.(Shala band zalya tar nibandh)
    

शाळेमध्ये आपण आपल्या आवडीचे विषय आनंदाने शिकत असतो. त्याचा फायदा निश्चितच आपल्याला पुढे जाऊन होतो . आज तुम्ही कोणत्याही एका मोठ्या अधिकाऱ्याला विचारले कि  तुमच्या आयुष्यातील तुमचे करिअर घरी होतानाचा महत्त्वाचा टप्पा  कोणता? तर निश्चितच त्यांच्याकडून शाळा आहे उत्तर येईल. म्हणून शाळा बंद पडला तर हा हा प्रश्न फक्त दहा मिनिटे म्हणाला समाधान देत असला तरी आपल्या पुढच्या आयुष्याचे काय?Shala band zalya tar nibandh

Shala band zalya tar nibandh

आजकालचे आयुष्यात के धावपळीचे झाले आहे की कुठेच मानसिक समाधान आपल्याला भेटत नाही ‌. आयुष्यात आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला समजते की शाळेचे  आयुष्य हेच सर्वात समाधानकारक असे आपले आयुष्य होते. म्हणूनच जर शाळा बंद झाल्या तर आयुष्यात या सुंदर आठवणींची शिदोरी आपण जमा करू शकणार नाही.
      शाळा बंद झाल्या तर आपल्याला मोठे मोठे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी कोठून भेटणार? आणि जर शास्त्रज्ञ भेटले नाही तर आपल्या आयुष्य सुखकर कसे होणार? (Shala band zalya tar nibandh)

जेव्हा आपण आयुष्यात एक आपले ध्येय साध्य करतो. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवण येते ती म्हणजे आपल्या शाळेची आणि आपल्या शाळेतील शिक्षकांची. कारण त्यांचा आपल्या ध्येय  साध्य करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा असतो.

आपण दररोजच्या आयुष्यात जगत असणाऱ्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी आपण पहिल्यांदाच शिकतो ते म्हणजे शाळेमध्येच. आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचा श्री गणेशा शाळेमध्येच केला जातो
      शाळा बंद झाल्या तर काही विद्यार्थी खुश होतील पण हा त्यांचा आनंद थोड्या काळा पुरताच मर्यादित राहील. कारण जेव्हा सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेऊन झाल्यानंतर परत त्यांना शाळेची आठवण येईल हे मात्र नक्कीच..(shala band zalya tar nibandh)
  
  शाळा कायमच्याच बंद झाल्या तर शिस्त कुणालाच लागणार नाही. त्यामुळे या जगात गुन्हेगारीचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढेल. शाळेतील या शिस्ती  मुळेच आपल्या आयुष्यात आपल्यावर चांगले संस्कार घडतात. शाळा बंद झाली तर सामाजिक राजकीय तसेच व्यक्तिगत आयुष्यात भरपूर चुकीचे परिणाम होतील. दिवसांनी दिवस आपली प्रगती होण्यापेक्षा आपली अधोगती होत जाईल.आणि आपण लहानपणापासूनचे आपण जे स्वप्न पाहतो त्या आयुष्यात साध्य करण्यासाठी आपल्याला एक मार्ग मिळतो. म्हणून शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळा बंद झाल्या तर…. फक्त कल्पनाच बरी आहे प्रत्यक्षात मात्र असे कधीच घडायला नको….

. नवनवीन निबंध येथे वाचा

मी सरपंच झालो तर मराठी निबंध

श्यामची आई मराठी निबंध

मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध

माझी शाळा कविता – https://youtu.be/LxbcRR3PkVI?si=WMGy0Sg7TfEXPIR7