Uric acid home remedies marathi : यूरिक ॲसिड हा एक आपल्या बॉडी मधील वेस्ट पदार्थ आहे जो की आपल्या मूत्राद्वारे बाहेर टाकला जातो पण आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, कमी पाणी पिणे जास्त प्रोटीन असणारे अन्य पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणे यासारख्या चुकीच्या गोष्टीमुळे शरीरामध्ये यूरिक ॲसिड दिवसेंदिवस वाढत जाते आणि ते एका जॉईंट भागामध्ये साचले जाते. ते शरीराच्या एका ठिकाणी साचल्यानंतर खूप वेदनादायी त्रास होऊ लागतो. यूरिक ॲसिड चा गोळ्या मुळे आपल्याला किडनीला सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे घरच्या घरीच युरिक ऍसिड कसे कमी करावे हे आपण पाहूयात.
Uric Acid Home Remedies Marathi : युरीक ऍसिड कमी करा सोप्या पद्धतीने
यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी घरगुती उपाय
१) यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी एक चमचा ओवा घ्या तसेच एक चमचाभर होईल असे आल्याचे बारीक तुकडे करून घ्या हे दोन्ही सुद्धा एक ग्लासभर पाण्यामध्ये चांगले उखळा . आता हे पाणी इतके उकळा की त्यातील निम्मे पाणी कमी झाले पाहिजेत. आता हे मिश्रण तुम्ही सकाळी जेवण झाले की अर्ध्या तासानंतर घ्या . तसेच रात्री जेवणानंतर अर्ध्या तासानंतर दिवसातून दोन वेळा घ्या. यामुळे नक्कीच तुमच्या यूरिक ॲसिड मध्ये तुम्हाला फरक जाणवून येईल.
२) कारल्याचा ज्यूस-
कारल्याचा ज्यूस हा कडू जरी असला तरी प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणून मानला जातो. सकाळी उठून जर तुम्ही उपाशीपोटी करण्याचा ज्यूस पिला तर शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहिलंच त्याचप्रमाणे शरीरातील जे घातक पदार्थ आहेत ते सुद्धा बाहेर पडण्यास मदत होईल.
३) मध आणि हळद–
रात्री झोपताना जेवल्यानंतर कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि चिमूटभर हळद टाकून ते पाणी पिल्यास यूरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते. यामुळे छातीमध्ये दुखणे यासारख्या गोष्टींचा सुद्धा त्रास कमी होतो
४) लिंबू पाणी–
यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर अनुशेपोटी कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून प्या. त्यामुळे सुद्धा शरीरातील यूरिक ॲसिड कमी होण्यास फार मदत होईल.
यूरिक ॲसिड शरीरामध्ये जास्त वाढत असेल तर जास्तीत जास्त विटामिन सी असणारे अन्नघटक आपण आपल्या आहारामध्ये सामील केले पाहिजेत जसे की लिंबू, किवी, ऑरेंज इत्यादी
५) एप्पल साइडर विनेगर–
एप्पल साइडर विनेगर यामध्ये ऍसिटिक ऍसिड असते त्यामुळे त्याचा वापर आपण यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी करू शकतो. यासाठी दररोज सकाळी उठल्यावर अनुशेपोटी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा एप्पल साइडर विनेगार मिक्स करा आणि प्या.
हे सुद्धा वाचा –गरोदर पणा मध्ये काय खावे आणि काय टाळावे
६) पाणी
जर तुम्हाला यूरिक ॲसिड च त्रास वारंवार होत असेल तर. दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या. आपल्या शरीरातील भरपूर सारे आजार हे फक्त पाणी भरपूर पिल्यामुळे कमी होतात. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय औषधे घ्यायची नसतील तर दररोज पाणी पिल्यामुळे शरीरातील घातक घटक मूत्राद्वारे बाहेर फेकले जातील आणि तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही.
यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी खालील अन्य पदार्थ टाळा
यूरिक ॲसिड चा त्रास उद्भवत असेल तर ज्या अन्नपदार्थांमध्ये प्रोटीन जास्त आहे असे अन्नपदार्थ टाळावेत. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जास्त झाले की आपल्या किडनीवर भार येतो मग आपली किडनी हव्या त्या प्रमाणामध्ये यूरिक ॲसिड शरीराबाहेर फेकू शकत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात तयार झालेले यूरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये जमायला चालू होते. हे टाळण्यासाठी खालील अन्नपदार्थ त्रासांमध्ये खाऊ नका.
- तुरडाळ
- मशरूम
- अंडी
- उडीद डाळ
- फ्लॉवर
- राजमा
- अल्कोहोल
- मासे
- मटण
- कडधान्ये
- गोड पदार्थ
यूरिक ॲसिड मध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत.
