Varkari pension Yojana Maharashtra/आता वारकऱ्यांना ही मिळणार पेन्शन

Varkari pension Yojana Maharashtra:आपल्या महाराष्ट्र सरकारकडून विविध क्षेत्रात जसे की शेती, बांधकाम, मोलमजुरी करणारे क्षेत्र, स्त्रियांसाठी सर्वांगीण विकास करणारे क्षेत्र, शिक्षण , मागासवर्गीय आर्थिक दृष्टीने कमी असणारे लोक यांच्यासाठी दरवर्षी आगळ्या वेगळ्या योजना आखत असते. समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास होणे खूप गरजेचे असते तेव्हाच कुठे जाऊन आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास निश्चित ठरतो.

वारकरी संप्रदाय हा आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भक्ती वर्ग आहे. दिवसेंदिवस वाढणारा हा वारकरी समाज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये सामावला आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा विकास करण्याच्या हेतूने तसेच वारकरी संप्रदायातील लोकांना आपला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा वर्षानुवर्षे असाच पुढे घेऊन जाण्यासाठी चालना देणे खूप महत्त्वाचे आहे. पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्रातील एक अग्रस्थानी असलेले पवित्र तीर्थस्थळ आहे. पंढरपूर सारख्याच अजून पवित्र तीर्थक्षेत्रांचा विकास करणे हे उद्दिष्ट घेऊन आपल्या सरकारकडून ही योजना आखण्यात आलेली आहे.Varkari pension Yojana Maharashtra

varkari pension Yojana Maharashtra

भक्तीचे माहेरघर असलेल्या पंढरी मध्ये आषाढी एकादशी निमित्त  महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा भरते आणि दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरपूरला भेट देतात. यामध्ये हजारो भाविक दरवर्षी चालत  पंढरपूरला जातात. यामध्ये दर महिन्याला पायी वारी करणारे   भरपूर सारे विठ्ठल प्रेमी आहेत.  तर त्यांचा विचार करून आपल्या महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना आणली आहे.

पंढरपूर सारखेच अन्य तीर्थक्षेत्रावर दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत चाललेली आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे , तीर्थक्षेत्रावरील प्रदूषण सुद्धा वाढत चाललेले आहे, वाढत्या गर्दीमुळे पवित्र नद्यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे जेव्हा पंढरपूरची आषाढी एकादशीची यात्रा झाल्यानंतर खूप सारे लोक आजारी पडतात ते फक्त प्रदूषणामुळे आणि खालवत चाललेल्या पाण्याच्या दर्जामुळे त्यामुळे आपल्या या पवित्र तीर्थस्थळावरील पवित्र नद्यांचे पावित्र्य जपून ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि हे छोट्या स्तरावरती होणारे काम नाही यासाठी नीट नियोजन करून, व्यवस्थापन करून सर्वा नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे वारकरी पेन्शन योजना ही फक्त वारकऱ्यांना पेन्शन देण्यापुरताच मर्यादित नसून पवित्र तीर्थक्षेत्रांचा उद्धार करणे, नद्या प्रदूषण मुक्त करणे यासारख्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे निश्चितच या योजनेचा सर्वांनाच पुरेपूर फायदा होईल.

तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आपल्या   पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक योजना आखली आहे ती म्हणजे ” वारकरी महामंडळाची “स्थापना करण्याबाबत घोषणा केलेली आहे. राज्य मंडळाच्या बैठकीमध्ये 11 जुलै 2024 या रोजी या वारकरी महामंडळाच्या स्थापनेचा विचार करण्यात आला. Varkari pension Yojana Maharashtra

varkari pension Yojana Maharashtra

   या वारकरी महामंडळाच्या अंतर्गत जे वारकरी दर महिन्याला पायी वारी करतात त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात पेन्शन चालू होईल. यामुळे नक्कीच वारकऱ्यांना एक आधार भेटणार आहे. दरवर्षी दिवसेंदिवस पायी वारी करणाऱ्या लोकांच्या मध्ये वाढ होत चाललेली आहे. तर त्यांचे योग्य प्रकारे नियोजन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांना आरोग्य सोयी, स्वच्छता या सगळ्या गोष्टींचा वारकरी महामंडळा मार्फत नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पायी चालत जाणाऱ्या  पालखी मार्गाचे सुद्धा नियोजन करणे खूप गरजेचे आहे

. दर महिन्याला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा कवच देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. कारण वाढते रस्त्यावरील अपघात लक्षात घेऊन या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. तसेच भजनासाठी लागणाऱ्या प्राथमिक वस्तू म्हणजेच टाळ, मृदंग वीणा, तबला, यांसारख्या वस्तूंना सुद्धा अनुदान भेटत असल्यामुळे आपला वारकरी संप्रदाय अजूनच विठुरायाच्या भजनामध्ये दंग होईल.( Varkari pension yojana maharashtra)
  

