Nibandh on pavsala in Marathi : पावसाळा मराठी निबंध

Nibandh on pavsala in marathi

Nibandh on pavsala in Marathi -पहिला पाऊस म्हणजे आनंद. रखरखत्या उन्हात मनाला तजेदार  पणा देणारा पाऊस म्हणजे आपण कित्येक महिने आतुरतेने वाट पाहत असतो. रखरखत्या उन्हात जेव्हा उष्णतेने आपल्या अंगाची लाही लाही होते तेव्हा आठवतो तो म्हणजे पाऊस. कारण पावसामुळे मनाला शरीराला थंडावा मिळतो. इतकच काय तर आपली धरती माता नेहमीच वाट पाहत असते ते म्हणजे पावसाची.
 

जून महिना सुरुवात झाला की शेतकऱ्यांपासून ते आपल्या धरणीमातेपर्यंत सगळेजण आकाशाकडे   डोळे लावून बसलेले असतात. पावसाचे नक्षत्र कुठे लपून बसलेले आहे याची चाल सगळ्यांना लागून असते.  पाऊस यासाठी थोडा जरी उशीर झाला तर त्य वरूणराजाची पूजा केली जाते.  जमीन नांगरून बसलेला शेतकरी आणि पाऊस याची नाते म्हणजे काय विचारायलाच नको. आपल्या धरणी मातेच्या पोटात वरून राजाने येऊन पावसाने तिचं पोट भरावा आणि तिला तृप्त करावं. इतकीच आशा ही शेतकऱ्याची असते. पाऊस असेल तर आपल्या शेतात धान्य पिकेल आणि धान्य पिक्चरच आपले पोट भरेल. म्हणून आपल्या आयुष्यात पाऊस हा खूप महत्त्वाचा आहे.

Nibandh on pavsala in Marathi : पावसाळा मराठी निबंध

Nibandh on pavsala in Marathi :  पावसाळा मराठी निबंध
Nibandh on pavsala in Marathi : पावसाळा मराठी निबंध

हे सुद्धा वाचा – शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध

पावसाची सुरुवात झाली की, सगळीकडे अंधाराने आणि भरून येते. सोसाट्याचा वारा  इकडून तिकडे वाहू लागतो. आणि मग त्या सोसाट्याच्या वाऱ्यांच्या झळा मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. पावसाची सुरुवात झाली की मोर सुद्धा आनंदाने थुई थुई नाचू लागतो. मग त्याचा  पिसारा फुलवून नाचण्याचा आनंद गगनात मावत नाही,. पावसाबरोबर येणाऱ्या पहिल्या गारा टप टप केव्हा धरती वरती येऊन पोहोचवतात. तेव्हा त्याचा आवाज ऐकण्या जोगा असतो.  पावसाअभावी वाळलेले धबधबे पावसाच्या येण्याने तुडुंब भरून वाहत असतात.पावसामुळे धबधब्यांसारखेच नदी, नाले ,छोटे ओढे खळखळून वाहू लागतात. पावसामध्ये निसर्गामध्ये होणारी इंद्रधनुष्याचे उधळण म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच .

धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे धरणी माता मात्र तृप्त होते. आणि त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीतला वरील सर्व झाडे झुडपे, पाना फुलांनी भरून जातात.  तिच तिच्या आनंदाची पोच पावती असते. पावसामुळे  सर्व सृष्टीत हिरव्या रंगाची झालेली उधळण आपल्याला पाहायला भेटते. या हिरव्या रंगांच्या उधळणामध्ये इतक्या छटा दडलेल्या असतात की कुठे गर्द हिरव्या तर कुठे पोपटी छटा  तर कुठे प्रसन्न करणारा विविध फुलांच्या छटा. हे सारे सृष्टीचे  नाविन्य बघण्याजोगे असते. हा साक्षात्कार होतो तो म्हणजे फक्त पावसामुळेच.  पावसाळा चालू झाला की सगळे लोक पावसाळी सहलीसाठी बाहेर पडतात. कारण पावसाची संगत आणि निसर्गाचा साक्षात्कार यांचा मिलाप पाहायला भेटतो.

पाऊस पडून गेल्यानंतर आजूबाजूच्या वातावरणामध्ये झालेला कायापालट ‌ हा बघण्यासारखा असतो. सारी सृष्टी ही नववधू सारखी नटलेली असते. सगळे वातावरण या चैतन्यमय आणि आनंदाने भरून गेलेले असते. शेतकऱ्यांचे खरे सुख म्हणजे पाऊसच.  कधीकधीजास्त पाऊस पडला तर शाळांना सुद्धा सुट्टी भेटते . त्यामुळे लहान मुलांना देखील पावसाची ओढ लागलेली असते. पावसाची सुरुवात म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि श्रावण चालू झाले म्हणजे आपले सारे सण यांचे देखील सुरुवात होते. त्यामुळे सगळीकडचे वातावरण सण आणि प्रसन्न वातावरणामुळे अधिकच चैतन्य मय होते. एकदा पुरेसा पाऊस पडून गेला तर मग वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटून जाते.

पावसामुळे हवेतील उष्णता कमी होते. पावसामुळे मोठी मोठी धरणे पाण्याने पूर्ण भरली जातात. आणि या पाण्यावरती वीज उत्पादन सुद्धा केले जाते. पावसामुळे झाडांना नव संजीवनी भेटते त्यामुळे वाढत्या झाडांच्या प्रमाणामुळे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण कमी होते आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचे कित्येक फायदे आहे त्याचा पण विचार पण करू शकत नाही. जमिनीची सुपीकता पाण्यामुळे तर टिकून राहते. आणि त्यामुळे अन्नधान्याची पिकाचे उत्पादन वाढते. 