- लिंबू
- नारळ पाणी
- पाण्याचा भरपूर वापर
- आले
- एप्पल साइडर विनेगर
- संत्री
- किवी
- हिरव्या पालेभाज्या
- ओट्स
- ब्रोकली
- ओवा
- कारले
- यूरिक ॲसिड शरीरामध्ये कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या मते दिवसाला 50 मिलिग्रॅम विटामिन सी शरीरामध्ये जाणे खूप गरजेचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त संत्रा लिंबू पाणी यांचा ज्यूस तुम्ही दिवसातून प्या.
यूरिक ॲसिड वाढण्याची कारण काय आहे?
सर्वप्रथम शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढण्याचे मेन कारण म्हणजे आपला unhealthy diet आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन तयार करत असतो.
कमी पाणी पिणे. आपला diet चांगला नसेल किंवा चांगला असेल तरी जर आपण पाणी कमी पीत असलो तर शरीरामध्ये भरपूर सारे आजार तयार होतात त्यामधील एक कारण म्हणजे शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढणे. भरपूर सारे पाणी पिल्यामुळे शरीरातील सारे घातक घटक बाहेर फेकले जातात. त्यामुळे आपली पचन संस्था चांगली राहते त्यामुळे दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दिवसाला तीन ते चार लिटर पाणी पिले पाहिजे.
भरपूर प्रमाणात मद्यपान करणे. मद्यपान हे शरीरासाठी नक्कीच खूप घातक आहे. मद्यपणामुळे किडनी च्या संबंधित आजार उद्भवू लागतात. तसेच युरिक ऍसिड वाढणे हे सुद्धा एक कारण आहे.
भरपूर साऱ्या प्रमाणात मांसाहार खाणे . पावसामध्ये जसे की मासे मटन यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात प्युरिन असते त्यामुळे शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढते.
भरपूर साऱ्या प्रमाणात वजन वाढणे. वाढत्या वजनामुळे सुद्धा आपली पचनक्रिया नीट काम करत नाही. त्यामुळे सुद्धा यूरिक ॲसिड शरीरामध्ये वाढू शकते.
मधुमेह यासारख्या आजारामुळे शरीरामध्ये यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. तसेच खूप सारे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे यूरिक ॲसिड चे प्रमाण शरीरामध्ये वाढते.
अपुऱ्या प्रमाणात झोप. झोपेचे शेड्युल बदलले की आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होऊन जातात. त्यामुळे बदलू न देता लवकर झोपावे आणि लवकर उठावे.
व्यायाम – अजिबात व्यायाम न करणे या चुकीच्या सवयीमुळे सुद्धा शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढू शकते. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. तुम्हाला व्यायाम करणे जमत नसेल तर कमीत कमी एक ते दोन किलोमीटर दररोज चालले पाहिजेत. व्यायामावर लक्ष केंद्रित करून आपण यूरिक ॲसिड कमी करू शकतो.
यूरिक ॲसिड शरीरामध्ये कसे तयार होते?
जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्युरीन्स हे एक रासायनिक पदार्थ यांचे विघटन होत असते म्हणजेच त्यांचे ब्रेकडाऊन होत असते. तेव्हा यूरिक ॲसिड तयार होते. Purins हा रासायनिक पदार्थ खूप साऱ्या अन्नपदार्थांमध्ये आढळतो जसे की मटन, मासे, तूर डाळ, अंडी, गोड पदार्थ तसेच अल्कोहोल यासारख्या अन्नपदार्थांमध्ये purin हा घटक आढळतो. असे अन्नपदार्थ जेव्हा आपण जास्त प्रमाणात खातो. तेव्हा purin खूप सार्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते.
आणि त्याचा परिणाम म्हणून आपले शरीरात त्याचे विघटन होते आणि यूरिक ॲसिड तयार होते.
आता हे रक्तातील यूरिक ॲसिड आपल्या लघवीद्वारे बाहेर पडते. पण जर हे यूरिक ॲसिड जास्तच प्रमाणात आपल्या बॉडी मध्ये तयार झाले तर शरीर हे यूरिक ॲसिड बाहेर काढून टाकण्यास असमर्थ ठरते. तेव्हाहे जास्तीचे यूरिक ॲसिड शरीराच्या एका भागात जमा होते आणि गाऊट ( gaut )तयार होतो.
हे टाळण्यासाठी आपण योग्य असा संतुलित आहार करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे कोणताही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर भरपूर सारे पाणी पिणे खूप आवश्यक आहे. भरपूर पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील 70 टक्के आजार कमी होतात
शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढण्याची लक्षणे कोणती आहेत
१) पायाच्या जॉईंट्स मध्ये सूज येणे
२) जॉईंट्स मध्ये तीव्र न सोसण्यासारख्या कळा येणे.
३) जॉईंट्स मध्ये सूज असल्यामुळे अधून मधून ताप येणे.
४) यूरिक ॲसिड मुळे मुतखड्याचा त्रास सुद्धा उद्भवू शकतो.
५) या मुतखड्याच्या त्रासामुळे पाठ दुखी उद्भवू लागते. सारखे लघवीला होण्यासारखे वाटणे. लघवी मधून रक्त येणे.
६) मळमळ उलटी येणे याचा त्रास होतो.
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!