Dandruff home remedies in Marathi : केसांमध्ये कोंडा होणे ही एक सर्वांना सतवणारी समस्या बनलेली आहे. केसांमध्ये कोंडा झाला तर तो फक्त केसांपुरताच मर्यादित न राहता त्यामुळे चेहऱ्यावरती पुरळ फोड त्याचप्रमाणे आपल्याला इन्फेक्शनचा धोका असतो. पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांमधील कोंडा कसा कमी करायचा हे आज आपण पाहूयात.
Dandruff home remedies in Marathi : केसांमधील कोंडा कमी करा अगदी सोप्या पद्धतीने
केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
१) खोबरेल तेल आणि लिंबू
हा सर्वात सोपा आणि प्रत्येक जण करू शकणारा सोपा असा घरगुती उपाय आहे. तर यामध्ये चार चमचे खोबरेल तेल गरम करून घ्यायचे आहे. तसेच यामध्ये चार चमचे लिंबाचा ज्यूस चार चमचे मिक्स करायचे आणि हे मिश्रण आपल्या केसांना लावून केसांच्या मुळांना मसाज करायचा आहे. त्यामुळे तेल आणि लिंबाचे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत जाईल. त्यानंतर तीस मिनिटांनी केस चांगले शाम्पू ने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.
यामुळे डँड्रफ कमी होण्यास तर मदत होईलच पण केसांना सुद्धा एक प्रकारचे नरिशमेंट भेटेल. तसेच यामुळे कोणत्याही प्रकारचे घातक दुष्परिणाम आपल्या केसावरती होणार नाही.
२) दही
या उपायामुळे एका वापरामध्येच तुम्हाला केसांमधील कोंडा कमी झालेला दिसून येईल. तर यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये अर्धी वाटी भरली जाशील असे दही घ्या. केसांच्या मुळापाशी दही चांगले लावून पंधरा मिनिटानंतर केस चांगले शाम्पू ने धुवून घ्या यामुळे केसांना मॉइश्चरायझर भेटेल आणि कोंडा सुद्धा कमी होईल.
हे सुद्धा वाचा – कोरीयन स्किन मिळवा आता फक्त ७ दिवसात
३) मेथीदाण्याची पेस्ट
मेथी दाण्याची पेस्ट करण्यासाठी मेथी जवळपास अर्धी वाटी आदल्या दिवशी रात्री भिजत घाला दुसऱ्या दिवशी याची मिक्सरला बारीक पेस्ट करून केसांना अप्लाय करा. पेस्ट लावल्यानंतर एक तास केसांमध्ये चांगली मुरू द्या. एक तासानंतर हेच चांगले पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
४) बेकिंग सोडा
बेकिंग सोडायच्या वापरामुळे सुद्धा आपण केसातील कोंडा कमी करू शकतो पण हा उपाय करताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे बेकिंग सोडा जास्त वेळ आपल्या केसांमध्ये मुरू द्यायचा नाही. हा उपाय केल्यानंतर लगेचच एक मिनिटाच्या अगोदर आपले केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर यासाठी आपले केस ओलसर करून घ्या आणि एक चमचा बेकिंग सोडा ज्या ठिकाणी कोंडा जास्त वाटतो . तिथे अप्लाय करा .. आणि लगेच 30 ते 40 सेकंदामध्ये पाण्याने आणि शाम्पू ने स्वच्छ आपले केस धुऊन घ्या.
५) एप्पल साइडर विनेगर
ॲपल साइडर विनेगर त्याच्यामुळे केसातील कोंडा कमी करण्यास मदत होऊ शकते यासाठी एका वाटीमध्ये जितके आपण एप्पल साइडर विनेगर येणार आहोत तितक्याच प्रमाणात त्यामध्ये पाणी मिक्स करावे आणि हे मिश्रण केसांच्या मुळांना लावावे. आणि केसांच्या मुळांना चांगला मसाज करावा पंधरा मिनिटानंतर तेच चांगले शाम्पू ने स्वच्छ धुऊन घ्या.
६) कडुलिंबाचा रस
कडुलिंबाचा वापर हे कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी केला जातो केसातील कोंडा हे सुद्धा एक प्रकारचे इन्फेक्शनच आहे. त्यामुळे कडू लिंबाचा रस केसांना लावल्यास केसातील कोंडा मुळापासून कमी होण्यास मदत होते. तर यासाठी कडुलिंबाची पाने मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी. जाडदार पेस्ट आपल्या केसांच्या मुळांना लावावी. आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर एक चांगले स्वच्छ धुऊन घ्या. या उपायामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल .
७) पिकलेले केळे आणि ऑलिव्ह ऑइल
पिकलेल्या केळ्यामध्ये अशा प्रकारचे मिनरल्स असतात ज्यामुळे आपण केसातील कोंडा कमी करू शकतो. तर यासाठी एक चांगले पिकलेले केळे घ्या. त्या पिकलेल्या केळ्याचे पेस्ट करून घ्या यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल घाला. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर खोबरेल तेलाचा सुद्धा वापर करू शकता. हे मिश्रण केसांना लावून पंधरा मिनिटानंतर केस चांगले शाम्पू ने दोन घ्या . हा उपाय करताना पिकलेल्या खेळामध्ये ऑइल घालण्यास अजिबात विसरू नका नाहीतर केळ्याची पेस्ट केसांमधून निघण्यास त्रास होईल.
