Shankarpali recipe Marathi :दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आता सगळीकडे लग बग सुरू होते ती म्हणजे फराळाची . तर अशाच फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीची शंकरपाळी अचूक प्रमाणात आणि कमी तेलकट कशी बनवायची हे आता आपण पाहूयात.खाली दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी करून बघितली तर ती अजिबात चुकणार नाही आणि कमी तेलकट तर होईलच त्याचप्रमाणे शंकरपाळीच्या प्रत्येक पाकळ्या सुद्धा फुलून येतील. आणि हातामध्ये घेऊन ते कुस्करली तर तुम्हाला अतिशय खुसखुशीत वाटेल तर शंकरपाळी करताना अचूक प्रमाण आणि खूप सोप्या अशा टिप्स पुढे दिलेले आहेत तर पूर्ण लेख नक्की वाचा. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तर चला आता आपण पाहूयात शंकरपाळीसाठी कोणकोणते साहित्य लागते. खालील शंकरपाळी चे प्रमाण अर्धा किलो साठी घेतलेले आहे.
Shankarpali Recipe Marathi : हाताने पदर मोजता येतील इतक्या खुसखुशीत शंकरपाळी
शंकरपाळी साठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे
- पाऊण कप साखर
- पाऊण कप दूध किंवा पाऊण कप पाणी
- चार कप मैदा
- अर्धी वाटी साजूक तूप
- चवीनुसार वेलची पावडर
- चवीनुसार मीठ ़
शंकरपाळी पाककृती
सर्वप्रथम एकच कप मेजरमेंट साठी सर्व पदार्थांना वापरायचा आहे. एकाच कपाने सगळे साहित्य मोजून घ्यायचे आहे. तर चार कप मैदा आपण चाळणीने चाळून परातीमध्ये घ्यायचा आहे.
आता दुसरीकडे पाऊण कप दुधामध्ये किंवा पाऊण कप पाण्यामध्ये पाऊण कप साखर गॅस वरती वितळवण्यासाठी ठेवणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या हे पाणी उखळायचे नाही फक्त पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये साखर वितळेपर्यंत गरम करायचे आहे.. आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. हे मिश्रण गरम करताना मंद आचेवर गरम करा.
आता आपण जे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले आहे. ते कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. आणि हे कडकडीत तूप मैद्यामध्ये ओतायचे आहे. हे तूप आपल्या हाताने सर्व मैद्यामध्ये एकत्रित करून घ्यायचे आहे मैद्याच्या पिठाला हे तूप चांगले प्रकारे एकजीव झाले पाहिजेत . याची काळजी घ्या.
आता पाणी केव्हा दूध यामध्ये जी आपण साखर वितळलेली आहे ते आता या मैद्याच्या पिठामध्ये होता आणि हलक्या हाताने पीठ मळून घ्या. पीठ मळताना अतिशय हलक्या हाताने मळा म्हणजे शंकरपाळी जेव्हा आपण तळून तेव्हा त्याला चांगले पदर सुटतील.
हे सुद्धा वाचा – हॉटेल सारखा पनीर बटर मसाला आता करा घरच्या घरी
पीठ मळताना जर तुम्हाला हे पीठ थोडेफार कोरडे वाटत असेल. तर पाण्याचा किंवा दुधाचा हलका हात पिठावरती फिरवू शकता.
आता आपण या कणकेची पोळी लाटून घेणार आहोत. ही पोळी साधारणता जाडसर लाटावी. जास्त पातळ लाटू नये त्यामुळे शंकरपाळ्या तळताना त्याला जास्त पदर सुटणार नाहीत. आणि पोळी लाटताना हलक्या हाताने पोळी लाटावी.
आता सुरीच्या मदतीने पोळीला आपण उभ्या आणि आडव्या तुम्हाला जशा आकारामध्ये हवे आहेत त्या आकारामध्ये कट करून घ्यावेत.
आता आपण एका मोठ्या कढईमध्ये कढई भरून तेल घेणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण शंकरपाळी तळून तेव्हा त्या पूर्णपणे त्यामध्ये बुडून जातील. चौकोनी आकारामध्ये कट केलेल्या शंकरपाळ्या तेल गरम झाल्यानंतर तळून घ्यायचे आहे.
तेलामध्ये शंकरपाळ्या तळताना त्या मंद आचेवरती तळाव्यात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्या परतून आहेत दोन मिनिटानंतर त्या शंकरपाळ्या परताव्यात. असे केले तरच शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळणार नाही.
पाच ते दहा मिनिटानंतर शंकरपाळे हलका ब्राऊन कलर झाल्यानंतर बाहेर काढायचे आहेत.
अशाप्रकारे दिवाळी स्पेशल आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत.
अशाप्रकारे दिवाळी स्पेशल आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. वरील दिलेल्या प्रमाणामध्ये आणि खाली ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्यांचा वापर करून जर तुम्ही शंकरपाळी बनवला तर ती अजिबात शकणार नाही आणि अतिशय तेलकट सुद्धा होणार नाही त्याचबरोबर भरपूर असे पदर शंकरपाळीला सुटलेले तुम्हाला दिसतील. फक्त तुम्ही जे प्रमाण घेणार आहात ते बरोबर आणि एकाच वाटिने घ्या.