हे सुद्धा वाचा – रक्षाबंधन मराठी निबंध
      

कधी कधी पाऊस इतका कोसळतो की घराबाहेर पडणे शक्य होत नाही. पण माणसाला दिलासा भेटतो तो म्हणजे फक्त पावसामुळेच. श्रावणातील पावसा मध्ये तर ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन अगदी हरपून जाते ‌. पावसामुळे फक्त मनुष्य आणि पृथ्वीच्या आयुष्यातच नाही तर पशुपक्षी यांच्या सुद्धा आयुष्यात चैतन्य अगदी ओसंडून वाहत असते. पावसाच्या पहिल्या थेंबाने सुकलेल्या धरणीमात अगदी सुगंधी होऊन जाते. या सुगंधाची जागा कोणताच महागडा परफ्युम घेऊ शकत नाही. निसर्गात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. पावसाच्या थेंबांनी सुकलेली झाडे फुले प्रफुल्लित होतात. पावसाची ओढ काय असते हे त्याचातक पक्षाला विचारा. पावसाच्या एका थेंबासाठी तो वर्षभर वाट पाहत असतो.
   

  पण कधीकधी पाऊस मात्र याची जाणीव करून देते की पाणी हे जरी जीवन असले तरी त्याचा अतिरेक झाला तरी ते मनुष्याच्या आयुष्याला किती घातक ठरू शकते. आजकाल दिवसेंदिवस होणाऱ्या वाढत्या पावसामुळे सगळीकडे महापुराची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. इतका पाऊस पडतो आहे की माणसाचे जनजीवन विस्कळीत होत चाललेले आहे. अतिरिक्त पावसामुळे जागोजागी पाणी साचते तसेच वाहतूक ठप्प होते. अति पावसामुळे रोगराईला निमंत्रण भेटते. पावसामुळे कित्येक भयानक आजारांच्या साथी पसरलेले आहेत हे आपण पाहत आहोत. एकदा महापूर येऊन गेला की छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांचे पूर्ण गणितच बिघडून जाते.

इतकेच काय तर कित्येक जण आपले आयुष्य या पावसामुळे गमावून बसलेले आहेत. त्यामुळे हे मात्र नक्कीच ती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही.
      

दिवसेंदिवस प्रमाणापेक्षा जास्त पडणाऱ्या पावसाला माणूसच जबाबदार आहे. वाढत्या प्रमाणात होणारे प्रदूषण याला कुठेतरी जबाबदार आहे ‌ .तसेच भरपूर साऱ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे त्यामुळे देखील याचा पावसा वरती खूप मोठा परिणाम होत आहे. कधी कधी पाऊस अजिबात पडत नाही कारण पावसासाठी लागणारे अनुकूल वातावरण मानवी हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस बदलत चाललेले आहे.

झाडांची संख्या कमी होत आहे त्यामुळे पाऊसाचे प्रमाण देखील कमी होत आहे.  कित्येक भागात आपण दुष्काळ पाहत आहोत. आणि ज्या भागात दुष्काळ आहे तो भाग नेहमीच आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या राहतो. कारण पावसाअभावी कोणत्याही प्रकारचे पीक आपण करू शकत नाही.  आणि त्यामुळे पाऊस नसलेला भाग हा कायमच आर्थिक दृष्ट्या मागासलेला राहतो. पावसा अभावी दुष्काळ जर आपल्याला थांबवायचा असेल तर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या प्रकल्पांना हातभार लावला पाहिजे.

पाऊस  दोन ते तीन महिने सोडून जातो पण मानवी जीवनाला वापरासाठी लागणारे पाणी  वर्षभरासाठी देऊन जातो.तुडूंब पडणाऱ्या पावसामुळे   नाले तसेच गटारांची स्वच्छता होते. मोठ्या मोठ्या वस्तू आरामात पावसामुळे स्वच्छ होऊन निघतात.म्हणून पाऊस हा कायमच माझा आवडीचा आहे. पावसा वरतीच आपले  आयुष्य आहे.

शेतकऱ्याची संपूर्ण आयुष्य तर फक्त पावसावरती अवलंबून आहे. जास्त पाऊस पडला तर पिकांचे नुकसान होते. आणि जर पाऊसच पडला नाही तर शेतामध्ये पिकाची निर्मिती होत नाही. त्यामुळे एका विशिष्ट प्रमाणात पाऊस पडणे हे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहे. तांदूळ या पिकाचे उत्पन्न उत्तर फक्त पावसावरती अवलंबून आहे. पावसाचे वातावरण पाहूनच शेतकरी राजा भात पेरतो.. पीक चांगले आले तरच शेतकऱ्याचे भरभराट होते ‌. तांदळाप्रमाणेच हो कापूस, गहू ,ऊस यांचे सुद्धा उत्पादन अवलंबून आहे ‌ ते फक्त पावसावरच.

म्हणून पाऊस हा कायमच माझा आवडीचा आहे. पावसा वरतीच आपले  आयुष्य आहे. कारण पाणी आहे तर जीवन आहे आणि हे सारे शक्य आहे ते फक्त पावसामुळेच.( Nibandh on pavsala in Marathi)

पावसावरती कविता