८) टी ट्री ऑइल
या उपायामुळे कोंड्यामुळे जे खाज येते ती कमी होण्यास मदत होते. तरी या उपायासाठी टी ट्री ऑइल चे चार थेंब आपल्या शाम्पू मध्ये मिक्स करा हा शाम्पू तुमच्या केसांच्या मुलांना मसाज करून केस धुवून घ्या यामुळे तुमच्या कोंड्यामुळे येणारे खाज कमी होण्यास मदत होईल. तसेच केसातील कोंडा सुद्धा कमी होईल.
९) कोरफडीचा रस
हा उपाय आठवडाभर जर तुम्ही केला तर पूर्णपणे केसातील कोंडा निघून जाईल. त्यासाठी कोरफड मधून सुरीने कट करून घ्या यातील रस चमच्याच्या साहित्याने काढून एका डब्यामध्ये साठवून तुम्ही फ्रिजमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचा रस दररोज केसांच्या मुळांना लावून मसाज करा. दररोज रात्री केसांना कोरफड लावून सुद्धा तुम्ही झोपू शकता. आणि सकाळी उठून शाम्पूच्या मदतीने के स्वच्छ धुऊन घ्या.
१०) कापूर
कापूर मध्ये जेव्हा आपल्याला कोंडा मुळे केसांमध्ये खाज येते तेव्हा ती खाज कमी करण्याची कूलिंग प्रॉपर्टी यामध्ये असते. तर यासाठी एक ते दोन कापूर दोन चमचेखोबरेल तेलामध्ये विरघळून घ्या आणि हे तेल केसांच्या मुळांना लावून मसाज करून घ्या. आणि पंधरा मिनिटानंतर केस चांगले स्वच्छ धुऊन घ्या.
११) रोज मेरी ऑइल
या तेलामध्ये जे आपल्या शेतामध्ये एक प्रकारचे सिबम म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने आपल्या स्काल्पमध्ये जे तेल तयार होते ते कधी कधी जास्त प्रमाणात तयार होते तर रोज मेरी ऑईलचा वापर करून सिबम बॅलन्स करण्यासाठी आपण वापर करू शकतो. तर यासाठी रोज मेरी ऑइल आणि खोबरेल तेल याचे समप्रमाणात मिश्रण घेऊन आपल्या केसांच्या मुळांना मसाज करून दहा ते पंधरा मिनिटे ठेवा आणि त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. या उपायामुळे सुद्धा आपला केसातील कोंडा तर कमी होईलच त्याचप्रमाणे आपल्या केसांची गळती सुद्धा थांबेल. अन केसांची वाढ होण्यास मदत होईल.
केसात मध्ये कोंडा होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
आज-काल हेअर स्टाईल करण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात प्रोडक्ट्स वापरतो त्यांच्या अति वापरामुळे सुध्दा आपल्या केसाचा स्काल्प ड्राय होतो. आणि केसांमध्ये कोंडा बनण्यास सुरुवात होते तर यासाठी जे आपल्या केसांना घातक असे केमिकल्स असणारे हेअर प्रोडक्ट्स असतात त्यांचा वापर कमी करा आणि शक्यतो जमत असेल तर आयुर्वेदिक केसांसाठी वापरा.
जास्त गरम पाण्याने डोक्यावरून अंघोळ केल्यामुळे आपल्या केसांची मुळे कोरडी पडतात. तसेच आपली त्वचा सुद्धा कोरडी पडते. त्यामुळे केस धुत असताना हलक्या कोमट पाण्याने धुवा त्यामुळे केसांमध्ये कोंडा होणार नाही.
आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांच्या मुळांना मसाज नक्की करा.
जमत असेल तर महिन्यातून दोन वेळा कडुलिंबाच्या पाण्याने डोक्यावरून आंघोळ करायला विसरू नका त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर ते निघून जाईल.
केसांच्या वाढीसाठी दररोज कच्चा कढीपत्ता नक्की खा किंवा आपल्या आहारात भरपूर प्रमाणात कडीपत्ता चा समावेश करा त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी मदत होईल.
केसांना वापरण्यात येणारा शाम्पू हा माइड असावा त्यामध्ये असणारे घटक हे जास्त केसांना डॅमेज करणारे नसावे.
महिन्यातून एकदा केसांना आयुर्वेदिक मेहंदी नक्की लावा त्यामुळे सुद्धा केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे?
१) आपले केस आठवड्यातून स्वच्छ न धुणे.
२) सतत शाम्पू बदलणे.
३) आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती तसेच योग्य प्रकारचा डायट न घेणे.
४) आपली त्वचा ड्राय असणे.
५) अतिशय गरम पाण्याने केस धुणे.
Recent Comments