या वारकरी मंडळाचे मुख्य कार्यालय पंढरपूर मध्ये असेल. तसेच यासाठी निवृत्त अधिकारी तसेच सेवेमधील अधिकारी या मंडळाचा कार्यभार सांभाळतील. या वारकरी महामंडळासाठी आपल्या महाराष्ट्र सरकार कडून 50 कोटीचे अनुदान देण्यात येईल. या वारकरी महामंडळाच्या  स्थापनेमुळे पंढरपूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील जे अजून पवित्र तीर्थक्षेत्र आहेत त्यांचाही विकास व्हायला मदत होईल. आजकाल वारकरी संप्रदायामध्ये दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येबरोबरच पवित्र तीर्थक्षेत्र या ठिकाणी प्रदूषण सुद्धा वाढत चाललेले आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचे नियोजन योग्य रीतीने करणे खूप गरजेचे त्यामुळे या वारकरी महामंडळा अंतर्गत ज्या काही योजना राबविण्यात येतील त्या महत्त्वाच्या भुमीका  निभवणार आहेतVarkari pension Yojana Maharashtra

varkari pension Yojana Maharashtra

वारकरी महामंडळातील महत्त्वाच्या योजना पुढील प्रमाणे

  • वारकऱ्यांना आरोग्य  विमा  योजना पुरवली जाणार.
  • चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी या नद्यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे तर त्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी  उपाय योजना केल्या जातील
  • पंढरपूर ,आळंदी, देहू, कोल्हापूर, सासवड ,पिंपळनेर, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव, संत सावता माळी समाज मंदिर , अरण. (तालुका माढा, जिल्हा सोलापूर) अशा या महाराष्ट्रातील प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची उद्दिष्टे.
  • टाळ , मृदुंग,विणा, तबला यासारख्या प्रमुख भजनासाठी लागणाऱ्या साहित्यांना अनुदान देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जे पालखी चे सारे मार्ग असतील, त्या मार्गामध्ये सुधारणा करणे तसेच जागोजागी आरोग्य सुविधा पुरवणे, त्याचबरोबर स्वच्छता आणि निवारा या सगळ्यांचे नियोजन करणे.

येथे वाचा👉 शिलाई मशीन योजना 2024

Varkari pension Yojana Maharashtra

varkari pension Yojana Maharashtra

वारकरी महामंडळाचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे

  • महाराष्ट्रातील प्रमुख आणि पवित्र तीर्थस्थळांचा प्रामुख्याने विकास करणे
  • वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन देणे.
  • वारकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा पोहोचवणे.
  • पायी वारीला प्रोत्साहन देणे.
  • वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देणे.
  • वारकरी समाजाच्या अडी अडचणी वर मार्ग काढणे.
  • तीर्थक्षेत्रामधील प्रदूषण कमी करणे. तसेच नद्यांचे होणारे प्रदूषण थांबवणे.
  • ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरेला चालना देणे

(varkari pension Yojana Maharashtra)

महाराष्ट्र सरकारची अधिकृत माहिती –

वारकरी मंडळाचे फायदे पुढील प्रमाणे

१) महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्रांचा संस्कृतीचा वारसा जपणे.

२) या योजनेमुळे वारकऱ्यांना आर्थिक मदत होईल. वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागेल.

३) चंद्रभागा , इंद्रायणी, गोदावरी नदी यासारख्याच अन्य नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांना प्रदूषण मुक्त करणे, आणि पाण्याचे व्यवस्थापन करणे याच्या फायद्यासाठी ही योजना नक्कीच फायदेशीर ठरेल.

४) महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्रांचा विकास या योजनेमुळे शक्य होईल.

५) पायी वारी करणाऱ्या वारकरी मंडळींना सुरक्षा देणे म्हणजेच त्यांना काही वैद्यकीय अडचण आल्यास त्या पुरवणे, पाई वारी करताना विमा सुरक्षा देणे अशा पायाभूत सुविधा या योजनेमुळे राबवल्यामुळे वारकरी चिंतामुक्त होईल .

६) भजनासाठी वापरात येणारे साहित्य खराब झाले असेल तर ते नवीन घेण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी या योजनेअंतर्गत वारकऱ्यांना शक्य होईल.

७) वारकऱ्यांना वारीला जाताना पायी मार्गावर याच्या अगोदर पाण्याचे नीट व्यवस्थापन नव्हते पण या योजनेमुळे पायी मार्गावर जाताना पाण्याचा वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, तसेच प्यायचे पाणी प्रदूषण मुक्त वारकऱ्यांना उपलब्ध करून देणे यामुळे फायद्याचे होईल.

८) पंढरपूरला जाणाऱ्या वाढत्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन वारीला जाताना रस्त्यावरती त्यांना कोणती दुखापत झाली असेल, किंवा शारीरिक कोणताही त्रास झाला असेल तर त्यांना वैद्यकीय सुविधा पोहोचवणे, तसेच त्यांना विमा उपलब्ध करून देणे, या योजनेमुळे फायदेशीर ठरेल.

९) आपले वारकरी चिंतामुक्त होऊन पायवारी करतील.

१०) वृध्दाप काळात त्यांना आर्थिक मदत होईल आणि आर्थिक हातभार लागेल.

varkari pension yojana maharashtra

‌ येथे वाचा– मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना २०२४

तुम्हाला नवनवीन निबंध वाचन करायला आवडत असेल तर खाली निबंध लेखनाची लिंक दिली आहे ,नक्की वाचा आणि तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

नवनवीन निबंध येथे वाचा

संत विचार काळाची गरज

छत्रपती शिवाजी महाराज असते तर मराठी निबंध

महाराष्ट्र माझा मराठी निबंध

श्यामची आई मराठी निबंध

माझा आवडता सण रक्षाबंधन

बाबा तुम्ही ग्रेट आहात मराठी निबंध लेखन

राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध लेखन

मी सरपंच झालो तर