आता आपण शंकरपाळ्या करताना छोट्याशा टिप्स पाहूया ज्यामुळे आपली रेसिपी अजूनच छान होईल. कारण काही अशा टिप्स असतात ज्या माहिती नसल्यामुळे आपली रेसिपी चुकते पण या छोट्या ट्रिक्समुळे आपली रेसिपी अगदी छान जमते तर चला मग शंकरपाळे यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हे आपण पाहूयात .
शंकरपाळी करताना टिप्स. कोणत्या वापराव्यात?
शंकरपाळी करताना पाण्याऐवजी शक्यतो दुधाचा वापर करा त्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होण्यास मदत होईल.
शंकरपाळी मध्ये वेलची आणि जायफळ यांचा वापर नक्की करा त्यामुळे एक प्रकारचा छान वास शंकरपाळीला येईल.
शंकरपाळी चे पीठ मळताना अगदी हलक्या हाताने मळावे. पीठ जास्त आकुंचित होणार नाही आणि शंकरपाळीला पदर छान सुटायला मदत होईल.
पाण्यामध्ये किंवा साखरेमध्ये साखर वितळताना ते जास्त कडकडीत करू नका.
शंकरपाळी ची पोळी लाटत असताना ती अगदी हलक्या हाताने लाटा.
जेव्हा आपण शंकरपाळी तळायला घेतो तेव्हा जास्त तेलाचा वापर करा आणि शंकरपाळी पहिल्यांदा तेलामध्ये सोडताना तेल जास्त कडकडीत गरम झाले नाही याची काळजी घ्या कारण जर जास्त कडकडीत झाले तर शंकरपाळी चे पदर सुटण्यास मदत होणार नाही.
अगदी हलक्या मंद आचेवर शंकरपाळी तळून घ्यावी. जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये सोडतो तेव्हा लगेच त्याला चमच्याने हलवू नये. थोडा वेळ शंकरपाळे सेट होण्यासाठी वेळ द्यावा. मग दोन मिनिटांनी शंकरपाळी दुसऱ्या बाजूला परतवावी.
शंकरपाळी तळण्याच्या पूर्ण प्रोसेस मध्ये मंद आचेवर शंकरपाळी तळली तर आतून शंकरपाळी कच्ची राहणार नाही.
जर तुम्ही शंकरपाळी खूप काळी तळली तर ती खायला पळपट लागते आणि जर लगेच तेलातून बाहेर काढली तर ती आतून कच्ची राहते. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर एक शंकरपाळी तेलातून काढून ती आतून भाजलेली आहे की नाही हे चेक करा आणि मगच साऱ्या शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढा.
शंकरपाळी मध्ये दुध साखर किंवा पाणी आणि साखरेचे मिश्रण खूप गरम असताना मिक्स करायचे नाही. त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार नाही.
इतर फराळ करताना कोणत्या टिप्स वापराल?
१) बेसन चे लाडू करताना जे आपण लाडूसाठी पीठ वापरणार आहोत ते जाडसर वापरा. आणि लाडू करताना आपण पीठ भाजणार आहोत ते चांगले भाजावे नाहीतर लाडू हाताने कच्चे लागतात आणि आपल्या तोंडामध्ये चिकटतात
२) दिवाळी सणासाठी फराळ मध्ये चिवडा करताना त्यामध्ये वापरणारी लसूण ही ठेचून घाला. त्यामुळे त्याचा स्वाद अजून जरा चिवड्यामध्ये उतरेल जर लसुन मिक्सरला लावली तर त्याची चव कमी होते. तसेच जर तुम्ही कच्चा चिवडा करत असाल तर त्यामध्ये वापरणारी लसूण ही चांगली खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजा जर लसूण कच्ची राहिली तर त्यामधील पाणी हे चिवड्यामध्ये उतरते आणि चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते.
३ काही जण चिवड्यामध्ये पूर्ण साखर तशीच पसरवतात असे न करता त्याची पिठीसाखर करून चिवड्यामध्ये वापरावे असे केल्यामुळे साखर सगळीकडे लागते. जर तसेच साखरेचे दाणे टाकत असाल तर ते पूर्णपणे वितळत नाही आणि एकसमान चिवड्याला चव येत नाही.
४) चकली तेलामध्ये तळताना जेव्हा तुम्ही चकली तेलामध्ये टाकतात तेव्हा गॅसची आच मोठी असावी. एकदा चकली टाकली आणि ती छान एक मिनिटापर्यंत सेट झाली त्यानंतर मग मंद आचेवर पूर्ण चकली भाजून घ्यावी असे केल्यामुळे चकली तुटणारही नाही आणि आत मधून कच्ची सद्धा राहणार नाही.
५) चकलीचे पीठ करताना त्यामध्ये थोडे साबुदाणे घातले की चकली छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आणि ती तळताना अजिबात तुटत नाही.
६) चकलीच्या पिठामध्ये थोडे जाडे पोहे वापरले तर चकली छान हलकी आणि खुसखुशीत होते.७)
७) चकलीचे पीठ मळताना ते थोडे घट्ट मळा जास्त पातळ करू नका त्यामुळे चकलीला छान काटे येतील. आणि चकली थोड्या दिवसानंतर मऊ सुद्धा पडणार नाही.
Hello!! My name is Jeanine
I love to eat, travel, and eat some more! I am married to the man of my dreams and have a beautiful little girl whose smiles can brighten anyone’s day!